जलसंपदा व जलसंवर्धन विभागातील स्थापत्य अभियंता या पद भरतीसाठी पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास विविध जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शविलेला आहे तर मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित ही भरती प्रक्रिये राबवावी #WRD_JE#WCD_Recruitment
बेरोजगार अभियांत्रिकी विद्यार्थी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत..
जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील रिक्त कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा तात्काळ भराव्यात अशी त्यांची मागणी आहे..
मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थी जाहिरातीची वाट पाहत आहेत परंतु सरकार चालढकल करत आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे..
सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत गांभीर्यपूर्वक विचार करून लवकरात लवकर पदभरती करावी..
राज्यातील बेरोजगार युवकांना सारख रस्त्यावर उतरून आंदोलन कराव लागत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे..
सरकारने तरुणांच्या भविष्याशी खेळणे थांबवावे..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan@RVikhePatil@AUThackeray@CPRGuv@SanjayDRathods@OmRajenimbalkr@ShivsenaUBTComm
#WRD_JE
#WCD_Recruitment
@CMOMaharashtra कडून जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांत्रिकी सेवा प्रवेश नियम बाबत monitering करणे गरजेचे आहे. अनेक दिवसांपासून सेवाप्रवेश नियम प्रलंबित आहेत. नम्र विनंती 🙏
@MahaChiefSec@ssaunik#WRD_RR
I am working on BANKING AWARENESS on priority basis since IBPS Interview is there. I will resume January CA in 3 days. Next 3 days all my energy will be on Banking Awareness (Current).
@mybmc रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) सरळसेवा भरती परीक्षे साठी सुमारे 3200 महिला उमेदवारांना सुद्धा लांबची remote Centers देण्यात आली आहेत असे समजते @Dev_Fadnavis जी ₹1000/- भरून जिथे साधं टॉयलेट नाही! महिला सुरक्षेबाबत काय????
याची सर्वस्वी जबाबदारी मुंबई महानगर पालिका प्रशासन, IBPS व @MahaPolice यांची असेल @mieknathshinde साहेब 20% मुल
मुलीनां 250 km कमीत कमी प्रवासासाठी शनिवारी रात्री मुक्कामाला यावं लागेल. परीक्षा रविवारीच संध्याकाळी 4 ते 7 म्हणजेच रविवार मुक्काम! सोबत आईवडील किंवा भाऊ असं कमीत कमी ₹6000/- खर्च???
साहेब मुलीनी आज नांदेड मध्ये आपणास सविस्तर माहीती दिलीत त्यामुळं आपणा सर्वांना कळकळीची विनंती खाजगी बदनाम केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी TCS ION Digital Centers वरच परीक्षा घ्यावी अन्यथा गोरगरीब पोरं खचून जातील म्हणून @mybmc अजून वेळ आहे!उगाच अट्टहास करू नका! खाजगी केंद्रांवर आत काय होईल कोणालाच समजणारच नाही! पोलीसांनाही कारण ते केंद्रां बाहेर असतात! म्हणून मायबापा हो TCS ION Digital Centers घ्या! तमाम गोरगरिबांच्या लेकरांन साठी @iambadasdanve जी आपण आज स्वतः आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिलं त्याबद्दल आभार व धन्यवाद! @RRPSpeaks@Awhadspeaks आपलेही आभार!! सहकार्याच्या अपेक्षेत!!!
आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे यांची भेट घेऊन विविध सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा केली.
मुंबई महानगरपालिका (BMC SE/JE) सरळसेवा भरती २०२४ परीक्षा खाजगी परीक्षा केंद्रांच्या ऐवजी शासनाच्या अधिकृत TCS iON या कंपनीच्या केंद्रावर घ्यावी या लाखो अभियंत्यांच्या मागणीबाबत आज किंवा उद्या पर्यंत मा. आयुक्तांनी पत्रक काढण्यासाठी पाठपुरावा करुन ही अभियंत्याना दिलासा देणे गरजेचे आहे, याबाबत लाखो तरुण भावी अभियंत्यांची भूमिका मांडली.
