प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. उदय सामंत - मंत्री, उद्योग विभाग तथा अध्यक्ष, MIDC
मा. पी. वेलरासू, IAS - मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC
विषय : MIDC सरळसेवा पदभरती 2023 – सहाय्यक आरेखक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती आदेश देण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत सन 2023 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या सरळसेवा पदभरतीतील सहाय्यक आरेखक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत. भरती प्रक्रियेतील सर्व प्रमुख टप्पे पूर्ण झालेले असूनही हा विलंब सुरू आहे.
भरती प्रक्रियेचा तपशील :
जाहिरात – 13/08/2023 | परीक्षा – 06/08/2025 | गुणवत्ता यादी – 08/10/2025 | निवड यादी – 10/02/2026 | कागदपत्र पडताळणी – 06/05/2026
अर्थात, उमेदवारांनी परीक्षा, गुणवत्ता यादी, अंतिम निवड यादी आणि कागदपत्र पडताळणी असे सर्व टप्पे पूर्ण केले आहेत. तरीही नियुक्ती आदेश प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. भरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊन जवळपास तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. या प्रदीर्घ विलंबामुळे निवड झालेल्या युवकांना मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यांच्या करिअरचे व भविष्यातील नियोजनाचे नुकसान होत आहे.
शासन युवकांना रोजगार देण्याच्या घोषणा करीत असताना, शासनाच्या स्वतःच्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांनाच नियुक्तीसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागणे ही गंभीर विसंगती आहे.
म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने पुढील मागण्या करीत आहे :
1. सहाय्यक आरेखक पदासाठी निवड झालेल्या सर्व पात्र उमेदवारांचे नियुक्ती आदेश तात्काळ निर्गमित करावेत.
2. नियुक्तीस विलंब करणारी कोणतीही प्रशासकीय/तांत्रिक अडचण असल्यास तिचे कारण लेखी स्वरूपात स्पष्ट करावे.
3. नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निश्चित अंतिम कालमर्यादा जाहीर करावी.
4. या विलंबाची तातडीने प्रशासकीय समीक्षा करून जबाबदारी निश्चित करावी.
निवड झालेल्या युवकांना आश्वासने नकोत; त्यांना नियुक्ती आदेश हवेत. या प्रकरणात तातडीने निर्णय न झाल्यास, निवड झालेल्या उमेदवारांच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा रोजगार व स्वयंरोजगार विभाग लोकशाही मार्गाने आंदोलन उभारेल, याची कृपया नोंद घ्यावी.
आपण तातडीने हस्तक्षेप करून सकारात्मक व कालबद्ध निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
आपला विश्वासू,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस तथा अध्यक्ष : रोजगार व स्वयंरोजगार विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@INCHarshsapkal@INCMaharashtra@Dev_Fadnavis@samant_uday@midc_india
३ वर्षे, ३ CEO, ३ GM (HR) बदलले; पण MIDC वर्ग १ भरतीतील उमेदवारांच्या हाती अजूनही शून्य!
जुलै २०२३ ची जाहिरात. २०२६ संपत आलं तरी भरती प्रक्रिया अपूर्ण. वर्ग २ मधील ५९०+ उमेदवारांना वेळेवर नियुक्ती मिळते, मग वर्ग १ उमेदवारांवर हा विलंब का? मुख्यमंत्र्यांचे “पारदर्शक व जलद भरती”चे आदेश MIDC मध्ये लागू होत नाहीत का?
तरुणांच्या भवितव्याशी अशी अनिश्चितता का? सरकारने तातडीने वेळबद्ध प्रक्रिया जाहीर करून नियुक्त्या पूर्ण कराव्यात.
@INCHarshsapkal@VarshaEGaikwad@Dev_Fadnavis@samant_uday@midc_india
#MIDC #MIDCRecruitment #RojgarNyay #MaharashtraJobs #YouthForJobs #StudentsVoice #dhananjayshinde #RojgarAdhikar
MIDC वर्ग १ भरती: ३वर्षे,३ CEO,३ GMHR बदलले,पण उमेदवारांच्या हाती शून्य!
१) जुलै२०२३ची जाहिरात, २०२६ संपत आला तरी प्रक्रिया अपूर्ण. २)वर्ग२ च्या ५९०+जणांना वेळेवर नियुक्ती, मग वर्ग १ ला विलंब का?
३) "पारदर्शक व जलद भरती"चे मुख्यमंत्र्यांचे आदेश MIDC मध्ये लागू होत नाहीत का?
MIDC वर्ग १ भरती: ३वर्षे,३ CEO,३ GMHR बदलले,पण उमेदवारांच्या हाती शून्य!
१) जुलै२०२३ची जाहिरात, २०२६ संपत आला तरी प्रक्रिया अपूर्ण. २)वर्ग२ च्या ५९०+जणांना वेळेवर नियुक्ती, मग वर्ग १ ला विलंब का?
३) "पारदर्शक व जलद भरती"चे मुख्यमंत्र्यांचे आदेश MIDC मध्ये लागू होत नाहीत का?
मा. @samant_uday साहेब, @midc_india
सरळसेवा भरती २०२६ अंतर्गत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठी नियुक्ती स्वीकारण्याची मुदतवाढ दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना संधी देऊन लवकरात लवकर नियुक्ती देण्यात यावी, ही नम्र विनंती.
