मा. दिपक कपूर जी,
अतिरिक्त मुख्य सचिव,
जलसंपदा विभाग
महाराष्ट्र राज्य,
महोदय,
सदरील विभागाची सरळसेवा भरती २०२३ परीक्षा होऊन अंतिम उत्तरतालिका (१४ फेब्रुवारी ) यामध्ये दुरुस्ती करून ती दिनांक २४ फेब्रुवारी, २०२४ रोजी पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर, काही उमेदवारांनी आपणास संपर्क साधला असता तांत्रिक अडचणीमुळे चालू आठवड्यात निकाल लावला जाईल असे सांगण्यात आले होते. परंतु, अद्याप आपल्या विभागाने निकाल जाहीर केलेला नाही. सबब आपणास विनंती करण्यात येत आहे की आपण निकाल तत्काळ जाहीर करून आचार संहितेआधी नियुक्त्या द्याव्यात. अन्यथा भरती प्रक्रिया विनाकारण लांबली जाईल.
@Deepakk75058621@AAPMaharashtra@Mpsc_Andolan @degree_holders @AsimSarode
मा. एकनाथ शिंदे,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
महोदय,
जलसंपदा विभागाची सरळसेवा भरती परीक्षा २०२३ या जानेवारी महिन्यात पार पडली आहे. या काळात आणि त्या आधी इतर अनेक विभागातील भरती प्रक्रिया पार पडून निकाल लागत आहेत. यात अनेक उमेदवारांची एका पेक्षा जास्त ठिकाणी निवड होऊ शकते. जलसंपदा विभागाने इतर सर्व विभागांनी उमेदवारांना उपलब्ध करून दिलेला opting out चा पर्याय उपलब्ध करून द्यावा तसेच सर्वसाधारण गुणवत्ता यादी, निवड यादी, कागदपत्र तपासणी, या सर्व प्रक्रिया जलद गतीने पार पडून आचार संहिता लागण्यापूर्वी नियुक्त्या देऊन सर्व उमेदवारांना दिलासा द्यावा हि नम्र विनंती.
@mieknathshinde@CMOMaharashtra@Mpsc_Andolan @degree_holders @AjitPawarSpeaks@rautsanjay61@NANA_PATOLE@Dev_Fadanvis@PatilKailasB@AUThackeray@AsimSarode@Deepakk75058621
#OptingOutForWRD #Opting_Out #MeritList
जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टी द्वारे उत्तरे पुरवत होता. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. या सरकार ला अजून काय पुरावे पाहिजेत की हे झोपेचे सोंग करत आहेत.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@SanjayDRathods
@iAditiTatkare जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हा TCS आयओएन centre वर परीक्षेचे आयोजन करावे ही मागणी आहे. मदतीची अपेक्षा 🙏
मृद व जलसंधारण तसेच अभियांत्रीकी सेवेच्या मुलाखती व एसएससी जीडी परीक्षा पुढे ढकलावी..!
राज्यात शासनाच्या मृद व जलसंधारण तसेच महाराष्ट्र अभियांत्रीकी सेवेची मुलाखत व एसएससी जीडी परीक्षा या 20 व 21 फेब्रुवारी रोजी शासनाने घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र राज्यात सध्या मराठा आरक्षणामुळे विविध जिल्हयात वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे त्यामुळे या उमेदवारांना प्रवासात आडथळा निर्माण होवून परीक्षेच्या ठिकाणी वेळेवर पोहचता येणार नाही त्यामुळे या उमेदवारांना परीक्षा व मुलाखती पासून वंचीत राहण्याच्या भितीने हजारो उमेदवार या परीक्षा व मुलाखती पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत.
तसेच दिवसेंदिवस खाजगी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार वाढत असून सध्या नियोजीत केलेल्या परीक्षा या खाजगी परीक्षा केंद्रावर घेण्याचे शासनाने निश्चीत केले आहे तरी या परीक्षा टीसीएसच्या अधिकृत परीक्षा केंद्रावर घ्याव्यात अशी देखील तशी देखील उमेदवारांकडून मागणी होत आहे त्यामुळे शासनाने या दोन्ही मागण्याचा सहानुभुतीपुर्वक विचार करावा या उमेदवारांवर होणारा अन्याय दुर करणे बाबत आपण शासन स्तरावर योग्य ते निर्णय घ्यावेत, ही विनंती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांचे कडे केली आज आहे.
#भरती #अभियांत्रिकी #एसएससीजीडी
@mieknathshinde
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात परीक्षा पारदर्शक घ्या म्हणून विद्यार्थ्यांना वारंवार विनंती करावी लागते हे खर तर दुर्देवी आहे.मायबाप सरकार ला कळकळीची विनंती आहे कृपया आपण TCS ion digital सारखेच सेंटर द्यावे.
