@Dev_Fadnavis साहेब गोर- गरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांची हजारो मुलं /मुली बृहन्मुंबई महानगरपालिकेने गतवर्षी घेतलेल्या सदर कनिष्ठ अभियंता 400 पदाच्या परीक्षेचा निकाल गेली दोन वर्षे न्यायालयीन कोणतीही आडकाठी नसताना रखडवल्याचं समजते. बेरोजगार पदविकाधारक अभियंता पोरं चातका सारखी सदर परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत तरी आपण शासकीय दुखावटा संपल्यावर @mybmc ला याबाबत आदेश देण्यात यावे ही नम्र विनंती 🙏
MIDC सरळसेवा भरती 2023 चा निकाल 08 ऑक्टोबर 2025 रोजी लागला… पण अंतिम निवड यादी नाही, प्रतीक्षा यादी नाही, कागदपत्र पडताळणी नाही.
उमेदवारांची महिनोंमहिने दिशाभूल करून “आचारसंहिता”चं खोटं कारण पुढे केलं जात आहे.
मात्र इतर विभागांनी त्याच काळात भरती प्रक्रिया पूर्ण केली!
मग MIDC का थांबली? कोण जबाबदार?
@samant_uday जी,
हजारो उमेदवारांचा संयम आता संपत आहे. कृपया तातडीने पुढील निर्देश द्यावेत:
✔️ अंतिम निवड यादी
✔️ प्रतीक्षा यादी
✔️ कागदपत्र पडताळणी वेळापत्रक
तत्काळ जाहीर करणे बंधनकारक आहे.
ही केवळ मागणी नाही,
हा न्यायाचा लढा आहे.
#MIDC #MIDCRecruitment2023 #JusticeForAspirants
@Dev_Fadnavis साहेब सदर प्रकरणात मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयास मा. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देऊन आज 14दिवस उलटून गेलें तरी @mybmc ला निकालाचा बोध होतं नाहीं??? समोरच्या पक्षकाराला या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून पालिकेचं विधी खातं चालढाकल करीत आहे? अशी सर्वच परीक्षाथर्थी ची ओरड आहे. बरीच गरीब शेतकरी कष्टकऱ्यांची मुलं 1 वर्षांपासून नैराश्य ग्रस्त झाली आहेत यात काही बरं वाईट झाल्यास त्याची सर्वं जबाबदारी @mybmc ची राहील याची कृपया नोंद घ्यावी. @mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@narendramodi@maha_governor
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे, प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देणारे आणि सर्वांना आपले वाटणारे हवे आहेत, या क्षेत्रात एका "सकारात्मक विचार करणाऱ्या" व्यक्तिमत्वाची गरज आहे.
@Dev_Fadnavis वैयक्तीक तुम्हाला विनंती आहे🙏
@samant_uday साहेब, लवकरात लवकर MIDC चा निकाल जाहीर करा!
परीक्षेला दोन महिने उलटून गेले तरी अजून निकाल लागलेला नाही.
हजारो विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि भविष्य याच निकालावर अवलंबून आहे.
कृपया विलंब न करता तातडीने निकाल जाहीर करण्यात यावा ! @samant_uday@CMOMaharashtra@midc_india
मा. @Dev_Fadnavis साहेब
खालील 3 मुद्दे आपण गंभीरतेने घ्यावे व तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत ही
बेरोजगारांकडून माझी नम्र विनंती
अन्यथा विद्यार्थ्यांना आक्रमक पवित्रा घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही
प्रत्येक गोष्टीसाठी रस्त्यावरची लढाई योग्य नाही.
यात सरकारचीच
प्रतिमा मलिन होते.
🔶 #WRD
@RVikhePatil@girishdmahajan
जलसंपदा कनिष्ठ अभियंता चे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्याची कार्यवाही अजून किती महिने सुरु राहणार आहे ? #RR नाहीत म्हणून भरती नाही व भरती लवकर काढायची नाही म्हणून #RR प्रसिद्ध करायचे नाहीत असे ठरवलं आहे काय ???
मा. @maha_governor आपण यावर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देणे आता क्रमप्राप्त झाले आहे.
काही त्रुटी होत्या,त्या दूर झालेल्या
असताना इतका प्रदीर्घ कालावधी यासाठी लागणे हे सरकार व प्रशासनाच्या अधोगतीचेच प्रतीकआहे.
महामहीम @maha_governor
महोदय कृपया हा मुद्दा आपण गभीरतेने घ्यावा ही नम्र विनंती.
🙏🙏🙏
🔶 @SanjayDRathods आपण विसरला असाल तर स्मरण करून देऊ इच्छितो
आपण #WCD मृद जलसंधारण मंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून
तब्बल 8 वेळा पदभरतीची घोषणा केली आहे.
