@Dhananjay4INC देवाभाऊ, काहीतरी जनाची नाही तर मनाची तरी बाळगा.
आता काय आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतल्यावरच आमच्या मागण्या मान्य होतील का?
आता ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांचे पण मानसिक स्थिती खराब झालेली आहे त्यामुळे मायबाप सरकार तुम्हास विनंती आहे योग्य तो निर्णय घ्यावा खूपमुलांचे परीक्षा केंद्र दूर आहे त्यांना ह्या मानसिक तणावातूनतुम्ही बाहेर काढावे ही हात जोडून विनंती
किती अंत बघणार आहात अजून
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही” हे विधान म्हणजे संधीसाधू “फडणवीस पवार शिंदे” सरकारचा उद्धट अहंकार, प्रशासकीय अपयश आणि विद्यार्थ्यांविषयीचा तिरस्कार उघड करणारे आहे. हे उत्तर नाही तर ही राज्यातील अन्यायग्रस्त परीक्षार्थींच्या थेट मानसिक छळाची कबुली आहे.
आमचे सवाल टाळू नका, उत्तर द्या :
🔥 १५–२० दिवस परीक्षा पुढे ढकलली तर ३ लाखांचे नुकसान होते, पण MPSC २–२ वर्षे निकाल लटकवते तेव्हा नुकसान होत नाही?
🔥 जाहिरात ७ महिने उशिरा काढणे तुमची चूक, आणि शिक्षा विद्यार्थ्यांना? ही कसली मस्ती?
🔥 ज्यांचे वय संपले, त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार - त्यापेक्षा इतरांचे १५ दिवस मोठे?
🔥 तुटपुंज्या जागा, शून्य नियोजन, शून्य जबाबदारी-तरीही सरकार येवढ्या माजात?
अन्याय सहन करणे नव्हे, त्याविरुद्ध उभे राहणे हाच न्याय असतो. विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पाय देणारा सत्ते��ा अहंकार तुम���हाला भोवणार आहे हे नक्की!
जाहीर निषेध!
@INCHarshsapkal @VijayWadettiwar @satejp @prithvrj @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
#MPSC #PuneProtest #MPSC_Postpone #StopMentalTorture
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
#JusticeForMPSCStudent
मा. मुख्यमंत्री महोदय,
एवढं आडमुडी आणि अहंकारी धोरण नको!
लवकर निर्णय घ्या!
गेली ६ महिने विद्यार्थी संयम ठेवून वाट पाहत होते, तेव्हा शासनाला वेळ नव्हता.
आता अचानक म्हणत��� — GR काढू, पण link open करणार नाही, नवीन फॉर्म भरू देणार नाही, आणि ४ जानेवारीलाच परीक्षा घेणार!
मग प्रश्न असा आहे👇
👉 ज्यांची शेवटची संधी हुकली त्यांनी काय करायचं?
STI Open – 0 जागा
ASO Open – 1 जागा
SR – 0 जागा
ही परीक्षा आहे की विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ?
🔹 गेल्या वर्षीप्रमाणे link open करा
🔹 विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास वेळ द्या
🔹 परीक्षा काही दिवस पुढे घ्या
इतकीच साधी आणि न्याय्य मागणी आहे!
सरकारचे ��ोन तर्क — आणि त्यांची वस्तुस्थिती
१) “१० हजार मुलांसाठी २.५–३ लाख मुलांचे नुकसान कसे करू?”
➡️ खरं तर एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ न देणे हेच शासनाचे कर्तव्य आहे!
➡️ परीक्षा १५–२० दिवस किंवा १ महिना पुढे गेल्याने नुकसान नाही,
उलट २.५–३ लाख मुलांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळेल!
२) “आचारसंहितेमुळे GR काढता येत नाही”
➡️ मग आचारसंहितेच्या २ तास आधी बिहारमध्ये योजना कशी जाहीर झाली?
➡️ निवड��ूक काळात दर शुक्रवारी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कसा टाकला गेला?
➡️ तेव्हा आचारसंहिता कुठे गेली होती?
जर खरंच आचारसंहिता अडचण आहे,
➡️ १ महिना थांबा, आचारसंहिता संपल्यावर GR काढा, मग परीक्षा घ्या!
आमचे थेट सवाल 🔥
1️⃣ १५–२० दिवसांनी परीक्षा ढकलली तर ३ लाख मुलांचे नुकसान कसे होईल?
— उलट सर्वांना समान संधी मिळेल!
2️⃣ MPSC निकाल लावायला २–२ वर्षे घेते, तेव्हा मुलांच्या आयुष्याचे नुकसान होत नाही क���?
3️⃣ जाहिरात ७ महिने उशिरा काढली — ही चूक विद्यार्थ्यांची की शासनाची?
मग शिक्षा विद्यार्थ्यांना का?
4️⃣ ज्याचे वय संपले, ज्याचं संपूर्ण भविष्य या एकाच संधीवर अवलंबून आहे —
त्याचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य मोठं की इतरांचे १५–२० दिवस?
5️⃣ ७ महिने उशीर, तुटपुंज्या जागा, शून्य भरती…
तेव्हा मुलांचं नुकसान आठवत नाही आणि आता अचानक हा कसला हट्ट?
“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही”
➡️ ��े उत्तर नाही, हा निर्दयी अहंकार आहे!
“अनंत काळ अन्याय सहन करणे हा न्याय मिळवण्याचा मार्ग नसून,
अन्यायाविरुद्ध बंड करणे हाच खरा न्यायाचा मार्ग आहे.”
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर
⚠️ विद्यार्थ्यांच्या जिव्हारी लागेल एवढा अहंकार सत्तेसाठी घातक ठरेल!
आज विद्यार्थी शांत आहेत, पण न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाहीत!
#StudentJustice
#MPSC_अन्याय
#LinkOpenKara
#ExamPostponeKara
#विद्यार्थ्यांचा_संयम_संपतोय
@Dev_Fadnavis
ऑल इंडिया पँथ��� सेना विद्धार्थ्यांच्या बाजूने आहे!
आचारसंहितेमध्ये जीआर काढायला तुम्हाला अडचण आहे मान्य आहे त्यामुळे त्यामुळे जीआर इलेक्शन झाल्यानंतर काढा इलेक्शन काही जास्त दिवस लांब नाही 16 तारखेला निकाल लागेल त्यानंतर आचारसंहिता संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही जीआर काढा
@kolhe_amol पाटील....🔥🔥🔥🔥 नाम ही काफी है... मैं नहीं इतिहास गवा है.
MPSC विध्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी मनोज दादा जरांगे पाटील मैदानात. सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
अहिल्या अभ्यासिका सदाशिव पेठ पुणे
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सरकारची दडपशाही निंदनीय ; PSI पूर्वपरीक्षा तात्काळ पुढे ढकला..
मागील ७ महिन्यांपासून PSI परीक्षेची तयारी करणारे हजारो उमेदवार वयोमर्यादा वाढीच्या मागणीसाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र विद्य��र्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या अत्यंत न्याय्य व रास्त मागणीकडे महायुती सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, ही बाब गंभीर आहे..
आज अनेक विद्यार्थी आपली गावे, कुटुंब सोडून पुण्यासारख्या शहरात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत आहेत. कुणी खोलीभाडे, जेवणखर्च कसा भागवायचा यासाठी संघर्ष करत आहे, तर कुणी रोजंदारी करून अभ्यास करत आहे. अशा परिस्थितीत वर्षानुवर्षांची मेहनत, वेळ आणि आर्थिक ओझे पणाला लागले असताना सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेणे अपेक्षित होते..
उद्या शनिवार, ४ जानेवारी रोजी PSI पूर्वपरी���्षा होणार असल्याने पुण्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस बळाचा वापर करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार न करता, लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज व दडपशाही करणे हे सरकारच्या असंवेदनशीलतेचे स्पष्ट दर्शन घडवते..
विद्यार्थ्यांची मागणी ही केवळ परीक्षा किंवा वयोमर्यादेपुरती मर्यादित नसून, त्यांच्या भवितव्याश��, मेहनतीशी आणि स्वप्नांशी जोडलेली आहे. सरकार��े विद्यार्थ्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवू नये. प्रश्न सोडवण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारणे हे लोकशाही मूल्यांना काळीमा फासणारे आहे..
सरकारने तात्काळ ४ जानेवारीची PSI पूर्वपरीक्षा पुढे ढकलावी, विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि वयोमर्यादा वाढीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा..
