विचार करा मित्रांनो, २०१२ पूर्वी जेव्हा परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह (वर्णनात्मक) होती, तेव्हा आपल्याच कॉलेजचे एक शिक्षक ज्यांच्याकडे डिस्क्रिप्टिव्ह पेपर मॉडरेशनसाठी आला, त्यांनी उत्तरपत्रिकाच बदलली आणि हस्तलेखन (Handwriting) सुद्धा जुळले नाही. ती व्यक्ती पुढे डीवायएसपी (DySP) झाले आणि आज आयपीएस (IPS) अधिकारी आहेत.
आम्हाला ऑब्जेक्टिव्ह (वस्तुनिष्ठ) परीक्षा का हवी आहे, हे यावरूनच स्पष्ट होते.
@GaneshgSpeaks@BaliramDoleyINC@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@yogsara
नुकतेच पदवीधर (Graduate) झालेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, दादांनो आणि ताईंनो,
तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या (MPSC) क्षेत्रात उतरलात आणि डिस्क्��िप्टिव्ह (वर्णनात्मक) पॅटर्ननुसार अभ्यास करत होता. तुम्हाला वाटले की पॅटर्न बदलेल. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काही लोकांनी तुमच्या मनात उगाच भीती निर्माण केली😨"पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह (वस्तुनिष्ठ) हो�� देऊ नका, लढा! जुन्या विद्यार्थ्यांना १० हजार MCQ तोंडपाठ आहेत, तुम्हाला पोस्ट मिळणार नाही." या खोट्या भीतीपोटी तुम्ही आंदोलने केलीत, तुमचे कौतुकच आहे. अन्याय होतोय असे वाटल्यावर, अगदी १०-१२ जण का असेना, तुम्ही तुमचे म्हणणे मांडले.
पण आता सर्व शांत झाले आहे, तर दादा आणि ताईंनो, मी तुम्हाला एक कटू सत्य सांगतो.
MPSC मध्ये 'ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न' झाला, तर त्यातच विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे हित आहे. राज्यसेवेचे खरे वास्तव समजून घ्या ,कधी १०० जागा येतात, तर कधी १२०. इतक्या कमी जागांसाठी डिस्क्रिप्टिव्हसारखा अपारदर्शक आणि पूर्णपणे कोचिंग क्लासेसवर अवलंबून असलेला पॅटर्न योग्य नाही.
तुम्हाला माहित आहे का? जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह राज्यसेवेचा अभ्यास केलात, तर कम्बाईन (Group B आणि C) मधून पुढील ३ वर्षांत एखादी पोस्ट मिळवून तुम्ही किमान आर्थिकदृष्ट्या सक्षम (Financially Secure) होऊ शकता. पण १००-१२० जागांच्या राज्यसेवेसाठी वर्षभर डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करत बसलात, तर Group B आणि C च्या एका तासाच्या तीव्र स्पर्धेत तुम्ही टिकू शकला नसतात.
राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह झाली, तर तुमच्यासाठी संधींची कवाडे उघडी होतील. आम्ही गेल्या ४ वर्षांपासून MPSC चा अनुभव घेत आहोत म्हणूनच हे सांगत आहोत. अभ्यासक्रम आणि पॅ��र्न सारखा असल्याने वनसेवा (Forest), राज्यसेवा, PSI, STI पासून अगदी लिपिक (Clerk) पदापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध होतात.
तुम्ही नवीन आहात, त्यामुळे सुरुवातीला आत्मविश्वास खूप असतो 👍आम्हाला त्याची जाणीव आहे. पण जर ९९% विद्यार्थी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची मागणी करत असतील, तर त्या विचारात नक्कीच काहीतरी तथ्य असेल.
Descriptive राहिले तर दरवर्षी पेपर रिचेकिंग ला जात राहतील खूप अपारदर्शक आहे Descriptive पॅटर्न मध्ये.
@BaliramDoleyINC
@yogsara @GaneshgSpeaks
For generations, Aramco TV brought knowledge, culture, and entertainment into people’s homes, becoming part of everyday life before its legacy continued across new platforms
उगाच Context समजून न घेता काहीतरी चेपायच बंद करा..आपल्यासारख्या अभ्यासून व्यक्तणाऱ्या व्यक्तिमत्वाला शोभा देत नाही. एकतर तो जुना Video आहे..काही अंशी बरोबर सुद्धा. पण MPSC २०२३ पासून D परीक्षा घेतेय एकाही परीक्षेत गुणात्मक सुधारणा नाही..सगळे घोळ! मग क्षमता नसताना का लादायचा?
