जबाबदार माध्यमांना आणि माध्यमकर्मींना कळकळीची विनंती...
मागील दोन दिवसांपासून विशेष करून समाज माध्यमावर सुरू असलेल्या काही बातम्या पाहून व्यथित झालो, वाईट वाटले. ठराविक माध्यमांना माझे कळकळीचे आवाहन आहे, कृपया कोणतेही वृत्त प्रसारित करताना शहानिशा करण्याची थोडी तसदी घ्या.
बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक खेळीमेळीत पार पडली, तिथे माझा आणि विरोधी पक्षातील एका लोकप्रतिनिधींचा कोणताही वाद किंवा खडाजंगी झालेली नाही. राजकारणात वैचारिक मतभेद असतीलही मात्र सौहार्द आणि संवाद असतोच, त्याला कुणीच अपवाद नाही. बैठकीतील प्रत्यक्षदर्शींकडून याची खात्री करता आली असती, मात्र अशा प्रकारच्या बातम्या चालवून काहींना जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडवून टाकायचा आहे!
दुसरा विषय, आदरणीय सुनेत्रा वहिनी या महिला आहेत, आधीच कौटुंबिक दुःखात आणि त्यात स्व. अजितदादांच्या माघारी प्रथमच बीड शहरात आल्या होत्या. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी काही नागरिक मोठमोठ्याने बोलत असल्याने सर्वांचे म्हणणे नेमके कळणार नाही या दृष्टीने मी आपले प्रश्न शांतपणे मांडा, हळू बोला अशी विनंती केली असता त्याचेही रुपांतर धनंजय मुंडे याने शेतकऱ्यांना दम दिला, असे केले जात आहे, याचे सध्याच्या काळात मला आश्चर्य वाटत नाही; कारण ठराविक माध्यम प्रतिनिधींनी तसा अजेंडा राबवण्याचा घाट घातलेला आहे.
बीड जिल्ह्यातील ९०% पेक्षा अधिक पत्रकार हे अत्यंत जबाबदारीपूर्वक काम करतात. त्यांच्या निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचा मी कायम आदर करतो. मात्र काही पत्रकारांच्या बाबतीत आर्थिक गैरव्यवहार सहित अनेक तक्रारी माझ्याकडे पूर्वीच आलेल्या आहेत. परंतु कुणाचे तारुण्यात नुकसान नको, म्हणून मी वरिष्ठांना तक्रार करण्याऐवजी दुर्लक्ष केले. कुणाच्याही आर्थिक लाभ किंवा समृद्धीच्या आड मी येऊ इच्छित नाही.
जिल्ह्यात बिघडलेला सामाजिक सौहार्द हळूहळू स्थिर होत आहे, कृपया चुकीच्या बातम्या पेरून वातावरण बिघडवू नका, ही कळकळीची विनंती...!
#Beed
#Media
#MediaTrial
#FakeNews
@BlueDart_ AWB number: 77096609855
Your team had called me and told that they can't deliver and now they are feeding the service provider that I have declined the order. This thing is a lie and is your responsibility totally. Same has been sent at DM @MochiShoesIN@BlueDart_
आज ठाणे येथे आयोजित वंजारी समाज अधिवेशन, विचार मंथन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून संबोधित केले.
#DMUpdates
Details in the link 🔗
https://t.co/qxLXn5h3QF
चमक सूरज की नहीं, तेरे किरदार की है;
खबर ये आसमा के अखबार की है
तू चले तो तेरे संग कारवां चले;
बात गुरुर की नहीं, ऐतबार की है!
साहेब.... शतायुषी व्हा!
@dhananjay_munde
भारताने पुन्हा एकदा दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेत पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर हल्ले करत ते नष्ट केले आहेत. लष्कराच्या तिन्ही दलांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या 'ऑपरेशन सिंदुर' मध्ये सहभागी झालेल्या सर्व सैनिकांचे आभार व अभिनंदन.
दहशतवाद आता कदापि खपवून घेतला जाणार नाही, हा कडक इशारा भारत सरकारने शेजाऱ्यांना दिला आहे. देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री श्री. अमितजी शहा, संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांचे मनापासून अभिनंदन.
@narendramodi
#OperationSindoor
#India
#JayHind
आज विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच श्री क्षेत्र भगवानगड येथे दर्शन, प्रसाद व मुक्काम असा दुग्धशर्करा योग गडाचे महंत, गुरुवर्य, ह.भ.प. न्यायाचार्य डॉ.नामदेव शास्त्री महाराज यांच्या आशीर्वादाने घडून आला.
ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले त्याचबरोबर गडाचे द्वितीय महंत वै.ह.भ.प. भीमसिंह बाबांच्या समाधीचेही दर्शन घेतले.
गुरुवर्य शास्त्री बाबांनी आशीर्वाद व नवचेतना दिली.
भगवान गडाचे आणि माझे दोन पिढ्यांचे प्रेरणास्थान आणि निस्सीम भक्त असे नाते आहे. इथे येऊन बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन मला लढायची शक्ती आणि लोकांची कामे करण्यासाठी ऊर्जा मिळते.
गड व परिसरतील भाविकांनी केलेल्या स्नेह - स्वागताबद्दल अनेकानेक आभार.
#Bhagwangad
#SaintBhagwanbaba
#DrNamdevShastri
#DMUpdates
निमंत्रण
उद्या दि.21 ऑगस्ट पासून परळी वैद्यनाथ नगरीत राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा.
या महोत्सवांतर्गत भव्य कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, धान्य महोत्सव, चर्चा सत्रे व शेतकरी संवाद, विविध आधुनिक उपकरणे व अवजारांची प्रात्यक्षिके, रानभाज्या महोत्सव, यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री यांसह शेतकरी बांधवांना उपयुक्त असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्याच्या इतिहासात राज्यस्तरीय कृषी महोत्सव प्रथमच होत असून, उद्या राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री मा.शिवराजसिंह चौहान, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष मा.खा.सुनील तटकरे, क्रीडामंत्री मा.संजय बनसोडे, बहुजन कल्याण मंत्री मा.अतुल सावे, अल्पसंख्यांक विकासमंत्री मा.अब्दुल सत्तार, सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.तानाजी सावंत, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा.पाशा पटेल यांच्यासह अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी आदी उपस्थित राहणार आहेत.
सबंध राज्यातील शेतकरी बांधवांनी या कृषी महोत्सवात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती...
@mieknathshinde@ChouhanShivraj@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@SunilTatkare@BansodeSpeaks
#KrishiMahotsav
#KrishiMahotsavParli
सेविका मदतनीस भरती करण्याची पद्धत, त्याचा जीआर याचा अभ्यास नीट केला असता तर अशा फेक्या फसरावयाची गरज पडली नसती. अर्धवट किंवा चुकीची माहिती पेरून बदनामी आणि जातीवाद पेरणे मस्त सुरु आहे तुमचे.
Go for #Gold Avinash...!
Our golden guy from Beed is going to run the finals of 3000 m steeplechase in #ParisOlympics2024 tonight.
Let's pray for him. Avinash will definitely win Gold for #India
All the best Avinash.
@avinash3000m
आपल्या बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिकच्या 3000 मी.स्टिपलचेस स्पर्धेच्या फायनल्स मध्ये पोचला असून, आज रात्री गोल्ड मेडलसाठी अविनाश धावणार आहे!
आपण सर्वजण अविनाशसाठी प्रार्थना करू...
अविनाश तुला फायनल्स साठी खूप खूप शुभेच्छा!
#GOLD #AvinashSable #GoForGold #Paris2024
राज्यातील 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला शब्द राज्य सरकारकच्या माध्यमातून पूर्ण केला असून, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये प्रमाणे (कमीत कमी 1000 व कमाल 2 हेक्टर पर्यंत) मदत देण्याचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मागील वर्षी विविध कारणांनी आर्थिक नुकसान सहन कराव्या लागलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थेट अर्थसहाय्य मिळणार आहे, याचे मला समाधान वाटते.
राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी केलेल्या या घोषणेची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.देवेन्द्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.अजितदादा पवार साहेबांचे राज्यातील समस्त कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी व कृषी विभागाच्या वतीने मनःपूर्वक आभार!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AgriDeptGoM@MahaDGIPR
कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतील सर एच.एन.रिलायन्स फाउंडेशन रुगणालायत पित्ताशयाची शस्त्रक्रिया शुक्रवारी करण्यात आली आहे. आता त्यांची प्रतिकृती स्थिर असून काँग्रेस नेते @bb_thorat आ.@Pankajamunde माजी खा.@DrPritamMunde यांनी भेट घेऊन विचारपूस केली.
@dhananjay_munde
आज भाजपा व संघांचे 3000 हजार कार्यकर्ते पुणेकरांना मदतीला उतरले अशी प्रेसनोट भाजपाने काढली आहे..
पुणेकर जनतेला कोणता भाजपाचा कार्यकर्ता मदत करताना दिसला का??