धन्यवाद @RRPSpeaks आपण cm साहेब तसेच आज Dcm (@mieknathshinde ) साहेबांना देखील विद्यार्थी वतीने #स्वतः निवेदन दिले.
आभार..🙏
नाहि तर आजकालच्या लोकप्रतिनिधींना तर स्वतः च्या नेत्यांकडे जनतेच प्रश्न घेऊन जाण्याची विनंती केली तर स्वतः च्या नावे अर्ज करा स्वतः संपर्क करा म्हणतात..
राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल: २२ दिवसांत
गट ब पूर्व परीक्षा निकाल: १७ दिवसांत हे दोन्ही
ऑफलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षांचे निकाल मा. आयोगाने अतिशय गतिमान पद्धतीने लावले आहेत याबद्दल @mpsc_office चे खूप खूप आभार.
ऑफलाईन बाबत आयोग एवढा गतिमान असताना "ऑनलाईन" चा अट्टाहास नको.
#MPSC च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यास विद्यार्थ्यांचा ठाम विरोध असून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, असा संदेश #MPSC च्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल, असं यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार १२ जुलैपर्यंत हा निर्णय रद्द होण्याची आम्ही वाट बघत आहोत. अन्यथा ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभारण्याशिवाय आमच्यापुढं पर्याय राहणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेतील उमेदवारांनी उपस्थित केलेल्या गंभीर तक्रारींची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्याचे लेखी आश्वासन देत पत्र जारी केल्याबद्दल पुणे महानगरपालिका आयुक्त मा. नवल किशोर राम आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाचे मनःपूर्वक आभार.
आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या प्रत्येक तक्रारीची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी केली जाईल, चौकशी पूर्ण होईपर्यंत अंतिम नियुक्त्या स्थगित ठेवण्यात येतील, तसेच कोणत्याही पात्र उमेदवारावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. ही केवळ एका भरतीची बाब नाही, तर स्पर्धा परीक्षा प्रणालीवरील लाखो तरुणांच्या विश्वासाचा प्रश्न आहे. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि न्याय्य पद्धतीने पूर्ण झाली पाहिजे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पात्र उमेदवारांना न्याय मिळालाच पाहिजे. आंदोलन करणाऱ्या सर्व परीक्षार्थ्यांनी दाखविलेला संयम, लोकशाही मार्गाने केलेला संघर्ष आणि सत्यासाठीचा लढा निश्चितच कौतुकास्पद आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा आहे.
काँग्रेस पक्ष प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थ्याच्या न्यायाच्या लढ्यात खंबीरपणे सोबत उभा आहे. प्रत्येक पात्र उमेदवाराला न्याय मिळेपर्यंत आणि भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होईपर्यंत आमचा पाठपुरावा व संघर्ष कायम राहील.
@PMCPune@navalMH@prajytnair@satejp@INCHarshsapkal
#पुणे_महापालिका #कनिष्ठ_अभियंता #पदभरती #स्पर्धापरीक्षा #Transparency #JusticeForCandidates #Congress
आकृतीबंध,सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध नसताना आरोग्य मंत्री @abitkar_prakash यांनी आठ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करू असे आश्वासन on record अधिवेशनात दिले याबद्दल आरोग्य मंत्री याबद्दल मंत्री महोदय यांचे आभार परंतु कोणत्याही प्रकारे कंत्राटी जाहिरात प्रसिद्ध होणार नाही याची काळजी घ्यावी
PMC JE भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे न्याय्य असून, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांच्या भविष्याचा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. न्याय कधी मिळणार?
@RRPSpeaks@PMCPune@CMOMaharashtra
पुणे महापालिकेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून यामध्ये प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळं ही प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या आवारात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम साहेब यांचीही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या या आक्षेपांची सखोल चौकशी करण्याचं आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणालाही नियुक्त देणार नसल्याचं आश्वासन यावेळी आयुक्त साहेबांनी दिलं. तसंच नॉर्मलायझेशनमुळं कोणत्याही विद्यार्थावर अन्याय होणार नाही, याबाबतही त्यांनी आश्वस्त केलं.
#पुणे_महापालिका #पदभरती_घोटाळा
पुणे महानगरपालिकेच्या वतीने कनिष्ठ अभियंता (JE) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे रद्द करून फेरपरीक्षा घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दोन्ही अध्यक्षांनी आंदोलनास पाठिंबा दिला.
PMC मुख्यालयाबाहेर विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
पुरावे समोर आहेत, फोटो समोर आहे, तरी प्रशासन गप्प आहे!
विद्यार्थी रस्त्यावर आणि दोषी मोकाट — हीच का पारदर्शक भरती?
न्याय नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होईल.
#JusticeForPMCJE#TransparentRecruitment@prajytnair@navalMH@PMCPune
लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही; त्या प्रश्नांची उत्तरं देणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे.
विधान परिषदेत MPSC संदर्भातील गंभीर प्रश्नांवर सरकारने सविस्तर, वस्तुनिष्ठ आणि समाधानकारक उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते सतेज (बंटी) पाटील यांनी सभापतींकडे पत्राद्वारे केली आहे.
लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य पेपरफुटी, भरतीतील विलंब, रिक्त पदे आणि गैरव्यवहारामुळे अंधारात ढकलले जात आहे. सरकारने मौन सोडून उत्तर द्यावे आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
राज्यातील लाखो परीक्षार्थींना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे!
@satejp@VijayWadettiwar@INCHarshsapkal@bhimanwar@mpsc_office
#MPSC #StudentsFirst #Maharashtra #लोकशाही #Congress
पेपरफुटी आता अपवाद नाही, तर भाजप सरकारची ओळख बनली आहे.
NEET नंतर आता #TET लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी हा क्रूर खेळ कधी थांबणार? जे सरकार परीक्षा सुरक्षित ठेवू शकत नाही, ते तरुणांचे भविष्य काय सुरक्षित ठेवणार?
विद्यार्थ्यांना न्याय हवा, पेपर माफियांना राजकीय संरक्षण नव्हे. दोषींवर कठोर कारवाई आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था हीच काळाची गरज.
#PaperLeak #Maharashtra #StudentsFirst
एकिकडे #ElNino सारखे नैसर्गिक संकट समोर आहे आणि दुसरीकडे WRD विभागात हजारो पदे रिक्त आहेत.
#WRD_JE ला 04/2023 ची मंजूरी पण प्रत्यक्षात #जाहिरात अजूनही प्रलंबित!
प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का?
विद्यार्थी आणि प्रकल्प दोन्ही संकटात आहेत.
#Recruitment#RR@RVikhePatil@girishdmahajan
"आमची ३ वर्षे परत देणार का?
#WRD_JE भरती प्रक्रियेतील विलंबामुळे हजारो विद्यार्थी आज नैराश्यात आहेत.
वयाची अट ओलांडत चाललेल्या तरुणांच्या व्यथा आपल्याला कधी कळणार?
फक्त घोषणा नको,आता प्रत्यक्ष कृती हवी आहे. तातडीने जाहिरात प्रसिद्ध करा! @RVikhePatil@girishdmahajan#WRD_JE_Delay