MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC
तुमची सकाळ तुमच्या इच्छाशक्तीवर नाही…
ती तुमच्या रात्रीच्या सवयींवर ठरते.
अनेक लोक सकाळ बदलण्याचा प्रयत्न करतात…
पण रात्री बदलण्याचा नाही.
आणि मग OPD मध्ये एकच वाक्य पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतं
“Doctor, सकाळी उठतच नाही…”
“व्यायामाची इच्छा होत नाही…”
“ऊर्जा वाटत नाही…”
“सकाळी mood च नसतो…”
खरं सांगायचं तर…
सकाळ ही गजराने ठरत नाही.
ती आदल्या रात्री ठरते.
1️⃣ 5 वाजता उठणं कठीण नसतं…
रात्री स्वतःला थांबवणं कठीण असतं.
“आणखी एक reel…”
“आणखी एक episode…”
“आणखी थोडं काम…”
“उद्या बघू…”
आणि नकळत रात्र वाढत जाते.
2️⃣ शरीराला झोपेची वेळ कळते…
कारण शरीर घड्याळानुसार चालतं.
मोबाईलच्या battery percentage नुसार नाही.
झोपण्याची वेळ रोज बदलली…
की hormones, metabolism, भूक, ऊर्जा आणि मनःस्थिती सुद्धा बदलते.
3️⃣ रात्री उशिरापर्यंत जागणं ही फक्त सवय नसते…
ती दुसऱ्या दिवसाच्या थकव्याची सुरुवात असते.
म्हणूनच सकाळी उठल्यावर अनेकांना वाटतं
“आज राहू दे… उद्यापासून सुरू करतो.”
4️⃣ सकाळी इच्छाशक्ती कमी पडत नाही…
Recovery कमी पडते.
रात्री पुरेशी झोप झाली नसेल…
तर चालणं, व्यायाम, meditation, healthy breakfast…
सगळंच अवघड वाटू लागतं.
5️⃣ हे फक्त तरुणांचं नाही…
हे सगळ्यांचंच वास्तव आहे.
रात्री assignment पूर्ण करणारे विद्यार्थी…
काम संपवून उशिरा झोपणारे professionals…
घर आवरून स्वतःसाठी शेवटी वेळ काढणाऱ्या गृहिणी…
रुग्णांची काळजी घेत जागणारे caregivers…
आणि “आता निवांत वेळ मिळालाय” म्हणून TV पाहत बसणारे ज्येष्ठ नागरिक…
प्रत्येकाची रात्र वेगळी असते.
पण शरीराची गरज एकच असते -नियमित झोप.
6️⃣ म्हणूनच अनेक health goals अपूर्ण राहतात.
लोक motivation शोधतात…
पण शरीराला motivation नाही…
routine हवं असतं.
Consistency हीच biology ची भाषा आहे.
7️⃣ उद्याची सकाळ आज रात्रीच लिहिली जाते.
तुम्ही रात्री किती वाजता झोपता…
यापेक्षा महत्त्वाचं आहे
झोपण्याआधी शेवटचा एक तास कसा घालवता?
स्क्रीनसोबत…
की स्वतःसोबत?
माझा अनुभव
Diabetes, obesity, stress, fatigue, poor sleep…
या अनेक समस्या सकाळी सुरू होत नाहीत.
त्या आदल्या रात्री सुरू होतात.
आणि सुधारणा सुद्धा अनेकदा रात्रीपासूनच सुरू होते.
कारण चांगली सकाळ ही अपघाताने घडत नाही…
ती शांत, शिस्तबद्ध आणि जागरूक रात्रीतून जन्माला येते.
आज रात्री झोपण्यापूर्वी एकच प्रश्न स्वतःला विचारा
उद्याची सकाळ चांगली व्हावी म्हणून…
आज मी काय थांबवणार आहे?
तुमच्यासाठी सर्वात कठीण काय असतं?
उशिरापर्यंतचा मोबाईल, काम, मालिकांचा एक episode, की न संपणारे विचार?
शब्दांत मांडता आलं तर नक्की लिहा.
📱 एक छोटं अपडेट…
Android आणि iOS App Launch आता अगदी जवळ आलं आहे
लाखो वाचकांबरोबरचा संवाद आता पुढच्या टप्प्यात जाणार आहे…
जिथे आरोग्य फक्त वाचलं जाणार नाही,
तर समजून घेतलं जाईल, ट्रॅक केलं जाईल आणि गोपनीयपणे जपलं जाईल.
Like | Share | Subscribe
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
#The5AMClub #MorningHealthMarkers #SleepHealth #MetabolicHealth #ClinicalWisdom #JustForHearts
नियती किती निष्ठूर होऊ शकते याचं हे दुर्दैवी उदाहरण आहे....
अक्षय कुमार पांडगळे या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून(MPSC) नोकरीचे स्वप्न पाहिले. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असताना वडिलांनी मुलाला शिक्षणासाठी आधार दिला.
दोन वर्षांपूर्वी अक्षय पांडगळे याचे वडील कुमार पांडगळे यांना कॅन्सरचे निदान झाले. दोन वर्ष उपचार चालले. थोडी होती ती दोन एकर जमीन वडीलांच्या दवाखान्यासाठी विकावी लागली. दुर्दैवाने कुमार पांडगळे यांचे वीस दिवसांपूर्वी निधन झाले.
दरम्यान अक्षय पांडगळे या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वरिष्ठ लिपिक परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली होती. काही दिवसांत त्याला नोकरीची ऑर्डर येणार होती परंतु नियती अत्यंत निर्दयी झाली.
मागील आठवड्यात अक्षय पांडगळे याला झोपेत असताना ब्रेन स्ट्रोक आला. तो सध्या अत्यवस्थ असून पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. पत्नी, तीन वर्षांची मुलगी आणि अवघ्या सात दिवसांचा तान्हा मुलगा आहे. उपचारांसाठी दररोज 70 ते 80 हजार रुपये खर्च येत असून एकूण खर्च 19 ते 20 लाख येणार आहे.
अक्षयला आणि त्याच्या परिवाराला आर्थिक मदतीची गरज आहे. आक्षय बरा होऊन अधिकारी होईल आणि तुमचे ऋण नक्कीच फेडील. या कठीण काळात त्याला मदत मिळणं गरजेचं आहे.
खाली अक्षयचा भाऊ सुशील कुमार पांडगळे याचे अकाऊंट डिटेल्स व मोबाईल नंबर जोडत आहे. जमेल तेवढी मदत नक्की करा.
Sushil Kumar Pandgale
बँक: HDFC Bank
A/C No.: 50100492651282
IFSC Code: HDFC0001515 Mobile-8850548917
@CMOMaharashtra@DevendraFbhau@Dev_Fadnavis@MahaDGIPR@mieknathshinde@SunetraA_Pawar@DrSEShinde@VijayWadettiwar@RahulGandhi@abpmajhatv@saamTVnews@TV9Marathi@mumbaitak@LoksattaLive@lokmat@SaamanaOnline@rautsanjay61@PawarSpeaks@PMOIndia@Aaple_Sarkarr
आंब्याची विक्री करताना काही अनुभव मनाला स्पर्श करून जातात. गुरुवारी S B Roadला हॉटेलमध्ये बसलो होतो, तिथंच टेबलवरं आंबा कापलेला होता. एक छोटा मुलगा जवळ आला. त्याला आंबा खायला दिला तर त्यानं तो आवडीनं खाल्ला. तो खाताना त्याचं सगळं तोंड आंब्यानं भरून गेलं होतं.
मित्राला Call करून आंबा कसा होता विचारलं तर त्यानं मधासारखा गोड होता असं सांगितलं. कार्पेट नसलेले आणि नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे आपल्याला हवे असतील, तर आजच खालील Contact Noवर संपर्क करा.
संपर्क : विवेक - 7499105923
पुढील उपचारांसाठीही व follow up साठी मोठा खर्च अपेक्षित आहे.
या गरीब कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधी तसेच इतर शासकीय मदतीचा लाभ मिळावा व आवश्यक मार्गदर्शन मिळावे, ही नम्र विनंती.
Plz_Healp
@BTechComedian@beingshrutip
@radhakrush
#ChiefMinisterReliefFund#MedicalHelp
त्यासाठी कुटुंबाला स्वतःची एक एकर शेती विकावी लागली होती. सध्या वडील पेट्रोल पंपावर काम करतात व आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते.
सोहमवर विखे पाटील फाउंडेशन, विळद घाट हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च झालेला असून तो नातेवाईकांनी उचलला आहे.
'आशाताई' -दि लास्ट एम्परर
ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात.
लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं.
तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं. तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच , ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं.
'गाणं हे माझं पॅशन आहे' किंवा 'ऍक्टिंग माझं पॅशन आहे' असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात.
असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.
मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.
'पिया तू अब तो आजा' मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. 'आईये मेहरबान' मध्ये लडिवाळपणा आहे, 'दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए' मध्ये नजाकत आहे. 'दम मारो दम' मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात.
व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या.
जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.
मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील , ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी आपल्याला घालून दिला !
जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला !
आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.
राज ठाकरे।
आमचे आंदोलन (11 एप्रिल 2025) आणि वास्तव (TREAD)
आंदोलनातल्या दोन प्रमुख मागण्या
1. राज्यसेवेमध्ये जे तांत्रिक आणि न्यायालयीन अडचण येऊ शकतात त्या दूर करणे आणि मगच मुख्य परीक्षा घेणे त्यासाठी मुख्य परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी.
2. कम्बाईन 2024 च्या जागा वाढ कराव्या. (1/9)
MPSC आणि विद्यार्थी..
