@RajThackeray साहेब लोक बोलतात #मनसे ही मराठी माणसाची पार्टी आहे परंतु मराठी विद्यार्थ्यांवर महावितरण कंपनीने #सहाय्यक_अभियंता या पदासाठी #domicile अनिवार्य न केल्याने परप्रांतीय भरणा होणार आहे . मनसे च्या नेते लोकांना सांगून सुद्धा कोणी लक्ष देत नाही. #मराठी माणसाचे वाली कोण?
#महावितरणच्या सहाय्यक अभियंता (जाहिरात क्र.७/२०२३) परीक्षेसाठी रहिवासी दाखला अनिवार्य करणे, GATE परीक्षेची अट रद्द करणे या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या असून विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार उर्जा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता वरिष्ठांकडे पाठपुरावा करून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच विद्यार्थ्यांना अपेक्षित असा सकारात्मक निर्णय होईल हा विश्वास आहे.
#महावितरणच्या सहाय्यक अभियंता (जाहिरात क्र.७/२०२३)परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाला महाराष्ट्राचा रहिवासी दाखला सक्तीचा नसल्याने इतर राज्यातील तरुणही यासाठी अर्ज करतील परिणामी राज्यातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होऊ शकतो. त्यामुळे सदर परीक्षेसाठी रहिवासी दाखला अनिवार्य करावा.
तसेच या परीक्षेसाठी GATE परीक्षेच्या १०% गुणांची अट टाकल्याने GATE परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. वास्तविक GATE परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार फारच कमी असतात, तसेच भरमसाठ परीक्षा शुल्क असल्याने बहुतांश उमेदवार GATE देणंही टाळतात. त्यामुळे महापारेषण, महानिर्मितीसाठी ज्याप्रमाणे GATE परीक्षेची कुठलीही अट नाही त्याप्रमाणे महावितरणनेही GATE परीक्षेची अट शिथिल करण्यासंदर्भात विचार करावा ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
वीज महावितरण कंपनीने सहाय्यक अभियंता (AE) व कनिष्ठ अभियंता (JE) या पदांसाठी काढलेल्या जाहिरातीतील त्रुटी व राज्यातील विद्यार्थ्यांच्या मागण्या या संदर्भात आज वीज महावितरण कंपनी चे संचालक मा. विश्वास पाठक यांची भेट घेतली. पेपरफुटी ला आळा बसण्यासाठी परीक्षा IBPS च्या ऐवजी @mpsc_office मार्फत घ्यावी अशी विनंती देखील केली.
अत्यंत जिव्हाळ्याच्या चर्चेत मा. पाठक यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या व भूमिका ऐकून घेतली, आणि अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.
आपल्या मागण्यांचा विचार करून महावितरण कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे संचालक मा. अरविंद भादीकर यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ असे त्यांनी आश्वासन देखील दिले.
धन्यवाद मा. विश्वास पाठक जी.
बेरोजगार युवक व युवतींचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही संविधानिक मार्गाने सर्व प्रयत्न करू.
@CMDMSEDCL@connectMSPGCL@MSEDCL@vishwasvpathak
संदर्भ : आप महाराष्ट्र / ०५०१२०२४/००१.
प्रति,
मा. लोकेश चंद्र जी,
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.
महाराष्ट्र राज्य
विषय : महावितरण मधील नोकरभरती जाहिरातीतील त्रुटी व विद्यार्थ्यांच्या मागण्या.
संदर्भ : महावितरण जाहिरात क्र. ७/२०२३ (AE) आणि जाहिरात क्र. ८/२०२३(JE)
महोदय,
आपल्या खात्यातील महावितरण कंपन्यांमध्ये कनिष्ठ अभियंता (JE) व सहाय्यक अभियंता (AE) पदासाठी वरील जाहीराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या जाहीरातीमध्ये जातसंवर्ग, आरक्षणानुसार पदे, GATE ची सक्ती, पात्रता निकष अशा अनेक तांत्रिक चुका आढळून आल्या आहेत. या संबंधांत शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या खात्याशी पत्रव्यवहार देखील केला आहे.
कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या ३०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५१ जागांची व सहाय्यक अभियंता (AE) पदाच्या ६०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ २८१ जागांची जाहीरात प्रसिद्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे.
अनेक दिवसांनी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील वरील चुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृपया यामध्ये आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
तसेच या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्हाला सोमवार दिनांक ८ जानेवारी किंवा मंगळवार दिनांक ९ जानेवारी, २०२४ रोजी वेळ द्यावी हि विनंती.
धन्यवाद,
#Increase_AE_JE_Vacancy #No_GATE_For_MAHADISCOM
#CancelGATEforAE
#MH_Domecile_Compulsory
@mieknathshinde@Dev_Fadanvis@MSEDCL@CMDMSEDCL@SandeepPathak04@AjitPawarspeaks@maha_governor