मित्रांनो सध्याच्या परिस्थिती मध्ये MPSC आयोग सर्वांना नोकरी देऊ शकत नाही त्यामुळं आपण सर्व जण सरळसेवा परीक्षा देऊन लवकर नोकरी लागावी म्हणून प्रयत्न करतो. कारण सरळसेवा मध्ये जागा खूप जास्त असतात पण सरळसेवा भरती मध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे होत आहे. आपण ते बऱ्यापैकी उघडकीस आणले पण परत हे थांबण्या ऐवजी नव नवीन उद्योग करून घोटाळे हे करतच आहे. आता तर ते सेंटर च मॅनेज करत आहेत. TCS कंपनी किती ही म्हटली आमचा सेंटर मॅनेज होत नाही तर मग लातूर चे गुरू ऑनलाईन सेंटर घोटाळा उघडकीस आला की लगेच बंद केले. असे किती तरी गुन्हे नोंद झाले आहेत. TCS च्या कर्मचारी आणि सेंटर मालक वर पण गुन्हे नोंद झाले आहेत. आता हे सर्व सहन करण्याच्या पलीकडे आहे. कालच फडणवीस यांनी घोषित केले की मेगा भरती करणार पण आम्हाला ही मेगा भरती फक्त आणि फक्त आयोगाकडूनच हवी आहे त्याशिवाय गोर गरिबांचे पोर नोकरीस लागणार नाहीत. त्यामुळे आपल्या या ट्विटर वॉर ला पाठिंबा द्या आणि सर्व जन सहभागी व्हा.
आपल्या हक्कासाठी आपल्या भविष्यासाठी ...
गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते 12
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत/यांत्रिकी) पदांची पदभरती प्रकिया लवकरात लवकर सुरू करून जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी.
#WRD_JE#VBAForIndia