आमचा रॉकी... भलताच अतरंगी, घरातल्यांसाठी प्रचंड लाडका आणि प्रेमाचा सागर, पण शत्रू किंवा संकटासाठी साक्षात काळ ! हा पठ्ठा स���वभावानं जितका इमानदार, तितकाच भयंकर धाडसी आहे. यापूर्वी त्याने अनेकदा विषारी साप गरागरा फिरवून मारले आहेत. एकदा तर एका विषारी सापाने चावा घेतल्यामुळे त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या, तो मरणाच्या दारापर्यंत पोहोचला होता. पण त्याही संकटावर मात करून तो चमत्कारिक रित्या सुखरूप बाहेर पडला !🧿
अशा या आमच्या 'रॉक स्टार' रॉकीने काल संध्याकाळी ७:१५ च्या सुमारास मुरबाड येथील आमच्या फार्म हाऊसवर स्वतःचाच एक नवा रेकॉर्ड केला. बेसावध असताना कंपाऊंडच्या जाळीवरून उडी मारून काल एका बिबट्याने रॉकीवर पाठीमागून हल्ला केला !
पण समोर बिबट्या असला तरी त्याची गाठ आमच्या पठ्ठ्यासोबत होती. रॉकीने क्षणाचाही विलंब न करता बिबट्याचा डावा गाल आणि हनुवटीवर असा काही मजबूत चावा घेतला की बिबट्या स्वतःची सुटका करण्यासाठी धडपडू लागला. अखेर रॉकीने पकड सैल करताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या थरारक झटापटीत रॉकीला बिबट्याची नखे लागून जखमा झाल्या, पण तरीही हा पठ्ठा त्याचा शत्रू कुठे गेला हेच छाती ठोकून पाहत उभा होता. त्याने दाखवून दिले की लढायला वाघाचं कातडं नाही तर वाघाच काळीज हवं !
नंतर आम्ही CCTV फुटेज पाहिले तेव्हा अंगावर काटाच आला. रात्रीच तिथे जाऊन डॉक्टरांना बोलावून रॉकीवर प्रथमोपचार केले आणि आता तो सुरक्षित आहे. मुरबाड वनविभागालाही तातडीने याची माहिती देण्यात आली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
��रंतु इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की यात दोष नक्की कोणाचा ?
मुरबाड आणि आसपासच्या परिसरात तसेच राज्यात इतरत्रही मानव-वन्यजीव संघर्ष सातत्याने समोर येत आहे. हा प्रश्न केवळ आमच्या रॉकीच्या कौतुकाचा नाही, तर एका गंभीर समस्येचा आहे. विकासाच्या नावाखाली आपण माणसांनी जंगले नष्ट केली, प्राण्यांचे हक्काचे घर हिरावून घेतले. जेव्हा त्यांचा अधिवास संपतो, तेव्हा अन्नाच्या शोधात हे वन्यजीव मानवी वस्त्यांकडे वळणारच !
काल आमचा रॉकी होता ज्याने शौर्याने बिबट्याला पळवून लावले, पण उद्या तिथे एखादा निष्पाप माणूस, महिला किंवा लहान मूलही असू शकते, याला जबाबदार कोण ? वन्यजीवांवर रागवण्यापेक्षा आपण निसर्गाचा समतोल राखायला हवा, अन्यथा हे संकट प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही ! हा धोक�� मानव व अर्थातच सरकारच्या विकासाच्या नावावर उद्योगपती धार्जिण्या चुकीच्या योजनांना पाठबळ देण्यामुळे निर्माण झाला आहे हे मान्य करावेच लागेल.
#RockyTheHero #SaveForests #RealHero #NatureBalance #Wildlife
फारच झोंबलय वाटतंय …
भाजप प्���देशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या
२००९/२०१९/२०२४ मधील प्रतिज्ञापत्रात जे गुन्हे दाखल आहेत ..
मी त्याची वाच्यता केली … आणि मी यावर ठाम आहे …
निर्दोष मुक्तता झाल्यावर त्या गुन्ह्यांची नोंद आपण निवडणूक आयोगाला देत असलेल्या प्रतिज्ञापत्रात करीत नाही इतके ज्ञान भाजप वाल्यांना नसावे हे आश्चर्यकारक आहे ...
असत्य, खोटे, आणि निराधार आरोप करण्याची सवय भाजप वाल��यांना आहे ..
हे या देशाने आणि महाराष्ट्राने गेल्या १२ वर्षात पाहिले ��हे …
राहिला प्रश्न कायदेशीर कारवाईचा तर त्याला सामोरे जायची माझी तयारी आहे
यापुढे मनसे ला गुंड म्हणताना १० वेळा विचार करावा …
जिनके घर शीशे के होते है, वो दुसरो के घरो पर पत्थर नहीं मारा करते ...
