#महापारेषण व #महावितरण भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी असून या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे तसेच या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष Contract Period रद्द करावा, या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या आहेत. ऊर्जामंत्री साहेबांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, ही विनंती…!
@Dev_Fadnavis
#MSEB_EXAM_DATE_DECLARE
#No_GATE_For_MAHADISCOM
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये कार्यकारी अभियंता ते सहाय्यक तंत्रज्ञ पदांच्या ३०४८ जागांचा आराखडा मागील दोन महिन्यांपूर्वी जाहिर करण्यात आलेला आला. त्याबाबत कंपनी मार्फत एक परिपत्रक व रिक्त जागांची जाहिरात वर्तमान पत्रातून प्रसिद्ध करण्यात आली, परंतु अद्यापही भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. हा प्रकार मागील २ वर्षापासून चालू आहे.
ठराविक अंतराने जाहिरातीची आशा सुशिक्षित बेरोजगारांना दाखविण्यात येते परंतु जाहिरात प्रसिद्ध केली जात नाही. या प्रकारात आय. टी. आय. इलेक्ट्रिशियन व विद्युत अभियांत्रिकी उमेदवारांची २ वर्षे निघून गेली आहेत.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री ना. @Dev_Fadnavis जी आपणास विनंती आहे की, सदरील जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी व नोकरीसाठी संघर्ष करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना न्याय द्यावा.
@CMOMaharashtra@OfficeofUT@Devendra_Office@AUThackeray@iambadasdanve@OmRajenimbalkr