डोळ्यांच्या शस्त्रक्रिये नंतर जेव्हा त्या मुलाने आपल्या आईला पहिल्यांदा स्पष्टपणे पाहिले
हा क्षण माणसाला भावु��� करणारा आहे
आईसाठी यापेक्षा अधिक काही असूच शकत नाही!!!
आईच्या आनंदाला सीमा नाही, जणू संपुर्ण जग जिंकल्याचा भाव तिच्या चेहर्यावर दिसत आहे...
एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्य���वर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितक�� अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो.
ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन ��ण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात.
मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही.
त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार सं��ाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही.
मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे.
असो..
माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन���मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही.
त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद 🙏
राज ठाकरे ।
एक तथाकथित विशितले बाबा आहेत. ते चमत्कार दाखवतात, चिठ्ठी काढून भविष्य सांगतात, आलेल्या लोकांच्या समस्या ओळखुन दाखवण्याचे ( हातचलाखीचे) प्रयोग करतात, एकेकाळी साध्या खोलीत टेबल फॅन लाऊन ओपीडी काढणारे आता चार्टर्ड फ्लाईट घेऊन विदेश वारी करतात, त्यांना भविष्याचा अचुक वेध घेता येतो, तंतोतंत माहिती असते असा दावा करतात. तर त्यांनी एक यात्रा काढली आहे त्या यात्रेत म्हणे लोक भाड्याने आणले��्या गाद्या घेऊन सकाळी निघुन जातात. अशा २५००० गाद्या लोकांनी पळवल्याचे या महाराजांना कळले ते कसे तर हे स्टेजवर बोलत असताना त्यांना संबंधितांनी चिठ्ठी पाठवली म्हणुन, मग त्यांनी लोकांना तसे न करणेबाबत आवाहन केले ! ज्यांना स्वतःच्या गाद्या चोरीला गेल्याचे दुसऱ्याकडून कळते, जे ते होण्यापासून थांबवू शकत नाहीत ते काय डोंबलाचे तुमचे भविष्य पाहणार आणि काय त्यावर डोंबलाचा उपाय करणार !
आमचे ए��� मित्र उद्योग व्यवसायात आहेत. पहिली पंधरा वीस वर्षे भरभराटीची गेल्यावर गेल्या चारपाच वर्षांपासून जरा नरमगरम काम चालु आहे म्हणुन ते अलीकडे कायम चिंतेत, काळजीत, दुःखात असतात. एकदा मी अचानक म्हणुन त्यांच्या घराकडून चाललो होतो म्हणुन त्यांना भेटायला गेलो तर त्यांच्याकडे कोणीतरी एक दाढीवाला मुल्ला की मौलवी संपुर्ण गेटअप आणि तामझम घेऊन बसला होता. मला बघून माझ्या मित्रासह ते सर्व जरा चपापलेच. मी त्याला म्हणलो अरे हे काय आहे ? तर तो म्हणे हे म���ठे फकीर आहेत आणि यांनी भल्याभल्यांना तोडगा काढून दिल्यामुळे अनेक लोक अफाट यशस्वी झालेत. मग मी मोर्चा त्या फकिराकडे वळवला. तो मला सांगु लागला काहीतरी बगदादा की कुठले बडे खा साहेब कसे जिन्न आहेत आणि त्यांच्या काय शक्ती असतात आणि ते कसे त्याचे अंगात येऊन लोकांच्या अडचणी दुर करण्यात त्याला मदत करतात वगैरे. मी म्हणलं तु पहिले तुझी इथली धोपटी उचलुन पळतो का तुला आ��ी खर्चापाणी आणि नंतर पोलिसात देऊ. बिचारा ढुंगणाला पाय लावून पळाला.