#WCD_670@SanjayDRathods@CMOMaharashtra @BaliramDoley @Dhananjay_AAP
मा. एकनाथ शिंदे जी,
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सदोष सरकारी नोकर भरती प्रक्रियेबद्दल, संविधनिक मार्गाने सरकारला विनवण्या करून सांगत आहोत. याबाबत पुरावे देखील दिले आहेत. सदोष प्रक्रियेमुळे अनेक "समाजद्रोही" आणि "चोरांनी" परीक्षांमध्ये "चोरीचे" यश मिळवून, ते सरकार मध्ये रुजू आले आहेत.
ही सदोष प्रक्रिया बदलली नाही तर अनेक "चोर" आगामी काळातील परीक्षांमध्ये गैर मार्गाने पास होऊन, विविध पदांवर जाऊन रुजू होतील.
आपण या चोरांचे नक्कीच समर्थन करणार नाही याची आम्हाला खात्री आहे. राज्यातील ४० ते ५० लक्ष विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची गेले अनेक वर्ष तयारी करत आहेत. सरकारच्या नाकर्तेपणा त्यांची स्वप्ने उध्वस्त होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
सरकारने पुढील गोष्टी केल्यास लाखो प्रामाणिक तरुण तरुणींना न्याय मिळेल.
१. पेपरफुटी ची चौकशी करण्यासाठी "विशेष चौकशी समिती" (SIT) नेमून ३० ते ४५ दिवसांत समितीचा अहवाल घ्यावा
२. अहवालानुसार १ आठवड्यात राज्य सरकारने निर्णय घ्यावा.
३. पेपरफुटी वर केंद्र सरकार प्रमाणे कठोर कायदे बनवावेत, ज्यात गुन्हेगाराला रू. १ कोटी दंड व १० वर्षांचा तुरुंगवास इतकी सजा आहे.
४. सर्व परीक्षा "महाराष्ट्र लोकसेवा आयोग" (MPSC) मार्फत घ्याव्यात.
वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या राज्यातील लाखो तरुण तरुणींना निराशेने ग्रासले असून, येणाऱ्या काळात ते चुकीच्या मार्गाने जाऊ नये अशी आपली देखील इच्छा असावी. कृपया त्यांना न्याय द्यावा ही विनंती.
@mieknathshinde@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@VijayWadettiwar@iambadasdanve@Mpsc_Andolan@waglenikhil@AAPMaharashtra
हे सेंटर बीड येथील आहे. सर्वच खाजगी सेंटर असे आहेत. लगेच हे मॅनेज होतात. याबाबतीत लातूर येथे सेंटर मालक वर गुन्हा दाखल झाला आहे. खाजगी सेंटर देताना कोणतेही निकष दिले गेले नाहीये. त्यामुळे घोटाळा होण्याची शक्यता खूप जास्त आहे.
मा. संजय भाऊ,
खाजगी परीक्षा केंद्रे पेपरफुटी चा अड्डा झाल्याचे अनेक पुरावे या अगोदर झालेल्या सर्व परिक्षांमधील पेपरफुटी मुळे विद्यार्थ्यांसमोर आले आहेत.
लातूर आणि धाराशिव मधील
खाजगी परीक्षा केंद्रांमध्ये झालेल्या पेपर फुटिमुळे संबंधितांवर गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत.
गल्ली बोळात असलेले परीक्षा केंद्र निवडताना शासनाने कोणते निकष वापरले आहेत याची चौकशी करून आपण स्वतः जर या केंद्राला भेट दिली तर आपणांस धक्का बसेल.
कृपया आपण यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना "न्याय" द्यावा ही विनंती.
@SanjayDRathods@Mpsc_Andolan@MarathiBrain@MarathiRojgar@AAPMaharashtra
@iAditiTatkare जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हा TCS आयओएन centre वर परीक्षेचे आयोजन करावे ही मागणी आहे. मदतीची अपेक्षा 🙏
@mieknathshinde साहेब जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत.नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका. तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हा TCS आयओएन centre वर परीक्षेचे आयोजन करावे ही कळकळीची विनंती साहेब
@mieknathshinde 1000 रू फी आकारून जर असे परीक्षा केंद्र असतील परीक्षा घेण्याला काय अर्थ उरतो
निदान उमेदवाराला आपण आधिकारी पदाची परीक्षा देतोय असं तरी वाटू द्या
जेवढी फी आकारत आहेत तश्या सुविधा परीक्षा केंद्रावर मिळणे हा उमेदवारांचा हक्क आहे
सर्व परीक्षा #TCS च्या अधिकृत केंद्रावरच झाल्या पाहिजेत
@mieknathshinde साहेब,
जलसंधारण विभागाने गट ब पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत. नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका 🙏 तूर्तास परीक्षेला स्थगिती द्यावी
@mieknathshinde#WCD
जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत. नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका.
@CMOMaharashtra@SanjayDRathods