मा. सचिव @mpsc_office
सध्या महाराष्ट्र शासनाने अधिवेशनात हा निर्णय घेतला आहे की सरळसेवा मधील वर्ग 3 च्या पदांची MPSC मार्फत होईल.
निर्णय उत्तम असला तरी सरळसेवा परीक्षा सरळसेवा सारख्याच घ्याव्यात त्यात कोणताही बदल करु नये.
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@mieknathshinde
काल #MPSC ची सुधारित जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे त्यानुसार OPEN/EWS मधील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना SEBC आरक्षणातून फॉर्म भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. परंतु मागील दोन-तीन महिन्यांमध्ये मराठा समाजातील बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे कुणबी प्रमाणपत्र निघालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना आता OBC प्रवर्गातून फॉर्म भरावा लागेल परंतु OPEN / EWS TO OBC असा फॉर्म भरण्याचा पर्याय सध्या उपलब्ध नसल्याने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मा. मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ याची दखल घेत यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून शासन स्तरावरून OPEN/EWS TO OBC असा फॉर्म भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात आयोगाला तत्काळ निर्देश द्यावेत व हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result
हजारो विद्यार्थ्यांनी पालकांसह रंगवलेली स्वप्ने आणि त्यांच्या जीवतोड मेहनतीला न्याय देण्यासाठी
सरकार तसेच #MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांना नम्र विनंती :
- राज्यसेवा 2024
- संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024
- समाजकल्याण 2023
या परीक्षेच्या तातडीने तारखा जाहीर कराव्यात.
@mpsc_office@CMOMaharashtra
#DeclareMPSCExamDates
15 एप्रिल 2024 रोजी #MPSC ने गट क मधील कर सहाय्यक मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला. मात्र या निकालामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फक्त क्लर्क या पदासाठी मेन्स चा फॉर्म भरला त्या विद्यार्थ्यांचीही नावे कर सहाय्यक या पदासाठी आली असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नकळतपणे आयोगाकडून ही चूक झाली असल्याने आयोगाने लवकरात लवकर यासंबंधीत एखादे परिपत्रक जाहीर करावे किंवा कर सहाय्यक पदाचा सुधारित निकाल पुन्हा लावून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
@mpsc_office
मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
निकाल लागण्यात उशीर होणार असेल तर परिपत्रक काढून सांगावे.
अनेक विद्यार्थी संभ्रमात आहे.
@Suvarnakharat4
राज्यभरात होत असलेल्या पोलीस भरतीसाठी हजारो तरुण अर्ज भरत आहेत मात्र १५ एप्रिल रोजी सर्व्हर डाऊन झाल्याने ग्रामीण भागातील हजारो तरुणांना फॉर्म भरता आले नाहीत. तसंच मराठा आरक्षण SEBC सर्टिफिकेटही अनेक उमेदवारांना अद्याप मिळालेले नाहीत. मुख्यमंत्री साहेबांनी मुदत वाढवून देण्याचे आश्वासन दिले होते ते अजून पूर्ण झाले नाही. विद्यार्थ्यांच्या या अडचणी लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २-३ दिवस मुदत वाढवून देऊन त्यांचे होणारे नुकसान थांबवावे, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
मा. मुख्य सचिव,
महोदय,
जाहीर झालेल्या परीक्षांच्या तारखा, निकाल, कागदपत्र पडताळणी, प्रतीक्षा यादी, रिस्पॉन्स शीट या सर्व प्रक्रिया करण्याचे आदेश निवडणूक आयोगाच्या संमतीने MIDC, पुरवठा निरीक्षक, जलसंपदा, ZP, नगरपरिषद सर्व विभागांना तातडीचे आदेश द्यावेत ही कळकळीची विनंती.
कळावे