@PawarSpeaks आरोग्य सेवक ५०% ची नियुक्ती यादी मेरिट नुसार लागायला पाहिजे ... जाहिरातीला अनुसरून result n lavta zp मनमानी करत आहे....मेरिट मधील मधील विद्यार्थांना न्याय द्यावा...@PawarSpeaks
मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे,उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपल्या देशात कलेक्टर होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यायची असेल किंवा विविध पदं मिळवण्यासाठी MPSC च्या परीक्षा द्यायच्या असल्या तरीही अशा प्रकारची अट नाहीये.
अशा प्रकारच्या जाचक अटी असणारी भरती प्रक्रिया न्यायालयात अडकून पडते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशी जाचक अट असणारी जाहिरात काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा सरकारचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो.
माझी मा. मुख्यमंत्री @mieknathshinde , मा. उपमुख्यमंत्री @dev_fadnavis व मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांतर्फे कळकळीची विनंती आहे की आपण ही अन्यायकारक अट रद्द करून तत्काळ शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश द्यावेत.
मा. @mieknathshinde साहेब
गेल्या 23 तासापासून हजारो उमेदवार
न्याय्य मागणी व परीक्षा देण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
सरकारला काहीच घेणंदेणं नाही काय????
मा. @mpsc_officeने एक tweet करून सांगितले meeting उद्या आयोजित केली आहे.
सगळ्यांनी मिळून खेळ मांडला व तमाशा बघत मजा लुटत् आहात काय????
मा. @Dev_Fadnavis आज तीन वाजता meeting आहे असे सांगितले होते ना आपण.
इतके षडयंत्र व राजकारण गोरगरीब बेरोजगार सोबत का करत आहात सर्वजण???
सरकारने यावर मा.आयोगास तात्काळ निर्देश द्यावेत व भूमिका जाहीर करण्यास सांगावे.
किती अंत बघणार आता????
असंवेदनशीलतेचा कळस झाला.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@NANA_PATOLE
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा येत्या २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परंतु त्याच दिवशी ‘आयबीपीएस’ची देखील परीक्षा ठेवली आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे अनेक उमेदवारांना कोणत्या तरी एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. वर्षानुवर्षे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर हे अन्याय केल्यासारखे होईल. यासंदर्भात गेली काही दिवसांपासून हे सर्वजण विविध माध्यमांतून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु शासनाने त्यांच्याकडे योग्य ते लक्ष दिलेले नाही. यामुळे हे सर्व विद्यार्थी काल रात्रीपासून पुण्यात आंदोलन करीत आहेत. त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र कृषि सेवा गट अ, ब, आणि ब (कनिष्ठ) संवर्गासाठी दोन-तीन दिवसांत जाहिरात प्रकाशित करण्यात येऊन सदर पदांसाठी ऑक्टोबरमध्ये परिक्षा घेण्यासंदर्भातील ट्विट केले आहे. जर हि परिक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार असेल तर कृषी विभागाची पदे राज्यसेवा परीक्षेमध्ये समाविष्ट करून ऑक्टोबर मध्ये एकत्रित सर्वसामवेशक राज्यसेवा परिक्षा घेता येणे शक्य आहे, व तेच तांत्रिकदृष्ट्या योग्य राहील असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. असे केल्यास विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा योजनेचा संदर्भ घेतला तर त्यांचे हे म्हणणे बरोबर देखील आहे. तरी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की, या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून कृपया त्यांची दखल घ्यावी आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला योग्य ते निर्देश देऊन तातडीने त्यासंदर्भातील परिपत्रक जाहिर करावे.
@CMOMaharashtra@mpsc_office
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४
आज सकाळी १०.३० वाजता आम आदमी पार्टी पुणे शहर समितीचे सर्व पदाधिकारी, असंख्य कार्यकर्त्यांसह विद्यार्थी आंदोलनात सहभागी होतील.
मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज मुंबईत भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांची पूर्तता करून ताबडतोब नोटीफिकेशन काढण्या साठीचे प्रयत्न चालू आहेत.
@AAPMaharashtra शेवटपर्यंत विद्यार्थ्यांसोबत आहे .
