पाठीवर अभ्यासाची बॅग, साधारण शर्ट पण बोलण्याची धार एकदम कडक.... कारण आमचा भाऊ #MPSS करतो.... रोज लोकसत्ता,The Hindu वाचतो आणि अन्यायाविरुद्ध देखील लढतो.....!
खरं तर हा व्हिडिओ फक्त तीन मिनिटांचा आहे.... परंतु तीन मिनिटात तीस वर्षाच्या स्पर्धा परीक्षा बेरोजगार उमेदवारांच्या भावना मांडल्या आहेत.... सगळीकडे #viral झालेला हा व्हिडिओ आहे....!
" यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्री चा हात असतो परंतु आमच्यासारख्या यशस्वी पुरुषाच्या मागे मंगळसूत्र गहाण ठेऊन पैसे देणाऱ्या आईचा देखील हात आहे"
" हे कोल्हापूर आहे,आम्ही नाय नाय त्यावरोधात लढलो आहे,#MPSC काय त्याविरोधात देखील लढू"
कोल्हापूर हा विषयच वेगळा आहे.... जे पोटात तेच ओठात असत....!
#कोल्हापूर 🔥
आज पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने मोर्चा निघत आहे. ही केवळ एका दिवसाची किंवा एका जाहिरातीची मागणी नाही; जाहिरात निघाल्यापासून परीक्षा, निकाल आणि नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक कायम असते.
परीक्षा पद्धतीतील त्रुटी आणि अपारदर्शकतेमुळे विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय शासनाने गांभीर्याने घ्यावा. विद्यार्थ्यांना भीतीमुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक परीक्षा देण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात.
विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणे ही शासनाची जबाबदारी आहे.
#स्पर्धापरीक्षा #पारदर्शकपरीक्षा #विद्यार्थीआंदोलन #MPSC #JusticeForStudents
#MMRDA#MPSC#PMC
पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांचा शासनाच्या परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी केवळ समित्या नेमून चालणार नाही. निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी CBIमार्फत किंवा मा. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावी, ही विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे.
केंद्राचा पेपरफुटीविरोधी कायदा महाराष्ट्रात केव्हा लागू होणार? याचे शासनाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी बोलणारे मंत्री, आमदार व खासदार या गंभीर प्रकरणात किती ठोस पाठपुरावा करतात, हे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी पाहत आहेत.
आश्वासनांपेक्षा आता विद्यार्थ्यांना कृती, पारदर्शकता आणि न्याय हवा आहे!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra@Shivsenaofc@INCMaharashtra@NCPspeaks@ShivSenaUBT_@VBAforIndia
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेतून प्रश्नांचे फोटो बाहेर येऊनही मनपा प्रशासन जबाबदारी झटकतंय. गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांनी मनपासमोर आंदोलन केलं त्यावेळी मी स्वतः आयुक्तांची भेट घेऊन चौकशी होईपर्यंत नियुक्त्या न देण्याची विनंती केली होती. आता IBPS च्या अहवालात merit further investigation असा स्पष्ट निष्कर्ष असताना तसंच विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधानंतरही मनपा प्रशासनाला प्रसिद्धीपत्रक काढून तातडीने नियुक्ती आदेश देण्याची एवढी घाई का झालीय? यामागं कुणाचा अदृश्य दबाव कार्यरत आहे का?
हे प्रकरण अतिशय गंभीर असून विद्यार्थ्यांनी यासाठी अनेकदा आंदोलनं केली आहेत. विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन न करता प्रशासनाने नियुक्त्या देण्याचा प्रयत्न केला, तर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मलाही त्यांच्यासोबत मनपासमोर आंदोलनाला बसावं लागेल!
@Dev_Fadnavis
@maha_governor Thousands of honest aspirants spent years studying, only for the PMC Junior Engineer(Civil) exam to be ruined by hightech cheating and leaks. Justice delayed is justice denied! Honorable @maha_governor,please intervene cancel the exam & order a re-test immediately
#CancelPMCExam
🚨 #PMCJE : PMC, हा अहवालाचा आधार आहे की पुरावे झाकण्याचा खेळ?
