राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
जागा 431
अजुन तहसीलदार 100+, उपजिल्हाधिकारी 50+, उत्पादन शुल्क SP 20+ आणि 100+ Dy.SP त्यात आणायच्यात.
यावर्षीची जाहिरात कोणत्याही परिस्थितीत चार आकडी करायची आहेच.
यावर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक आहे हे सरकारला विसरून परवडणार आणि चालणारही नाही.
🎯राज्यसेवा परीक्षा 2024
♦️उपनिबंधक सहकारी संस्था:- 49 पदे रिक्त तरीही केवळ 2 पदांचे मागणीपत्रक .
♦️सहा निबंधक सहकारी संस्था:- 140 पदे रिक्त तरीही केवळ 5 पदांचे मागणीपत्रक.
पदे रिक्त ठेवून शासन कारभार गतिमान करण्याची ही कोणती पद्धत आहे?
@mieknathshinde
तलाठी भरतीच्या गैरव्यवहारावरून एकाने आत्महत्या केली. पण बातमी नीट वाचली तर कळेल या घोटाळेबाजाने ०८ तलाठी उमेदवारांकडून पैसे घेतले होते, त्यातील पाच जणांचे काम झाले आणि तिघांचे काम झाले नाही.
घोटाळा करून नोकरीवर लागलेले पाच जण कोण? याचा तपास आपले कर्तव्यदक्ष गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतील का? गृहमंत्र्यांना नक्की किती पुरावे पाहिजे आहेत? नियुक्त्या दिल्या तरी काहीही फरक पडणार नाही, संपूर्ण घोटाळा आम्ही बाहेर काढणार आहोत. "दमदार पुरावे येत्या काळात बाहेर येतील" याची हमी आज आम्ही देतो आहोत.
@Dev_Fadnavis@RVikhePatil@maharevenue@AUThackeray@VijayWadettiwar@RRPSpeaks .
जुन्या अभ्यासक्रमाची शेवटची परीक्षा असल्याने राज्यसेवा परीक्षेसाठी जागावाढ तसेच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, Dysp यासारख्या पदांचा समावेश करण्यासंदर्भात विद्यार्थी प्रतिनिधींसोबत सामान्य प्रशासन विभागाचे अवर मुख्य सचिव नितीन गद्रे साहेबांची भेट घेतली. शासनाच्या सर्व रिक्त पदांचा आढावा घेऊन #MPSC कडे त्वरित पाठपुरावा करण्यासंबंधी त्यांना विनंती केली. जागावाढ करण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असून विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगत त्यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचं आश्वासित केलं.
तसंच केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने शासकीय पदभरतीच्या जाहिराती काढण्यास तांत्रिक अडचणी येणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विभागांच्या रिक्त जागांचा आढावा घेऊन त्यासंदर्भात मागणीपत्रे देऊन भरती प्रक्रियेला गती देण्याची विनंतीही यावेळी केली.
राज्यसेवा परीक्षा २०२४
जुन्या अभ्यासक्रमानुसार होणारी शेवटची परीक्षा
३५ कॅडरमधील शेकडो जागा रिक्त असताना २०५ पदांची जाहिरात का?
सर्व कॅडरमधील १००% जागांची भरती केल्यास ४ आकडी जाहिरात शक्य
स्थापत्य अभियांत्रिकी मधील सर्व रिक्त जागांची मागणी पत्रके द्या
#राज्यसेवा_2024_जागावाढ
#MPSC_EXAM 2024
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500#MPSC_Civil_1000_posts#Civil_Engineering_2024
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत..
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती..🙏
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
3. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढली आहे त्यात बदल जागावाढ करावी.. 🙏
👉 5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी. शासनाने वरील गोष्टी जागावाढ बाबतीत #MPSC ला पत्रक पाठवून दखल घ्यावी ही नम्र विनंती.. 🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule@maha_governor
राज्यसेवा 2024 ही जुन्या अभ्यासक्रमाची शेवटची आहे. तरीही केवळ 205 जागांची जाहिरात आली आहे.
त्यात सर्वच 35 संवर्गाची पदे असणारी वाढीव जाहिरात यायला हवी.
#राज्यसेवा_2024_जागावाढ झालीच पाहिजेत.
@CMOMaharashtra
♦️2022 राज्यसेवा जाहिरातीत "623 जागा" होत्या.
♦️जुन्या अभ्यासक्रमास 2 वर्षे वाढून दिल्यावर तटपुंज्या संख्येच्याच जाहिराती काढल्यात.
📍2023 :- 303
📍2024 :- 205
📍 म्हणजे दोन वर्षात केवळ 508 जागा.
♦️20 ऑक्टोंबर 2022 चा GR रद्द/बदल करून #राज्यसेवा_2024_जागावाढ करावी.