@RahulAsks सुधीर ठाकरेंचा पण व्हिडिओ पोस्ट करा की! काल MPSC चे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांनी ���ण ट्विट केलं आहे, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न बेस्ट का आहे. ते पण सांगा.
डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये किती घोळ आहे, तुम्हाला कल्पना तरी आहे का? @Objective2027
@bali
अरे लेका, तू तर लयच बढाया मारतोयस जसं की तूच गव्हर्नन्सचा सगळा गाढा एकटा ओढून नेलायस! पण वस्तुस्थिती ही आहे की तुझे बेसिक कॉन्सेप्ट्ससुद्धा क्लिअर नाही आहेत.
त्या तुझ्या so called "सर"ने तुला शिकवलेली संकल्पनाच मुळात चुकीची आहे, हे मोठमोठ्या बाता मारण्याच्या नादात तू सोयीस्करपणे विसरलास.
आम्ही ऑब्जेक्टिव्ह ��ाज्यसेवा मुख्य परीक्षा (GS-2) मध्ये जे गव्हर्नन्स शिकलोय, त्यानुसार धोरणात्मक लकवा (Policy Paralysis) म्हणजे जिथे सरकार किंवा सनदी अधिकारी कोणताही निर्णय घ्यायला इतके घाबरतात की ते पुढे जायलाही टाळाटाळ करतात आणि मागे फिरायलाही!
पण तू? पूर्ण अभ्यास वाचायच्या आधीच उतावळा होतोयस मित्रा! आधी जरा बेसिक कॉन्सेप्ट्स क्लियर करून घे. सांगायला तर सांगतोयस "मी UPSC करतोय", पण पॉलिस�� पॅरालिसिससारखी(POLICY PARALYSIS)अगदी प्राथमिक संकल्पनासुद्धा तुला माहिती नाही! तू म्हणतोयस की जर समिती रिव्हर्स गेली म्हणजे धोरणात्मक लकवा आहेत तो ,उलट समितीने पारदर्शकतेसाठी ९९ टक्के विद्यार्थ्यांच्या मागणीवरून रिव्हर्स निर्णय घेतला आणि पुन्हा हा अपारदर्शक डिस्क्रिप्टिव्ह बाजूला सारून ऑब्जेक्टिव्ह आणला, तर त्या निर्णयाला "धाडसी निर्णय" (Bold Decision) म्हटलं जाईल, पॉलिसी पॅरालिसिस नाही!
तू उगाच ���्या विवेकानंद पाटीलची कॉपी करायला जाऊ नकोस. त्याचं व्यक्तिमत्त्व खूप मोठं आहे, अभ्यासू पोरगा आहे तो! ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा दांडगा अभ्यास केलेला पोरगा आहे तो. तू त्या क्लासवाल्यांच्या नादी लागू नकोस, त्यांनी तुझे धड कॉन्सेप्ट्ससुद्धा क्लियर केलेले नाहीत!
ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने अभ्यास कर, म्हणजे प्रत्येक पॉइंट अगदी इन-डेप्थ शिकशील!
@GaneshgSpeaks
@BaliramDoleyINC
2012-2014 या काळात MPSC चे अध्यक्ष राहिलेले आदरणीय
IAS श्री. सुधीर ठाकरे साहेब यांनी भारतात इतर कोणत्याही राज्यात नव्हता असा एक क्रांतिकारी पॅटर्न आणला. त्यांनी पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देऊन वस्तुनिष्ठ (Objective) पद्धतीचा अवलंब केला आणि राज्यसेवा, अन्न सुरक्षा अधिकारी (FSO), कृषी सेवा व अभियांत्रिकी सेवा यांसारख्या सर्व महत्त्वाच्या परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपात घेऊन विद्यार्थ्यांना खरा न्याय दिला.
त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कोचिंग माफियांसारख्या व्यवस्थेला उभे राहता नाही आले आणि संपूर्ण परीक्षा पद्धत ही केवळ आणि केवळ प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या हिताचीच राहिली.
