प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
ऊर्जा मंत्री,
महाराष्ट्र राज्य
विषय : महावितरण मधील नोकरभरती जाहिरातीतील त्रुटी व विद्यार्थ्यांच्या मागण्या.
संदर्भ : महावितरण जाहिरात क्र. ७/२०२३ (AE) आणि जाहिरात क्र. ८/२०२३(JE)
महोदय,
आपल्या खात्यातील महावितरण कंपन्यांमध्ये कनिष्ठ अभियंता (JE) व सहाय्यक अभियंता (AE) पदासाठी वरील जाहीराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या जाहीरातीमध्ये जातसंवर्ग, आरक्षणानुसार पदे, GATE ची सक्ती, पात्रता निकष अशा अनेक तांत्रिक चुका आढळून आल्या आहेत. या संबंधांत शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या खात्याशी पत्रव्यवहार देखील केला आहे.
कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या ३०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५१ जागांची व सहाय्यक अभियंता (AE) पदाच्या ६०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ २८१ जागांची जाहीरात प्रसिद्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे.
अनेक दिवसांनी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील वरील चुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृपया यामध्ये आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
धन्यवाद.
@AAPMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@degree_holders@parthpunter@sohitmishra99
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@CMDMSEDCL
महावितरण (MSEDCL) मध्ये सहाय्यक अभियंता (AE-636) व कनिष्ठ अभियंता (JE-381)
महापारेषण (MSETCL)
सहाय्यक अभियंता (AE-390)
पदाच्या रिक्त असलेल्या जागा IBPS द्वारे भरण्यासाठी लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी
#Mahagenco पदभरतीत ज्युनिअर ऑफिसर (सिक्युरिटी) पदावर निवड झालेला गणेश सतावन, #म्हाडा भरती घोटाळ्यात आरोपी आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.
महाराष्ट्रातील नोकर भरतीत मोठे घोटाळे सुरू असून, गृहमंत्री म्हणून #फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत. #तलाठी भरती सुरळीत सुरू असल्याचे वाटत असले तरी संपूर्ण घोटाळा बाहेर असल्यास सगळ्यांनाच हादरे बसतील.
@Dev_Fadnavis@RVikhePatil@mieknathshinde@AjitPawarSpeaks@RRPSpeaks
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये कार्यकारी अभियंता ते सहाय्यक तंत्रज्ञ पदांच्या ३०४८ जागांचा आराखडा मागील दोन महिन्यांपूर्वी जाहिर करण्यात आलेला आला. त्याबाबत कंपनी मार्फत एक परिपत्रक व रिक्त जागांची जाहिरात वर्तमान पत्रातून प्रसिद्ध करण्यात आली, परंतु अद्यापही भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. हा प्रकार मागील २ वर्षापासून चालू आहे.
ठराविक अंतराने जाहिरातीची आशा सुशिक्षित बेरोजगारांना दाखविण्यात येते परंतु जाहिरात प्रसिद्ध केली जात नाही. या प्रकारात आय. टी. आय. इलेक्ट्रिशियन व विद्युत अभियांत्रिकी उमेदवारांची २ वर्षे निघून गेली आहेत.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री ना. @Dev_Fadnavis जी आपणास विनंती आहे की, सदरील जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी व नोकरीसाठी संघर्ष करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना न्याय द्यावा.
@CMOMaharashtra@OfficeofUT@Devendra_Office@AUThackeray@iambadasdanve@OmRajenimbalkr
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो ,एकवेळ उपाशी राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
अभ्यासात खंड पडू नये ,प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत ,तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
एका जागेसाठी आम्ही हजार हजार जण स्पर्धेत असतानाही असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही ,तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो , तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो ,हे सरकारने देखील #seriousness दाखवत समजून घ्यायला हवे.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत,आता सरकारने देखील पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावे .

देवेंद्र फडणवीस यांनी 22 डिसेंबर 2022 ला घोषणा करूनही प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. रिक्त पदे IBPS च्या माध्यमातून तात्काळ भरावीत अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.या मागणीला मी जाहीर पाठिंबा देत आहे.
@mieknathshinde@atullondhe@Dev_Fadnavis
विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक भरती प्रक्रियेतील सर्व उमेदवार हे अद्याप या भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. विविध कारणांनी भरती प्रक्रिया पुढे ढकलली गेली आणि तरुण मुलांची उमेदीची वर्षे वाया गेली. सभागृहात हा मुद्दा कळकळीने मांडला...
#BudgetSession2023#MaharashtraBudget@NCPspeaks
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@CMDMSEDCL@MSEDCL साहेब मुल महावितरणमधे सहाय्यक अभियंता (AE )या पदासाठी ५ वर्षांपासून वाट पाहत आहेत मात्र भरती बद्दल हालचाल दिसून येत नाही.आपण स्वातंत्राचा अमृत महोत्सव साजरा करतोय त्यात महावितरणचीसुद्धा भरती करण्यात यावी ही विनंती