मा प्रधान जी यांनी राजीनामा ज् दिले हि सरकार आणि जनते प्रती जबाबदारी आहे थोडा आधी दिला असता तर जबाबदारी उत्तर दायित्व वाटल आसत वाटला असता प्रधान जी याच आदर कारण गेली दहा वर्षे देशाचे इधनमत्री होते
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी प्रधान जी याचा राजीनामा घेणे ही जबाबदारी आहे, प्रधान जी यांनी गेली दहा वर्षे चागल्या प्रकारे काम केले आहे मात्र युवा वर्ग साठी त्याच भविष्य पारदर्शक असणे ही सरकारची जबाबदारी आहे जे लोक आशा संघटीत पेपरफुटीला जबाबदार आसतील त्याना
@deepakkedardk आंदोलनात काही पक्ष आपली पोळी भाजून घेत आहेत महाराष्ट्रातील विध्यार्थी च्या हितासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या आॅनलाईन निर्णय या विरोध स्वयंघोषित पक्ष बोलत नव्हते
पंतप्रधानजी,
फास्ट ट्रॅक न्यायालये हा निर्णय स्वागतार्ह आहे, पण लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न केवळ पेपरफुटीपुरता मर्यादित नाही. वर्षानुवर्षे रखडलेल्या भरती, वारंवार बदलणारे परीक्षा नियम, परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ, निकालातील विलंब, रिक्त सरकारी पदे आणि न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणारी पोलिसी दडपशाही याबाबतही देश उत्तर मागत आहे.
तरुणांचे भविष्य खरोखरच सर्वोच्च प्राधान्य असेल, तर दोषींवर कारवाईसोबतच पारदर्शक परीक्षा व्यवस्था, वेळेत भरती, रिक्त पदे भरणे आणि विद्यार्थ्यांचा घटनात्मक आवाज दडपणे थांबवणेही तितकेच आवश्यक आहे.
युवकांना आश्वासने नाहीत, तर न्याय आणि कृती हवी आहे.
MPSC CBT (ऑनलाईन) परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. हा विरोध विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येत नाही म्हणून नसून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा पारदर्शक होत नाही हे वारंवार सिद्ध झालेले आहे. महापरीक्षा पोर्टल का बंद केले? TCS, IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा MPSC कडे देण्याचा निर्णय सरकारने का घेतला? ऑनलाईन परीक्षा मधील भोंगळ कारभार समोर असतानाही त्याच कंपन्यांना परीक्षा घ्यायला देणे म्हणजे MPSC ला पांगळे करण्यासारखे आहे. मागील वीस वर्षापासून MPSC मार्फत एकदाही पेपर फुटण्याची घटना नाही, कोणताही गोंधळ नाही तरीही परीक्षा ऑनलाईन घेण्याचा घाट का?
ऑगस्ट 2027 नंतर पुन्हा परीक्षा ऑनलाईन घेणार म्हणजे आजचे मरण उद्यावर. 30-40 हजार पदे भरणार ते 2026 मधेच भरणार का? सरळसेवा MPSC मार्फत २०२६ मधेच घेणार का? याविषयी काहीच माहिती नाही.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, जमावबंदी लागू करून विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला जात आहे. तुम्ही कितीही दडपशाही करा ऑनलाईन परीक्षा मान्य नाहीच.
#onlyofflineexam
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@mieknathshinde
@AdeJ123@Dev_Fadnavis@mpsc_office मा आमदार अभिमन्यूजी पवार नुसता तुणतुणे पाणी नका वास्तविकता पहा आणि एकाच दिवशी एकाच वेळी सर्व राज्यभर परीक्षा घेत येत असेल तर आॅनलाईन शक्य नाही
अभिमन्यूजी
सरळ सोप्या भाषेत 2 प्रश्न विचारतो.
1.देवाभाऊंच्या घोषणेनुसार २०२६ हे पदभरतीच वर्ष असणार का ?
2.नव्याने समाविष्ट सरळसेवेच्या पदांसाठी जाहिरात येऊन यावर्षी फक्त #पुर्व_परिक्षा का होईना,पण संभव आहे का ?
अपेक्षा कि यावर आपण प्रतिक्रिया द्यावी.🙏
@Dev_Fadnavis@mpsc_office
MPSC परीक्षा ऑफलाइन व्हावी : नांदेड आंदोलन …..
नांदेडमधील विद्यार्थ्यांच्या महामोर्चाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा जाहीर पाठिंबा
MPSC च्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच घेण्यात याव्यात, या लाखो विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीसाठी आज नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या महामोर्चाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित कोणताही निर्णय त्यांच्या विश्वासाला तडा देणारा असू नये. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह, समान संधी देणारी आणि सर्व विद्यार्थ्यांना न्याय देणारी असणे हीच काळाची गरज आहे.
जर आयोगाने भविष्यात स्वतःची अत्याधुनिक, सुरक्षित आणि पारदर्शक परीक्षा यंत्रणा उभारण्याचा विचार मांडला, तरी २०२९ पर्यंत किंवा कोणत्याही कालमर्यादेनंतर ऑनलाइन परीक्षा लागू करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांशी व्यापक चर्चा, सर्व राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना, तज्ज्ञ आणि समाजातील संबंधित घटकांशी सल्लामसलत केल्याशिवाय स्वीकारता येणार नाही. सध्या विद्यार्थ्यांची स्पष्ट आणि एकमुखी मागणी म्हणजे MPSC च्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच व्हाव्यात.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या या न्याय्य संघर्षात ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. आवश्यक असल्यास राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल.
