आज पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने मोर्चा निघत आहे. ही केवळ एका दिवसाची किंवा एका जाहिरातीची मागणी नाही; जाहिरात निघाल्यापासून परीक्षा, निकाल आणि नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक कायम असते.
परीक्षा पद्धतीतील त्रुटी आणि अपारदर्शकतेमुळे विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय शासनाने गांभीर्याने घ्यावा. विद्यार्थ्यांना भीतीमुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक परीक्षा देण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात.
विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणे ही शासनाची जबाबदारी आहे.
#स्पर्धापरीक्षा #पारदर्शकपरीक्षा #विद्यार्थीआंदोलन #MPSC #JusticeForStudents
महाराष्ट्र में हजारों छात्र सड़कों पर हैं, शांतिपूर्ण तरीके से आंदोलनरत हैं - इसकी वजह सिर्फ एक परीक्षा या भर्ती नहीं, पूरे सिस्टम से टूट चुका भरोसा है।
चाहे वो केंद्र की हो या राज्य की, BJP सरकार से हर छात्र त्रस्त है। पेपर लीक, रुकी हुई भर्तियां, शिक्षा की असहनीय लागत, हॉस्टल में अमानवीय हालात, ज़हर जैसा खाना, DBT में धोखाधड़ी...
...और अब MPSC जैसी संवैधानिक संस्था पर कब्ज़ा कर उसकी विश्वसनीयता बर्बाद कर दी है।
अपने सफल भविष्य के लिए छात्रों की हर मांग जायज़ है। सरकार उनकी आवाज़ सुनकर तुरंत कार्रवाई करे - वरना न्याय मिलने तक ये छात्रों की गूंज बढ़ती ही जाएगी।
#ChhatronKiGoonj
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात! ⚖️✊
MPSC,एमएमआरडी आणि पुणे महानगर पालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरतीतील गैरप्रकाराविरोधात आज पुण्यात विद्यार्थ्यांसोबत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांची भेट घेतली.
विविध अहवाल, भरती प्रक्रियेतील गंभीर प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आंदोलनासोबतच आता कायदेशीर लढाईचीही तयारी सुरू झाली आहे. पुढील कायदेशीर कारवाईबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
महायुती सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नये.
प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही!
@AsimSarode@INCHarshsapkal@satejp
#PMCJE #PMCRecruitment #StudentsJustice #RojgarNyay #IBPS #Congress
🚨 #PMCJE : PMC, हा अहवालाचा आधार आहे की पुरावे झाकण्याचा खेळ?
PMC ने "IBPS/TCS अहवालाच्या नावाखाली ३ उमेदवारांची उमेदवारी रद्द करून FIR दाखल केली. पण अहवालच सांगतो👇
❌ "Analytical Flag = गैरप्रकार सिद्ध नाही"
❌ CCTV = फक्त "Further Investigation Indicator"
❌ गैरप्रकाराची पद्धत "सिद्ध नाही"
❌ स्पष्टीकरणाची संधी न देता कारवाई "नको"
मग PMC ने नेमका कोणता पुरावा पाहून शिक्षा सुनावली? PMC, आता एकच करा : पूर्ण अहवाल बाहेर काढा. मूळ CCTV बाहेर काढा. Audit Logs बाहेर काढा. स्वतंत्र Technical Audit करा. नाहीतर आमचा सरळ सवाल राहील, अहवालाचा आधार घेतला की अहवालातील सोयीचे भाग वापरून सत्य दडपले?
हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा खेळ आहे. हिशोब द्यावाच लागेल!
