@Central_Railway@drmbct@drmmumbaicr@PMOIndia Dr. saurabh, ortho opd 2 @ Dr.babasaheb Amdekar railway hospital, is very rude and arrogant while talking to retired employee who comes for checkup. also some ward boys chew sambhaji in the front of doctors and patients.
kindly chck
@Central_Railway@RailMinIndia@Rail_Minister सेवानिवृत्त रेल्वे सेवकांना भायखळा स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात योग्य वागणुक मिळायला हवी, स्वच्छतेच्या नावाखाली गलिच्छपणा. वृद्ध /अपंग कर्मचाऱ्यांना स्वच्छता गृहापर्यंत जाण्यासाठी अथक परिश्रम करावे लागत आहेत. कृपया लक्ष द्य
@Central_Railway@drmmumbaicr@drmbct@Rail_Minister महोदय, २ माझ्या वडिलांना भायखळा स्थित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, सेवानिवृत्तीनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांचा इलाज करते ..छान, पण येथील स्वच्छतागृहांची अस्वच्छता पाहुन माणूस मरण यातना सोसतोय
@MumbaiUni what happened your site is not working, today is the last date of students registration. please extend the timing
some time it's shows "504 gateway error"
विद्यार्थी गोंधळात आहेत, एक दिवस वाढवा.
@CMOMaharashtra@ShelarAshish
@MumbaiUni today is the last day of registration and since morning the site is not working. kindly extend the timing to registration. it's not a student falt. @CMOMaharashtra@DivaCity612
@abpmajhatv हा सरकारी यंत्रणेचा बळी ठरला. बड्या नेत्यांचे सगळे छुपे धंदे बाहेर पडु नये म्हणून एका सामान्य नागरिकाला अतिरेकी असल्याप्रमाणे मारले गेले असावे का ? त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे संबंधित नेत्यांना विचारून घेता आले नसते का ? त्याला समजावण्याचा प्रयत्न कोण्या नेत्याने केला का ?
@TMCaTweetAway सामान्य दिवेकारांना खड्डेमय रस्त्यावर चालतांना प्रवास करतांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय, उद्यावर आलेल्या गणरायाचे स्वागत अशा खड्डेमय रस्त्यावरून करावी लागणार आहे. माणसं तर जनावरं आहेत तुमच्यासाठी निदान देवासाठी तरी खड्डे बुजवा. #दिवाशीळरोड@DivaCity612
@mieknathshinde@AjitPawarSpeaks साहेब, आमदार निवास खेड्यापाड्यातील लोकांना काही काळ निवासासाठी देतात हे माहीत होतं पण काही मंत्रालयातील कंत्राटी कामगार कुवत असूनही बाहेर वास्तव्य न करता वर्षानुवर्ष येथेच वास्तव्यास आहेत. ते केवळ सत्तेत असलेल्या कोणाचा परिचयाचा असेल म्हणून सूट?
@RajThackeray@RajThackeray@U_Thackeray साहेब, ओळखा आपल्या मराठी माणसाची ताकद, दोन भाऊ एकत्र आले तर काय होऊ शकते याची प्रचीती आपण पहिलीत तेव्हा एकत्र येऊन महाराष्ट्राच्या वैरींना ठेचु शकतो. मोठ्या साहेबांची इच्छा तसेच मराठी जनांची मर्जी लक्षात घ्या. मग महाराष्ट्र आपलाच. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.
पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.
अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी ! ! !
हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.
आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये... त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे.
असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा.
मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन.
राज ठाकरे ।
सस्नेह जय महाराष्ट्र,
आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी.
आपला नम्र,
राज ठाकरे ।