बहुजन आणि वंचित घटकांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेणारे दूरदृष्टी राजे! राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजच्या काळातही तितकेच मार्गदर्शक आहेत. छत्रपती शाहू महाराजांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
#ShahuMaharaj#EducationForAll#VisionaryLeader #MaharashtraHistory #SocialReform
📍 इचलकरंजी, #कोल्हापूर |
कोल्हापूर जिल्ह्यातील #इचलकरंजी येथील जनता सहकारी बँकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आणि जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या "कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना" असा नामविस्तार सोहळा आज केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांच्या शुभहस्ते पार पडला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, संजय सावकारे, शिवेंद्रराजे भोसले, रवींद्र चव्हाण, माधुरीताई मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, राजेश क्षीरसागर, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, लाडक्या बहिणी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Ichalkaranji #Kolhpur #EknathShinde #Maharashtra #AmitShah
@Dev_Fadnavis@abitkar_prakash@mrhasanmushrif@RaviDadaChavan@madhurimisal@mpdhairyasheel@Rajesh9099
कोल्हापूर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असले तरी देशाच्या राजनैतिक शक्तीपीठांचा विचार केला तर पहिले शक्तीपीठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे शक्तीपीठ म्हणजे पोलादी पुरुष अमित शाह आहेत असे गौरवोद्गावर याप्रसंगी काढले. मोदीजी यांनी भारताला विकासाच्या नव्या उंचीवर नेले, तर अमित शाह यांनी देशाची सुरक्षा आणि सहकार क्षेत्राला नवी दिशा दिली असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.
कलप्पाअण्णा आवाडे यांचा गौरव करताना, वयाच्या ९५ व्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे असे सांगून त्यांनी उभारलेला हा केवळ साखर कारखान्याचा कार्यक्रम नसून सहकारातून समृद्धीकडे नेणाऱ्या चळवळीचा उत्सव असल्याचे नमूद केले.
सहकार क्षेत्रातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचावा यासाठी अमितभाई शाह यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. सहकारी बँकांना सक्षम करण्यासाठी गृहकर्ज मर्यादा वाढविणे, वन टाइम सेटलमेंट सुविधा, स्वतंत्र अंब्रेला ऑर्गनायझेशन, स्वतंत्र को-ऑपरेटिव्ह क्लिअरिंग हाऊस उभारणी यांसारखे महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. यामुळे सहकारी बँकांची आर्थिक क्षमता आणि विश्वासार्हता अधिक मजबूत झाली असल्याचे यावेळी अधोरेखित केले.
पश्चिम महाराष्ट्र ही देशातील साखर सहकार चळवळीची भूमी आहे. देशातील साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. लाखो शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा कणा म्हणजे सहकारी साखर कारखाने आहेत. भारत विकसित राष्ट्र व्हायचा असेल तर सहकार चळवळ अधिक मजबूत झाली पाहिजे अशीच अमित शाह यांची भूमिका असून शेतकरी, साखर कारखाने आणि सहकारी संस्थांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
📍 ठाणे |
आंतरराष्ट्रीय योग दिना’निमित्त आज निवासस्थानी उत्साहात योगासने करून हा विशेष दिवस साजरा केला.
धकाधकीच्या आयुष्यात मनाला शांतता आणि शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ‘योग’ हाच एकमेव उत्तम मार्ग आहे. केवळ आजच्या दिवसापुरतेच मर्यादित न राहता, योग ही आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा एक भाग बनावा, हाच आजच्या दिवसाचा खरा संकल्प!
तुम्हा सर्वांनाही आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा...
#आंतरराष्ट्रीय_योग_दिन #InternationalYogaDay #Yoga #Thane #EknathShinde #Maharashtra
📍 #मुंबई |
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी मंत्री उपस्थित होते.
#Mumbai#MonsoonSession2026#Maharashtra #EknathShinde
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar
📍 #मुंबई |
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज एक विशेष बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. बेस्ट उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने,
* कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करण्याचा तसेच नवीन वेतन करार होईपर्यंत कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ३००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी वाढ देण्याचे मान्य करण्यात आले.
* कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करण्यात येईल असेही स्पष्ट केले.
* सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पुढील तीन वर्षांत ५००० नवीन बसेस स्वतःच्या मालकीच्या घेण्यात येईल असेही निश्चित करण्यात आले.
* बेस्ट प्रशासनाने तयार केलेला 'कायापालट' प्रस्ताव तातडीने शासनास सादर करून त्यास मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाईल असेही यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीअंती कृती समितीने आपला संप मागे घेत असल्याचे जाहीर केले.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, आमदार मुरजी पटेल, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, तसेच बेस्ट कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
#Mumbai #BEST #EknathShinde #Maharashtra
@PratapSarnaik@AhirsachinAhir@MurjiPatel_
📍 #मुंबई |
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन - २०२६. दिवस पहिला.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले.