PMC ने "IBPS/TCS अहवालाच्या नावाखाली ३ उमेदवारांची उमेदवारी रद्द करून FIR दाखल केली. पण अहवालच सांगतो👇
❌ "Analytical Flag = गैरप्रकार सिद्ध नाही"
❌ CCTV = फक्त "Further Investigation Indicator"
❌ गैरप्रकाराची पद्धत "सिद्ध नाही"
❌ स्पष्टीकरणाची संधी न देता कारवाई "नको"
मग PMC ने नेमका कोणता पुरावा पाहून शिक्षा सुनावली? PMC, आता एकच करा : पूर्ण अहवाल बाहेर काढा. मूळ CCTV बाहेर काढा. Audit Logs बाहेर काढा. स्वतंत्र Technical Audit करा. नाहीतर आमचा सरळ सवाल राहील, अहवालाचा आधार घेतला की अहवालातील सोयीचे भाग वापरून सत्य दडपले?
हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा खेळ आहे. हिशोब द्यावाच लागेल!
@INCMaharashtra@PMCPune@prajytnair
#PMCJE #JusticeForPMCJE #ExamTransparency
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेबाबत IBPS च्या २७ ऑगस्ट २०२६ च्या अहवालाने अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
IBPS ने काही उमेदवारांचे गुण “non genuine” असल्याचे नमूद केले असून, परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याच्या शक्यतेबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. TCS आणि M/s E&Y यांच्या विश्लेषणातूनही या निष्कर्षांना पुष्टी मिळाल्याचे अहवालात नमूद आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आयुक्तांना सविस्तर निवेदन सादर केले.
आमच्या प्रमुख मागण्या स्पष्ट आहेत:
१. सदर कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा रद्द करून नव्याने निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी.
२. संपूर्ण प्रकरणाची मा. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र, निष्पक्ष, तांत्रिक आणि वेळबद्ध चौकशी करण्यात यावी.
३. चौकशी पूर्ण होईपर्यंत पुढील नियुक्ती व रुजू प्रक्रिया स्थगित ठेवावी.
४. देण्यात आलेल्या १४६ नियुक्तीपत्रांचा स्वतंत्र कायदेशीर व प्रशासकीय फेरविचार करावा.
५. CCTV फुटेज, सर्व्हर लॉग्स, response-time data, biometric records आणि सर्व डिजिटल व फॉरेन्सिक पुरावे तातडीने सुरक्षित करावेत.
ही लढाई कोणत्याही एका उमेदवाराविरोधात नाही. ही लढाई हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या समान संधीच्या घटनात्मक अधिकारासाठी आहे. राज्यातील हजारो परीक्षार्थींच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही.
@maha_governor@RahulGandhi@INCHarshsapkal@navalMH@satejp@INCRojgar@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@mieknathshinde
#Pune #PMC #JuniorEngineer #IBPS #Students #Recruitment #JusticeForStudents #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
एकीकडे पुणे महापालिकेने परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं मान्य केलं आणि दुसरीकडे अतिशय जलद गतीने मनपा प्रशासन उमेदवारांना नियुक्ती आदेश देत आहे. या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त, आयुक्त यांना प्रश्न आहे की नियुक्तीची एवढी घाई नक्की कोणाला वाचवायला करत आहात?
निर्लज्ज भाजपा सरकारच्या काळात भरती परीक्षा म्हणजे भ्रष्टाचाराचा महाबाजार आणि निष्पाप तरुणांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याचे केंद्र बनले आहे. परभणीत नर्सिंगच्या पेपरफुटीनंतर आता पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत झालेला बोगस डिजिटल गैरप्रकार म्हणजे भाजपच्या भ्रष्ट आणि नाकर्त्या कारभाराचा उघडा पुरावा आहे.
परीक्षा केंद्रांवर भाजपचे कृपाछत्र लाभलेली घोटाळेबाज टोळी सक्रिय होऊन शेवटच्या अर्ध्या तासात ९३-९३ प्रश्नांचा बाजार मांडते आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या गरिबांच्या मुलांच्या हक्कावर थेट दरोडा टाकला जातो. तलाठी असो, म्हाडा असो की आता महापालिका भरती, भाजप सरकारच्या नाकाखाली पेपरफुटी आणि हायटेक गैरप्रकारांचे हे रॅकेट खुलेआम फोफावले असूनही हे निर्लज्ज शासन मूग गिळून बसले आहे. केवळ दोन-तीन प्याद्यांवर गुन्हा दाखल करून मूळ दरोडेखोरांना आणि मंत्रालयातील सूत्रधारांना पाठीशी घालण्याचे हे पाप सुरू आहे; लाखो विद्यार्थ्यांच्या घामाचा असा निर्घृण लिलाव करणाऱ्या या भ्रष्ट व्यवस्थेला महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण कधीही माफ करणार नाहीत.