मग माझ्या मित्राला म्हणलो अरे बाबा गेली वीसेक वर्ष तु धूमधडाक्यात बिझनेस केलास, प्रचंड यश मिळवलंस पण आता काही काळापासून जरा धंदा मंद आहे. पण तुझा व्यवसाय हा निर्यातीशी संबंधित आहे आणि गेल्या पाच सहा वर्षांपासून आधी अस्मानी आणि आता सुलतानी संकटामुळे ग्लोबल सप्लाय चेन डिस्टर्ब झाल्याने तुझ्यासारखे अनेक ( एकेकाळी तोडफो��� कामगिरी केलेले ) आता स्ट्रगल करत आहेत. आता त्यात हा धोपटीवला भामटा काय करणार ? त्याच्यात काही शक्ती असती तर तो अशी जादूचे प्रयोग दाखवून ठगी करत कळकट अवस्थेत कशाला जगला असता. आणि तो कोण बडे खा साहेब बगदाद वाला जिन्न त्याच्या इराकमधेच एवढ्या समस्या गेल्या तीसेक वर्षापासून आहेत तिकडेच का जादु चालवत नाही आणि त्या लोकांना सुखी करत नाही ?
तुझ्या ज्या काही समस्या आहेत त्यावर एकच व्यक्ती मार्ग काढू शकतो तो म्हणजे तुच! मग स्वतःच स्वतःवर काम कर, या भामट्यांच्या घश्यात पैसे कशाला घालतो.
अडीअडचणीत असलेल्या लोकांना गाठून त्यांना उल्लू बनवून शोषण करणाऱ्यांचे अफाट पिक आले आहे सध्या.
डॉ प्रशांत भामरे
'जगन रेप कर' असं जगनला कोणी शिकवत नाही, हे खरं.
पण, 'तुला काय अक्कलय! गप्प बस', असं बाप आईला चार-चौघात म्हणतो, तेव्हा पहिलीतल्या जगनला कळतं की बाईला काही सन्मान ��गैरे नसतो.
बहिणीला 'बघायला' पाहुणे येतात. तेव्हा तिला शोरुमसारखं पाटावर बसवलं जातं. पाय दाखव. चालून दाखव, वगैरे सुरू असतं, तेव्हा तिसरीतल्या जगनला कळतं की गाडी वा टीव्ही विकत घेणं आणि लग्नासाठी बायको घेणं (आणि, इथं पैसे आपल्यालाच मिळतात!) यात काही फरक नाही.
मैत्रिणींच्या गराड्यात रमलेल्या मावशीचा एकदा पदर पडतो आणि जगनलाही काहीतरी दिसू लागतं. मग, सहावीत असलेला जगनचा मावसभाऊ म्हणतो, 'आई, पदर नीट घे.' तेव्हा, मावशीच्या सगळ्या मैत्रिणी त्याचं कौतुक करायला लागतात. 'पोरगं मोठं झालं बघ', असं मावशीला सांगू लागतात. तेव्हा आपला मोठेपणीचा 'रोल' जगनच्या लक्षात येतो.
शाळेतल्या बाई चांगल्या शिकवतात, असं सातवीतला जगन आईला सांगतो, तेव्हा आई म्हणते, 'नटवी मेली! दंड मोकळे ठेवते. बेंबीखाली साडी नेसते. ती रे कसली चांगली?' तेव्हा, बाई म्हणजे शरीर हे जगनच्या लक्षात येतं.
मग तोही रस्त्यावरच्या पो��ींकडं असंच बघत बसतो.
वर्गातल्या बाई असोत की त्याला तपासणार्या डॉक्टर, त्याला हे आधी दिसतं. मग कळतं की हे 'शरीर' शिक्षिका आहे किंवा डॉक्टर!
मूल होत नाही म्हणून त्याच्या मावशीला काकानं सोडल्यावर, 'हीच कमनशिबी' असं आजी म्हणते, तेव्हा 'बायको म्हणजे पोरं जन्माला घालायची मशिन' हे जगनला समजत जातं.
एके दिवशी शेजारच्या मालतीकाकू रात्री कोणाच्या तरी बाइकवर घरी येतात, त्यावर आई आणि इतर बायका करत अस���ेलं गॉसिप जगन ऐकत असतो. बाई पुरुषाच्या जवळ आली म्हणजे तसलंच काहीतरी घडतं, हे तर जगनला समजतंच, पण त्यात चूक फक्त बाईची असते. पुरुष तर मजा मारत असतात. हेही जगनला समजून चुकतं.
आठवीतल्या जगनला पहिल्यांदा हस्तमैथुन करावं वाटतं. आणि, आपण चूक केलं का बरोबर, हेही त्याला माहीत नसतं. पण, ते विचारायला कोणी नसतं. त्यामुळं अशा गोष्टी लपूनछपूनच करायच्या असतात, याची त्याला खात्री पटते.
एकदा ��ात्री धाकटी बहीण उशिरा येते. जगन नेहमीच त्याहून उशिरा घरी येत असतो. बहिणीला आई बडवते आणि म्हणते, 'बाई म्हणजे काचेचं भांडं. पुरुषाला काय, तो काहीही करेल!' तेव्हा, जगनला समजतंः बाईनं आपलं चारित्र्य जपायचं असतं आणि पुरुषानं पौरुष सिद्ध करायचं असतं.
'आज तीन *** मारले. बायको घायल. नको, नको असं ती किंचाळतेय. मी थोडाच गप्प बसतोय', असं नुकतंच लग्न झालेला त्याचा दादा मित्रांच्या कोंडाळ्यात सांगत असतो, तेव्हा पौरुष म्हणजे काय, हे जगनला समजतं.
काकू शेजारणीला सांगत असते, 'ती प्रिया उगीच नाही झाली मेंबर. अण्णांपुढं दहादा पदर पाडल्यावर मग ते काय सोडतील का तिला? पुरेपूर किंमत वसूल केली तिनं. अण्णांना पाहिजे, ते त्यांनी मिळवलं. आपण नाही बाई असलं काही करणार. नाहीतर मीच झाले असते मेंबर!' मग जगनला हा 'व्यवहार' समजतो.
गणेशोत्सवाच्या रांगेत किती पोरी दाबल्या, यावर गल्लीत पोरांची चर्चा सुरू असते, तेव��हा नववीतल्या जगनचे हात सळसळ��� लागतात.
कधीतरी कळतं, जगननं कोणावर तरी बलात्कार केलाय.
जगनला 'रेपिस्ट' कोणी केलं?
फासावर द्यायचं कोणाला?
जगनला द्यायचंच, पण या घराचं काय करायचं!
जगन तुमच्या घरातही आहे.
त्याला कसं वाढवायचं, ते आपण ठरवायचंय.
- संजय आवटे
स्रोत व्हॉट्स अप
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर, लक्षात आलं आहे की, कित्येक ठ��काणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरु झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये त्यामुळे, शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे...
त्यामुळे सरकारने खालील सूचनांचा विचार करावा.
१) कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी ७ आणि ८ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नु���सान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान १ वर्ष लागेल.
२) गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं. केंद्र सरकारने ��िहारला असं पॅकेज या आधी दिलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे.
३) अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करावी. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा.
४) या अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावं. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं.
५) अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच.
सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. त्यामुळे या सगळ्या मोहापासून द��र राहून सरकारने, प्रशासनाने आता एकरी किमान ३० ते ४० हजाराची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्याचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पहावं.
आपला
राज ठाकरे
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
आर्थिक शिक्षण नसलेला सामान्य माणूस जर हजार-दोन हजार रुपये गुंतवायचे म्हटलं, तर "पैसे नाहीत" असं म्हणतो.
पण तोच ���ामान्य माणूस जर मोबाइल अचानक खराब झाला, तर लगेच त्या संध्याकाळी कुठून तरी पंधरा हजार रुपये जमवून तो मोबाइल विकत घेतो.
हेच जर त्याने आपल्या ��विष्यासाठी गुंतवणुकीसाठी केलं, तर तो लवकर आर्थिकदृष्ट्या साक्षर होईल आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवेल.
सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. अरुण नाईक सांगत आहेत ते काळजीपूर्वक ऐका, पहा आणि मग अंमलात आणा.
मेंदूचं विस्मरण आणि अन्य व्याधींना दूर ठेवण्यासाठी, Vertigo, Tinnitus, Dizziness, Headache Or Brain Fog पासून आराम मिळवा. फक्त तीन मिनिटांचा व्यायाम सकाळी उठल्याबरोबर आणि झोपण्यापूर्वी किंवा लंच ब्रेकमध्ये देखील करा.