नांदेडच्या महामोर्चात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गांचे संचालक, विविध विद्यार्थी संघटना आणि नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा हा लढा निश्चितच यशस्वी होईल.
“विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि MPSC च्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन (OMR) पद्धतीने घेण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.”
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar @CongressRojgar @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@bhimanwar
Cmसर🙏
2दिवस अगोदर आपण शब्द दिला
आणि आज तोच शब्द आपण "अर्धवट पाळला"
एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात
पेपर फक्त ऑफलाईन पद्धतीत शक्य आहे
आता आपण "ऑगस्ट 2027"चा जावई शोध
का आणि कसा लावला??
त्या बैठकीत तर तस तुम्ही काहीही बोलला नाहीत
मग आज का आणि कशा व कोणासाठी??
ऑगस्ट २०२७
ऑफलाइन परीक्षा घेणं जर MPSC ला जमत नसेल, तर अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा. तुमच्याकडून बदलाची अपेक्षा होती, पण लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात ढकललं. आज ८–९ लाख विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. याची जबाबदारी कोण घेणार? @bhimanwar@CMOMaharashtra@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षांची परीक्षा योजना अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी मोठ्या संभ्रमात असून त्यांच्या अभ्यासाचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून MPSC च्या परीक्षा पद्धती, ऑनलाइन (CBT), ऑफलाइन (OMR), नॉर्मलायझेशन, अभ्यासक्रम आणि परीक्षा प्रक्रियेबाबत विविध चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत सरळसेवा परीक्षांची निश्चित परीक्षा योजना जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
परीक्षेची पद्धत, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, गुणांचे वितरण, विषय, परीक्षा प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या बाबी स्पष्ट नसताना विद्यार्थ्यांनी नेमकी कोणत्या पद्धतीने तयारी करावी, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. हजारो विद्यार्थी पूर्णवेळ अभ्यास करत आहेत. अनेकांनी नोकरी, व्यवसाय आणि इतर संधी बाजूला ठेवून आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दिली आहेत. त्यामुळे आयोगाकडून होणारा प्रत्येक विलंब त्यांच्या भविष्यावर थेट परिणाम करणारा ठरत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सातत्याने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी भूमिका घेतली आहे. MPSC च्या सर्व परीक्षा पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थीहित जपणाऱ्या पद्धतीने होणे हीच आमची भूमिका आहे. त्याच अनुषंगाने सरळसेवा परीक्षांची परीक्षा योजना देखील कोणताही विलंब न करता तात्काळ जाहीर करण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे.
आयोगाने परीक्षा योजना जाहीर करताना विद्यार्थ्यांमध्ये कोणताही संभ्रम राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, गुणांकन पद्धती, परीक्षा दिनदर्शिका आणि पुढील भरती प्रक्रियेबाबत स्पष्ट, सविस्तर आणि अधिकृत माहिती एकाच वेळी जाहीर करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना योग्य नियोजन करून अभ्यास करता येईल.
विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक ऊर्जा अमूल्य आहे. त्यांचा संयम पाहण्यापेक्षा त्यांच्या भविष्याचा विचार करणे ही आयोगाची जबाबदारी आहे.
म्हणूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आमचे स्पष्ट आवाहन आहे.
1. सरळसेवा भरती परीक्षांची परीक्षा योजना तात्काळ जाहीर करा.
2. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित विषयांमध्ये अनिश्चितता आणि विलंब टाळा.
3. हजारो विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका.
4. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ न करता, पारदर्शकता आणि वेळबद्धतेचे तत्त्व स्वीकारून त्वरित निर्णय घ्या.
विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा विश्वास कायम राहिला पाहिजे आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक भरती प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक व विश्वासार्ह झाली पाहिजे, हीच अपेक्षा.
@mpsc_office@degree_holders@Mpsc_Andolan@bhimanwar @CongressRojgar
#MPSC_ExamPlan_जाहीर_करा
MPSC ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट 2027 पासून घेणार हा आपला निर्णय म्हणजे "आजचे मरण उद्यावर ढकलणे"
MPSC मार्फत एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याइतपत इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नाही तोपर्यंत परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या. यावर फेरविचार करावा
@CMOMaharashtra
@INCMaharashtra तुम्हाला अजुन लढव लागेल हे सरकार आणि आयोगाने आॅनलाईन परिक्षेची मागणी नसताना गोरगरीब लेकरावर यासाठी तुम्ही राज्यभर मोहीम चालू करा या सरकारला पाय उतार कराव लागेल
आत्तापर्यंत फक्त घोषणाच झालेल्या आहेत प्रत्यक्षात मात्र विविध प्रशासकीय करणे देऊन "मेगाभरती" प्रक्रिया लांबण्याचे षडयंत्र सुरू आहे, बेरोजगार उमेदवारांचे वाढते वय, ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थिती यामुळे तरुण पिढी प्रचंड नैराश्यात आहे.
#MPSC
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@AbhiPawarBJP