२०२४ मध्ये वाढलेली मतदारसंख्या नेमकी कुठून आली ? SIR ने उपस्थित केले गंभीर प्रश्न !
१४४ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील SIR 2026 ची आकडेवारी अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.
लोकसभा २०२४ — ४,५३,१५९ म��दार
विधानसभा २०२४ — ५,४७,७५० मतदार
( लोकसभेनंतर फक्त ९४६०१ मतदार वाढले व असाच प्रकार राज्यातील प्रत्येक विधानसभा निवडणुकीवेळी व महापालिका निवडणुकांमध्ये घडला होता. त्यावेळी सर्व विरोधी पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही निवडणूक आयोग मुग गिळून गप्प बसले. याचा निषेध व सत्य परिस्थिती दाखविण्यासाठी मा.राजसाहेबांच्या व इतर विरोधी पक्षांच्या मुख्य नेत्यांनी मिळून ‘सत्याचा मोर्चा’ काढला होता व त्यावेळेसही मा. राजसाहेबांनी दुबार मतदार याद्यांचा ठिग जनतेसमोर जाहीरपणे दाखवला होता. )
आता SIR Draft Roll मध्ये तब्बल २,५२,२४७ नावे समाविष्ट नाहीत. त्यापैकी २,३८,७८९ नावे Permanently Shifted / Untraceable / Absent म्हणून वर्गीकृत आहेत. Indian Express ने कल्याण ग्रामीणमध्ये हे प्रमाण ९४.७% असल्याचे नमूद केले आहे.
विशेष म्हणजे २०२४ विधानसभेला एकुण मतदान झाले २,९४,८८८ एवढे मतदान झाले. व आताच्या SIR प्रमाणे जाहीर केलेल्या यादीत मतदार आहेत २,९५,५०३ मग वगळलेल्या २,९५,५०३ मधील निश्चितच काही नावे बोगस, डुप्लिकेट किंवा अपात्र होती. मग त्यांनी मतदान केले का याची निष्पक्ष चौकशी हो���े गरजेचे आहे.
📌 संदर्भ: The Indian Express, 3 सप्टेंबर 2026
#SIR2026 #KalyanRural_144 #VoterList #Maharashtra
दादर - माहीम येथील भाजपच्या कार्यालयाबाहेर पोलिस संरक्षणात आंदोलन करत स्टंटबाजी करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र सैनिकांचे चोख प्रतिउत्तर ... 🔥💪🚩
महाराष्ट्र सैनिकांचे अभिनंदन ... 💐💐
आता, शीळफाट्यावरून मुंबई फक्त १० ते १२ मिनिटांत ❤️
आपल्या सेवेत लवकरच खुला होईल..
कट��ई - ऐरोली (नाहूर, मुलुंड ) नवीन मार्ग (ऐरोली-काटई नाका एलिव्हेटेड फ्रीवे) हा कल्याण - डोंबिवली - शिळफाटा - मुंब्रा आणि नवी मुंबई/मुंबई दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळवून देण्यासाठी MMRDA कडून तयार करण्यात आलेला १२.३ किमी लांबीचा महत्वाचा मार्ग आहे.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी ह्या स्वतंत्र एलिव्हिटेड मार्गाला २०१५ ला मंजुरी दिली होती. २०१६ ला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. मध्यं��रीच्या काळात काही लोकांनी कामात आडकाठी आणली होती. पण, सर्व संकटावर मात करीत या महामार्गाचा एक फेज पुर्ण झाला आहे.
एरोली - कटाई नाका उन्नत मार्ग हा नवी मुंबईतील ऐरोली पुलाच्या पूर्वेकडील टोकापासून (ठाणे-बेलापूर रोडवरून) सुरू होतो, जिथून हा रस्ता ठाणे-बेलापूर रोडला वरच्या वर (उन्नत मार्गाने) ओलांडून पुढे पारसिक डोंगराच्या दिशेने जातो.
त्यानंतर हा मार्ग पारसिक डोंगरामधून काढण्यात आलेल���या १.६९ किमी लांबीच्या दुहेरी बोगद्यातून पुढे जातो आणि मुंब्रा बायपास / राष्ट्रीय महामार्ग ४८ जवळ बाहेर पडतो; तिथून पुढे हा रस्ता दिवा - पनवेल रेल्वे मार्गाच्या समांतर असलेल्या उन्नत
पुलावरून जात थेट कल्याण - डोंबिवलीच्या कटाई नाका येथे संपतो.
हा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर शीलफाटा भागातील वाहतूक कोंडी टाळून ऐरोली ते कटाई नाका / डोंबिवली प्रवास फक्त १५ ते २० मिनिटांत पूर्ण होईल.