राज्यसेवा objective pattern ची शेवटची संधी लक्षात घेता सर्व ३५ पदांची १५००+ जागांची जाहिरात काढण्यात यावी आणि ३१ जानेवारीपर्यंत सर्व रिक्त जागांचे मागणीपत्रक आयोगाकडे पाठवण्याची गरज आहे.
डेप्युटी कलेक्टर, DySP, तहसीलदार, Excise SP, CO-1 यासारख्या class-1 पदांची शेकडो जागा रिक्त असताना जाहिरातीत मात्र एकही जागा नाही ही शोकांकिता आहे.
या सर्व बाबींचा विचार करून राज्यसेवा जागा वाढीमध्ये अडचण असलेला GR तातडीने रद्द करून कृषी सेवा संवर्ग तसेच इतर संवर्गांचा जाहिरातीत समावेश करण्यात यावा, ही विनंती!
#राज्यसेवा_2024_जागावाढ
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
राज्यसेवा परीक्षा २०२४
वर्ग अ १६ कॅडरपैकी ५ कॅडरच्या ७९ जागा
वर्ग ब १९ कॅडरपैकी ७ कॅडरच्या १२६ जागा
अजूनही २२ कॅडर बाकी
त्यातही ज्या जागा दिल्यात त्यातीलही खूप साऱ्या अजूनही रिक्त
महसूल, गृह, नगरविकास यांच्या जागांचा आकडा ५००+ होईल
#राज्यसेवा_2024_जागावाढ@AjitPawarSpeaks
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500
♦️राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ शासनाने करावी ही विनंती.🙏
👉 राज्यसेवा परीक्षा 2024 ही वस्तुनिष्ठ प्रकारची शेवटची परीक्षा आहे त्यामुळे ही जाहिरात जास्तीत जास्त जागांची करुन खुप दिवसापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा ही विनंती.. आलेल्या राज्यसेवा पुर्व परीक्षा जाहिरात 2024 मध्ये रिक्त संवर्ग व जागा लवकरात लवकर शासनाने #MPSC कडे पाठवून आम्हाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती..🙏🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule
♦️स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष - राहुल कवठेकर यांच्यावर गुन्हा दाखल.
तलाठी भरती रद्द करण्यासाठी, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने रीतसर पोलीस परवानगी काढून मोर्चा आयोजित केला होता. पण रोड ब्लॉक केल्याचे कारण देत पोलिसानी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष- राहुल कवठेकर यांच्यावर पोलीस ठाण्यात नेऊन, गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शेवटी विखे पाटलांचा शब्द खरा ठरला, गुन्हे दाखल झालेच.
कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडणार नाही, आम्ही सत्य बाहेर काढूच. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती दाखल करण्यात येणाऱ्या गुन्हाचा तीव्र निषेध करते. याच्या निषेधार्थ आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन छेडू. तलाठी भरती रद्द साठी शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही भरती रेटून नेऊ देणार नाही. 👊✊✌️
@Dev_Fadnavis@RVikhePatil@maharevenue@RRPSpeaks@Awhadspeaks @Dhananjay_AAP @VijayWadettiwar@KunalNitinRaut@girishkuber@abpmajhatv@zee24taasnews@TV9Marathi@saamTVnews
मनापासून धन्यवाद @AbhiPawarBJP साहेब..
राजपत्रित तांत्रिक पूर्व परीक्षा 2024 मध्ये नवीन संवर्ग ऍड करण्यासाठी अडचण ठरणारा Gr रद्द करण्यासाठी पाठपुरावा करत आहात त्याबाबत मनापासून सर्व विध्यार्थी वतीने धन्यवाद.. तुमच्या पाठपुराव्याला नक्कीच यश मिळो हीच प्रार्थना..
👉 तुम्ही #Combined गट ब, गट क 2024 पूर्व जाहिरात मध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी मा. @mieknathshinde@Dev_Fadnavis साहेब यांच्याकडे पण पाठपुरावा करावा ही सर्व कम्बाईनच्या विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती.. 🙏🙏
राज्यसेवा परीक्षा २०२४ च्या पदसंख्येत वाढ करण्यासंदर्भात आज सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरावा केला. सा. प्र. विभागाने पत्राद्वारे सर्व विभागांकडे अतिरिक्त मागणीपत्रासाठी विचारणा केली असल्याचे सांगितले, यासंदर्भात आगामी काळात अधिक पाठपुरावा करीन.
राज्यसेवा जागावाढीसाठी अडसर ठरू शकणारा दि. २० ऑक्टोबर २०२२ चा शासन निर्णय रद्द करण्याची विनंती मी मा. उपमुख्यमंत्री यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती, सदरील विषयाचाही आज पाठपुरावा केला. याबाबत कार्यवाही सुरू असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभिप्राय मिळणेसाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती मला देण्यात आली आहे.
#MPSC #राज्यसेवा