महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-२८८, कनिष्ठ ���भियंता (यांत्रिकी)-३१ आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक-९६ पदे भरण्यात यावी ही विनंती.
@jaljeevan_maha
@GulabraoRPatil
@MeghnaBordikar
भूमिअभिलेख विभागांमधील भूकरमापक (Surveyor) Group-C परीक्षा होऊन 1.5 महिने झाले अजूनपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही आहे तरी,मा. मंत्री महोदयांनी कृपया तातडीने निकाल जाहीर करण्याचे आदेश विभागाला द्यावेत, ही नम्र विनंती. @cbawankule@iYogeshRKadam@maharevenue
सद्यस्थितीत राज्यात जल जीवन मिशन,अटल भूजल योजना,जलयुक्त शिवार अभियान यासारख्या मोठ्या प्रमाणात योजना चालू आहेत, यासाठी स्थापत्य अभियंता खुप मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे,तरी MJP विभागाने १००% कनिष्ठ अभियंता व CEA पदे भरावीत ही विनंती @jaljeevan_maha@GulabraoRPatil@MeghnaBordikar
#KDMC जगावाढ आंदोलन
नगरविकास विभाग महाराष्ट्र शासनाकडून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला दिलेले निर्देश आणि आकृतीबंध
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 100% प्रमाणे मंजूर पदे 112, भरलेली पदे 7, रिक्त पदे 105
माननीय आयुक्त साहेब
100% पद भरती परवानगी असताना जागा कपात का?????????
मुंबई महानगरपालिका (MCGM) यांच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेत पदविका धारक (Diploma) उमेदवारांसोबतच पदवीधर (Graduate) उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणात परीक्षा दिलेली आहे. सदर शैक्षणिक पात्रतेसंबंधीचा मुद्दा सध्या माननीय न्यायालयाच्या विचाराधीन अस���न, या प्रकरणात अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
अशा परिस्थितीत, परीक्षेचा निकाल जाहीर करताना सर्व परीक्षार्थींना न्याय मिळावा, तसेच भविष्यात कोणताही गोंधळ किंवा अन्याय होऊ नये म्हणून, निकाल हा माननीय न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून जाहीर करण्यात यावा. माननीय प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, ही विनंती.
@mybmc @degree_holders @INCHarshsapkal @VarshaEGaikwad
संदर्भ : महाराष्ट्र_काँग्रेस/रोजगार_सत्याग्रह/वाल्मी/१२१२२०२५/०००१.
प्रति,
मा. सौ. अंजली रमेश (भा.प्र.से.)
आयुक्त, मृदा व जलसंधारण विभाग
वाल्मी, छत्रपती संभाजीनगर
विषय : वाल्मी येथील आंदोलन स्थळी भेट देऊन आमच्या मागण्यांची दखल घेतल्याबद्दल तस��च विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिलेल्या आश्वासनाबद्दल मनःपूर्वक आभार.
मा. महोदया,
काल, गुरुवार दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी वाल्मी मुख्य प्रवेशद्वाराजवळ झालेल्या आमच्या शांततापूर्ण "रोजगार सत्याग्रह" आंदोलनाला आपण प्रत्यक्ष भेट देऊन आमच्या मागण्यांची सविस्तर चर्चा ऐकून घेतली आणि परीक्षार्थींसोबत संवाद साधला, याबद्दल आम्ही आपणांस मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करत��.
जलसंधारण विभागाचा आकृतीबंध तातडीने मंजूर करून सर्व रिक्त व नव्याने निर्माण केलेल्या पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यासंबंधी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची आपण घेतलेली गंभीर दखल, विद्यार्थ्यांमध्ये आशेचा किरण ठरली आहे. आपले खालील निर्णय आम्हाला विशेष मोलाचे वाटले:
१. तातडीने प्रशासकीय कार्यवाही
आपण तत्काळ प्रसिद्ध केलेले दिनांक ११ डिस��ंबर २०२५ चे पत्र:
• जलसंधारण विभागाचा आकृतीबंध तातडीने मंजूर करण्याबाबत,
• २०१४ नंतर निर्मित झालेल्या सर्व नवीन पदांची भरती लवकरात लवकर सुरू करण्याबाबत,
• सर्व पदभरती प्रक्रिया पारदर्शक व स्पर्धात्मक पद्धतीने IBPS/राज्यस्तरीय परीक्षा घेऊन करण्याबाबत,
• विभागाने लवकरात लवकर तपशीलवार वेळापत्रक जाहीर करण्याबाबत,
या सर्व निर्देशांमुळे लाखो अभियंता विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला ���हे.
२. पुढील उच्चस्तरीय समन्वयाची हमी:
चर्चेदरम्यान आपण दिलेले आश्वासन आम्हाला अतिशय महत्त्वाचे वाटले की,
• आपण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आमची बैठक आयोजित करण्यास मदत कराल.
• तसेच भविष्यात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी वाल्मी कार्यालयाला भेट देत असल्यास, आपण आम्हाला चर्चेसाठी आमंत्रित कराल, जेणेकरून आमच्या मागण्या थेट त्यांच्यासमोर मांडता येतील.
हा संवेदनशील आणि सहकार्यपूर्ण दृष्टिकोन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
३. विद्यार्थ्यांचा समन्वय गट तयार
आपल्या मा���्गदर्शनानुसार आम्ही विद्यार्थ्यांचा एक समन्वयक गट स्थापन केला असून, त्यांची नावे आपणास सुपूर्द केल्या आहेत. हा गट आपल्या कार्यालयाशी सातत्याने संपर्कात राहून पुढील पाठपुरावा करेल.