गोरगरीब बेरोजगारांच्या भावनांशी हा खेळ व त्यांची क्रूर चेष्टा आहे.
👉 अडीच महिन्यापूर्वी आपण
संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आकृतीबंधाचा शासन निर्णय काढण्याचे निर्देश दिले होते ना.
कुठे आहे आकृतीबंध???
तो मंजुरीसाठी पण गेला नाही अजून???
अधिकारी वर्ग आपल्या निर्देशानुसार कार्यवाही करत नाही काय ??
कोण आहेत झारीतले शुक्राचार्य ???
निदान आतातरी आपण हा मुद्दा गंभीरतेने घ्याल ही अपेक्षा.
🔶 @MeghnaBordikar@GulabraojiPatil
आपण दोघांनी यात तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 100%
पदभरतीच्या आश्वासनाचे काय झाले ??
तमाम बेरोजगार कित्येक महिन्यापासून
पदभरतीची वाट पाहत आहेत.
🔶 #WCD_recruitment
#MJP_Recruitment
#WRD_Recruitment
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE@MahaDGIPR@INCHarshsapkal
@SanjayDRathods साहेबांनी २९ जुलै रोजी आकृतीबंध तत्काळ काढण्याचे निर्देश ( आदेश) देऊन देखील अद्याप आकृतीबंध प्रसिद्ध झालेला नाही, मंत्री महिदयांचे निर्देश पाळले जात नसतील तर सामान्य जनतेने " जलसंधारण" विभागाकडून अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे.
@naikindranil#WCD_Recruitment
@midc_india ने परीक्षा घ्यायला दोन वर्ष लावली आता कमीत कमी निकाल तरी वेळेवर लाऊन विद्यार्थ्यांचा रोष कमी करावा, प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी #Mail, कॉल, निवेदन हेच काम करत बसायचं का....?
#MIDC_Result@samant_uday
@degree_holders@midc_india@samant_uday आम्ही सर्व उमेदवार आपणास विनंती करतो की, परीक्षा होऊन 70 दिवसान पेक्षा जास्त कालावधी झाला असून सुद्धा MIDC नी अजून निकाल लावला नाही आहे तरी आपण लवकरात लवकर निकाल लावावा तो पण फक्त IBPS Format मध्ये
@degree_holders@naikindranil@SanjayDRathods माननीय जलसंधारण राज्यमंत्री @naikindranil साहेब यांना जलसंधारण विभाग पदभरती बाबत विद्यार्थ्यांनी निवेदन दिले आणि पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती करण्यात आली.
📍 पुसद
माननीय जलसंधारण राज्यमंत्री @naikindranil साहेब यांना जलसंधारण विभाग पदभरती बाबत विद्यार्थ्यांनी निवेदन दिले आणि पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती देखील करण्यात आली.
@SanjayDRathods
MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या विविध पदांसाठी घेतलेल्या भरती परीक्षेला सध्या दीड ते दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र, अजूनपर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही.
ही परीक्षा देणाऱ्या हजारो उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि अनिश्चिततेचं वातावरण आहे. उमेदवारांनी मेहनत घेऊन अभ्यास करून परीक्षा दिली आहे, त्यांचे भविष्य या निकालावर अवलंबून आहे. परंतु निकालाच्या विलंबामुळे उमेदवारांना मानसिक त्रास होत आहे तसेच त्यांच्या शैक्षणिक आणि करिअर नियोजनावरही परिणाम होत आहे.
सरकारने पारदर्शकता आणि जबाबदारीचे भान ठेवून त्वरित निकाल जाहीर करावा, हीच उमेदवारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची एकमुखी मागणी आहे.
@midc_india आणि विभागाचे मंत्री मा. उदय सामंत @samant_uday यांच्याकडे आमची नम्र विनंती आहे की –
उमेदवारांच्या भविष्याचा विचार करून निकाल जाहीर करण्यात विलंब होऊ नये.
निकाल जाहीर करण्यासाठी ठोस दिनांक देण्यात यावा.
संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून उमेदवारांचा विश्वास जपावा.
उमेदवारांचा संयम संपत चालला आहे. तातडीने निकाल जाहीर करावा हीच अपेक्षा.
"मिनी मंत्रालय" मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदांची संख्या जवळपास पन्नास हजारांच्या आसपास आहे परंतु रिक्त पदे भरण्याच्या बाबत ग्रामविकास विभाग गंभीर नाही असे दिसते.
@Jaykumar_Gore@CMOMaharashtra
#MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध पदांच्या भरती परीक्षेला दीड-दोन महिने झाले आहेत परंतु अजून निकाल लागलेला नाही. @midc_india आणि विभागाचे मंत्री महोदय मा. उदय सामंत @samant_uday आपल्याला नम्र विनंती आहे, MIDC भरतीचा निकाल लवकर जाहीर करावा.@samant_uday