एमपीएससी मधील लिपिक टंकलेखक आणि इतर नवीन सरळसेवेच्या पदांची भरती करताना TCS/IPBS/ जिल्हा निवड समितीप्रमाणे एकच पेपर घेऊन परीक्षेसाठी लागणारा कालावधी कमी करून
एका वर्ष भरात परीक्षेची प्रकिया पूर्ण व्हावी. उगाच पूर्व, मुख्य मध्ये विद्यार्थ्यांना खेळत ठेवू नये.
@mpsc_office
आदरणीय अभिमन्यू जी,आपण जसे जागा वाढ बद्दल काम करत आहात तसे PSI वयोमर्यादा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.या बाबतीत जर असंवेदनशीलता दाखवली गेली, तर अनेक पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, आपण नेहमी सकारात्मक निर्णय घेत आला आहात.हा पण मुद्दा आपण मार्गी लावावा व मुलांना न्याय द्या.
माननीय @mpsc_office आयोग
प्रामाणिकपणे मेहनत करणार्या मुलांचा संयम तोडू नका
4 जानेवारी रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्र लवकरात लवकर उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून द्या.❤️
Excise च्या 203 जागा रिक्त !
तसेच 31 जुलै 2025 च्या शासन निर्णयानुसार जागांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आलेला आहे.
@AjitPawarSpeaks
आपणांस नम्र विनंती आहे की आपल्या विभागातील दुय्यम निरिक्षक (Excise Sub Inspector) या पदाचे मागणीपत्र सन 2025 साठी MPSC कडे पाठवावे @Dev_Fadnavis
मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ,
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त परीक्षा 2025 तसेच गट क परीक्षा या जाहिरातीमध्ये SR, ASO, STI, EXCISE SI व AMVI पदांचे अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करण्यात यावी.
धन्यवाद.🙏
@CMOMaharashtra#MPSC#Combine_जागा_वाढ_2025
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री
खालील मागण्यांकडे विशेष लक्ष घालावे
1) दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक (SR/SI) आणि सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) रिक्त जागांचे मागणीपत्र संयुक्त गट ब 2025 साठी तात्काळ आयोगाकडे पाठवावे
2) राज्य कर निरीक्षक (STI) आणि कर सहाय्यक या पदांचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा आल्या आहेत त्यात वाढ करावी.
3) Excise Sub Inspector ची 200+ रिक्त पदे आहेत. ते संयुक्त गट क 2025 साठी पाठवावे.
4) Assistant Motor Vehicle Inspector (AMVI ) ची 300+ पदे रिक्त आहेत ते पण संयुक्त गट क 2025 मध्ये समाविष्ट करावीत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Maha_GoodGovern@maharevenue
मा.@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 फायनल यादी जून च्या पहिल्या आठवड्यात लागेल असे आपण जाहीर केलेलं आहे.
उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. कृपया आज निकाल जाहीर करावा..
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
. @mpsc_office च्या कारभाराचे वाभाडे काढणारी & स्पर्धा परीक्षार्थींच्या मनातील भावना व्यक्त करणारी कविता व्हायरल झाली आहे.
आयोगानं फक्तं UPSC चा अभ्यासक्रम कॉपी करून भागणार नाही, तर UPSC प्रमाणे कारभार पण गतिमान करायला हवा.🙏
#Combine गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ चा निकाल अजूनही जाहीर झाला नाही.परीक्षा होऊन 101 दिवस झाले.
विद्यार्थ्यांना भविष्याचे नियोजन करणे शक्य होत नाही. @mpsc_office यावर काहीच बोलत नाही. सरकार काही बोलत नाही.
विरोधक काही बोलत नाहीत.
@RRPSpeaks@LoksattaLive@NANA_PATOLE
Akash sewakram Patle यांना 200 मार्क पडल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐
कारण त्यांनी खूप कमी वेळात खूप चांगला अभ्यास केला आहे. त्यांना या आधीच्या अकाऊंट या पदासाठी फक्त 12 मार्क पडले होते. खूप कमी वेळात खूप चांगला अभ्यास केला आहे आणि आम्हाला TCS/ IBPS वरचा विश्वास अजून दृढ झाला आहे. खरंच खूप पारदर्शक परीक्षा होत आहेत. आम्ही असाच अभ्यास करत राहू आणि आकाश सारखे मुले जिद्द चिकाटी आणि एका महिन्यात झीरो चे हिरो होऊन जातात कमाल आहे.