...ॲसिड ॲटॅक झालेल्या महिलांवर उपचार करणं, त्यांच्या विद्रुप झालेल्या चेहर्यावर स्वखर्चानं प्लॅस्टिक सर्जरीसारखी महागडी ऑपरेशन्स करणं, त्यांच्यावर मानसिक उपचार करुन त्यांच्या मनाला उभारी देणं आणि त्यांना स्वत:च्या पायांवर उभं रहाण्यासाठी सगळी आर्थिक मदत करणं...
ही सगळी कामं तो गेली कित्येक वर्ष करतोय !
...आपल्या आईवडिलांच्या आठवणीसाठी नानावटी हाॅस्पीटलमध्ये त्यानं लहान मुलांच्या कॅन्सरवरच्या उपचारांसाठी एक वाॅर्ड उभा केलाय, ज्यासाठी तो सतत म��ठ्ठी आर्थिक मदत करत असतो !
...२०१२ साली त्यानं देशभरातली बारा खेडेगांवं दत्तक घेतली. तिथं स्वखर्चानं वीज-पाणी-शाळा आणि औषधं अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम त्यानं केलं. अजूनही तिथं नवनविन सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम तो आजतागायत करतोय !
...२००८ साली बिहार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यानं जगभर लाईव्ह काॅन्सर्टस् करून तीस दशलक्ष रूपये जमा करुन दिले ! २०१५ मध्ये चेन्नई पूरग्रस्तांसाठी एक कोटी रूपये.. २०१३ मध्ये उत्तराखंड पूरग्रस्तांसाठी तेहेतीस लाख रूपये.. तर डाॅ. मनमोहन सिंग यांच्या 'त्सुनामी रिलिफ फंड'साठी पंचवीस लाख रूपये त्यानं स्वत:च्या खिशातून दिले !
...एक पत्रकार त्याची मुलाखत घेऊन परत जात असताना, त्या पत्रकाराचा ॲक्सीडेंट झाला.. तो गंभीर जखमी झाला. मृत्यूशी झुंज सुरू झाली.. अशावेळी त्या पत्रकाराचा बरा होईपर्यन्तचा सगळा हाॅस्पीटल खर्च त्यानं उचलला, जो ��र दिवशी दोन लाख रूपये होता !
...भारतभरातल्या झोपडपट्ट्यांमधल्या लहान मुलांच्या छोट्या-मोठ्या इच्छा-स्वप्न पूर्ण करणार्या 'मेक अ विश फाऊंडेशन' या समाजसेवी संस्थेबरोबर तो काम करतो !
...२००९ मध्ये ओरीसामधल्या सात खेडेगांवांमध्ये त्यानं स्वखर्चानं सोलर इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट सुरू केले.. ज्यामुळे स्वातंत्र्यानंतर तब्बल ६१ वर्षांनंतर त्या गांवांमध्ये 'लाईटस्' आले !
...आयपीएल सिझन सात मध���ये त्याची टीम विजेता ठरली. बक्षिस म्हणून पंधरा कोटी रूपये मिळाले. ती सगळीच्या सगळी रक्कम त्यानं मुंबई आणि कलकत्त्यामधील गरीब कॅन्सर पेशंटस् वरील उपचारांसाठी दान करून टाकली !
...महाराष्ट्रातल्या आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटूंबीयांसाठी त्यानं जगभर काॅन्सर्ट करुन कोट्यावधी रूपये उभे केले तर इंडीयन आर्मीमधील जवानांसाठी सात कोटी रूपये दिले !
...कोरोनाकाळात त्यानं स्वत:चं चार मजली ऑफीस बीएमसी ला दिलं. लाॅकडा��नमध्ये मुंबईत १००० गरीब कुटूंबांना तेल, पीठ, तांदूळ, डाळ इत्यादी सामान पुरवलं. अगदी हातावर पोट असलेल्या २००० लोकांना रोज ताजं अन्न दिलं. बंगालमधल्या अतिशय दुर्गम खेड्यापाड्यांमध्ये जाऊन राशन आणि सॅनिटायझर पुरवले.