तरुणांच्या भवितव्याशी असा जीवघेणा खेळ मांडणाऱ्या भाजप सरकारचा हा अहंकार आम्ही ठेचल्याशिवाय गप्प बसणार नाही; या संपूर्ण महाघोटाळ्याच्या सूत्रधारांना जेलमध्ये डांबा आणि परीक्षा पद्धती तातडीने सुधारा, अन्यथा संतप्त बेरोजगार तरुणांचा हा तीव्र उद्रेक तुमच्या सत्तेचे सिंहासन जाळून भस्मसात करेल!
#PuneMunicipalCorporation #PMCRecruitment #JuniorEngineerExam #ExamScam #PaperLeak #RecruitmentScam
@bestsharma6@CJP_for_India भाऊ मी स्वतः एक्झाम दिली आहे साक्षात सरस्वती माता जरी आली असती तरी एवढा स्कोर आला नसता कारण पेपर खरच खूप कठीण होता @bestsharma6
One candidate went from 60 and 80 in recent exams to 200 out of 200 in MMRDA JE Civil. 😳
Another reportedly jumped from single digits to 196. And 13 of 16 toppers came from one Nagpur centre.
Abhijit Dipke: What magic was happening there? If jobs are being managed by setting, stop this exam drama and auction government jobs like IPL.
Aspirants: We protest for advertisement, centre, result and joining. If students fight for every basic step, when will they study?
‘रोजगार न्याय यात्रे’तून महाराष्ट्रातील युवकांचा बुलंद आवाज! ✊
रिक्त पदांची तातडीने भरती, प्रलंबित भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे, सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेणे आणि पेपरफुटीविरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने पुण्यात ‘रोजगार न्याय यात्रा’ काढण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यात्रेचा प्रारंभ केला. यावेळी AICC सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी श्री. बी. एम. संदीप आणि AICC सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी श्रीमती रेहाना क्रिस्टी यांनी पुणे महानगरपालिका येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना ठाम पाठिंबा दिला. यात्रेत गोपाल तिवारी व अतुल लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बळीराम डोळे यांच्यासह पुणे शहर व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, युवक, विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दिवसरात्र मेहनत करून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना माफी मिळणार नाही. भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यात्रेदरम्यान सिंचन भवन येथे मुख्य अभियंता तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन युवकांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि भरती प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्ताधारित व भ्रष्टाचारमुक्त होईपर्यंत काँग्रेसचा हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.
@INCHarshsapkal@BMSandeepAICC@RayazRehana@atullondhe
@CongressRojgar
@PMCPune@CollectorPune #Dhananjay_Shinde #DhananjayShinde
आज ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानिमित्त पुणे येथे उपस्थित असताना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील उमेदवारांनी भेट घेऊन त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या माझ्या निदर्शनास आणून दिल्या.
👉सदर उमेदवारांनी निदर्शनास आणून दिल्यानुसार, मागील काही वर्षांपासून राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदे रिक्त असूनही सदर रिक्त पदांच्या भरतीसाठी आवश्यक त्या जाहिराती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. विशेषतः जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, नगरपरिषद प्रशासन तसेच इतर संबंधित विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदांमुळे पात्र उमेदवारांना शासकीय सेवेत संधी उपलब्ध होण्यास विलंब होत आहे.
👉जलसंधारण विभागातील भरतीबाबत संबंधित विभागाचे मा. मंत्री महोदय यांच्याकडून वेळोवेळी घोषणा करण्यात आल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे. तथापि, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नसल्याने उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
👉त्यामुळे संबंधित विभागांनी उपलब्ध रिक्त पदांची वस्तुनिष्ठ आकडेवारी निश्चित करून, पदांची आवश्यक मंजुरी व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कालबद्ध कार्यवाही करणे आवश्यक आहे.
👉MMRDA सहाय्यक अभियंता-२ परीक्षेच्या निकालाबाबत
नुकत्याच पार पडलेल्या MMRDA सहाय्यक अभियंता-२ पदाच्या परीक्षेच्या निकालाबाबत काही उमेदवारांनी गंभीर स्वरूपाचे आक्षेप उपस्थित केले आहेत.
