@yabancibasin @gunsnrosesgirl3 I think some people misunderstand what I said. Yes, I agree 2590 deaths mean lot, I also can feel pain of those many families. What I wanted to share was pure statistics.
@yabancibasin @gunsnrosesgirl3 Over 2.69 billion passengers travel Mumbai local trains yearly and death toll is 2590 last year, which I don’t think is too much.
मी कोविशील्ड घेतली आहे मग मला हार्ट अटॅक येईल का?
काल एस्ट्राझेनेका कंपनीने आपल्या वॅक्सीन मुळे TTS (सोप्या भाषेत रक्ताच्या गुठळ्या आणि त्यामुळे हार्ट अटॅक) होऊ शकते असे कबुल क���ल्याची बातमी आली आणि आपल्या इथे अपेक्षेप्रमाणे हंगामा झाला. एस्ट्राझेनेकाच्याच वॅक्सीनला भारतात कोविशील्ड या नावाने बनवण्यात आले होते. आणि बहुतांश भारतीयांनी हीच लस घेतली असल्याने आपण सामूहिक पॅनिक मोड मध्ये जायला तयार झालो.
2021 मध्ये वॅक्सीन याच नावाच्या एका पॉप्युलर जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधानुसार वॅक्सिन मुळे TTS होण्याच्या केसेस एक्सट्रीमली रेअर आहेत. म्हणजे अगदीच दुर्मिळ आहेत. इतकेच नाही तर दुसरा डोस घेतल्यानंतर सापडलेल्या TTS केसेसचा दर हा जगात कोव्हिडच्या आधी सापडत असलेल्या TTS केसेसच्या दराइतकाच होता. मात्र पहिला डोस घेतल्यानंतर अशा केसेस सापडण्याचा दर हा थोडा जास्त होता. पहिला डोस घेतल्यानंतर शरीराच्या प्रतिकारक क्षमतेला पहिल्यांदा काम लागते तेव्हा अगदी नगण्य लोकांत असे ह���ऊ शकते. मात्र यात अजूनही काही फॅक्टर्स आहेत. TTS हे लसीऐवजी खऱ्या कोविड इन्फेक्शनमुळे सुद्धा होऊ शकते. त्यामुळे ज्या केसेस समोर आल्या त्या वॅक्सीनमुळे होत्या की कोविडमुळे ते निश्चित सांगता येणार नाही. त्यासाठी VITT म्हणजे थोडक्यात वॅक्सीन मुळे होणारा TTS शोधावा लागतो. VITTची काही चार पाच लक्षणे आहेत. ती सगळी जर सापडली तर त्या माणसाला वॅक्सीनमुळेच हा आजार झाला असे म्हण��ा येते.
याच वॅक्सिन नावाच्या जर्नलच्या एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की २८ लाख लोकांपैकी फक्त ५६ लोकांत ही TTS ची लक्षणे आढळली. मात्र हे सगळे पेशंट पहिल्या डोसनंतरचे होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसनंतर मात्र त्यांना TTS झालेली एकही केस आढळली नाही.
TTS नाही तर त्यातील फक्त एक T म्हणजे थ्रोम्बोसिस या आजारात रक्ताच्या गुठळ्या बनून मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या जगात दरवर्षी १ लाख ते ३ लाख ��तकी प्रचंड आहे. या नॉर्मल थ्रोम्बोसिस लोकांशी कोविड किंवा कोविडची लस यांचा काही संबंध नाही.
लॅन्सेट या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये २०२१ मध्येच एस्ट्राझेनेकानेच फायनान्स केलेल्या एका अभ्यासात सांगितले की युरोपात जवळजवळ पाच कोटी लोकांनी वॅक्सीन घेतले होते. आणि त्यातील फक्त ३९९ लोकांना TTS झाल्याची नोंद आहे. यापैकी UK मधील १३ केसेस या जर्नल मधील अभ्यासात रिपोर्ट केल्या आहेत. आणि त्यावरून आपले वॅक्सीन घेतल्यामुळे TTS होऊ शकते हे एस्ट्राझेनेकाने तेव्हाच कबुल केल्याचे लक्षात येते. कालपरवा त्यांनी ते कोर्टात सांगितले आहे हाच काय तो फरक.
मात्र तीनच महिन्यांनी एस्ट्राझेनेकाच्या या रिपोर्टला छेद देत ऑक्सफर्ड मधल्याच एका हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी लॅन्सेटमध्येच दुसऱ्या प्रबंधात सिद्ध केले की या १३ तील एकही केस ही VITTची लक्षणे पूर्ण करत नाही. म्हणजे रिपोर्ट झालेले TTS हे वॅक्सीनमुळेच झाले असे ठामपणे अजिबात म्हणता येणार नाही. मात्र तरीही शंकेस वाव ठेवायचाच असेल तरी नेमके TTS हो���्याचे कारण शोधण्याची स्टॅंडर्ड मेथड आपल्याकडे नसल्याने आणि पुरेसा डेटा ही नसल्याने वॅक्सीनमुळे असे होतच नाही हेही आपण निश्चितपणे सांगू शकत नाही.