@INCMaharashtra@PMCPune@prajytnair
#PMCJE #JusticeForPMCJE #ExamTransparency
पुणे मनपा महापौर मॅडम मंजुशाताई यांना आम्हा विद्यार्थ्यांच्या वतीने एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की जर आपणास पुणे शहर सुधारवाचे असेल तर सर्वात पहिले मनपा प्रशासन यामध्ये सुधार करावा. महापौर मॅडम यांच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे परंतु काही लोक मॅडम पर्यंत गोष्टी जाऊच देत नाहीत.पुणे मनपा महापौर मॅडम मंजुषा ताई यांना एकच विनंती हे की पुणे मनपा मध्ये खूप कमी विश्वासू अधिकारी आपणास सापडतील बाकी वरून खालपर्यंत खुप सारे भ्रष्टाचारी आहेत....
अभ्यासिकेत दिवस अन् ढेकणात रात्र काढली
कधी वडापाव मॅगीवर भूक भागवली
कधी परीक्षेच्या तारखा पाहून
कित्येक दसरा अन् दिवाळी
घराची पायरी नाही चढली
अन् AC त बसून पेपर फोडणाऱ्यांनी
पोरांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली.
@degree_holders
@PMCPune@prajytnair@navalMH#PMCJE
एकीकडे आयुक्त साहेब स्वतः तीन उमेदवार संशयित आढळले आहेत म्हणत आहेत आणि दुसरीकडे त्यांना नियुक्ती देण्यात येईल असेही सांगत आहेत, या घोटाळ्याच्या मुळाशी मात्र जाण्याची त्यांची इच्छा का दिसत नाही ?
IBPS च्या confidential Report वरती २७ ऑगस्ट ही तारीख असताना तो रिपोर्ट आज म्हणजेच २८ ऑगस्ट म्हणजे उद्यापासून सुट्ट्या असताना का प्रसिद्ध करण्यात आला? नियुक्ती आदेश निर्गमित देखील इतक्या वेगात का करण्यात येत आहेत....?
विद्यार्थ्याचे अनेक प्रश्न आणि शंका आहेत उत्तर द्यावेच लागेल.
पुणे मनपाने नियुक्ती आदेश देखील दिले ते पण इतक्या रात्री..... याला गतिमान कारभाराचा उत्तम नमुना म्हणायचं की पेपरफोडणाऱ्यांना वाचण्याचा उत्तम नमुना म्हणायचं???
नक्की कोणाला वाचवत आहे @PMCPune
कोणत्याही पोलिस तपासाशिवाय छायाचित्र फक्त एकाच व्यक्तीकडे आहेत हे कशाच्या आधारावर पुणे मनपाने निश्चित केले आहे?
आणि नियुक्ती द्यायची एवढी घाई कशासाठी सुरू आहे @prajytnair सर.
@PMCPune
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता परीक्षेतील घोटाळ्याची व्याप्ती फक्त तीन उमेदवार आणि दोन कर्मचारी यांच्यापर्यंत आहे हे कशाच्या आधारावरून ठरवले गेले आहे, याबाबतचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा आणि याचा तपास हा पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात यावा.
@PMCPune
लाल बहादूर शास्त्रींचा आदर्श आपण कधी घेणार ? 🇮🇳
१९५६ मध्ये रेल्वेमंत्री असताना झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून लाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
ते वैयक्तिकरित्या अपघाताला जबाबदार नसतानाही त्यांनी मंत्रिपदाची राजकीय आणि नैतिक जबाबदारी स्वीकारली.
आज मात्र परीक्षा गैरप्रकार, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेवरील गंभीर प्रश्न उपस्थित झाले तरी जबाबदारी स्वीकारण्याऐवजी चौकशा, समित्या आणि वेळकाढूपणा दिसतो.
शास्त्रीजींच्या काळात पद म्हणजे अधिकार नव्हे, तर जबाबदारी होती.
आजच्या लोकशाहीतही हा साधा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे—
गैरप्रकार घडला तर जबाबदारी नेमकी कोणाची?
आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची परंपरा संपली आहे का?
#MoralResponsibility #Accountability #MPSC #PaperLeak #Recruitment #औषध_निरीक्षक
@bhimanwar@mpsc_office
MMRDA नंतर आता MJP मधीलही मोठा गैरप्रकार समोर येण्याची शक्यता आहे.