माय बाप सरकार बघा किती पारदर्शक परीक्षा होत आहेत. सामान्य विद्यार्थ्यांनी जीव द्यावा का? हे फक्त एक उदाहरण आहे.
आम्ही कितीही पुरावे दिले कितीही गुन्हे नोंद केले तरी आपली पोलीस यंत्रणा मॅनेज होतेच कारण धाराशिव मध्ये तलाठी पेपर फुटीच्या केस मध्ये आम्ही अनुभवला आहेच. पोलीस कसे मॅनेज होतात ते एक उत्तम उदाहरण आहे. कारण तिथे जवळपास 200 बोगस विद्यार्थी सापडले असते तिथे यांनी तपासच केला नाहीये.
राज्याचे ग्रहमंत्रीच @Dev_Fadnavis असे आहेत तर पोलीस तरी काय करणार ना. अजून वेळ गेली नाहीये बघा यावर काय करता येते का?
@DGPMaharashtra @OsmanabadPolice
@OmRajenimbalkr@PatilKailasB
विषय: भरती परीक्षांतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह – विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचा ठाम पाठींबा !
आकाश सेवाकराम पाटले यांना २०० गुण मिळाल्याबद्दल अभिनंदन. मात्र, याआधी फक्त १२ गुण मिळवलेला उमेदवार इतक्या कमी वेळेत थेट २०० गुणांपर्यंत पोहोचतो, हे सामान्य विद्यार्थ्यांना आणि समाजालाही धक्का देणारे आहे. कुठलाही अभ्यास, चिकाटी, किंवा मेहनत इतकी झपाट्याने एवढं यश देऊ शकते का, यावर गंभीर प्रश्न उपस्थित होतो.
TCS/IBPS सारख्या संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांवर विद्यार्थ्यांचा विश्वास उडण्यास अशा घटनांनी हातभार लावला आहे.
या व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आहे का? की काहीजणांसाठी स्पर्धा परीक्षांची व्यवस्था ‘मॅनेज’ होते?
धाराशिव येथील तलाठी भरती घोटाळ्यात जवळपास २०० बनावट उमेदवारांबाबत सरकारकडे सर्व पुरावे आहेत तरीही पोलीस तपासात कोणतीही कारवाई का झाली नाही? कारण पोलीस यंत्रणा देखील मॅनेज झाली.
राज्याचे गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळात जर पोलीस यंत्रणा अशी निष्क्रिय असेल, तर राज्यातील सामान्य विद्यार्थ्यांनी न्यायासाठी कुणाकडे पाहावे?
काँग्रेस पक्षाकडून संधीसाधू “महायुती” सरकारकडून चाललेला विद्यार्थ्यांच्या भावनांचा, मेहनतीचा आणि भविष्यातील संधींचा खेळ मुळीच सहन केला जाणार नाही. आम्ही या संपूर्ण प्रक्रियेची उच्चस्तरीय, न्यायालयीन किंवा न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र चौकशी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. गरज पडल्यास रस्त्यावर उतरूनही विद्यार्थी आणि बेरोजगार युवकांचा आवाज बुलंद करू.
विद्यार्थ्यांनो, काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे. हा लढा फक्त नोकरीसाठी नाही, तर तुमच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि भविष्यासाठी आहे.
लाखो प्रामाणिक परीक्षार्थींना “न्याय” मिळावा यासाठी आम्ही संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरून लढू !
@INCHarshsapkal@INCMaharashtra
सन्माननीय आयोग,
लिपिकच्या ३९३ जागा Add करून एकूण 7006 जागांची Final List लवकर जाहीर करा🙏
Skill Test होऊन ९ महिने उलटून गेले... अजून अंतिम निकाल नाही..🙏
उमेदवारांचा होणारा मानसिक त्रास समजून घ्या साहेब🙏
@mpsc_office@Suvarnakharat4 🙏🏻