खरंच वाटतंय कधी-कधी की ही परीक्षा नाय रे, Squid Game आहे —
स्पर्धा परीक्षेची पोर.... संघर्ष करतायत, झगडतायत, आणि सिस्टीम बाहेरून फक्त बघतेय… कदाचित Entertain सुद्धा होतेय!
आम्ही खूप लोकांना सांगितलं…
अर्ज केले, मेल केले, ट्वीट केले, वाट पाहिली.
पण आता थकलोय.
🙏 लोकशाहीचा चौथा स्तंभ — तुमच्यावरच शेवटची आशा आहे.
@RahulAsks@ashish_jadhao@AbhijitKaran25@_prashantkadam@waglenikhil@sahiljoshii@GondaneDevesh
आज राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या पदसंख्येत वाढ करण्याची मागणी केली. सध्या या जाहिरातीत 457 पदांचा समावेश असून राज्यसेवेच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रमांक 2 ची जाहिरात आहे. तरीही वस्तुनिष्ठ पद्धतीने राज्यसेवेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी ही अखेरची संधी असल्याने पदसंख्येत वाढ व्हावी यासाठी पाठपुरावा केला. पदांच्या वाढीबाबत आजरोजी ठोस काही सांगता येत नसले तरी पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत माझा प्रामाणिक प्रयत्न सुरु राहील.
यासोबतच राज्यसेवा 2022 च्या परीक्षेत निवड झालेल्या 623 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देणेबाबत विनंती केली. याबाबत मा. देवेंद्रजी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना दिले आहेत. #mpsc
महाराष्ट्र राज्याचा श्वास असलेला महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागात नेमकं चाललय काय...? या विभागातील कर्मचारी संघटना,आज दिनांक 17 डिसेंबर 2024 बेमुदत धरणे आंदोलन का करत आहे...? काय प्रश्न आहेत या विभागातील कर्मचार्यांचे
१. राज्यकर निरीक्षक ते राज्यकर अधिकारी पदोन्नती.
राज्यकर निरीक्षक ते राज्यकर अधिकारी पदोन्नती बाबत संघटनेचे प्रशासनासोबत एक वर्षापासून पत्रव्यवहार,भेटीगाठी, चर्चा पण अंमलबजावणी झाली नाही २. प्रशासकीय व विनंती बदली विशेष राज्यकर आयुक्त यांनी आश्वासित दोन ते तीन दिवसांमध्ये कर सहायकांचे विनंती बदल्यांचे आदेश व पदोन्नतीच्या जागा वापरून लवकरात लवकर राज्यकर निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश करण्यात येतील फक्त आश्वासने दिली जातात. शिवाय याव्यतिरिक्त मागण्या
१. १०:२०:३० कालबद्ध पदोन्नती.
२. कर सहायक सेवाशर्ती
३. कर सहायक व राज्यकर निरीक्षक पदोन्नती सन २०२४ DPC
४. विभागाच्या पुनर्रचनेमधील ७९९ राज्यकर निरीक्षकांचा प्रलंबित प्रस्ताव.
५. Pending Seniority list & Open Female Seniotity
6. HBA order तात्काळ पारित व्हावी.
7. E way bill drive यामध्ये कर्मचाऱ्यांची गैरसोय/ संरक्षण व होणारा अन्याय व रात्री/ अपरात्री महिलांना ई वे बील ड्युटी देवू नये.
8. राज्यकर निरीक्षक यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताणतणाव
9. खामगाव, नाशिक, भाईंदर येथील ठराविक अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना होणारा त्रास.
10. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बाबतीत केलेल्या पत्रव्यवहाराबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याबाबत तीव्र नाराज
राज्यकर निरीक्षक ते राज्यकर अधिकारी पदोन्नती व विनंती व प्रशासकीय बदल्या याबाबत जोपर्यंत आदेश पारित होत नाही. तोपर्यंत संघटना आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटू न देनार्या वस्तू व सेवा कर विभागातिल वरिष्ठांच्या मनमानी कारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या जिवनाची घडि मात्र विस्कटतना दिसत आहे.याचाच परिणाम म्हणून वांरोवार अर्ज विनंत्या निवेदन देऊन हि कुंभकर्णा सारख्या झोपि गेलेल्या प्रशासना विरोधात याच विभागातील राज्य कर्मचारी संघटनेने जो बेमुदत धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्यास आमच समर्थन आहे राज्यातील विरोधी पक्ष म्हणून आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागातील संघटना यांच्या मागण्या रास्त आहेत.शासन आणि प्रशासनाकडून फक्त आश्वासने दिली जातात.सरकारला व वस्तू व सेवा कर विभाग प्रशासनाला विनंती आहे आपण प्रामाणिकपणे आंदोलनकरत्यांचे प्रश्न सोडवावेत...