आम्ही यासंदर्भातील पुरावे आणि तथ्ये जमा करत आहोत. MJP भरती प्रक्रियेबाबत कोणाकडेही ठोस पुरावे, कागदपत्रे किंवा महत्त्वाची माहिती असल्यास कृपया मला DM करा.
विशेष म्हणजे, MMRDA प्रकरणात दिसून आलेल्या पॅटर्नशी साधर्म्य असलेले काही गंभीर प्रश्न MJP भरतीबाबतही उपस्थित होत आहेत. त्यामुळे हा केवळ निकालाचा विषय नाही. परीक्षा प्रक्रिया, प्रश्नपत्रिका, मूल्यांकन, निकाल आणि संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही गैरप्रकाराची गय केली जाणार नाही. MMRDA प्रमाणेच MJP चा मुद्दाही विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याच्या आणि सरकारी भरती प्रक्रियेत पारदर्शकता प्रस्थापित करण्याच्या लढ्याचा भाग असेल.
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@MMRDAOfficial@MahaChiefSec@MahaDGIPR@mpsc_office@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@INCRojgar
#MJP #MJPRecruitment #JusticeForStudents #RecruitmentTransparency #DhananjayShinde #Dhananjay_Shinde #MMRDA #MPSC
पेपर फुटीचं हे सत्र कधी थांबणार? आता पुन्हा MPSC च्या औषध निरीक्षक (Drug Inspector) पदाच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची बातमी समोर आली आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि मेहनतीशी होणारा हा खेळ अत्यंत संतापजनक आहे. तो यापुढे खपवून घेतला जाणार नाही.
पारदर्शक परीक्षा आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी आम्ही लावून धरत आहोत!
भाजप सरकारमध्ये पेपर फुटीची मालिका कधी थांबणार?
#PaperLeak #JusticeForStudents #MPSC
भीमटे, चोर-चम*र, नीले कबूतर, भंगी, जूते पोलिश करने वाले - ये कुछ गालियाँ हैं जो जातिवादी लोग सार्वजनिक रूप से और ऑनलाइन दलितों को दे रहे हैं।
अगर ब्राह्मणवादियों और मनुवादियों को लगता है कि ये जातिवादी गालियां देके तुम हमें चुप करा लोगे तो मेरी बात ज़रा अच्छे से, ध्यान से सुन लो!
जब भी तुम ज़हर उगलते और, तो हमें कमज़ोर नहीं कर रहे बल्कि खुद की जातिवादी मानसिकता को बेनकाब कर रहे हो।
तुम्हारे गालियों से तुम्हारी ब्राह्मणवादी और मनुवादी की सड़ी हुई सोच साफ़ झलकती है। और हर बार जब तुम बाबासाहेब, आरक्षण को और हमें गलियाँ देते हो, तुम हमें ये याद दिलाते हो कि फुले-शाहू-अंबेडकर का आंदोलन कितना ज़रूरी हैं!
साफ़ है कि संविधान और आरक्षण के ज़रिए समानता और एससी, एसटी और ओबीसी की तरक्की को ब्राह्मणवादी और मनुवादी पचा नहीं पा रहे हैं।
जब-जब ब्राह्मणवादी और मनुवादी हमें गालियाँ दोगे तब-तब हम जय भीम बोलेंगे, जय संविधान बोलेंगे!
