महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अचानकपणे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहिर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झाला आहे. विद्यार्थ्यांची ही भावना लक्षात घेता आज MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन MPSC परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच घेणेबाबतची आग्रही मागणी केली. यावर मा. मुख्यमंत्री महोदय सकारात्मक असून त्यांनी आयोगाला याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय जाहिर करेल असा विश्वास आहे. यावेळी श्री. राजेश पांडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
#devendrafadnvis #abhimanyupawar #mpsc
@Dev_Fadnavis
महाराष्ट्र TET का पेपर लीक हुआ, परीक्षा रद्द हुई। 6 लाख अभ्यर्थी अधर में। दो हफ्ते हो गए, नई तारीख़ का कोई अता-पता नहीं।
लीक करने वाले आज़ाद, सिस्टम बेदाग़ और सज़ा भुगत रहा है वो जिसने ईमानदारी से मेहनत की।
ये देश के कार्यरत और होने वाले शिक्षक हैं जिनके हाथ में भारत का भविष्य है - ये वही लोग हैं जिन्होंने साल दर साल तैयारी की, फॉर्म भरे, फीस दी, दूर-दराज के सेंटर तक गए। और अब बस इंतज़ार कर रहे हैं, बिना तारीख़, बिना जवाब।
मुख्यमंत्री जी - तीन चीज़ें, आज ही:
1. समय-सीमा : TET की नई तारीख़ अभी घोषित कीजिए।
2. जवाबदेही : लीक के ज़िम्मेदारों पर कार्रवाई हो, अभ्यर्थी पर नहीं।
3. भविष्य की रक्षा : जिनका साल इस लीक के कारण बर्बाद हुआ, उन्हें उम्र सीमा में छूट दी जाए।
गलती संस्था की, सज़ा अभ्यर्थी को - यह इंसाफ़ नहीं है।
17 जुलाई को देहरादून में मैं पेपर लीक के बढ़ते संकट पर आपसे विस्तार से बात करूंगा। अब समय आ गया है शिक्षा क्रांति का - ऐसी व्यवस्था बनाने का, जहां युवाओं को सिस्टम की नाकामी नहीं, अपनी मेहनत का फल मिले।
#ChhatronKiGoonj
राज्यसेवा आयोगाने मनमानीपणे लादलेल्या ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करूनही पाठपुरावा करूनही आयोगाने विद्यार्थ्यांची दखल घेतलेली नाही.
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. एवढ्या ८-१० दिवसात सरकारने आणि आयोगाने निर्णय न घेतल्यास मी स्वतः विद्यार्थ्यांच्या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेन...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा यशस्वी झाला आता पुढचा लढा स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी...!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#लढणार_आणि_जिंकणार #OnlineExam
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न #लढा_विद्यार्थ्यांचा
सोनम वांगचुक, जिसने कभी अपने लिए नहीं माँगा, कुछ कि पद चाहिए, सत्ता चाहिए।
अपनी ज़िंदगी देश, समाज और आने वाली पीढ़ियों के भविष्य के लिए लड़ते रहे है और 15-16 दिनों से अनशन पर बैठे हैं!
अपने लिए नहीं, देश के लिए। देश के बच्चों के भविष्य के लिए! उसके बाद भी देश के नेताओं की सोई हुई संवेदनाएँ नहीं जाग पा रही।
सत्ता की ख़ामोशी बरकरार है।
भूख हड़ताल और अनशन भी अगर व्यवस्था को सुनाई नहीं दे रहा, तो एक आम नागरिक की आवाज़ की कीमत क्या ही होगी?
अब दर्द सिर्फ़ यह नहीं कि एक व्यक्ति अनशन पर है, बड़ा दर्द यह है कि देश धीरे-धीरे उस मुकाम पर पहुँच रहा है जहाँ जनता की पीड़ा का महत्व खत्म है और उस पर सत्ता हावी है।
सोचिए, आज अगर एक ऐसे व्यक्ति की आवाज़ अनसुनी की जा सकती है, जिसने अपना जीवन देश के लिए लगा दिया, तो कल बेरोज़गार युवा, न्याय की गुहार लगाता परिवार, किसान, छात्र या कोई भी आम नागरिक किस उम्मीद से अपनी तकलीफ़ के लिए लड़ पाएगा और कौन उसकी सुनेगा?
लोकतंत्र का मतलब सिर्फ़ चुनाव है क्या? अगर सत्ता अपने शांत नागरिक की आवाज़ नहीं सुन रही, तो ये लोकतंत्र पर सवाल नहीं है?
और अगर वह आवाज़ भी अनसुनी होने लगे! तो यह चिंता सिर्फ़ पूरे देश को होनी चाहिए।
Be stand with Sonam Wangchuk
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित CBT परीक्षा पद्धती तात्काळ रद्द करून ऑफलाईन परीक्षा पद्धती लागू करावी, हीच महाराष्ट्र काँग्रेसची ठाम मागणी आहे.
#MPSC
मा.@mpsc_office@bhimanwar आपल्याला विनंती आहे कि, ऑनलाईन परीक्षा, normlization यामुळे आमचे 2 ते 3 वर्षे वाया गेले. आपल्या मार्फत होणाऱ्या ऑफलाईन परीक्षेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. सरकारच्या दबावाखाली आपण काम करत आहात का?
लवकरात लवकर निर्णय माघे घेण्यात यावा.
#MpscOfflineExam
MPSC परीक्षांच्या स्वरूपात अचानक करण्यात आलेल्या बदलांमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.
एकीकडे युवकांना रोजगाराच्या संधी मर्यादित होत असताना, दुसरीकडे MPSC सारख्या स्वायत्त संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित निर्णय पुरेशा संवादाशिवाय घेतले जात असतील, तर ही चिंतेची बाब आहे.