आता प्रश्न येतो तो कोविशील्ड घेतलेल्या लोकांना हार्ट अटॅक येईल का याचा.
या आणि इतरही अनेक सायंटिफिक अभ्यासांत एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे की वॅक्सीनचे तमाम साईड इफेक्ट्स हे वॅक्सीन घेतल्यानंतर ३० दिवसांच्या आतच दिसतात. अगदी TTS सुद्ध�� अनेक अभ्यासांत सरासरी १० दिवसांनी आढळून येतो असे नोंदविले आहे.
म्हणजे असे आहे की तुम्ही जर लस घेऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला असेल तर तुम्हाला काही लसीमुळे TTS होऊन हार्ट अटॅक येऊ शकत नाही हे नक्की.
जर तुम्ही दोन डोस घेतले असतील तर TTS होण्याची शक्यता जवळजवळ शून्यच आहे हेच सगळे सायंटिफिक अभ्यास सांगतात.
लस घेतल्याच्या 30 दिवसांनंतर TTS होणार नाही पण जर तुम्ही एक आठवड्यापूर्वीच कोविशील्ड घेतली असेल तरी TTS हा लाखोंतून एकाला होत असल्याने तुम्हाला होण्याची शक्यता अगदीच धूसर आहे. आणि तरीही तुम्ही अगदी अनलकी असाल आणि तुम्हाला एक आठवड्याच्या आत TTS झालाच तरीही एकूण TTS झालेल्यांपैकीही फक्त एक चतुर्थांश लोकांचाच मृत्यू झाला आहे. त्यामुळे आपल्याला असा काही त्रास होईल याची अजिबातही शक्यता नाही हे लक्षात घ्या. आणि अजिबात घाबरू नका. कोविशील्डने आपल्याला कोविड सारख्या महाराक्षसापासून वाचवले आहे हे लक्षात घ्या. कोविशिल्डने झालेला फायदा आणि व��चलेले जीव हे कितीतरी प्रमाणात अधिक आहेत. सगळ्या जगात लसीकरण सुरू झाल्यापासून TTS मुळे जितके लोक मेले असतील त्याहून जास्त लोक तर मुंब��च्या लोकलमध्ये एका महिन्यात मरतात.
सो चिल करा, आप पुरी तरह सेफ हो.
@realstewpeters This is very old data. India has progressed a lot. Swachcha Bharat Mission aimed to provide toilets at every house has been a great success. As of today 32 states out of 35 have achieved 100 % open defecation free status.
@AsimSarode सरोदेसाहेब, मोदी, फडणवीस, भाजपा विरोधी तुमची मानसिकता आहे ते ठिक पण विरोधाच्या नादात, निदान तुमच्यासारख्या, उच्चशिक्षित ���्यक्तिकडून, ५ सेकंदात ७ संडास बांधले, अशी बाळबोध टिका अपेक्षित नाही. हे गणित तुम्हाला समजत नाही असंही नाही.
@girish_bhau@narendramodi प्रदेश / केंद्र स्तरावर निर्णयप्रक्रियेत अथवा पक्षाची विचारधारा प्रभावित करतील अशा स्तरावर जोपर्यंत आयात नेते येत नाहीत तोपर्यंत अडचण नसावी. सत्ता मिळवताना फार सोवळे पाळून चालणार नाही. सत्ता राबवताना जर विचारधारा सांभाळून काम होत असेल तर फार विचार करू नये असं मला तरी वाटतं.
@Awhadspeaks गजाननराव प्रमाण मानलेत हे अगदी योग्यच केलेत. फक्त मग गजाननराव पूर्णपणे मान्य करा. खान धर्मवेडा, कपटी व क्रूर होता. अनेक देवळांना त्याने उपद्रव केला होता. हे ही मान्य करावे लागेल मग, तुमच्या राजकारणाला नाही परवडणार.
@AsimSarode@BJP4Maharashtra@BJP4India एखाद्या गुन्हयाची माहिती आपल्याला कळली, तर ती तपासयंत्रण���ंना स्वतःहून देणे, हे प्रत्येक नागरीकाचे नैतिक (काय��ेशीर आहे का नाही हे तुम्हीच अधिकारवाणीने सांगू शकाल) कर्तव्य नाही का ???