महोदया, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित भरती प्रक्रियांमुळे राज्यातील लाखो तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले गेले आहे. अशा परिस्थितीत आपण दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि न्याय्य तोडगा काढण्याची तयारी विद्यार्थ्यांसाठी नवी आशा घेऊन आली आहे. आपल्या मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत. आपल्या सकारात्मक पुढील पावलांची आम्ही अपेक्षा करतो.
��न्यवाद.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करिता,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस
अध्यक्ष : रोजगार व स्वयंरोजगार विभाग
(भ्रमणध्वनी : ९८६७६ ९३५८८)
प्रत,
१. मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री : महाराष्ट्र राज्य
२. मा. हर्षवर्धन दादा सपकाळ, प्रांताध्यक्ष : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
३. मा. संजय राठोड, मंत्री : मृदा व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य
४. मा. गणेश पाटील, सचिव मृदा आणि जलसंधारण ���िभाग आणि पाटबंधारे व जलसंपदा विभाग
@Dev_Fadnavis @INCHarshsapkal @SanjayDRathods @AnjaliRameshIAS @MahaChiefSec @naikindranil
राज्य सरकारने वारंवार घोषणा करून बेरोजगारांची दिशाभूल केली असून प्रत्यक्षात जलसंधारण विभागातील एकही जाहिरात, आकृतीबंधाचा निर्णय किंवा भरती प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. त्यामुळे वाल्मी, छत्रपती संभाजीनगर येथे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे भव्य ‘रोजगार सत्याग्रह’ आंदोलन प्रद��श सरचिटणीस व रोजगार विभागाचे संयोजक धनंजय शिंदे आणि शहर जिल्हाध्यक्ष युसूफ शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
राज्यातील लाखो बेरोजगार अभियंते आणि युवकांची थट्टा करणाऱ्या राज्य सरकारला ठोस इशारा देत काँग्रेस पक्षाने आज स्पष्ट केले की, जोपर्यंत जलसंधारण विभागाचा आकृतीबंध मंजूर होत नाही, तोपर्यंत जलसंधारणमंत्री संजय राठोड यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेश करू देणार नाही!
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वाल्मीच्या आयुक्त डॉ. अंजली रमेश यांना निवेदन सादर केले. आकृतीबंध तातडीने मंजूर करणे आणि सर्व रिक्त पदांची तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली. आयुक्त डॉ. रमेश यां��ी, “सदर मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवून राज्य सरकारशी तातडीने चर्चा करू; निर्णयाबाबत बेरोजगारांना माहिती देण्यात येईल,” असे आश्वासन दिले. युवकांना न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल आणि सरकारच्या खोट्या आश्वासनांना आता जिल्ह्यात स्थान राहणार नाही.
यावेळी महिला काँग्रेस अध्यक्षा दीपालीताई मिसाळ, प्रदेश सचिव प्रकाश भगनुरे पाटील, प्रदेश सचिव प्रवीण केदार, प्रमोद सोनवणे त��ेच स्थानिक कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, बेरोजगार तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@Dhananjay4INC
#rojgar #chatrapatisambhajinagar
��ुवांना नोकऱ्या देऊ, बेरोजगारांना भत्ता देऊ या आश्वासनाच्या बळावर सत्ता मिळवणारे महायुतीचे सरकार आज मात्र युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. जलसंधारण विभागाच्या सुधारित आकृतीबंधानूसार ८ हजारहून अधिकची पदे रिक्त असतानाही पदभरती केली जात नाही. वारंवार राज्यभरातील युवांकडून मंत्र्यांना निवेदने दिली गेली पण यावर अजूनही कारवाई झालेली नाही. परिणामी आज संभाजीनगर येथील जलसंधारण व���भागाच्या कार्यालयाबाहेर युवांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
तरी सरकारने तात्काळ जलसंधारण विभागाच्या रिक्त पदांसह इतरही विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करावी व परिक्षा #TCS केंद्रावरच घेण्याबाबत निर्णय घ्यावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
#WCD #पदभरती
🚩 चलो वाल्मी, छत्रपती संभाजीनगर! 🚩
🇮🇳 रोजगार सत्याग्रह आणि तिरंगा यात्रा 🇮🇳
गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ आश्वासने देत आलेल्या जलसंधारण विभागाच्या उदासीन कार्यप्रणालीविरोधात, राज्यातील शेकडो बेरोजगार अभियांत्रिकी विद्यार्थी आणि परीक्षार्थी आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, “रोजगार व स्वयंरोज���ार विभाग संयोजक” मा. धनंजय रामकृष्ण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, राज्यातील लाखो बेरोजगार अभियंत्यांच्या न्याय आणि रोजगार हक्कासाठी, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात एक भव्य “तिरंगा यात्रा आणि रोजगार सत्याग्रह” आयोजित केला आहे!
📅 दिनांक : गुरुवार, डिसेंबर २०२५
📍 स्थळ : वाल्मी मुख्य कार्यालय, छत्रपती संभाजीनगर
काँग्रेसचा हात, बेरोजगारांना साथ !
@INCHarshsapkal @satejp @VijayWadettiwar @Dhananjay4INC
@mybmc पालिकेची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा पदवीधर उमेदवारांनी देखील दिलेली आहे,तसेच सदर प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून अंतिम निर्णय झालेला नाही म्हणून निकाल लावताना सर्वच परीक्षार्थींचा न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला आधीन राहून निकाल द्यावा ही नम्र विनंती @Dev_Fadnavis
दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री @mieknathshinde साहेबांनी ट्विट करून सर्व महानगरपालिका, नगरपरिषद – पंचायत पदभरती बाबत घोषणा केली होती परंतु अद्याप पदभरती जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. कृपया तत्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती