देशाचे पंतप्रधान @narendramodi यांना महाराष्ट्रात भूमीपूजनासाठी येण्यास वेळ आहे, मात्र दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रातील एखादा गावाला भेट देण्यास वेळ नाही, शेतक-यांनी आत्महत्या केल्या काय आणि शेतकरी मेला काय याचे ना त्यांना ना त्यांच्या @BJP4India सरकारला कसलेच देणेघेणे नाही.
पदे येतील, पदे जातील, मात्र महाराष्ट्रात जिथे जिथे जातो तिथे लोक मला म्हणतात, हे पोरग मुंडे साहेबांसारखे काम करते यापेक्षा माझ्या साठी कोणातच मोठा गौरव नाही.
परिवहन खात्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी निवडलेल्या 832 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयात या उमेदवारांची बाजू लावून धरावी अशी मागणी विधानपरिषदेत लावून धरली.त्यावर उत्तर देताना या उमेदवारांना दिलासा मिळेल यासाठी सरकार सर्व प्रयत्न करेल असे आश्वासन @DRaote
यांनी दिले.
मंत्रालयात संविधानाचे निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र व संविधानाचे प्रास्ताविक लावण्यासंदर्भात वर्षभरापुर्वी प्रशासन स्तरावरील कार्यवाही पुर्ण करण्यात आली मात्र मुख्यमंत्र्यांकडे वर्षभरापासुन हा प्रस्ताव प्रलंबित पडला आहे. मुख्यमंत्र्यांकडे यासाठी वेळ नाही का ?