लडेंगे… जितेंगे… 🇮🇳
#MPSC
@mieknathshinde@DrSEShinde@CMOMaharashtra
@snjagadale @AAPPune@AAPMaharashtra
MPSC आणि IBPS च्या परीक्षा परत एकदा एकाच दिवशी आल्याने लाखो विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. दिनांक 25 ऑगस्ट रोजी IBPS ने देशपातळीवरील परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही आपल्या दोन महत्त्वाच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत. याच्या निषेधार्थ पुण्यातील अहिल्यादेवी अभ्यासिके बाहेर हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहेत. कर्नाटक आणि केरळ सरकारने IBPS परीक्षेमुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांना न्याय दिलेला आहे. हीच भूमिका महाराष्ट्र सरकारची असायला हवी. २५ ऑगस्ट ला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलून त्यात कृषीच्या जागा समाविष्ट करण्यात याव्या अशी विद्यार्थ्याची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षेच्या तारखा बदलाव्यात, ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे नम्र विनंती करण्यात येत आहे. अन्यथा राज्यभर आयोगाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल..!
#MPSC #IBPS #Exams
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मुख्यमंत्री महोदय कृषी विभागातील 258 राजपत्रित जागा याचवर्षीच्या परीक्षेत Add करायला तयार आहेत आज संध्याकाळ पर्यंत आयोगाकडून तसे प्रसिद्धीपत्रक जाहीर करून उमेदवारांचा संभ्रम मिटला पाहिजे
@mieknathshinde@CMOMaharashtra
मा.@mpsc_office@Drsuvarnas ma'am
🔶#MPSC exams & IBPS exam dates Overlapping issue
18th August
25th August
संदर्भात आपणास......
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष,
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते,
काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते
यासह
मा.मंत्री यशोमती ताई ठाकूर,
मा.सतेज पाटील,
मा.विश्वजीत कदम
खासदार मा.सुप्रियाताईं सुळे
मा.अमोल कोल्हे
तसेच
मा.बच्चूभाऊ कडू
मा.कैलास पाटील
यांच्यासाह वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी व राजकीय नेते यांनी या लाखो उमेदवारांतर्फे आपणास call द्वारे, tweet द्वारे,ई-मेल द्वारे विनंती केली आहे.
🔶 यासोबतच वेगवेगळ्या Print media व main stream media ने हा मुद्दा ठळकपणे आपल्या निदर्शनास आणून दिलेला आहे.
आपण मात्र स्वतः चुका करून उपाय काढण्याऐवजी मौन धारण केले आहे.
स्वतः ढिसाळ नियोजन करायचे व त्याचा बळी गोरगरीब उमेदवारांना करायचा.
इतके दिवस हा प्रकार मनमानी कारभार असा होता,परंतु आता याला "मुजोरी"
हा एकच शब्द पुरेसा आहे.
🔶 #MPSC ने एक लक्षात घ्यावे वरीलपैकी कोणालाही कधीच आपल्या कारभारात हस्तक्षेप करण्याची हौस ,गरज नव्हती व नसणार.
पण लाखो गोरगरीब उमेदवारांचे हित सर्वात जास्त महत्वाचे आहे हे विसरू नका,आपला मनमानी कारभार नाही....
आपण वारंवार चुका करत आहात,
त्या दुरुस्त करण्यात आपल्याला कमीपणा वाटतो का ??
🔶 समाजकल्याण परीक्षेची
वर्षभर परीक्षेची तारीख जाहीर न करणे हे आपल्याला शोभले का?
ते वेळेवर केले असते तर आज ही वेळ आली नसती
निवडणुका वर्ष असते त्यावर्षी फेब्रुवारी त परीक्षा घेतली जाते.
परंतु आपण एप्रिल मध्ये त्याचे नियोजन केले होते विसरलात काय?
मराठा आरक्षणसंदर्भात किरकोळ तांत्रिक बाबीची पूर्तता वेळेत न केल्यामुळे आपण चक्क तीन वेळेस परीक्षा postpone केली.
ते कोणत्या नियमात होते????
तेंव्हा पण वेळोवेळी आपल्या चुका निदर्शनास आणून दिल्याच होत्या ना.
पण आपण तेंव्हा देखील दुर्लक्ष केले व
दुष्परीणाम उमेदवारांना भोगावे लागले.
🔶 "लोकसेवा" याचा अर्थ आपणास कळतो ना?
तात्काळ notification काढून ह्या उमेदवारांना न्याय द्यावा.
IBPS exam नियोजित असताना आपण त्याच दिवशी MPSC परीक्षा तारीख जाहीर करतात,
यात उमेदवारांची चुक काय???