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @AUThackeray @OmRajenimbalkr @mpsc_office @ShivsenaUBTComm @Mpsc_Andolan @PunyachiMPSC
बंडखोर उमेदवारांचे रुसवे फुगवे काढण्यासाठी, त्यांना भेटून "सेटलमेंट" ��रण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ आहे, मात्र सरकारच्या घोडचुकीमुळे आयुष्य पणाला लागलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांना भेटण्यास, त्यांच्या भावना जाणून घेण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही...
हे भावना शून्य, संवेदना मेलेल्या सरकारचे लक्षण आहे !
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट ‘ब’) २०२५ मधील वयोमर्यादेच्या अन्यायकारक अटीविरोधात विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले. परीक्षा पद्धतीत अचानक झालेल्या बदलामुळे आणि १ नोव्हेंबर २०२५ ही वयोमर्यादा ग्राह्य धरल्याने अनेक पात्र उमेदवार अपात्र ठरत ��सल्याचा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. डॉ. स्नेहाताई सोनकाटे, पुणे शहर युवा आघाडीचे शहराध्यक्ष सागर आल्हाट यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी असल्याचा विश्वास विद्यार्थ्यांना देण्यात आला.
#VBAForIndia
"फडणवीस साहेब तरुणांच्या संयमाची परीक्षा पाहू नका !
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना PSI वयवाढीबाबत सरकार अजूनही मौन बाळगून आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी आहे. मात्र या परीक्षेची जाहिरात तब्बल 7–8 महिने उशिर��� निघाली. या विलंबामुळे हजारो पात्र, मेहनती आणि स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय निकषाबाहेर गेले. ही चूक विद्यार्थ्यांची नाही, ही संपूर्ण चूक शासनाची आहे.
आज पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून वयवाढीसाठी आंदोलन करत आहेत. हातात पुस्तके असणारे तरुण आज पोस्टर हातात घेऊन न्याय मागत आहेत, ही बाब राज्यासाठी लाजिरवाणी आहे.
देशात आणि राज्यात आधीच बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेल��� असताना, शेतकरी आणि ��ोरगरीब कुटुंबातील लाखो मुलं दिवस-रात्र मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा, नियोजनाअभावी झालेल्या विलंबाचा फटका थेट या उमेदवारांनाच बसतो आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भातील हा संपूर्ण गोंधळ आयोगाच्या आणि सरकारच्या अपयशी नियोजनाचा परिणाम आहे. जाहिरात वेळेत न काढणे, परीक्षा उशिरा घेणे आणि आता वयवाढीवर निर्णय न घेणे या सगळ्याची नैति��� व प्रशासकीय जबाबदारी शासनावरच येते.
तरुणांच्या संयमाची परीक्षा पाहू नका. सरकारने तात्काळ PSI वयवाढीचा निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा !
@Mpsc_Andolan
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@NCPspeaks
@supriya_sule
#PSIवयवाढ
#संयुक्तपूर्वपरीक्षा2025
#विद्यार्थीआंदोलन
#तरुणांचा_न्याय
#बेरोजगारी
M.P.S.C विद्यार्थ्यासाठी परीक्षेची जाहिरात 7 महिने उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोगटात बसत नसल्याने परीक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाला,सर्व अधिकार्यांशी संपर्क करून तातडी��े निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
#mpsc
मागील ७ महिन्यांपासून PSI परीक्षेची तयारी करणारे हजारो उमेदवार सरकारकडे वयोमर्यादा वाढीबाबद पाठपूरावा करत आहेत.
पण नाठाळ महायुती सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, उद्या शनिवारी ४ जानेवारी रोजी परीक्षा असल्याने पुण्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यानंतर पोलिसी बळाचा वापर केला केला.
आंदोलनात NSUI चे महाराष्ट्र उपाध्यक्ष अक्षय कांबळे, सिद्धांत जांभुळकर, रविराज कांबळे, साहेबराव शिरसागर यांच्यासह NSUI चे अनेक पद���धिकारी आंदोलनास बसले असताना त्यांना अटक करण्यात आली आहे.
सरकारची ही कारवाई धिक्कारास्पद आहे.
विद्यार्थी न्याय हक्कासाठी…
कॉंग्रेस विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे.
लढेंगे जितेंगे!
#StudentJustice #PSIवयवाढ #विद्यार्थीन्याय #पुणे
#PSIवयवाढ_1वर्ष_GR