TCS/IBPS यांच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकतेबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अशा सर्व परीक्षा थेट MPSC मार्फत पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने घेतल्या जाव्यात, अशी विद्यार्थ्यांची सातत्याची मागणी होती. मात्र, आता MPSC देखील या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेणार असल्याचे जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. या प्रक्रियेचा वापर झाल्यास परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असे महत्त्वाचे निर्णय घेताना विद्यार्थी प्रतिनिधी, तज्ज्ञ आणि संबंधित घटकांशी व्यापक चर्चा होणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राहील, पारदर्शकता सुनिश्चित होईल आणि गुणवत्तेला न्याय मिळेल, अशा पद्धतीने निर्णय घेतले जावेत, हीच अपेक्षा.
@Dev_Fadnavis@mpsc_office
पुण्यात #MPSC च्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर अधिवेशनासाठी मुंबईला जाण्याचं नियोजित होतं, परंतु काही व्यक्तीगत अडचणीमुळं जाता आलं नाही. परंतु मंत्री गिरीश महाजन साहेब यांचा नुकताच फोन आला आणि मुख्यमंत्री महोदयांनी उद्या (बुधवार दि. १ जुलै) दुपारची वेळ दिल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार श्री क्षेत्र देहू इथं सकाळी ८.३० वा. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचं दर्शन घेऊन मुंबईला जाणार आहे. शेतकरी आणि विद्यार्थी या दोघांच्याही प्रश्नावर यावेळी सकारात्मक चर्चा होईल, ही अपेक्षा!
असावा छंद तरुणांशी पंगा घेण्याचा ! असं काही सरकारला म्हणावं लागेल कारण येणाऱ्या प्रत्येक दिवशी सरकार तरुणांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे.
मागील महिन्यात नीटचा पेपर फुटला आणि आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो तरुणांचे स्वप्नांचा चुराडा झाला. मागील आठवड्यात आपल्या राज्यात टीईटीचे पेपर फुटले आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांच्या मेहनतीवर पाणी टाकले गेले. आता सरकारने नवी गोष्ट काढली आहे. २०२७ पासून गट अ, ब आणि क संवर्गाच्या पूर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय एमपीएससीने जाहीर केला आहे.
या निर्णयाला लाखो परीक्षार्थींचा विरोध आहे. ग्रामीण भागातील परीक्षार्थींवर तर हा मोठा अन्याय आहे. अनेक विद्यार्थ्यांना संगणकावर परीक्षा देण्याचा पुरेसा सराव नाही. सर्व तालुका किंवा जिल्ह्यांत दर्जेदार CBT परीक्षा केंद्रे उपलब्ध नाहीत. अनेकांना परीक्षा देण्यासाठी दूरवर प्रवास करावा लागू शकतो. वीज, इंटरनेट, संगणक बिघाड किंवा सर्व्हर डाऊन झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. खासगी परीक्षा केंद्रांच्या विश्वासार्हतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
इतक्या अडचणी असताना एमपीएससीने कशाच्या आधारावर हा निर्णय घेतला आहे. काही कंपन्यांच्या भल्यासाठी तर हा खटाटोप नाही ना ? तसं नसेल तर सरकारने विद्यार्थ्यांशी तातडीने संवाद साधावा, त्यांचे म्हणणे ऐकावे आणि सर्वसमावेशक निर्णय घ्यावा. नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, महिला विभाग हा विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेल
@mpsc_office@CMOMaharashtra #MPSC #MaharashtraCM #StudentSuccess #YoungIndia #Genz #cjp_पार्टी
सेवाभरतीसाठी एक पूर्वपरीक्षा व तीत प्राप्त गुणांवर मुख्यपरीक्षेसाठी पात्रता हीच पद्धत #MPSC ने तूर्तास अवलंबणे बरे.'भिन्न सत्रांत ऑनलाईन पूर्वपरीक्षा व गुुणांंचे समानीकरण'या निर्णयाने आधीच असमाधानी असणारे उमेदवार आयोगाच्या दोन/तीन ऑनलाईन पूर्वपरीक्षांच्या सुुतोवाचाने अजूून विचलीत
#MPSC गट क संयुक्त सेवा परीक्षेसह यापुढच्या सर्व परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन करण्याच्या #MPSC च्या निर्णयाला राज्यातील विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध असून पुण्यात या विद्यार्थ्यांना भेटून याबाबत त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. ऑनलाईन परिक्षेमुळं होणारी पेपरफुटी, भ्रष्टाचार तसंच नॉर्मलायझेशनमुळं होणारा विद्यार्थ्यांवर अन्याय असे अनेक मुद्दे यावेळी विद्यार्थ्यांनी सविस्तर मांडले.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि #MPSC च्या अध्यक्षांची भेटून त्यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय मागे घेण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं. तसंच जर याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर १२ जुलैनंतर विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावरचा लढा लढण्याची तयारी असल्याचं आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांना दिलं.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षा पद्धतीला विरोध असून ऑफलाईन परीक्षा घेण्याची त्यांची मागणी आहे. यासंदर्भात आमदार रोहितदादा पवार हे उद्या (मंगळवार दि. ३० जून) पुण्यात पत्रकार संघात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
@RRPSpeaks
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC
आयोग ज्याप्रकारे स्वतःच्या ऑनलाइन CBT च्या बातम्या पोस्ट करतोय त्यावरून हे दिसतंय की स्वतः आयोग पण चाचपणी करतोय,पटवून देतोय की आम्ही करतोय ते योग्य. पण आयोगातील अधिकाऱ्यांना आम्ही निक्षून सांगतोय,ऑनलाइन पेपरफोडीचे अनेक प्रकार आम्ही उघडकीस आणले आहेत,ती वेळ पुन्हा आमच्यावर येऊ नये