एमपीएससीच्या (MPSC) इतिहासाचा जेव्हा जेव्हा अभ्यास केला जाईल, तेव्हा आदरणीय श्री. सुधीर ठाकरे साहेबांचे नाव अत्यंत आदराने आणि अभिमानाने घेतले जा��ल. एमपीएससीमधील या अभूतपूर्व बदलांसाठी त्यांना नेहमीच 'महाराष्ट्राच्या MPSC च्या सुधारणांचे जनक' (Father of Reforms) म्हणून सदैव लक्षात ठेवले जाईल.
@MeshramDayanand
@yogsara @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @GaneshgSpeaks @BaliramDoleyINC
अराजकीय MPSC विद्यार्थी आंदोलन....
अहिल्या शिक्षण मंडळ, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे
बहुपर्यायी परीक्षा पद्धत (Objective Pattern) 2027 पासून नव्याने लागू करण्यात यावी.
#mpsc#MPSC#Mpsc
थोड्याच वेळात आपले लाडके युवा आमदार मा. श्री. निरंजन डावखरे साहेब हे, MPSC विद्यार्थ्यांच्या '��ब्जेक्टिव्ह पॅटर्न २०२७ पासून पुन्हा लागू व्हावा' या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथे उपस्थित राहत आहेत.
अहिल्या अभ्यासिका ,पुणे
Objective 2027 🔥
@niranjandtweets @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoleyINC @EA_OfficialMH @GaneshgSpeaks
मा. मुख्यमंत्री श्री दे���ेंद्र फडणवीस साहेब यांना नम्र विनंती
महाराष्ट्र सरकारने स्थापनेपासूनच मध्यस्थांचे (दलालांचे) उच्चाटन करण्याचे खूप मोठे आणि कौतुकास्पद काम केले आहे. गैरप्रकार संपवून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी मिळवून देणे असो किंवा 'MahaDBT' सारखे पोर्टल सुरू करून अनेक क्षेत्रांतील मध्यस्थांना बाहेर काढणे असो, सरकारने नेहमीच चांगले निर्णय घेतले आहेत.
त्याचप्रमाणे २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्���ी. पृथ्वीराज चव्हाण यांनी श्री. सुधीर ठाकरे यांची MPSC च्या अध्यक्षपदी निवड केली होती. ठाकरे साहेबांनी MPSC ची परीक्षा वस्तुनिष्ठ (Objective) स्वरूपाची करून परीक्षेत मोठी पारदर्शकता आणली होती. त्यामुळे दिल्लीत जसा UPSC साठी कोचिंग माफिया तयार झाला आहे, तसा कोचिंग माफिया महाराष्ट्रात तयार झाला नाही.
पण आता पुन्हा वर्णनात्मक (Descriptive) परीक्षा पद्धत लागू झाल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुले थेट पुस्तकांतून अभ्यास करण्याऐवजी कोचिंग क्लासेसवर अवलंबून राहू लागली आहेत.
म्हणूनच, या क्षेत्रातील मध्यस्थांचे उच्चाटन करण्यासाठी आणि MPSC ची परीक्षा पुन्हा पारदर्शक करण्यासाठी ही परीक्षा पुन्हा 'ऑब्जेक्टिव्ह' (Objective) करण्यात यावी, ही मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना नम्र विनंती!
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoleyINC @EA_OfficialMH
महाराष्ट्रातील लोकप्रसिद्ध पत्रकार श्री. राहुल जी कुलकर्णी साहेब,
आम्ही वर्णनात्मक (Descriptive Pattern) ऐवजी वस्तुनिष्ठ पद्ध�� (Objective Pattern) पुन्हा लागू करण्याची जी मागणी करत आहोत, त्यामागची काही महत्त्वाची आणि वस्तुनिष्ठ कारणे मी आपल्याला मुद्द्यांनुसार स्प��्ट करतो:
१. अन्न सुरक्षा अधिकारी (Food Safety Officer - 2024):
या परीक्षेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) पद्धतीने पार पडली. मुलाखती पूर्ण होऊन अंतिम निकालही जाहीर झाला. परंतु, गुण देण्याच्या प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. काही उमेदवारांचे उत्तरपत्रिका एकाच व्यक्तीने तपासल्या, तर काहींच्या उत्तरपत्रिका दोघांनी तपासल्या आहेत.
२. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा (Agriculture Services - 2024):
ही परीक्षा���ुद्धा वर्णनात्मक पद्धतीनेच घेतली गेली होती. निकाल लागल्यानंतर यामध्येही गुण पद्धतीतील गोंधळाची तीच गंभीर समस्या समोर आली.