त्यांना दोन्ही परीक्षा देण्याचा अधिकार आहे,तो मिळालाच पाहिजे
@NANA_PATOLE@VijayWadettiwar@AdvYashomatiINC@satejp@ShindePraniti@vishwajeetkadam@supriya_sule@RealBacchuKadu@KailasPatilOffc@PawarSpeaks@mieknathshinde@atullondhe@RahulAsks@abpmajhatv@NDTVMarathi@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@kharge@RahulGandhi@chennithala@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews @News18lokmat @SakalMediaNews@LoksattaLive@lokmat@mataonline@ashish_jadhao@waglenikhil@_prashantkadam@aajtak@mumbaitak@pudharionline@LokshahiMarathi@kolhe_amol
#agree
CM शिंदे साहेब,DCM अजितदादा, फडवणीस साहेब,MPSC चा कारभार सुधारावा लागणारच अन्यथा विद्यार्थांना सोबत आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल.विनंती आहे त्वरित निर्णय घ्यावा लागेल सतत MPSC विद्यार्थ्यांच्या जीवाला घोर लावत आहे
@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mpsc_office
*MPSC & IBPS Exams dates Overlapping issue*
'परीक्षा देण्याच्या स्वातंत्र्यावरच गदा आणणाऱ्या मा.@mpsc_office ला
व बेरोजगारांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करणाऱ्या सरकारला '
15 ऑगस्ट च्या पवित्रदिनी लाखो स्पर्धा
परीक्षा उमेदवारांतर्फे रोखठोक सवाल करत आहे
मा.@Drsuvarnas ma'am
👉#MPSC परीक्षेचे वेळापत्रक ठरवताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का याची पडताळणी करणे हे कुणाचे काम आहे ???
👉 Central ची एखादी परीक्षा नियोजित असताना त्याच दिवशी MPSC ची परीक्षा मुद्दाम ठेवण्याचे नियोजन काय असू शकते ???
👉 MPSC च्या उमेदवारांना इतर परीक्षा देण्याचा अधिकार नाही असे आपले म्हणणे आहे काय ?????
असल्यास एक notification काढून उमेदवारांना सुचित करावे.म्हणजे इथून पुढे ते इतर परीक्षेचा फॉर्म भरणार नाहीत.
👉 18 ऑगस्ट ला IBPS RRB Clerk Exam नियोजित असताना त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण या दोन परीक्षा आपण कसे काय जाहीर करू शकतात?
👉 25 ऑगस्टला IBPS Clerk Exam नियोजित असताना त्याच दिवशी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा का ठेवण्यात आल्या आहेत????
👉 Schedule announce झालेल्या दिवसापासून हजारो उमेदवार आपणाकडे करत असलेल्या विनंतीकडे
आपण कसे काय दुर्लक्ष करू शकतात??
इतका मनमानी कारभार का????
@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
कुणालाच गोरगरीब बेरोजगारांच्या विनवण्या,आर्जवं, मागण्या ऐकू येतच नाहीत की काय ?
किती दिवस असे झोपेचं सोंग पांघरूण बसणार?
👉 कर्नाटकमध्ये सुद्धा 25 August यादिवशी KPSC व IBPS चा same issue झाला होता.
कर्नाटक सरकारने स्वतः जातीने लक्ष घालून तात्काळ यावर #KPSC ला solution काढण्यास सांगितले व आयोगाने त्याला प्रतिसाद दिला.
तेथील मा.मुख्यमंत्री स्वतः tweet करून याची माहिती उमेदवारांना देतात.
महाराष्ट्रात मात्र गोरगरीब उमेदवार
tweets, emails, phone calls द्वारे व शेवटचा पर्याय म्हणून राजकीय नेत्यांमार्फत दररोज सरकारला व मा.आयोगाला विनंती ,विनवण्या करत आहेत.परंतु कुणालाच याचं देणंघेणं नाहीच.
🔶👉 महाराष्ट्र संयुक्त अराजपत्रित गट-ब व गट -क जाहिरात व परीक्षा
या दोन्हीचा सरकारला व #MPSC ला विसर पडला आहे काय ???
फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध होणार होती
7 महिने उलटून गेले तरी जाहिरातीचा पत्ता नाही.
#MPSC ला आठवण करून देत आहे
ही exam 16 जूनला होणार होती.
ऑगस्ट अर्धा संपला तरी आपण जाहिरात तर दूरच अद्याप परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर केली नाही.
