हजारो पदांचा अनुशेष असूनसुद्धा जलसंपदा विभाग पदभरतीची कार्यवाही करताना दिसत नाही. सेवाप्रवेश नियम अद्याप प्रसिद्ध न झाल्याने जलसंपदा व पाणीपुरवठा ह्या दोन्ही विभागांची पदभरती प्रलंबित आहे. पदभरती तात्काळ जाहिर करावी.
#WRD_JE#WRD_Recruitment
सिंचनासाठी अभियांत्रिकी पद हे खूप महत्वाच आहे परंतु जायकवाडी सिंचन क्षेत्राची रिक्त पदांची अतिशय भीषण परिस्थिती, पैठण मध्ये ३५ पैकी केवळ १४ कनिष्ठ अभियंता, १.४२ लाख हेक्टर सिंचनासाठी केवळ १८ अभियंता,परभणीत ४३ पैकी ४,तसेच दोन्ही विभागात ७८ पैकी ६० अभियंता पदे रिक्त.
#WRD_JE
🛑 आंदोलन 🛑
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी) १००% रिक्त पदभरती झालिच पाहिजे .
जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती झालीच पाहिजे.
📢 युवा अभियंत्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
#WRD_JE#WCD_Recrutiment@girishdmahajan@SanjayDRathods
कंत्राटदार, बेरोजगार अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी सर्वांची सारखीच परिस्थिती आहे. जलसंपदा कनिष्ठ अभियंता@girishdmahajan आणि जलसंधारण पदभरती@SanjayDRathods या जाहिराती देखील लवकरात लवकर प्रसिद्ध झाल्या पाहिजेत.
विद्यार्थी प्रचंड निराशेच्या भावनेत आहेत. नम्र विनंती 🙏
प्रति,
मा. विश्वास पाठक,
संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (MSEB),
मुंबई.
विषय: महावितरण विभागातील सहाय्यक अभियंता (AE) व कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या रिक्त जागा तातडीने भरण्याबाबत.
@vishwasvpathak@INCHarshsapkal
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता( स्था/वि/यां) पदाचे सेवा प्रवेश नियम तत्काळ प्रसिद्ध करून लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती 🙏🙏
#WRD_Recruitment@Deepakk75058621@girishdmahajan
विद्यार्थ्यांसाठी नेहमीच तत्पर असणारे आमदार @AbhiPawarBJP यांनी सरळसेवेतून होणाऱ्या भरती साठी अधिकृत केंद्र म्हणजेच #TCS_ion केंद्रच देण्यात यावे जेणेकरून परीक्षेची पारदर्शकता राखली जाते व होतकरू विद्यार्थ्यांना न्याय मिळेल ही मागणी केली @mybmc@CMOMaharashtra@mieknathshinde
मुंबई महानगरपालिकेच्या गट अ ची परीक्षा IBPS ने घेऊन देखील परीक्षेत घोटाळा झाल्याचे वृत्त आहे. सध्या IBPS मार्फत होत असलेल्या #SE व #JE परीक्षेच्या पारदर्शकतेवर शंका येते. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही @mybmc ची असेल.
https://t.co/w80jhk4kK6
मा. भूषण गगराणी
आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका
विषय: कनिष्ठ अभियंता/दुय्यम अभियंता (स्थापत्य) परीक्षा २०२५ संदर्भात संभाव्य गैरप्रकारांविषयी तक्रार.
महोदय,
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदांसाठी ३, ८ आणि ९ मार्च २०२५ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भात काही दलाल आणि विद्यार्थ्यांमध्ये गैरप्रकार घडवून आणण्याचा संभाव्य कट असल्याची माहिती मिळालेली आहे.
विशेष म्हणजे, परीक्षेतील गुण (मार्क) वाढविण्याबाबत काही व्यक्तींमध्ये संवाद झाला असून, त्याचे ऑडिओ पुरावे उपलब्ध आहेत. या प्रकाराचा गंभीर परिणाम होऊ शकतो, तसेच मागील परीक्षा काळात असे काही घडले आहे का, याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.
तरी, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, अशा प्रकारांच्या निवारणासाठी त्वरित योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
आपण या प्रकरणाची योग्य आणि तत्काळ दखल घेवून, परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष होईल याची खात्री करावी, ही विनंती.
धन्यवाद!