जब-जब ब्राह्मणवादी और मनुवादी हमें नीचा दिखाने की कोशिश करोगे तब-तब हम और शिक्षित होंगे, संगठित होंगे, और आंदोलन करेंगे, जैसे बाबासाहेब ने हमें सिखाया है।
तुम्हारी घृणा और गंदी गालियां दुनिया को याद दिलाती हैं कि आज भी एससी, एसटी और ओबीसी के ख़िलाफ़ जातिगत भेदभाव कितना गहरा है, सामाजिक न्याय कितना जरूरी है, और एससी, एसटी और ओबीसी का आरक्षण कितना जरूरी है।
जय भीम 💙
जय संविधान. जय भारत 💪🏻
ज्या पद्धतीने औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्याचप्रमाणे @MMRDAOfficial मधील Assistant Engineer पदाच्या भरती प्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या गंभीर आक्षेपांचीही स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
विशेषतः भंडारा जिल्ह्यातील किती उमेदवारांची निवड झाली, त्यांची निवड प्रक्रिया काय होती आणि त्यासंदर्भात कोणाची भूमिका होती, याची सखोल पडताळणी करण्यात यावी.
कायमचा पत्ता ठाणे, अहिल्यानगर ,सोलापूर किंवा इतर भागातील असलेल्या उमेदवारांना नागपूर परीक्षा केंद्र का देण्यात आले? एखाद्या विशिष्ट परीक्षा केंद्रातून असामान्य प्रमाणात उच्च गुण मिळविणारे उमेदवार आढळत असल्यास त्याची स्वतंत्रपणे तांत्रिक तपासणी का होऊ नये?
CCTV फुटेज, बायोमेट्रिक नोंदी, सर्व्हर लॉग, परीक्षा केंद्रनिहाय उपस्थिती, प्रश्नपत्रिका वितरण, डिजिटल प्रतिसाद आणि गुणांकन प्रक्रियेची तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणणे आवश्यक आहे.
म्हणून चौकशी समिती नेमायचीच असेल तर ती उच्च न्यायालयाच्या विद्यमान/निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र व निष्पक्ष पद्धतीने नेमण्यात यावी. अन्यथा आम्हाला अन्यायग्रस्त सुशिक्षित बेरोजगार स्पर्धा परीक्षा उमेदवारांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करावे लागेल.
@DrSanMukherjee@MMRDAOfficial@BaliramDoleyINC@NANA_PATOLE@Mpsc_Andolan
#MMRDA_SCAM #AssistantEngineer #Recruitment #ExamTransparency #JusticeForStudents
📍 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा
@RahulAsks यापूर्वी देखील महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, कृषी तसेच #FSO#DISCRIPTIVE परीक्षेत पेपर तपासण्यावेळी मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळली होती.
👉 धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य दिलेल्या उमेदवारांना स्वतः लिहिलेली उत्तरपत्रिका पाहण्यासाठी #MAT मध्ये जावे लागले होते आणि त्यानंतर #MAT च्या आदेशाने उमेदवारांना उत्तरपत्रिका भेटल्या होत्या. मिळालेल्या उत्तरपत्रिकेत देखील काही प्रश्न जे एकदम #FACTUAL होते त्यामध्ये देखील दोन उमेदवारांना वेग वेगळे गुणांकन करण्यात आले होते.
📍 सरळसेवा
👉 #TCS #IBPS मध्ये तर सर्वात मोठा भष्टाचार झालेला आहे, तलाठी भरती असो किंवा जलसंधारण ( जी नंतर विद्यार्थ्यांनी आवाज उठवला, आंदोलन केले नंतर रद्द केली) भरती असो. ताजे उदाहरण द्यायचे झाले तर पुणे मनपा कनिष्ठ अभियंता चालू परीक्षेतून कॉम्प्युटरच्या स्क्रीन वरील प्रश्नासहित फोटो बाहेर आलेला आहे व #MMRDA Asst Engg परिक्षेत तर नागपूर या एकाच परीक्षा केंद्रावरून टॉपर आहेत, त्यामधील अनेकांचा आणि अभ्यासाचा काहीही संबंध नाही अशी लोक MMRDA मध्ये Asst Engg बनणार आहेत ज्यांना २०० पैकी २०० मार्क पडलेले आहेत आणि प्रामाणिक पोर याविरुद्ध लढा देत आहेत. भयंकर आहे हे सगळ वरून खालपर्यंत कुंपणच शेत खात आहे.