उमेदवारांची सगळीकडून कोंडी करण्यात येत आहे.
हा गलथान कारभार व ढिसाळ नियोजन नेमके कुणाचे???
मा.आयोगाचे ?सरकारचे ?दोन्हीचे?
@NANA_PATOLE@ssaunik
IBPS RRB CLERK व MPSC समाज कल्याण परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 18 ऑगस्ट 2024 रोजी तसेच नागरी सेवा पूर्व परीक्षा (राज्यसेवा परीक्षा) 2024 व IBPS CLERK परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 25 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे.
दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत असल्यामुळे दोन्ही फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार असून सोबतच एक परीक्षा न देता येण्याची खंत राहून मानसिक त्रास त्यांना होवू शकतो.
विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता MPSC ने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा आणि समाज कल्याण अधिकारी परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे.
महाराष्ट्राला बेरोजगारीच्या खाईत लोटून
स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या जीवावर उठलेल्या असंवेदनशील सरकारने खालील बाबींची तात्काळ व गांभीर्याने दखल घ्यावी
👉 1.एमपीएससी कृषीसेवा जाहिरात 2024
गेल्या दोन वर्षापासून जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.
258 जागा 2024 जाहिरातीसाठी नियोजित असताना सुद्धा जाणूनबुजून त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या सरकारला हजारो कृषी पदवीधारक गेल्या दोन महिन्यापासून विनवण्या करत आहेत हे दिसत नाही काय?
मा.मुख्यमंत्री महोदय @mieknathshinde सरकारने टोलवाटोलवी व खोटं आश्वासन देऊन त्यांचा खेळ मांडून ठेवला आहे.
@dhananjay_munde
11 दिवसावर परीक्षा आली तरी आपण
अजूनही गप्पच.मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही?
तात्काळ या पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्यात यावा.
👉 2. MPSC & IBPS Exams Overlapping issue
मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
आपण परीक्षा वेळापत्रक जाहीर करताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का या मूलभूत गोष्टीची पडताळणी सुद्धा करत नाहीत याचे आश्चर्य वाटत आहे.
समाजकल्याण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल एक वर्षाने आपण परीक्षेची तारीख जाहीर केली.
IBPS RRB clerk परीक्षा 18 ऑगस्ट ला नियोजित असताना सुुद्धा आपण त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण परीक्षा कसे काय जाहीर करू शकतात?
मराठा आरक्षणासंदर्भात योग्य त्या बाबींची वेळीच तरतूद व पूर्तता आपण न केल्यामुळे आधीच तीन वेळेस postpone झालेली परीक्षा तारीख सुद्दा आपण 25 ऑगस्ट दिली.
25 ऑगस्ट ला IBPS Clerk exam
नियोजित आहे हे आपणास माहित नव्हते काय??????
👉 ज्या दिवशी आपण 18 ऑगस्ट व 25 ऑगस्ट या दोन तारखा जाहीर केल्या त्यादिवशी पासून हजारो उमेदवार आपल्याला वारंवार IBPS परीक्षा व MPSC परीक्षा overlap होत आहेत हे निदर्शनास आणून देत आहेत.
तरीही आपण त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहात.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
गोरगरीब विद्यार्थ्यांची ही पिळवणूक कशासाठी??????
केंद्राच्या परीक्षा नियोजित असताना जाणूनबुजून त्याच दिवशी MPSC च्या परीक्षा ठेवण्याचे षडयंत्र कुणाचे?
सरकारचे की मा.आयोगाचे??????
उमेदवारांचा परीक्षा देण्याचा अधिकार आपण कसे काय हिरावून घेत आहात???
👉 3.राज्यसेवा 2024 जाहिरात
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेसाठी महत्वाचे संवर्ग गायब करून आपण नेमकं काय साध्य करत आहात?
गेल्या 10 महिन्यापासून लाखो गोरगरीब विद्यार्थी आपल्याकडे सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांची मागणी करत आहेत.
आपण सर्व त्यावर मौन बाळगून आहात.
@ssaunik ma'am या उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,मुख्याधिकारी ,पोलीस उपाधीक्षक होण्याचा अधिकार नाही काय?
उपजिल्हाधिकारी पदांसाठी सतत 7 महिने प्रयत्न केल्यानंतर फक्त 7 जागा ?
त्यातही OBC सह इतर काही category साठी चक्क ZERO ???
👉 4 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क 2024 जाहिरात व परीक्षा
जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये नियोजित असताना ऑगस्ट अर्धा संपला तरी जाहिरातीचा पत्ता नाही. 16 जुन ही परीक्षेची तारीख होती याचे कुणालाच भान नाही काय ?
कधीचा मुहूर्त शोधला आहे यासाठी ?????
👉 5. राज्यातील तरुण अस्वस्थ आहेत,प्रचंड मानसिक तणावात आहेत.रोज उठून शासन् दरबारी व # MPSC कडे विनवण्या,विनंती,आर्जव
करत आहेत.
आपण सर्वांनी झोपेचे सोंग घेतलं आहे.
परीक्षेची संधी न देणे व मिळाली तर ती हिरावून घेणे यातून सरकारला कोणता आदर्श घालून द्यायचा आहे?????
गेल्या 10 वर्षात याच धोरणामुळे चक्क एक पिढी बरबाद झाली आहे.
मा. अजित दादा,
लेखा व कोषागारे विभाग जाहिरात गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित आहेत , शेवटची भरती ६ वर्षांपूर्वी झाली होती. कृपया आपण यात स्वतः लक्ष घालून उपलब्ध रिक्त पदांची तात्काळ भरती जाहीर करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
@AjitPawarSpeaks
हवामान खात्याने मुंबईला 8 तारखेला red अलर्ट तर 9 ला yellow अलर्ट दिला आहे. लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. बाहेरून येणाऱ्या अनेक रेल्वे रद्द झाल्यात, अशा वेळी मुलं स्किल टेस्ट ला कसे पोहचणार. पवई सेंटरवर कोणत्याही प्रकारचा निवारा उपलब्ध नाही. @mpsc_office विनंती आहे यावर मार्ग काढा
♦लक्षवेधी...
#8julyskilltest 🌧
@mpsc_office@Suvarnakharat4
👉मा. महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
आपण45 मिनिटे उपस्थित राहण्यासाठी वेळ वाढवून दिला परंतु, लोकल ठप्प आहेत,मुंबई स्लो झाली आहे कौशल्य चाचणी परीक्षार्थींना पोहोचणे शक्यच होत नाही आहे, अन्याय होऊ नये ही विनंती🙏
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आज टायपिंग स्किल टेस्ट घेणार होते, ज्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी मुंबईला आले होते. पहिलीच बॅच 12:30 वाजेपर्यंत पूर्ण करता आली नाही आणि गोंधळ झाल्यानंतर आज आणि उद्या होणारी चाचणी रद्द करण्यात आली आहे. पुढील चाचणी 1 ऑगस्ट नंतर घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
पारदर्शकपणे परीक्षा घेण्याची आपली जबाबदारी असताना तांत्रिक अडचणींच्या कारणाने आपण ती TCS कंपनीच्या माथ्यावर मारून आपली नैतिक जबाबदारी नाकारत आहात का? जर प्रत्येक परीक्षा घेण्यात TCS अपयशी ठरत असेल, तर TCS कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट तातडीने रद्द करावे.
तसेच, दिलेले कोणतेही वेळापत्रक पाळण्यात अपयशी ठरलेल्या MPSC सचिवांनी राजीनामा द्यावा. निदान एवढी तरी नैतिकता दाखवून जबाबदारी स्वीकारावी.
@mpsc_office@mieknathshinde@NANA_PATOLE@Dev_Fadnavis@Drsuvarnas
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नाना पटोले साहेबांनी आज महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री व मा.मुख्य सचिव यांना call करून खालील मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले
1. कालपासून सुरु झालेल्या पोलीस भरती उमेदवारांचे पावसामुळे प्रचंड हाल होत आहेत.त्यांची राहण्याची व इतर व्यवस्था करावी
2.राज्यसेवा 2024 साठी डेप्युटी कलेक्टर,डीवायएसपी
सहित सर्व संवर्गाच्या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात.
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेत गोरगरीब मुलांना न्याय द्यावा.
3.कर सहायक waiting list मधील मुलांना तातडीने नियुक्ती देण्यात यावी
4. combined exam गृप b व गृप C
ची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी व जास्तीत जास्त पदे याद्वारे भरण्यात यावेत.
@NANA_PATOLE@mieknathshinde@MahaDGIPR@RahulGandhi@Dev_Fadnavis