(माननीय मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही परीक्षांच्या मुद्द्यांची दखल घेऊन चौकशी केली असून, निकाल रद्द करून उत्तरपत्रिका पुनर्तपासणीसाठी (Rechecking) पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.)
३. राज्यसेवा परीक्षा (2025):
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने पार पडली आणि निकाल लागल्यानंतर ९ सप्टेंबरपासून मुलाखती सुरू होणार होत्या. परंतु, गुण वितरणात मोठ्या प्रमाणावर तफावत आणि गोंधळ झाल्याने हा निकालही रद्द करून पुनर्तपासणीसाठी पाठवण्यात आला. यामुळे मुलाखतीसाठी पात्र ठरलेले सर्व विद्यार्थी सध्या प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत.
हे अत्यंत महत्त्वाचे आणि गंभीर मुद्दे अनेकदा समोर आणले जात नाहीत. दरवर्षी गुणांच्या तपासणीत असा गोंधळ होणे विद्यार्थ्यांना अजिबात परवडणारे नाही. अशा प्रकारच्या त्रुटी किंवा गोंधळ वस्तुनिष्ठ (Objective Pattern) पद्धतीत कधीही उद्भवत नाहीत.
म्हणूनच आमची मागणी आहे की, पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी २०२७ पासून पुन्हा वस्तुनिष्ठ पद्धत (Objective Pattern) लागू करण्यात यावी.
आम्ही जुना अभ्यासक्रम (Syllabus) लागू करावा अशी मागणी अजिबात करत नाही आहोत. अभ्यासक्रम काय असावा, हा पूर्णपणे आयोगाचा अधिकार आहे; परंतु परीक्षेतील पारदर्शकतेसाठी परीक्षा पद्धती मात्र वस्तुनिष्ठच (Objective) असणे अत्यंत आवश्यक आहे.
@RahulAsks
@GaneshgSpeaks @BaliramDoleyINC @abpmajhatv
ऐका मित्रांनो, आमदार श्री. संजय गायकवाडजी (जे स्वतः सत्तेतील आमदार आहेत) हे स्वतः सांगत आहेत की वर्णनात्मक (descriptive) परीक्षांचा पेपर कसा मॅनेज केला जातो आणि पेपर तपासणारे प्राध्यापक हे कसे मर्जीतील (ओ��खीचे) असतात.
म्हणूनच आम्हाला पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय असलेली वस्तुनिष्ठ (objective) पद्धतच हवी आहे.
@sanjaygaikwad34 @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @GaneshgSpeaks @BaliramDoleyINC
एमपीएससीच्या एकूण ६ मुख्य परीक्षा दिलेला विद्यार्थी — ज्यामध्ये ४ परीक्षा वस्तुनिष्ठ (Objective) पॅटर्ननुसार आणि २ परीक्षा (२०२५ व २०२६) वर्णनात्मक (Descriptive) पॅटर्ननुसार . तसेच, यात आलेल्या सर्व अडचणी...
राजीनाम्याला आमचा विरोध अजिबात नाहीच, पण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची ही मागणीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे!
OBJECTIVE 2027 🔥 🎯
@EA_OfficialMH@GaneshgSpeaks@BaliramDoleyINC@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
1]ऑब्जेक्टिव्ह Rs/civil/agri2027
2]राज्यसेवा/कृषी मुख्य पुनर्तापासनी
3]कम्बाईन घोळ
ह्या मागण्या कोणत्या ठिकाणी गुप्त केल्या आहेत हे रोहितदादांनी स्पष्ट करावे.राजीनामा तर झालाच पाहिजे पण त्यापलीकडे देखीलmpsc विश्व आहे हे लक्षात घ्या दादा 🙏 @Objective2027@RRPSpeaks#mpsc
पुण्यातील अहिल्या शिक्षण मंडळ येथे सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कॅबिनेट मंत्री नितेश राणे साहेब यांनी भेटून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
#mpsc#Mpsc
पंकजा ताई पुणे येथील आंदोलन येथे तुम्ही भेट द्यावी व Mpsc विद्यार्थींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी देवभाऊ कडे पाठपुरावा करावा..
१. राज्यसेवा objective 2027
https://t.co/qe8cZeOMm8 c 2026 विक्रमी जागा वाढ
3.परीक्षा वेळेवर घेणे व पुढील टा��मटेबल जाहीर करणे
@Pankajamunde