#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण स्व. आशा भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गीताचे लोकार्पण
@Dev_Fadnavis#Maharashtra#Mumbai#DevendraFadnavis
https://t.co/ILi0S8CJnx
विधिमंडळातील सहकारी, भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री.देवेंद्र कोठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उदंड, निरोगी, दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
@devendrakothe#DevendraKothe#देवेंद्र_कोठे#शुभेच्छा
विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या संविधानिक आणि शांततामय पद्धतीने मांडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, त्यांच्या प्रश्नांना “राजकारण” म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकाऱ्यांनी योग्य निर्णय घेऊन “न्याय” दिला असता तर हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरायचे काहीही कारण नव्हते. MPSC परीक्षेतील अनियमितता, पेपरफुटीचे आरोप आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव हे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर मुद्दे आहेत. विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी विरोधी पक्ष त्यांच्या सोबत उभा राहणे ही लोकशाहीतील जबाबदारी आहे.
आजचे स्पर्धा परीक्षा उमेदवार उद्याचे अधिकारी आहेत- म्हणूनच त्यांना न्याय्य, पारदर्शक आणि उत्तरदायी व्यवस्था मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.
#MPSC #MPSCProtest #StudentsForJustice #पेपरलिक
MPSC आयोगाचे अध्यक्षपद म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आणि संवैधानिक पद आहे, या पदावर बसणाऱ्या व्यक्तीसंदर्भात पुरावे काय तर साधा आरोप सुद्धा झालेला नसावा.
भीमनवार साहेबांच्या कार्यकाळात झालेल्या ऐतिहासिक अशा पेपरफुटीवर विद्यार्थी राजीनामा मागत असताना नैतिकता दाखवत त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित आहे, पण दुर्दैवाने ती नैतिकता त्यांच्याकडे दिसत नाही.
पुरावे दिले तर क्षणाचाही विलंब न करता राजीनामा देईल, असे भीमनवार साहेब म्हणाले होते. परिवहन आयुक्त असताना भीमनवार साहेबांनी कशाप्रकारे भ्रष्टाचार केला यासंदर्भात त्यांच्याच विभागातील कनिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारी आणि पुरावे बघा.
हा फक्त ट्रेलर आहे, पूर्ण पिक्चर लवकरच दाखवतो.. बदल्या, पदोन्नती, ओव्हरलोड गाड्यांच्या लिस्ट, वरळी वाहनखरेदी प्रकरणी लाचलुचपत विभागाने केलेली चौकशी......
आणखी खूप काही आहे.
#MPSC_आक्रोश_मोर्चा #MPSC #पेपरफुटी
विद्यार्थ्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपला राजीनामा मागितला आहे, तुम्ही पण #TCS#IBPS सारखं पुरावे द्या नका म्हणू.
राजीनामा तर आपणास द्यावाच लागेल, आज हजारों विद्यार्थी एकवटले होते उद्या लाखों विद्यार्थी एकत्र येतील..... कृपया "नैतिकता" म्हणून विद्यार्थ्यांनी राजीनामा मागितला आहे याची देखील नोंद घ्या साहेब.
तुम्हाला वाटतं आजची गर्दी ही राजकीय होती तर आपणास देखील विनंती आहे की कृपया आपण देखील एवढी गर्दी जमा करून दाखवावी...!
"MPSC" च्या प्रश्नासंदर्भात राजकारण करणारे राजकारण करत असतील तो राजकारणाचा भाग आहे परंतु आयोगाचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांनाच तुम्ही मान्य नसाल तर काय करणार त्या अध्यक्ष पदाचे आपण?
@bhimanwar
📢 पुण्यात आवाज फक्त उठणार नाही…
तो #MPSC च्या कानावर आदळणार आहे! 🔥
#पेपरफुटीने प्रश्नपत्रिका नाही,
विद्यार्थ्यांचा विश्वास फोडला आहे !
वर्षानुवर्षांची मेहनत,
दिवस-रात्र केलेला अभ्यास,
आणि भविष्याची स्वप्नं—
यांची किंमत कुणाच्या निष्काळजीपणापेक्षा मोठी आहे!
❗ पेपरफुटीचा हिशोब द्या.
❗ जबाबदारी निश्चित करा.
❗ दोषींवर कठोर कारवाई करा.
❗ विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवा.
आता मौन नाही… जाब हवा!
आता आश्वासनं नाही… कृती हवी!
📍 पुणे |
✊ प्रत्येक विद्यार्थी पोहोचा.
प्रत्येक आवाज बुलंद करा.
हा मोर्चा केवळ आंदोलन नाही—
ही आपल्या भवितव्याच्या हक्काची लढाई आहे!
@RRPSpeaks@Dev_Fadnavis@TV9Marathi@LoksattaLive@INCIndia@mpsc_office@CMOMaharashtra
#MPSC #MPSCPaperLeak
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी MPSC पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाऊ नयेत.
MPSC विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने आज विराट आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज बुलंद करण्यात आला आहे. हा महाराष्ट्रातील लाखो मेहनती, प्रामाणिक आणि स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे.
आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करत दिवस-रात्र अभ्यास करून गरीब विद्यार्थी परीक्षा देतात. अशा परिस्थितीत पेपरफुटी, गैरप्रकार किंवा परीक्षेतील कोणतीही अनियमितता घडल्यास त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते.
मेहनत करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे. परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांना कठोरपणे आळा घालून पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.
विद्यार्थ्यांच्या मनातील असंतोष समजून घेऊन त्यांच्या मागण्यांवर तातडीने आणि सकारात्मक निर्णय घ्या. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यात आल्या पाहिजेत.
MPSC विद्यार्थ्यांच्या या न्याय्य आणि हक्काच्या लढ्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही!