"घोटाळा झाला असेल तर पुरावा द्या..!" - अस फडणवीस म्हणत आहेत.
राज्यात पोलीस,कोर्ट आणि चौकशी यंत्रणा याचा विसरच गृहमंत्र्यांना पडलेला दिसतोय याठिकाणी #अध्यक्षमहोदय..!
फक्त गोड गोड बोलायचे, विद्यार्थ्यांना आश्वासनांची खैरात वाटायची आणि प्रत्यक्षात मात्र ना ठोस कारवाई, ना जबाबदारी, ना राजीनामा!
विद्यार्थ्यांनी पुरावे द्यायचे; चौकशी यंत्रणांनी मात्र मूग गिळून बसायचे—हा कसला न्याय?
#MPSC
ज्यांनी स्वतः IBPS कडील सरळसेवा परीक्षा दिल्यात त्यांना परिणाम माहित आहे, बाकी ज्यांची क्षमता नाही त्यांनी IQ बद्दल बोलणे म्हणजे कमालच आहे...
बहुदा ज्यांचा धंदा चौपट झाला ते पेपरफोडे आणि नक्कलकार ही मागणी करत आहे.
MPSC ने परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कोणालाही न पटणारी दिली गेलेली कारणे ही अनागोंदी कारभाराचा कळस आहे. २५ ऑक्टोबरची परीक्षा थेट ३ जानेवारी २०२७ वर ढकलण्यामागे नेमके काय गौडबंगाल आहे? भ्रष्टाचाराची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी? आपल्या सोयीने पेपरफुटीचे डाव आखण्यासाठी? की कोणाला तरी फायदा मिळवून देण्यासाठी? या निर्णयामुळे आयोगाने विद्यार्थ्यांच्या वेळेची, पैशांची आणि मानसिक स्वास्थ्याची राखरांगोळी केली आहे.
आयोगाने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
@CMOMaharashtra@mpsc_offical
@VikramPachpute_@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra मग जे अध्यक्ष होते त्यांची चौकशी करून त्यांना लवकरात लवकर नारळ द्या आणि ही परीक्षा 3 महिने पुढे न घेता नोव्हेंबर मधे घ्या.मेन्स हवे तर मार्च/एप्रिल मध्ये घ्या पण पूर्व परीक्षा इतक्या उशीरा होणे आम्हाला मानसिक, आर्थिक बाजूने परवडणारे नाही.
तुम्हाला माहिती आहे गावाकडे काय स्थिती ते
पुण्यात एमपीएससीच्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. परीक्षा तीन महिने पुढे ढकलू नये पूर्व परीक्षा नोव्हेंबर मध्ये मुख्य परीक्षा जानेवारी मध्ये व निकाल मार्चमध्ये लावावा व परीक्षेची प्रक्रिया पूर्ण करावी त्याआधी अध्यक्षांचा राजीनामा घ्या.
मा. मुख्यमंत्री यांना mpsc अध्यक्षांना क्लीन चीट देण्याची एवढी का घाई झाली आहे समजत नाही. आणि ते विद्यार्थ्यांना पुरावा द्या म्हणत आहेत. मग तुमच्या हाताशी असणाऱ्या यंत्रणा काय कामाच्या? आमच्याकडे कोणतीही सुविधा नसताना आम्ही कसा काय पुरावा द्यायचा? मा. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचा विचार करावा.🙏🏻
#MPSC चे विद्यार्थी आणि शिक्षकांचं उद्या (शुक्रवार दि. ११) छत्रपती संभाजीनगर इथं आंदोलन असून त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी मी ही या आंदोलनाला उपस्थित राहणार आहे.
भेटू - सकाळी ९:३० वाजता
स्थळ - हमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर
#विद्यार्थ्यांच्या_हक्कासाठी
#आता_नाही_तर_कधीच_नाही
सध्याची #MPSC ची परीक्षा व्यवस्था विश्वासार्हत राहिलेली नाही. या व्यवस्थेमधील गैरप्रकारांविरोधात #नागपूर, #नाशिक आणि #जळगावमध्ये आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे! MPSC मधील या अनागोंदीची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्ष आणि सचिवांनी पदावरून पायउतार व्हावं. सरकारनेही विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नये. आजचा आक्रोश उद्याचा मोठा संघर्ष बनू नये, यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा.
@CMOMaharashtra@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २५ ऑक्टोबरला होणारी परीक्षा अचानक थेट ३ जानेवारीवर ढकलण्यात आली आहे. परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना असा निर्णय घेणे म्हणजे रात्रंदिवस तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी, स्वप्नांशी आणि भविष्याशी चालवलेला क्रूर खेळ आहे.
केंद्रांची अनुपलब्धता, वाहतुकीच्या अडचणी आणि सणासुदीचा काळ ही काय कारणं आहेत? वेळापत्रक जाहीर करताना याचे नियोजन केले नव्हते का? अचानक घेतलेल्या संशयास्पद निर्णयामागे या परीक्षेतही काहीतरी मोठा घोळ शिजतोय का, असा संशय निर्माण होत आहे! विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या हा कारभार चुकीचा आहे.
MPSC च्या बेजबाबदार नियोजनाचा फटका नेहमी गरीब शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मुलांनीच का सहन करायचा? हा लाखो होतकरू तरुणांच्या संयमाचा अंत आहे. विद्यार्थ्यांचा हा वाढता संताप या संवेदनाहीन सरकारला आणि आयोगाला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही!
@mpsc_office
#mpsc #exampostponed #paperpostponed
When @abhijeet_dipke met Prathamesh’s mother, she broke down, saying that seeing him made her feel as if her son Prathamesh (Avi) had come back to meet her.
No mother should have to lose her son to a system that was supposed to give him a future.