काही उमेदवारांच्या प्राप्त गुणांमध्ये असामान्य स्वरूपाची तफावत असल्याचे तसेच काही विशिष्ट परीक्षा केंद्रांशी संबंधित निकालांच्या स्वरूपाबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सदर आक्षेपांची सत्यता अथवा वस्तुस्थिती अधिकृतरीत्या पडताळून पाहणे आवश्यक असून, कोणत्याही निष्कर्षापूर्वी संबंधित परीक्षा यंत्रणेमार्फत संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे तांत्रिक व स्वतंत्र परीक्षण करण्यात यावे.
यामध्ये आवश्यकतेनुसार परीक्षा केंद्रांवरील CCTV चित्रीकरण, बायोमेट्रिक नोंदी, सर्व्हर लॉग, उमेदवारांची उपस्थिती नोंद, प्रश्नपत्रिका वितरण व संकलन प्रक्रिया, उत्तरपत्रिका/डिजिटल प्रतिसाद, गुणांकन प्रक्रिया तसेच इतर संबंधित इलेक्ट्रॉनिक नोंदींची पडताळणी करण्यात यावी.
सदर पडताळणीअंती वस्तुस्थिती स्पष्ट करून पात्र उमेदवारांच्या हिताचे संरक्षण होईल, अशा पद्धतीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
👉पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेबाबतही काही उमेदवारांनी आक्षेप नोंदविले असून, सदर प्रकरणाची चौकशी/परीक्षण करण्यासाठी IBPS कडून अहवाल प्राप्त होणे अपेक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा परिस्थितीत संबंधित अहवाल प्राप्त होऊन त्यातील निष्कर्षांचा विचार होण्यापूर्वीच नियुक्ती प्रक्रियेबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला जात असल्यास, त्याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे IBPS चा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांचा सखोल विचार करूनच पुढील नियुक्तीविषयक कार्यवाही करण्यात यावी, अशी उमेदवारांची मागणी आहे.
👉वरील सर्व बाबींच्या अनुषंगाने शासन व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी
1. राज्यातील विविध विभागांमधील स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदांची अद्ययावत संख्या जाहीर करावी.
2. आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून रिक्त पदांच्या भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने जाहिराती प्रसिद्ध कराव्यात.
3. MMRDA सहाय्यक अभियंता-२ परीक्षेच्या निकालाबाबत उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची स्वतंत्र व तांत्रिक पद्धतीने पडताळणी करावी.
4. आवश्यकतेनुसार CCTV, बायोमेट्रिक, सर्व्हर लॉग, परीक्षा केंद्रनिहाय माहिती व गुणांकन प्रक्रियेची तपासणी करावी.
5. पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेबाबत IBPS चा अंतिम अहवाल प्राप्त करून त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करावी.
6. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व गुणवत्ताधारित राहील याची दक्षता घ्यावी.
7. उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांबाबत संबंधित प्राधिकरणाने अधिकृतरीत्या वस्तुस्थिती स्पष्ट करावी.
ही मागणी कोणत्याही विशिष्ट उमेदवाराच्या विरोधात नसून, पात्र उमेदवारांना न्याय मिळावा, भरती प्रक्रिया पारदर्शक राहावी आणि शासकीय सेवेत गुणवत्तेच्या आधारे निवड व्हावी, या व्यापक उद्देशाने करण्यात येत आहे.
राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून शासनाने सदर बाबींवर तातडीने सकारात्मक व कालबद्ध कार्यवाही करावी, ही अपेक्षा.
पुण्याकडे निघालोय…
विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला आणखी बळ देण्यासाठी! 🇮🇳✊
MMRDA भरती प्रकरणात विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांना काँग्रेसने सातत्याने आणि आक्रमकपणे आवाज दिला. Normalisation मधील विसंगती, गुणांबाबतचे गंभीर प्रश्न आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीची दखल घेत अखेर ३ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली. हा विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा ऐतिहासिक विजय आहे. मात्र हा केवळ पहिला टप्पा आहे. निष्पक्ष चौकशी, सत्य समोर येणे आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील.
🚩 आज पुण्यात ‘रोजगार न्याय यात्रा’
📅 २१ ऑगस्ट २०२६
⏰ सकाळी १० वाजता
📍 छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पुणे महानगरपालिका
या रोजगार न्याय यात्रेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ आणि अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. अलका लांबा यांच्या हस्ते होणार आहे.
यात्रेच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांच्या रोजगार, भरती आणि परीक्षा व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांसाठी सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या :
🔹 MPSC व इतर सरकारी भरती परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन/OMR पद्धतीने घेण्यात याव्यात.
🔹 परीक्षांमधील Normalisation पद्धत रद्द करण्यात यावी.
