शिक्षक भरती 2025 साठी आस्थापनांना पवित्र पोर्टल वरती जागा देण्यासाठी शेवटची तारीख 31 मे दिली आहे.परंतु आत्तापर्यंत खूप कमी जागा ह्या नोंद झालेल्या आहेत.आपल्या स्तरावरून विविध आस्थापनांनी लवकर नोंद करावी व जागा अपलोड कराव्यात यासाठी निर्देश द्यावे ही विनंती. @dadajibhuse#tait
शिक्षक भरती 2025 करिता बिंदू नामावली तपासणीसाठी 31 मे पर्यंतची वेळ दिलेली आहे.आपल्या स्तरावरून लवकरात लवकर तपासणी करून पवित्र पोर्टल वरती जाहिरात द्यावे असे सक्त आदेश द्यावे,जास्तीत जास्त जागा भरून महाराष्ट्रातील ded,bed मुलांची बेरोजगारी संपवावी ही नम्र विनंती @dadajibhuse
भारतातील खासदार आणि आमदारांची संख्या वाढवण्यापेक्षा सरकारी शाळेला 20 विद्यार्थ्या पाठीमागे दोन शिक्षक द्या. जिल्हा परिषद शाळा वाचवा.
#माझी_शाळा#मराठी_शाळा
आद.फडणवीस साहेब,तुमच्या कार्यकाळात खूप पुण्याचे काम सुरू आहे,गरिबांच्या पोरांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे,या सर्व शाळा बंद करून तिथे मंदिरे उभे करा,तुमच्या पूर्वजांनी ते काम केले आता तुम्ही सुद्धा हे काम करा.भुसे साहेब आणि भोयर साहेब तुमच्या हाताने खूप पुण्याचे काम होत आहेत.
CMOMaharashtra @EknathShinde5 @dadabhuse
समूह शिक्षण योजना रद्द करा!
कंत्राटी शिक्षकभरती थांबवा!
पवित्र पोर्टलवरून १००% गुणवत्तेनुसार पारदर्शक भरती करा!
आम्ही तयार आहोत, तुम्ही कधी देणार न्याय?
@kamblesandeep12#एकचमिशन#हिवाळीअधिवेशन
वेगवेगळ्या प्रकारच्या शासनाच्या निर्णयातून राज्यातील 18000 पेक्षा अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असून, वस्ती तांडे पाडे, ग्रामीण भागातील गोरगरिबांचे शिक्षण बंद करण्याचा सरकारने घाट घातला आहे. समुह शाळा योजना ,कंत्राट शिक्षकभरती, दुसरीकडे हजारो शिक्षक अतिरिक्त केले असून पात्र भावी शिक्षक मात्र परीक्षा देऊन बेजार आहेत सरकार त्यांच्या परीक्षांच्या माध्यमातून लूट केली जात असल्याने
TAIT 3 मध्ये 10 कोटी तर TET मध्ये 50 कोटी सरकार जमवले असून भावी शिक्षकांना मात्र वाऱ्यावर सोडले म्हणून....
न्याय हक्कासाठी
हिवाळी अधिवेशनात एल्गार आंदोलन
8 डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम धंतोली ते संविधान चौक भव्य मोर्चा असून त्यानंतर अधिवेशन होईपर्यंत तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
लढू आणि जिंकू
मोठ्या संख्येने उपस्थित रहा
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@Prksh_Ambedkar@Sujat_Ambedkar@RRPSpeaks@abpmajhatv@TV9Marathi@TulsidasBhoite@AnandrjAmbedkar@Dev_Fadnavis@Dhananjay4INC@AnujaDhakras21@AbhijitKaran25@satyajeettambe@sudhakaradbale@NANA_PATOLE@NitinRaut_INC@saamTVnews
कंत्राट शिक्षकभरती, समूह शाळा योजना बंद करण्यात यावी, शिक्षणसेवक मानधन वाढ,पवित्रपोर्टलवर शिक्षकभरती करताना मुलांच्या हिताचा विचार करावा म्हणून अनेक मागण्या घेऊन हिवाळी अधिवेशनात एल्गार आंदोलन करण्यात येणार असून तुम्ही व पक्षाच्या वतीने अधिवेशनात जोरदार प्रश्न उपस्थित करावेत.
@RRPSpeaks@NCPspeaks
महाराष्ट्रातील कित्येक अशा शाळा आहेत तेथे शिक्षक नाहीत त्यामुळे गरीब मुलांना शिक्षक मिळत नाहीत त्यामुळे शासनाने जास्तीत जास्त शिक्षकांची भरती करून गरीब मुलांना शिक्षक उपलब्ध करून द्यावे आणि 75 हजार जागांची शिक्षण भरती करावी विनंती. @dadajibhuse@INCIndia@Dev_Fadnavis
अनेकदा विरोध करूनही महाराष्ट्र शासनाचे कंत्राटी भरतीचं खूळ काही कमी होत नाही. राज्यात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत, लाखो गुणवत्तापूर्ण TET, TAIT, B.Ed/D.Ed उत्तीर्ण उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र असं असूनही शासन कायमस्वरूपी भरती काढतंच नाही. सरकारकडून पद्धतशीरपणे पटसंख्या कमी दाखवून शाळा बंद करण्याचं धोरण राबवलं गेलं आणि आता तेच कमी पटाच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमले जात आहेत, यात विद्यार्थ्यांचा काय दोष? त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण का नाकारलं जात आहे? शासनाने १८,६०८ कंत्राटी नव्हे तर १८,६०८ कायमस्वरूपी शिक्षकांची मेगा भरती करावी आणि शिक्षण क्षेत्राची व पर्यायाने विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड तत्काळ थांबवावी, ही विनंती.
@Dev_Fadnavis@dadajibhuse
विकसित देशात असलेले शिक्षणाचे महत्त्व आपल्या मागास देशाला काय कळणार?ज्या देशाचा पाया हा शिक्षण असून जिथे शिक्षकांच्या जागेला कात्री लावण्याचे काम केले जाते,असे विदारक चित्र पाहून मन हळहळते,कधीतरी विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल की नाही ही सुद्धा एक चिंता सतावत आहे ? 🤔🥲📚😭
"युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र "मार्फत @Yesjassociation
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख
उद्धव ठाकरे साहेबाना @uddhavthackeray
शिक्षकभरती जलद गतीने राबवावी,कंत्राट शिक्षक रद्द करावे म्हणून आज संभाजी नगर मध्ये निवेदन देण्यात आले.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब @OmRajenimbalkr
हिंगोलीचे खासदार नागेशपाटील साहेब
यांना शिक्षकभरती जलद व मोठयापदाची करण्यासाठी निवेदन देऊन खूप सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.
@ShivSenaUBT_@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबाना
@AjitPawarSpeaks
"युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र " @Yesjassociation
मार्फत
शिक्षकभरती 100% रिक्त मोठ्या पदाची, कंत्राट भरती रद्द करावी, समूह शाळा योजना बंद करावी अशा विविध प्रकारच्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या असून तब्बल चार ते पाच मिनिटे दादांनी सर्व विषय समजून घेत मंत्रालयीन अधिकाऱ्यांना तात्काळ कॉल करून कळवला, उर्वरित मागण्या शिक्षण मंत्री भुसे साहेब यांना लवकरच कळवणार असल्याचे मागितले...!
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांच्यामुळे सविस्तर भेट घडून आलेली असून पुढील पाठपुरावा त्यांच्या मार्फत केला जाईल असा शब्द ..
@ChakankarSpeaks
धन्यवाद रुपालीताई...
निवेदक
रणरागिणी पूजा मॅडम,सुशांत सर....
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR