विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ‘पूर्ण पाठिंबा’ म्हणत "आंदोलनाला भेट न देता" आंदोलनाचे फोटो काढणे सोपे आहे; पण तुमचे पक्षप्रमुख आणि नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारित पुणे महानगरपालिका येते, मग त्यांच्याकडून PMC-JE परीक्षा रद्द का करून घेत नाही?
विद्यार्थ्यांना केवळ आश्वासन नको, निर्णय हवा!
उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे अधिकार असूनही परीक्षा रद्द होत नसेल, तर पुणे शहर शिवसेना अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका नेमकी काय? विद्यार्थ्यांच्या बाजूने खरोखर उभे असाल तर आपल्या पक्षप्रमुखांकडे PMC-JE फेरपरीक्षेची मागणी लावून धरा. ते तुम्हाला जुमानत नसतील तर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा दिखावा बंद करा.
@INCHarshsapkal@INCMaharashtra@Shivsenaofc@mieknathshinde@DrSEShinde
#PMCJE #PMCJEExam #StudentsJustice #Congress
कनिष्ठ अभियंता पदभरतीतील गैरप्रकाराविरोधात विद्यार्थ्यांचे पुणे महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलन; शिवसेनेचा आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा..!!
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराच्या विरोधात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून परीक्षा देणारे विद्यार्थी आज पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर समोर आंदोलन केले. गुणवत्तेच्या आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांनीच भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे पुरावे पुणे महानगरपालिका प्रशासनासमोर मांडले. या पुराव्यांच्या आधारे पुणे महानगरपालिकेने तीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर केवळ तीनच विद्यार्थी दोषी असल्याचे प्रशासन कोणत्या अधिकृत तपासाच्या आधारे सांगत आहे, हा गंभीर प्रश्न आहे.
एकीकडे गैरप्रकाराचे पुरावे समोर येऊन गुन्हे दाखल झाले असताना दुसरीकडे उर्वरित परीक्षार्थींना सेवेत रुजू करून घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवणे म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. प्रश्नपत्रिका नेमकी किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली किंवा किती जणांना त्याचा फायदा झाला नाही, याबाबत पुणे महानगरपालिकेकडे अधिकृत आणि अंतिम स्वरूपाचा स्पष्ट निष्कर्ष नसताना संपूर्ण भरती प्रक्रिया पुढे रेटली जात असेल, तर या भरतीची पारदर्शकता आणि विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात येते. प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरचा वाटोळा करण्याचा अधिकार पुणे महानगरपालिका प्रशासनाला नाही.
या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेने यापूर्वीच आवाज उठवला असून, या संपूर्ण प्रकरणाची माहिती माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनाही देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा असून, कनिष्ठ अभियंता पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून नव्याने, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घेण्यात यावी, ही शिवसेनेची स्पष्ट मागणी आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या हक्कासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असून, प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास अधिक तीव्र अंदोलन करू.
@PMCPune@navalMH
#punecity #shivsena #PMC #students #peparleak
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात! ⚖️✊
MPSC,एमएमआरडी आणि पुणे महानगर पालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरतीतील गैरप्रकाराविरोधात आज पुण्यात विद्यार्थ्यांसोबत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांची भेट घेतली.
विविध अहवाल, भरती प्रक्रियेतील गंभीर प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आंदोलनासोबतच आता कायदेशीर लढाईचीही तयारी सुरू झाली आहे. पुढील कायदेशीर कारवाईबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
महायुती सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नये.
प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही!
@AsimSarode@INCHarshsapkal@satejp
#PMCJE #PMCRecruitment #StudentsJustice #RojgarNyay #IBPS #Congress
फसवणुकीने भरलेली #PMC_JE_Scam परीक्षा रद्द करण्यात यावी.
भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, निष्पक्षता आणि जनतेचा विश्वास अबाधित राखण्यासाठी, ही परीक्षा रद्द करून पारदर्शक पद्धतीने नव्याने आणि निष्पक्ष परीक्षा घेणे अत्यंत आवश्यक आहे.
_ @Dhananjay4INC@INCMaharashtra@INCHarshsapkal
PMC junior Engineer Exam मध्ये स्पष्ट पणे Exam conduct करणारे लोक प्रश्न लीक करण्यामध्ये सहभागी असताना PMC म्हणत आहे हा पेपर फुटीचा प्रकार नाही आणि मुद्दाम लवकर joining देऊन प्रकरण रेटण्याचा प्रकार करत आहे .
याच्या विरोधात विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
तरीही PMC ला काहीही फरक नाही
PMC JE भरती घोटाळा : पुणे महानगर पालिकेच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ परीक्षार्थींना संबोधित केले.
सर्व परीक्षार्थींना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष ही लढाई सोबत लढेल आणि जिंकेल.
@INCHarshsapkal@satejp@INCMaharashtra@navalMH@PMCPune
https://t.co/Iwt6BeEdfJ
40,000 विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे.
माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपण अनाथांचे नाथ आहात.
प्रशासन कानाडोळा करत आहे.
तुम्हीच आमचे नाथ आहात.
कृपया तात्काळ पुणे पालिकेच्या आयुक्तांना Re-Exam चे आदेश द्यावेत ही विनंती.
@mieknathshinde@DrSEShinde@Dev_Fadnavis@PMCPune@SunetraA_Pawar