शाहरूखच्या समाजकार्याबद्दल काय काय सांगू? मी लिहीत जाईन पण तुम्ही वाचून वाचून थकून जाल. त्याच्याविषयी कुणी कितीही अफवा पसरूद्यात. कुणी म्हणेल पाकिस्तानला त्यानं ह्यॅव दि��ं आणि त्यॅव दिलं. सगळ्या थापा आहेत हो. अहो, अन्नदान करतानासुद्धा धर्म बघून करणार्या त्या दळभद्र्या जमाती... त्यांना 'द ग्रेट शाहरूख खान' कसा झेपणार? त्यांनी कितीही ट्रोल केलं तरी सगळ्या जगात शाहरूखनं भारतीय कलाकारांचा सन्मान वाढवलाय हे सत्य लपणार नाही !
...त्यानं केलेल्या समाजोपयोगी कार्यासाठी त्याला जर्मनीमध्ये झालेल्या २० व्या युनेस्को अवाॅर्डस् मध्ये स्पेशल अवाॅर्ड देऊन सन्मानित करण्यात आलंय.
...साऊथ कोरीयानं त्याला 'गुडविल ॲम्बॅसीडर' म्हणून सन्मानित केलंय.
...इंग्लंडमधल्या सर्वात मोठ्या 'लाॅ युनिव्हर्सिटी'तर्फे त्याला ह्यूमन राईटस् आणि ॲक्सेस टू जस्टिस ॲन्ड क्राईम मधील कार्यासाठी स्पेशल डाॅक्टरेट देण्यात आलीय.
तो फक्त अभिनयातला बादशाह नाही, तर 'माणूस' म्हणून सुद्धा किंग आहे ! सलाम शाहरूख खान... कडकडीत सलाम !! कुठल्याही सच्च्या भारतीयाला तुझा अभिमानच वाटेल.. आज तू साठाव्या वर्षात पाऊल ठेवतोयस. तुला वाढदिवसाच्या मनाच्या तळापास्नं शुभेच्छा ❤️
- किरण माने.
भक्तडुक्कर पिलावळींनो... तुमच्या जुल्मी बापांच्या विरोधात बोलणार्यांना अजून किती ट्रोल कराल? किती बदनाम कराल? फरक पडत नाही. अरे तुमच्या अवतीभवती फक्त गटार आहे, घाण आहे, गू आहे... तुमच्या हाती काहीही नाही शि��ीगाळीशिवाय. आमची लेकरं आणि लेकी, असल्या फुटकळ गोष्टींनी केसभरही हलणारी नाहीत.
आज तुम्ही ओकलेली गरळ फिरून तुमच्याच तोंडावर आली आहे... तुमच्या नाकावर टिच्चून, तुमचे तोंड काळे करून आमच्या भारत देशाची वाघीण विनेश फोगटनं जपानच्या चार वेळा चॅंपीयन असलेल्या बलाढ्य पैलवान प्रतिस्पर्धीला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय.
विनेशने आपल्या कर्तृत्त्वानं ब्रुजभूषणपासून ते त्याला कव्हर करणार��या अंडभक्तांच्या सगळ्या अनौरस बापाचं हिकडचं थोबाड तिकडं केलं आहे. 🔥
समजा... समजा, विनेश पदक जिंकली तर महामहिम, विश्वगुरू कोणत्या तोंडानं आणि काय ट्विट करतील?
- किरण माने.
प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यात देवेंद्र फडणवीस यांची कोण जास्त चांगली चाटून दाखवतो याची स्पर्धाच लागली होती या प्रेसमधून मनोज जरांगे पाटलांनी प्रसाद लाड यांची चांगलीच अब्रू काढली आहे मला वाटत नाही परत लाड नादाला लागेल!
तिकडं दिल्लीत कंगना मुख्यमंत्री शिंदे यांचा सूट राहण्यासाठी मागते तर इकडं अनंत अंबानी मुख्यमंत्री महोदयांशी चड्डी यार असल्यागत वागतो.
नक्की काय चाललंय? महाराष्ट्र चे मुख्यमंत्री म्हणून काही किंमत ठेवून घेणार आहात की नाही?
...आणि एक दिवस त्याच राहुलने नजर भिडवल्यावर, 'ते' नजरेला नजर देऊ शकले नाहीत !
इसलिए,
दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे...
जब कभी हम सामने आ जाएं, तो शर्मिंदा न हों !
#शेवटचंच 😜😂😂😂