दुसरा टप्पा कटाई ते मुंब्रा काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू झाला आहे, याला तीन वर्षे जातील.
💼 PF Calculation Made Simple!
For a Basic Salary of ₹20,000:
➡️ Employee contribution: 12% = ₹2,400
➡️ Employer contribution: 12% = ₹2,400
➡️ Employer share: 8.33% to EPS + 3.67% to EPF
➡️ Total contribution: ₹4,800
Understanding PF contributions is essential for employees, employers & HR professionals for accurate payroll and better financial planning.
Save this for future reference! 📌
Follow the Tax Talk with CA Nitin Chawla A.C.C.A channel on WhatsApp: 👇 https://t.co/7KtKmuuyCo
#PF #ProvidentFund #EPFO #Payroll #HR #Salary #FinancialPlanning #EmployeeBenefits
पी.व्ही.आर - एक्सपेरिया मॉल, पलावा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'मामाच्या गोव्याला जाऊया' या मराठी चित्रपटाच्या विशेष शोला डोंबिवलीकर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.चित्रपटाच्या संपूर्ण कलाकार मंडळींनी चित्���पटगृहात अचानक भेट देऊन रसिक प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं, कलाकारांशी झालेला संवाद आणि प्रेक्षकांचा तो तुफान उत्साह... वातावरण खरोखरच भारावून टाकणारं होतं!
#मामाच्या_गोव्याला_जाऊया #MamachyaGovyalaJauya #MarathiCinema
कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठं बळ!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि पक्षाचे नेते मा. आमदार श्री. राजूदादा पाटील ��ांच्या उपस्थितीत कल्याण-डोंबिवलीत शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. तसेच भाजपामधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुन्हा मनसेमध्ये 'स्वगृही' वापसी करत मनसेचा झेंडा हाती घेतला.
#महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना_वैद्यकीय_कक्ष #कल्याण #डोंबिवली #दिवा
@BJP4Maharashtra@RaviDadaChavan तुम्ही यांच्या भाषेचं समर्थन करता का?
ह्या व्यक्तीच्या फेसबूक प्रोफाईलवर कव्हर पिक्चरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आहे. पक्षचिन्हं कमळदेखील आहे.
मुलाखत घेतली म्हणून ट्रोलिंग करताना त्यात महिलेला निवडायचं, तिच्यासाठी अभद्र, अश्लिल भाषा वापरायची ह�� तुमची संस्कृती आहे का? तुमचा हा कार्यकर्ता, पदाधिकरी असेल तर त्याची पाठराखण तुम्ही करणार आहात का?
@MahaCyber1 तुम्हीही याची दखल घेऊन कारवाई करावी अपेक्षा
नागरिकांची वीजबिलाच्या नावावर होणारी आर्थिक लूट मनसे खपवून घेणार नाही!
डोंबिवलीतील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या वाढीव वीजबिलांच्या तक्रारी, टीओडी (TOD) मीटर संदर्भातील गोंधळ आणि महावितरणकडून होणारी सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक याविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराच्यावतीने आम्ही आक्रमक पाऊल उचललं आहे. परिसरातील जवळपास २,००० नागरिकांच्या प्रत्यक्ष तक्रारी गोळा करून आज कल्याण येथील मुख्य अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून जाहीर निवेदन सादर करण्यात आले.
#महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना #मनसे #MNS
Dear BMC
If you want to declare WFH tomorrow for pvt employees, please do it now and not at 10:30-11:00 am in the morning when everyone has reached the office battling the rains and heavy winds!
Yours faithfully,
Spirit of Mumbaikar
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता डोंबिवली शहर, कल्याण ग्रामीण आणि १४ गाव परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे सज्ज आहे. काही विभागात 'मनसे आपत्ती व्��वस्थापन' यंत्रणा कार्यान्वित केली आहे.स्थानिक नागरिकांच्या मदतीसाठी आमचे मनसैनिक २४ तास तत्पर आहेत. पूरपरिस्थिती, झाड कोसळणे, पाणी भरणे किंवा इतर कोणत्याही पावसाळी आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी घाबरून न जाता, सोबत जोडलेल्या यादीतील आपापल्या प्रभागातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
जनतेच्या सेवेसाठी आणि रक्षणासाठी महाराष्ट्र सैनिक सदैव कटिबद्ध आहे !
धन्यवाद .!
'एकंदरीतच सध्या ढग सोडून पेपर, आमदार, खासदार एवढेच काय प्रभू रामांच्या मंदिरातील दान पेटी पण फुटत आहे पण लोकांच्या रागाला वाचा काही फुटता फुटत नाही हेच खरं दुर्दैव आहे!' - राजू पाटील
#RajuPatil#MNS#ShivsenaMPs#news#MarathiNews