यावेळी 'जय भवानी जय शिवराय' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या घोषणांनी पूर्ण आसमंत दुमदुमून गेला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी महायुतीचे मंत्री आणि आमदार आवर्जून उपस्थित होते.
#Mumbai #MonsoonSession2026 #Maharashtra #EknathShinde
📍 #मुंबई |
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन - २०२६ च्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना अधिवेशन कालावधीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे सहकारी मंत्री शंभूराज देसाई आणि संजय राठोड हेदेखील सोबत उपस्थित होते.
#Mumbai #MonsoonSession2026 #Maharashtra #EknathShinde
@rahulnarwekar@Dev_Fadnavis@shambhurajdesai@SanjayDRathods
📍 #मुंबई |
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सहा विद्यमान खासदारांनी आज हाती भगवा झेंडा घेत #शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेनेने आता आता चौकार नव्हे तर षटकार मारला असल्याचे मत व्यक्त केले.
या पक्षप्रवेश सोहळ्यात परभणीचे तीन वेळा निवडून आलेले खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
हे खासदार कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी आलेले नाहीत. ते मतदारसंघाच्या विकासासाठी, कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिवसेनेत आले आहेत असेही याप्रसंगी स्पष्ट केले.
दिलेला शब्द पाळणे हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे असे सांगत नव्याने प्रवेश केलेल्या खासदारांच्या मतदारसंघातील प्रकल्प, विकासकामे आणि प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, अशी ग्वाही दिली. तसेच या सहा खासदारांच्या आयुष्यात काहीही अडचण आल्यास त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू असेही यावेळी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री भरत गोगावले, तसेच पक्षाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde #Maharashtra
@Shivsenaofc
पद्म पुरस्कार हा केवळ व्यक्तीचा गौरव नव्हे, तर समाजाच्या जाणिवांना जिवंतपणा देणाऱ्या दीपस्तंभांचा गौरव आहे. आज अशा आदर्श दीपस्तंभांना पद्म पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. समाजाला दिशा देणाऱ्या या महानुभवांचे मनःपूर्वक अभिनंदन.पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या कर्तृत्वाने समाजव्यवस्था उजळते, ज्यांच्या सोबत असण्यानेही समाजाची प्रतिष्ठा उंचावते, अशा कर्तबगार, कर्तृत्ववान परंतु दुर्लक्षित अश्या व्यक्तिमत्त्वांचे दर्शन समाजाला घडविण्याचा नवा पायंडा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी पाडला, आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील विधायक व रचनात्मक कामांची ओळख समाजाला झाली. पुन्हा एकदा सर्व पुरस्कार प्राप्त पद्म विजेत्यांचे अभिनंदन.
@rashtrapatibhvn@narendramodi@PadmaAwards
#PadmaAwards2026 #PadmaAwards
The Padma Awards are not merely a recognition of individual achievements; they are a tribute to those who inspire society through their dedication and service. It is heartening to see such remarkable personalities being honoured for their valuable contributions. Congratulations to all the Padma Award recipients.
In recent years, Prime Minister Hon'ble Shri. Narendra Modiji has ensured that many deserving yet lesser-known individuals from across the country receive national recognition. Their inspiring work and commitment to society have now reached a wider audience, highlighting the positive changes being made in every corner of India.
The achievements of these awardees serve as an inspiration to society and bring pride to the communities they represent. Once again, heartfelt congratulations to all the Padma Award winners.
@rashtrapatibhvn@narendramodi@PadmaAwards
#PadmaAwards2026 #PadmaAwards
📍 ठाणे |
#रायगड जिल्ह्यातील #श्रीवर्धन तालुक्यातील उबाठा गटाचे नगराध्यक्ष ऍड.अतुल चौगुले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काल #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह दक्षिण रायगडचे माजी जिल्हाप्रमुख विजयराज खुळे यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्यासह, विक्रांत राऊत, साकार जाधव, प्रीतम श्रीवर्धनकर, लखन भाटकर, पायल भाटकर, मयुरेश मयेकर, प्रतीक पालवे, नियती जाधव आणि असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला.
यासोबतच माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ, उपाध्यक्ष अजितकुमार पिसाळ, माजी नगरसेविका भारती पिसाळ, उपाध्यक्ष हनुमंत ठाकूर, हिराजी निंबाळकर, शर्मिला पवार, वॉर्ड अध्यक्ष ज्योती पुजारी, कल्याणी बोंद्रे, युवक अध्यक्ष अनिल पुजारी, जितेंद्र खोत, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष ऑस्कर किणी यांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या सर्वांचे देखील पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, माजी महापौर दत्ता दळवी, उपनेत्या सुवर्णा करंजे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
#Shivsena #Raigad #Shrivardhan #EknathShinde #Maharashtra