राज्यातील लाखो परीक्षार्थींच्या मागणीला नक्कीच न्याय मिळेल ही आशा आहे.
@ArvindKejriwal@iambadasdanve@AUThackeray@MahavikasAghad3@AamAadmiParty
#BMC_JE #BMC_SE #TCS_ION_Digital #MCGM
#BMC_At_TCS_Ion_Centre #BMC_atION_Centre #BMC_iONexamसेंटरचद्या
आज मुंबई मनपा मुख्यालयात आयुक्त डॉ भूषण गगराणी साहेब यांची भेट घेतली व 9 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता सरळसेवा भरती परीक्षा TCS ION Digital Centers वरच घेण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते मा.अंबादास जी दानवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आग्रही मागणी करण्यात आली. सोबत मा. नगरसेवक सचिन पडवळ!
खालील बातमीत नगर अभियंता म्हणत आहेत की आम्ही स्थापत्य आम्ही TCS Ion degital चा विचार करू हे पूर्णतः चुकीचे आहे, स्थापत्य साठी वेगळा न्याय व विद्युत आणि यांत्रिकी साठी वेगळा हे योग्य नाही, कृपया सर्वांसाठी समान न्याय आणि समान संधी असायला पाहिजे.
#BMC_At_TCS_Ion_Centre
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार श्री. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा या अधिकृत केंद्रांवर आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात, या मागणीसाठी आज शिवसेना नेते, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ह्यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, माजी नगरसेवक सचिन पडवळ, इंजिनिअरिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश देशमुख, युवासेना सहसचिव धर्मराज दानवे उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या पदांसाठी दिनांक ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र तलाठी व इतर पेपर फुटी झाली त्याच एजन्सीला हे काम दिले गेले आहे. या परीक्षा अधिकृत केंद्रांवर आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात, या मागणीसाठी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेत या विषयावर चर्चा केली.
तसेच या भेटीत मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, मुंबई पब्लिक स्कुलमधील शिक्षकांची रिक्त पदे आवश्यकतेनुसार तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
टाहो फोडून सांगणारे विद्यार्थी आणि त्यांच्या BMC SE/JE बद्दल च्या अधिकृत परीक्षा केंद्राबद्दलच्या मागण्या मान्य करा. कृपा करून आमच्या भावनांचा अंत पाहू नका.
#BMC_At_TCS_Ion_Centre#BMCचं_डोकं_ठिकाणावर_आहे_का?
मा.मुख्यमंत्री महोदय
@Dev_Fadnavis
मा. @mieknathshinde साहेब
@mybmc च्या 9 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या दुय्यम अभियंता परीक्षेसाठी आजपासून केवळ दोन दिवस उरले आहेत.
सर्व उमेदवार आपणास ION digital center allotment साठी विनंती करून थकले.आपण मौन बाळगून आहात.
🔸@mybmc आयुक्त मा.भूषण गगराणी सर आपल्यासारख्या उच्चशिक्षित,अनुभवी व नावाजलेल्या
अधिकाऱ्याकडून परीक्षार्थीना पारदर्शकतेची अपेक्षा आहे,मुळात तो
त्यांचा अधिकारच आहे.
तरीही आपण अद्याप यावर कार्यवाही का करत नाही हे अनाकलनीय तर आहेच सोबत धोक्याची घंटा आहे.
👉 1000 रुपये परीक्षा शुल्क देऊन एकतर 600-700 km दूर center देऊन काय साध्य करत आहात?
👉 ज्या center वर यापूर्वी गैरप्रकार,गैरव्यवहार झाले आहेत तिथेच पुन्हा परीक्षा घेणे म्हणजे कळसच गाठला.
हेच का विद्यार्थी हित ??
