@degree_holders@Dev_Fadnavis@CMOMaharashtra UP मध्ये पुढच्या वर्षी निवडणूक आहे म्हणून १ लाख नियुक्त्या! महाराष्ट्रातही २०२९ ची निवडणूक आली की भरतीच्या घोषणा सुरू होतील.
पदे रिक्त, नियम तयार, उमेदवार तयार; तरी मागणीपत्रे फाईलमध्ये! युवकांच्या बेरोजगारीची चिंता नाही, सरकारला फक्त स्वतःच्या सत्तेच्या भविष्याची चिंता आहे.
@degree_holders@Dev_Fadnavis@CMOMaharashtra WRD विभागातील JE, CEA या पदाच्या 2000+ जागा रिक्त असताना अजून पण प्रशासन रिक्त जागा भरत नाही आहे..@Dev_Fadnavis लवकरात लवकर आकृतीबंधाला मान्यता देऊन 2026 मध्येच MPSC मार्फत ऑफलाईन पद्धतीनेच पदभरती पूर्ण करावी..जेणेकरून आपल्या 60k पदभरती करण्याच्या घोषणेची पूर्तता होईल... धन्यवाद
उत्तर प्रदेश मध्ये पुढील ६ महिन्यांत १ लाख सरकारी नियुक्त्या… मग महाराष्ट्रात कधी?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुढील ६ महिन्यांत १ लाख युवकांना सरकारी नियुक्तीपत्रे देण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात मात्र आजही घोषणांपासून प्रत्यक्ष भरतीपर्यंतचा प्रवास कासवगतीने सुरू आहे!
👉 जलसंधारण विभागाचा आकृतीबंध तयार आहे, मात्र सेवा प्रवेश नियम प्रलंबित आहेत.@SanjayDRathods
👉 जलसंपदा विभागांचे सेवा प्रवेश नियम तयार आहेत, मात्र आकृतीबंध प्रलंबित आहे.@RVikhePatil
👉 आणि ज्या विभागांचा आकृतीबंध व सेवा प्रवेश नियम दोन्ही पूर्ण आहेत, त्यांचे मागणीपत्र सामान्य प्रशासन विभागात प्रशासकीय कारणास्तव प्रलंबित आहे.( नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग)
म्हणजेच, पदे रिक्त आहेत… नियम आहेत… गरज आहे… उमेदवार तयार आहेत… पण भरती प्रक्रिया कुठेतरी फाईलमध्ये अडकली आहे!
महाराष्ट्र सरकारने आता केवळ “मेगाभरती”च्या घोषणा न करता प्रत्यक्षात रिक्त पदांची जाहिरात काढून भरती प्रक्रिया सुरू करावी.
महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार युवकांना आश्वासन नको, प्रत्यक्ष सरकारी नोकरीची संधी हवी!
@myogioffice very good decision 👏
#MaharashtraMegaRecruitment
#GovernmentJobs
#MPSC
#YouthEmployment
रोजगार न्याय यात्रेत सिंचन भवन येथे थिय्या आंदोलन!
शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात झालेल्या रोजगार न्याय यात्रेदरम्यान, पुणे महापालिकेपासून पदयात्रेला सुरुवात करून आम्ही सिंचन भवन येथे पोहोचलो. हजारो अभियंता विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथे थिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जलसंपदा विभागाच्या आकृतीबंधाला तातडीने मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे पदभरतीसाठी MPSC आयोगाकडे तातडीने पाठवावीत, अशी ठाम मागणी करण्यात आली.
AEE, AE, JE आणि CEA या संवर्गातील हजारो पदांच्या भरतीची अभियंता विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आकृतीबंधाच्या मंजुरीच्या नावाखाली ही भरती अनिश्चित काळासाठी लांबवणे म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांच्या भवितव्याशी खेळ आहे.
सरकारने आता दिरंगाई थांबवून तातडीने निर्णय घ्यावा : आकृतीबंधाला मंजुरी द्या, रिक्त पदे MPSCकडे पाठवा, AEE, AE, JE आणि CEA पदांची भरती तातडीने सुरू करा! रोजगार हा उपकार नाही, तर तरुणांचा हक्क आहे. हा हक्क मिळेपर्यंत रोजगार न्यायाचा संघर्ष सुरूच राहील!
@INCHarshsapkal@VarshaEGaikwad@Fadanvis007@satejp@VijayWadettiwar@mieknathshinde
#रोजगार_न्याय_यात्रा #रोजगार_न्याय_सत्याग्रह #MPSC #EngineeringJobs #जलसंपदा_विभाग #Pune #DhananjayShinde #Dhananjay_Shinde #ChhatronKiGoonjPune #PuneGirls #ChhatronKiGoonjForGirls #StudentVoices #EqualEducation
जलसंपदा विभागाच्या आकृतीबंधाला तातडीने मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर पदभरतीसाठी MPSC आयोगाकडे पाठवण्यात यावीत, ही विनंती.
हजारो अभियंता विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण या पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कोणतीही अनावश्यक दिरंगाई न करता AEE, AE, JE व CEA संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी.
@RVikhePatil@girishdmahajan@MahaDGIPR@Dev_Fadnavis@Devendra_Office
#WRD_CIVIL_AEE_AE_JE_CEA #जलसंपदा_विभाग #MPSC #EngineeringJobs #MegaRecruitment
@SanjayDRathods मृद व जलसंधारण विभाग नवीन आकृतीबंध तयार असूनसुद्धा अद्याप मंजूरी अभावी रखडला आहे,परिणामी जाहिरात प्रक्रियेचे आदेश असूनसुद्धा कार्यवाही अडकली आहे. लवकरात लवकर आकृतीबंधाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती !!🙏
@degree_holders#WCD_Recruitment@Dev_Fadnavis
‘रोजगार न्याय यात्रे’तून महाराष्ट्रातील युवकांचा बुलंद आवाज! ✊
रिक्त पदांची तातडीने भरती, प्रलंबित भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे, सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेणे आणि पेपरफुटीविरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने पुण्यात ‘रोजगार न्याय यात्रा’ काढण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यात्रेचा प्रारंभ केला. यावेळी AICC सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी श्री. बी. एम. संदीप आणि AICC सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी श्रीमती रेहाना क्रिस्टी यांनी पुणे महानगरपालिका येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना ठाम पाठिंबा दिला. यात्रेत गोपाल तिवारी व अतुल लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बळीराम डोळे यांच्यासह पुणे शहर व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, युवक, विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दिवसरात्र मेहनत करून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना माफी मिळणार नाही. भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यात्रेदरम्यान सिंचन भवन येथे मुख्य अभियंता तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन युवकांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि भरती प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्ताधारित व भ्रष्टाचारमुक्त होईपर्यंत काँग्रेसचा हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.
@INCHarshsapkal@BMSandeepAICC@RayazRehana@atullondhe
@CongressRojgar
@PMCPune@CollectorPune #Dhananjay_Shinde #DhananjayShinde
@NANA_PATOLE@Dev_Fadnavis साहेब,आपल्या कार्यकाळात प्रशासकीय दिरंगाई चिंताजनक ठरत आहे.१५० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवूनही WCD विभागाचे #सेवाप्रवेश_नियम अजूनही मंत्र्यांच्या दालनात प्रलंबित आहेत, तर WRD विभागाचा #आकृतीबंध मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे
यामुळे हजारो बेरोजगाराचे भवितव्य अंधारात आहे
आज ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानिमित्त पुणे येथे उपस्थित असताना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील उमेदवारांनी भेट घेऊन त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या माझ्या निदर्शनास आणून दिल्या.
👉सदर उमेदवारांनी निदर्शनास आणून दिल्यानुसार, मागील काही वर्षांपासून राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदे रिक्त असूनही सदर रिक्त पदांच्या भरतीसाठी आवश्यक त्या जाहिराती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. विशेषतः जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, नगरपरिषद प्रशासन तसेच इतर संबंधित विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदांमुळे पात्र उमेदवारांना शासकीय सेवेत संधी उपलब्ध होण्यास विलंब होत आहे.
👉जलसंधारण विभागातील भरतीबाबत संबंधित विभागाचे मा. मंत्री महोदय यांच्याकडून वेळोवेळी घोषणा करण्यात आल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे. तथापि, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नसल्याने उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
👉त्यामुळे संबंधित विभागांनी उपलब्ध रिक्त पदांची वस्तुनिष्ठ आकडेवारी निश्चित करून, पदांची आवश्यक मंजुरी व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कालबद्ध कार्यवाही करणे आवश्यक आहे.
👉MMRDA सहाय्यक अभियंता-२ परीक्षेच्या निकालाबाबत
नुकत्याच पार पडलेल्या MMRDA सहाय्यक अभियंता-२ पदाच्या परीक्षेच्या निकालाबाबत काही उमेदवारांनी गंभीर स्वरूपाचे आक्षेप उपस्थित केले आहेत.
काही उमेदवारांच्या प्राप्त गुणांमध्ये असामान्य स्वरूपाची तफावत असल्याचे तसेच काही विशिष्ट परीक्षा केंद्रांशी संबंधित निकालांच्या स्वरूपाबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सदर आक्षेपांची सत्यता अथवा वस्तुस्थिती अधिकृतरीत्या पडताळून पाहणे आवश्यक असून, कोणत्याही निष्कर्षापूर्वी संबंधित परीक्षा यंत्रणेमार्फत संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे तांत्रिक व स्वतंत्र परीक्षण करण्यात यावे.
यामध्ये आवश्यकतेनुसार परीक्षा केंद्रांवरील CCTV चित्रीकरण, बायोमेट्रिक नोंदी, सर्व्हर लॉग, उमेदवारांची उपस्थिती नोंद, प्रश्नपत्रिका वितरण व संकलन प्रक्रिया, उत्तरपत्रिका/डिजिटल प्रतिसाद, गुणांकन प्रक्रिया तसेच इतर संबंधित इलेक्ट्रॉनिक नोंदींची पडताळणी करण्यात यावी.
सदर पडताळणीअंती वस्तुस्थिती स्पष्ट करून पात्र उमेदवारांच्या हिताचे संरक्षण होईल, अशा पद्धतीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
👉पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेबाबतही काही उमेदवारांनी आक्षेप नोंदविले असून, सदर प्रकरणाची चौकशी/परीक्षण करण्यासाठी IBPS कडून अहवाल प्राप्त होणे अपेक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा परिस्थितीत संबंधित अहवाल प्राप्त होऊन त्यातील निष्कर्षांचा विचार होण्यापूर्वीच नियुक्ती प्रक्रियेबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला जात असल्यास, त्याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे IBPS चा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांचा सखोल विचार करूनच पुढील नियुक्तीविषयक कार्यवाही करण्यात यावी, अशी उमेदवारांची मागणी आहे.
👉वरील सर्व बाबींच्या अनुषंगाने शासन व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी
1. राज्यातील विविध विभागांमधील स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदांची अद्ययावत संख्या जाहीर करावी.
2. आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून रिक्त पदांच्या भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने जाहिराती प्रसिद्ध कराव्यात.
3. MMRDA सहाय्यक अभियंता-२ परीक्षेच्या निकालाबाबत उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची स्वतंत्र व तांत्रिक पद्धतीने पडताळणी करावी.
4. आवश्यकतेनुसार CCTV, बायोमेट्रिक, सर्व्हर लॉग, परीक्षा केंद्रनिहाय माहिती व गुणांकन प्रक्रियेची तपासणी करावी.
5. पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेबाबत IBPS चा अंतिम अहवाल प्राप्त करून त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करावी.
6. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व गुणवत्ताधारित राहील याची दक्षता घ्यावी.
7. उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांबाबत संबंधित प्राधिकरणाने अधिकृतरीत्या वस्तुस्थिती स्पष्ट करावी.
ही मागणी कोणत्याही विशिष्ट उमेदवाराच्या विरोधात नसून, पात्र उमेदवारांना न्याय मिळावा, भरती प्रक्रिया पारदर्शक राहावी आणि शासकीय सेवेत गुणवत्तेच्या आधारे निवड व्हावी, या व्यापक उद्देशाने करण्यात येत आहे.
राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून शासनाने सदर बाबींवर तातडीने सकारात्मक व कालबद्ध कार्यवाही करावी, ही अपेक्षा.
पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणायचं आणि त्याच पुण्यात पेपरफुटी, परीक्षा घोटाळे आणि भरतीतील अनियमितता सुरू ठेवायची, हा चंद्रकांत पाटील यांच्या विभागाचा कारभार आहे.
@ChDadaPatil
@degree_holders@girishdmahajan@RVikhePatil लवकरात लवकर जाहिरात काढावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा @CMOMaharashtra
2 -2 मंत्री असून 100 निवेदन दिली गेली आहेत
तरी पण काही हालचाल होत नाहीये
कार्यतत्परता दाखवणारे मंत्री या महाराष्ट्राला आजपर्यंत लाभले आहेत आणि हे मंत्री झोपा काढत आहेत की काय.
@degree_holders@Dhananjay4INC@PMCPune@Dev_Fadnavis साहेब,आपल्या कार्यकाळात प्रशासकीय दिरंगाई चिंताजनक ठरत आहे.१५० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवूनही WCD विभागाचे #सेवाप्रवेश_नियम अजूनही मंत्र्यांच्या दालनात प्रलंबित आहेत, तर WRD विभागाचा #आकृतीबंध मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे
यामुळे हजारो बेरोजगाराचे भवितव्य अंधारात आहे