धनंजय रामकृष्ण शिंदे
@mybmc@ArvindKejriwal@AUThackeray @harshsapkal @ShelarAshish@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@iambadasdanve@CMOMaharashtra
#BMC_At_TCS_Ion_Centre #tcs
#AAP #MCGM
#BMC बृहन्मुंबई महानगरपालिका #Engineer भरतीत घोटाळा/सेटिंग झाली आहे का?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता(स्थापत्य) या पदाची परीक्षा ही ३/८/९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षेबाबत घोटाळा करण्याच्या काहींचा मनसुबा आहे.
काही दलाल आणि विद्यार्थ्यांची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. परीक्षेतील मार्क वाढवण्यासाठी यांचे बोलले सुरू आहे.
BMC भरतीत घोटाळा होऊ नये म्हणून फक्त #TCS_ION ची परीक्षा केंद्रे द्यावे म्हणून आपण मागणी करतो आहोत, उमेदवारांनी आंदोलने सुद्धा केली परंतु तरीही BMC प्रशासन नमले नाही.
BMC आणि सरकारने या ऑडिओ क्लिपला गांभीर्याने घेऊन याची पोलिसांमार्फत चौकशी करावी. असे गैरप्रकार होऊ नये म्हणून आम्ही केलेल्या मागण्या पूर्ण करून परीक्षा घ्याव्यात ही नम्र विनंती.
@mybmc@Dev_Fadnavis@AUThackeray@mieknathshinde @Dhananjay_AAP @AjitPawarSpeaks@RRPSpeaks@ShelarAshish@Awhadspeaks @degree_holders @CMOMaharashtra@PatilKailasB@AbhiPawarBJP @harshsapkal .
@Mpsc_Andolan मुंबई महानगरपालिकेच्या SE आणि JE परीक्षा खाजगी केंद्रांवर न घेता सरकारमान्य TCS Ion या संस्थेच्या परीक्षा केंद्रावर घेण्याच्या लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करुन त्यांना न्याय द्यावा ही विनंती.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता(स्थापत्य) या पदाची परीक्षा ही ३/८/९मार्च २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षे बाबत घोटाळा करण्याच्या काहींचा मनसुबा आहे. काही दलाल आणि विद्यार्थ्यांची ही ऑडिओ क्लिप आहे. परीक्षा मधील मार्क वाढवणे या संदर्भात यांचे बोलले सुरू आहे. हे प्रकरण BMC आणि सरकारने गांभीर्याने घेऊन असले मार्क वाढवण्याचे प्रकार होऊ देऊ नका आणि मागील परीक्षे मध्ये पण असे काही झाले आहे का यांची चौकशी करा.
https://t.co/CsNzvEf8S6
https://t.co/CsNzvEf8S6
@mybmc@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AUThackeray@mieknathshinde@ShelarAshish@RRPSpeaks @degree_holders
सहा महिने काम करून #मुख्यमंत्री_युवा_कार्य योजनेतील उमेदवार आता "कायमस्वरूपी नोकरी" मागत आहेत.
राज्य सरकारने अशा मागण्यांकडे लक्ष देऊ नये. कारण लाखो प्रामाणिक बेरोजगार अनेक वर्षांपासून नोकर भरतीची तयारी करत आहेत, आमच्या हक्काच्या नोकऱ्या सहा महिने काम करणाऱ्यांना दिल्यात तर तो आमच्यावर अन्याय असेल.
मुख्यमंत्री_युवा_कार्य योजनेला आम्ही आधीपासूनच विरोध केला आहे, कारण ही सहा महिन्याची कंत्राटी भरती आहे.
महाराष्ट्रात सध्या प्रचंड #बेरोजगारी असून, मुख्यमंत्री युवा कार्य योजना हा त्यावर उपाय नाही. ही योजना तत्काळ बंद करून, कायमस्वरूपी नोकर भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध कराव्या ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AUThackeray@RRPSpeaks@AbhiPawarBJP @harshsapkal
संयुक्त गट ब परिक्षा २०२२ मधील पोलीस उप-निरीक्षक पदाचा अंतिम निकाल लागूनही अद्यापही उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही. मात्र याच परिक्षेतील राज्य कर-निरिक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी या पदांच्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. म्हणजेच एकाच परिक्षेतील इतर दोन पदांची नियुक्ती दिली गेली पण पोलीस उप-निरीक्षक पदासाठी निवडलेल्यांबाबत मात्र सरकारची उदासिनता दिसून येते. पोलीस उप-निरीक्षक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळत नसल्याने त्यांना मानसिक ताण सहन करावा लागतोय. तरी सरकारने या प्रकरणी लक्ष घालून नियुक्तीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office