पुणे मनपा कनिष्ठ अभियंता पेपर फुटी बाबतचा मुद्दा @andharesushama यांनी Press conference मध्ये मांडून पेपर फुटी बाबत पाठपुरावा करणाऱ्या उमेदवारांना आणखी बळ दिले. पुणे मनपा प्रशासनाने याबाबत आता तरी गांभीर्याने विचार करून पदभरती प्रक्रिया सदोष पद्धतीने राबवावी ही नम्र विनंती.
जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांना सांगली येथे उमेदवारांनी भेटून निवेदन दिले.
उद्या कोल्हापूर मध्ये पण काही उमेदवार भेटणार आहेत..... जोपर्यत जाहिरात येणार नाही तोपर्यंत प्रयत्न आम्ही प्रयत्न करणार....!
लढणार आणि जिंकणार देखील 🔥 ✌️
@RVikhePatil@CMOMaharashtra
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला घाबरून पुण्यात जमावबंदी लागू करणारे सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना काय उत्तर देणार? भरतीच्या जाहिराती काढता येत नाहीत, पेपरफुटी रोखता येत नाही; पण विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी कलम १४४ लागू करता येते!
ही जमावबंदी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आहे की सरकारच्या भीतीपोटी?
मा. देवेंद्रजी @Dev_Fadnavis
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याऐवजी, आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा. ३१ जुलैपर्यंत ५० ते ६० हजार पदांच्या भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करा आणि राज्यातील लाखो परीक्षार्थींना न्याय द्या.
प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर जमावबंदी लावून प्रश्न सुटत नाहीत; रोजगाराच्या जाहिराती काढूनच प्रश्न सुटतात! सरकारने विद्यार्थ्यांना घाबरू नये - विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता करावी.
जब जब सरकार डरती है, पोलीस को आगे करती है !!!
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@INCMaharashtra
सरकारने विविध प्रशासकीय कारणे देऊन पदभरती रेंगाळत ठेवली आहे आणि याला जबाबदार @mpsc_office चे अध्यक्ष @bhimanwar आयोगाचे सचिव,सामान्य प्रशासन विभाग देखील आहेत. बेरोजगार उमेदवारांचा संयमाचा बांध फुटण्यापूर्वी पदभरती प्रक्रिया राबवण्यात यावी.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
पुणे महापालिकेतील बनावट नोकरी घोटाळ्यातील आरोपी शिवानंद पाटील याला अखेर अटक झाली. हे प्रकरण म्हणजे केवळ हिमनगाचं टोक आहे. पोलिस तपासात या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार, त्याचे सहकारी, आर्थिक व्यवहार आणि त्यांना मिळालेले संरक्षण याचाही पर्दाफाश झाला होईल असे वाटते.
आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून या बनावट भरती रॅकेटबाबत सातत्याने पुरावे, कागदपत्रे आणि माहिती सार्वजनिक करत आहे. हा घोटाळा केवळ एका शिपायाचा नसून, महापालिकेच्या नावाने बेरोजगार युवकांची स्वप्ने विकणाऱ्या संघटित टोळीचा आहे.
“शिवानंद पाटीलची अटक हा शेवट नाही, तर खरी चौकशी आता सुरू झाली पाहिजे. या घोटाळ्याचे सूत्रधार, बनावट कागदपत्रे तयार करणारे, पैसे उकळणारे आणि त्यांना संरक्षण देणारे प्रत्येक जण कायद्याच्या कचाट्यात आला तरच बेरोजगार युवकांना न्याय मिळेल.”
#PMCJobScam #Pune #ShivanandPatil #JusticeForYouth
MJP भरतीतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा ५ मार्च रोजी पार पडली. इतर काही पदांचे निकाल लागले, मात्र JE (Civil) चा निकाल ४ महिने उलटूनही प्रलंबित आहे. कृपया उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून अंतिम निकाल तातडीने जाहीर करावा. 🙏
@CMOMaharashtra@mieknathshinde@GulabraoRPatil
मा.मुख्यमंत्री तथा आयोगाचे अध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या ५० ते ६० हजार पदभरती बाबत आयोगाने अद्याप "परीक्षा योजना" जाहीर केली नाही, कृपया लवकरात लवकर परीक्षा योजना जाहीर करून तत्काळ "मेगाभरती" जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
@mpsc_office@bhimanwar@Dhananjay4INC@Dev_Fadnavis
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अभियांत्रिकी सेवेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रित) या पदाचे सेवाप्रवेशाचे विनियमन करण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली.
जलसंपदा विभागांतर्गत 'कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रित)'
मा. लोकसेवा आयोग आपण ज्यांच्यासाठी परीक्षा घेणार आहेत तेच बेरोजगार विद्यार्थी आज रस्त्यावर आहेत आणि ते पण आपण घेतलेल्या ऑनलाईन च्या निर्णयाविरुद्ध याची आपण गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन करून अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना न्याय द्यावा.
@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मा. विवेक भीमनवार यांना अभियांत्रिकी विभागातील सर्व भरती परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीऐवजी पारंपरिक ऑफलाईन (OMR) पद्धतीने घेण्याची मागणी करणारे निवेदन आज सादर केले.
ऑनलाईन परीक्षांतील तांत्रिक अडचणी, नॉर्मलायझेशनबाबतचा संभ्रम आणि पारदर्शकतेवरील प्रश्न लक्षात घेता विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, हीच आमची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी @mpsc_office ने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, ही अपेक्षा.
@bhimanwar@INCHarshsapkal@satejp
#MPSC #Engineering #Students #OMR #CBT #Maharashtra #DhananjayShinde
#MPSC च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यास विद्यार्थ्यांचा ठाम विरोध असून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, असा संदेश #MPSC च्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल, असं यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार १२ जुलैपर्यंत हा निर्णय रद्द होण्याची आम्ही वाट बघत आहोत. अन्यथा ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभारण्याशिवाय आमच्यापुढं पर्याय राहणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
@JusticeForPMCJE @navalMH@prajytnair@PMCPune@RRPSpeaks@CMOMaharashtra आपल्यातील आंदोलन करणाऱ्या मित्राला चक्कर आली आहे...🙏
तुम्ही फक्त Lab ला बसून AC ची हवा खा, आणि खुर्ची गरम करा...😡🤬
आपले बंधू आपल्या साठी लढत आहेत...🙏✅
खरं आई बापाचा कष्टाची किंमत असेल तर येऊन PMC ला आंदोलन ना मधे सहभागी व्हा..🙏🙏
@civilmaharashtra
@JusticeForPMCJE @navalMH@prajytnair@PMCPune@RRPSpeaks@CMOMaharashtra आपल्यातील आंदोलन करणाऱ्या मित्राला चक्कर आली आहे...🙏
तुम्ही फक्त Lab ला बसून AC ची हवा खा, आणि खुर्ची गरम करा...😡🤬
आपले बंधू आपल्या साठी लढत आहेत...🙏✅
खरं आई बापाचा कष्टाची किंमत असेल तर येऊन PMC ला आंदोलन ना मधे सहभागी व्हा..🙏🙏
@civilmaharashtra
@RRPSpeaks पुरावे समोर आल्यानंतरच आंदोलन आणि चौकशीची वेळ यावी, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे.
PMC ने सुरुवातीपासूनच पारदर्शक भूमिका घेतली असती, तर विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं नसतं.
आता आश्वासन नाही, तर निष्पक्ष चौकशी आणि जबाबदारी निश्चित करणारी ठोस कारवाई हवी.
#JusticeForPMCJE