🔶 सगळं संशयास्पद च आहे...
सुविधा नसलेले, अडगळीतले centers allot करणे, अधिकृत ठिकाणी परीक्षा घेणे टाळणे,
संध्याकाळी 5-7 हा exam timing
मग exam transparency ची अपेक्षा सोडूनच द्यायची काय?
सरकारने व मा.आयुक्त महोदयांनी तसे जाहीर करावे.
👉 कोटींमध्ये परीक्षा शुल्क जमा झाले त्या परीक्षेचे हे असे हाल ?
परीक्षेला जातानाच पारदर्शकता गायब असेल तर काय त्या परीक्षेला अर्थ उरतो.
🔸 सर्व उमेदवारांतर्फे पुन्हा एकदा सांगतोय..
यावर पुनर्विचार करावा.
अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात एकही ठिकाणी गैरव्यवहार ,गैरप्रकार झाल्यास,उघडकीस आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी
@mybmc ची तर असेलच , सरकारला याचा जाब विचारला जाईलच
याची कृपया अत्यंत गंभीरतेने नोंद घ्यावी
@maha_governor@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@DGPMaharashtra@maha_udd@NANA_PATOLE@ssaunik
मा. आशिष शेलार,
पालकमंत्री, मुंबई उपनगर जिल्हा.
माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
विषय : मुंबई महानगरपालिका (BMC SE/JE) सरळसेवा भरती २०२४ परीक्षा TCS iON च्या अधिकृत सेंटरवर घेणेबाबत.
संदर्भ : वरील विषयावर आज झालेली चर्चा.
महोदय,
मुंबई महानगर पालिकेच्या आगामी ६९० अभियंता पदांच्या भरतीबाबत, राज्यातील लाखो अभियंता परीक्षार्थींच्या जिव्हाळ्याचा विषय समजून घेऊन, तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आपल्या भूमिकेबद्दल खूप खूप आभार.
मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी ९ फेब्रुवारी, २०२५ आणि मार्च २०२५ मध्ये IBPS या संस्थेमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी हजारो अर्जदार विद्यार्थ्यांनी भरलेल्या पर्यायी परीक्षा केंद्रांच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परीक्षा केंद्रे खाजगी असल्यामुळे गेल्या अनेक परीक्षांचा इतिहास पाहता त्या केंद्रांवर गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. गेल्या ५ - ६ वर्षांत झालेल्या तलाठी, मृद व जलसंधारण, म्हाडा आदी विभागांच्या परीक्षा खाजगी परीक्षा केंद्रांवर घेतल्या गेल्या होत्या व या खाजगी केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे घोटाळे झाले आहेत. खाजगी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याचे प्रकारही झाले आहेत. ८ महिन्यांपूर्वी हि बाबा आम्ही मुंबई महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
हजारो विद्यार्थ्यांना दूरच्या जिल्हातील खाजगी केंद्रे देण्यात आली आहेत. परीक्षेचे नियोजन खाजगी परीक्षा केंद्रांवर झाल्यामुळे परीक्षार्थींमध्ये विश्वासघात झाल्याची भावना निर्माण झाली आहे. IBPS या संस्थेचे, दुसरी शासनमान्य संस्था असलेल्या TCS ION सोबत करार असल्यामुळे TCS ION ची स्वतःची मोठी क्षमता असलेली परीक्षा केंद्रे या परीक्षांसाठी वापरता येऊ शकतात. त्यामुळं ही परीक्षा TCS ION च्या केंद्रांवर घेण्यात यावी, जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून लाखो विद्यार्थ्यांना “न्याय” द्यावा.
धन्यवाद,
@ShelarAshish@mybmc@degree_holders@Mpsc_Andolan
#BMC_JE #BMC_SE #TCS_ION_Digital #MCGM
#BMC_At_TCS_Ion_Centre #BMC_atION_Centre #BMC_iONexamसेंटरचद्या