महाज्योति फेलिशीप सरसकट व नोंदणी दिनांक पासून मिळावी यासाठी आझाद मैदान येथे संशोधक विद्यार्थ्याचा अमरण उपोषणाचा आज 25 व दिवस असून सरकार याच्याकडे अजिबात लक्ष देत नसून सरकार शिक्षणाचा हक्क हिरावून घेताना दिसत आहे.
23 दिवसापासून उपोषण सुरु आहे, हे निर्दयी सरकार अजून किती दिवस विद्यार्थ्यांना छळणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जान नसलेलं सरकार आणि महाज्योतीतील अधिकारी यांना कधी जाग येणार???
*आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची कोल्हापूर एअरपोर्ट येथे भेट घेऊन सारथी मधील विविध मागण्या (२०२३ बॅच सरसकट फेलोशप व विद्यापीठ नोंदणी दिनांक पासून फेलोशिप मिळावी) संदर्भात जवळपास २३ दिवस सुरू असलेले उपोषणाची माहिती दिली.