@OFFICER_CLUB11@AbhiPawarBJP@CMOMaharashtra@RRPSpeaks@AjitPawarSpeaks विद्यार्थ्यांनी मेहनत करून या स्पर्धा परीक्षा पास केल्या. परंतु निकाल लावायची जबाबदारी पण जर विद्यार्थ्यांवर असेल तर आपण कशा प्रकारच्या व्यवस्था निर्माण केल्या आहेत हे आपण समजले पाहिजे. सरकारने त्वरित निर्णय करून या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे.
विरोधी पक्ष नेते मा.विजय वडे्टीवार यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा -२०२० च्या १९६ उमेदवारांचे (EWS प्रवर्ग वगळून) ०२ ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाची दखल घेत @ABPNews ला दिलेली प्रतिक्रिया.
सरकार कधी देणार नियुक्ती?
#MPSC#MES2020#PWD#WRD
#90%Joining
'#महाराष्ट्र_स्थापत्य_अभियांत्रिकी_सेवा_परीक्षा_२०२० चा अंतिम निकाल लागून एका वर्षाहून अधिकचा कालावधी उलटला तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीपासून आझाद मैदानावर #उपोषण सुरु केलंय ,परंतु शासनाने अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही.
काही तांत्रिक अडचणी असतील तर तज्ञांशी बोलून मार्ग काढता येईल. गेल्या महिन्यात कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट-ब चे विद्यार्थी सिंचन भवन, पुणे येथे आंदोलनाला बसले असताना त्यांची बाजू शासनाकडे मांडून अधिकारी व विद्यार्थ्यांची चर्चा घडवून आणली होती, आज तो विषय अंतिम टप्प्यात आहे.
आझाद मैदानावर बसलेल्या विद्यार्थ्यांशी शासनाने चर्चा करायला हवी, परंतु शासन चर्चाच करणार नसेल तर प्रश्न सुटतील कसे? आपलं घरदार सोडून हे विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. त्यात विद्यार्थिनीही आहेत. शासनाने थोडी तरी संवेदनशीलता दाखवावी. युवावर्गाला अशा प्रकारे गृहीत धरणं योग्य नाही. शासनाने त्वरित दखल घ्यावी, ही कळकळीची विनंती!
@RRPSpeaks सरकार मधील अधिकाऱ्यांच्या कृती मुळे निर्माण झालेले प्रश्न आहेत व त्याचा परिणाम नाहक सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे. तात्काळ संबधीत विभागाची बैठक बोलावून हा विषय मार्गी लावावा ही सरकारकडे नम्र विनंती.
@swapnilwaghmde नियुक्ती होत नसल्यामुळे उमेदवारांना भविष्यातील दिशाच कळत नाही. महाराष्ट्र शासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ उमेदवारांना नियुक्ती द्यावी