🔹 पेपरफुटी, कॉपी, परीक्षा गैरप्रकार आणि भरती घोटाळ्यांवर कठोर कारवाईसाठी प्रभावी कायदा करावा.
🔹 जलसंपदा व जलसंधारण विभागातील प्रलंबित स्थापत्य अभियंता भरती तातडीने सुरू करावी.
🔹 विविध सरकारी विभागांतील प्रलंबित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
🔹 MMRDA प्रकरणातील चौकशी समितीने Normalization Formula, Raw व Normalized Scores, CCTV, Server Logs आणि Digital Records यांची सखोल तांत्रिक तपासणी करावी.
🔹 गैरप्रकार सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करून प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नये.
📚 त्यानंतर थेट विद्यार्थ्यांमध्ये…
रोजगार न्याय यात्रेनंतर आज संध्याकाळपासून आणि उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत पुण्यातील विविध स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व लायब्ररींना भेट देऊन विद्यार्थ्यांशी तसेच संघटना आणि क्लास चालकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधणार आहे. त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि मागण्या जाणून घेण्यासोबतच एका ऐतिहासिक कार्यक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागी होण्याचे आवाहन करणार आहे :
🇮🇳 ‘छात्रों की गूंज’ - राहुलजी गांधी पुण्यात!
📅 २२ ऑगस्ट २०२६
📍 AISSMS कॉलेज ग्राउंड, पुणे
देशातील विद्यार्थी आणि युवकांच्या शिक्षण, रोजगार, परीक्षा व्यवस्था आणि भविष्याशी संबंधित प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी राहुलजी गांधी पुण्यात येत आहेत.
‘छात्रों की गूंज’ ही केवळ सभा नाही; हा विद्यार्थ्यांच्या आवाजाला राष्ट्रीय व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. पुण्यातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, पदवीधर युवक, अभ्यासिका-लायब्ररीतील विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
तुमचा प्रश्न घेऊन या.
तुमचा आवाज घेऊन या.
तुमच्या मित्रांना घेऊन या.
@MMRDAOfficial प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या लढ्याने दाखवून दिले आहे की, विद्यार्थी एकजूट झाले, संघर्ष केला आणि आवाज बुलंद केला तर सरकारलाही उत्तर द्यावे लागते!
चला, या संघर्षाला पुढची दिशा देऊया.
चला, रोजगाराचा अधिकार बुलंद करूया.
चला, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आवाज बनूया. 🇮🇳✊
रोजगार न्यायासाठी संघर्ष सुरूच राहणार!
@RahulGandhi@INCHarshsapkal
#RojgarNyay #रोजगारन्याय #ChhatronKiGoonj #छात्रोंकीगूंज #StudentsJustice #YouthVoice #MMRDA #Pune #RahulGandhi #HarshawardhanSapkal #AlkaLamba #MaharashtraCongre #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
WRD 🚨चे मुख्य कामः⬇️सिंचन व्यवस्थापन: शेतीसाठी पाणी पुरवण्यासाठी मोठी धरणे, कालवे (canals) आणि उपसा सिंचन योजनांची निर्मिती व देखभाल करणे.
प्रशासकीय निष्काळजीपणामुळे जमिनी कोरड्या राहिल्या आणि त्याचा थेट फटका बळीराजाला बसला. २०२३ मध्ये राज्यात ६,६६७ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं, तर Jan-June २०२६ या अवघ्या ६ महिन्यांत एकट्या मराठवाड्यात ४६५ शेतकरी आत्महत्या झाल्या! या मृत्यूला रखडलेली भरती जबाबदार नाही का?
दोन दोन मंत्री, १००+ निवेदने दिली...तरी पण,जलसंपदा विभागात (WRD) फक्त 'घोषणांचा पाऊस'! २०२१ पासून २०००+ जागा रिक्त ठेवून सरकार नेमकं काय साध्य करतंय? सिंचन व्यवस्थापन, धरणे- कालव्यांची देखभाल करायला अधिकारीच नसतील तर पाणी शेतापर्यंत पोहोचणार कसं?
एका बाजूला नोकरी अभावी विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा, तर दुसऱ्या बाजूला पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या पदरी मरण ! हे पाप कोणाचे? घोषणा बाजूला ठेवा आणि थेट सांगा - 🛑WRD भरतीची अधिकृत जाहिरात कधी निघणार?@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Aaple_Sarkarr@girishdmahajan@RVikhePatil @degree_holders