@RVikhePatil सर तुम्ही जर मनावर घेतले तर हजारो बेरोजगार अभियंत्यांचे तुम्ही आयुष्य बदलू शकता आम्ही मागील तीन वर्षांपासून प्रलंबीत जलसंपदा विभागाच्या रिक्त कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात प्रसिद्ध करावी यासाठी पाठपुरावा करत आहोत कृपया आमचे मागण्या मान्य करा. @RVikhePatil
जलसंधारण पदभरतीबाबत मृद व जलसंधारण मंत्री मा. संजय राठोड यांनी आतापर्यंत ९ वेळा घोषणा केल्या आहेत. पहिल्या घोषणेला एक वर्ष पूर्ण होत आले असले तरीही पदभरतीची जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. High Power Committee तसेच वित्त विभागाची परवानगी मिळालेली असतानाही विभाग कोणत्या गोष्टीची वाट पाहत आहे, हे न समजणारे कोडे ठरत आहे.
वाढते वय आणि वाढती बेरोजगारी यामुळे विद्यार्थी आधीच चिंतेत आहेत. त्यामुळे जलसंधारण मंत्री संजय राठोड साहेबांना विनंती आहे की पुढील #Cabinet बैठकीत मृद व जलसंधारण विभागाच्या नवीन आकृतीबंधाला मान्यता देऊन कृपया लवकरात लवकर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी आणि ती प्रक्रिया TCS मार्फत राबवावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.
@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@AbhiPawarBJP@SanjayDRathods
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच विधानपरिषद आमदार संदीप जोशी यांना नागपूर येथे प्रलंबित पदभरती बाबत नागपूर येथील विद्यार्थ्यांनी निवेदन दिले.
जलसंधारण खात्यातील सुमारे ८ हजार ६६७ पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबविण्याची घोषणा मृद व जलसंधारण मंत्री महोदयांनी वर्षभरापुर्वी केली होती. या भरतीसाठी 'इंजिनिअरींग असोसिएशन' ही अभियंत्यांची संघटना सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या मागणीसाठी सदर संघटनेच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले. वाढते वय आणि बेरोजगारी यामुळे अभियंते चिंतेत आहेत. पदभरतीची जाहिरात वेळेत प्रसिद्ध होऊन ही प्रक्रिया पार पडली तर अनेक अभियंत्यांना रोजगार मिळू शकेल. हे लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री आणि मृद व जलसंधारण मंत्री यांनी या विभागातील ही भरती तातडीने जाहिर करुन वेळेत पुर्ण करावी.
@CMOMaharashtra@SanjayDRathods
जलसंधारण विभागाने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, पदभरती बाबत सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन देखील जाहिरात का प्रसिद्ध केली जात नाही? लाखो विद्यार्थी आज जाहिरातीची वाट बघत आहेत याची देखील विभागाने गांभीर्याने नोंद घेऊन जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती.
@SanjayDRathods
आपण पदभरती घोषणा करून आज नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे परंतु अद्याप देखील #जलसंधारण विभाग पदभरती जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे आपण केलेल्या घोषणेवर विश्वास ठेऊन लाखो मुले अभ्यास करत आहेत. कृपया दखल घ्यावी ही नम्र विनंती.
आदरणीय जलसंधारण मंत्री @SanjayDRathods आपण वेळोवेळी विद्यार्थ्यांना "नवीन पदभरती बाबत"आश्र्वासित केलेलं आहे परंतु तोंडावर आलेली आचारसंहिता पाहता आचारसंहिता लागण्यापूर्वी पदभरती जाहिरात प्रसिद्ध होणे गरजेचं आहे त्यामुळे आपणास विनंती आहे की कृपया लवकरात लवकर पदभरती मार्गी करावी.
मृद व जलसंधारण विभाग नवीन आकृतीबंध तयार असूनसुद्धा अद्याप मंजूरी अभावी रखडला आहे,परिणामी जाहिरात प्रक्रियेचे आदेश असूनसुद्धा कार्यवाही अडकली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये आकृतीबंधाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती 🙏
#WCD_Recruitment@SanjayDRathods@Dev_Fadnavis
🔴 वाल्मी आंदोलन 🔴
📍 वाल्मी,छत्रपती संभाजीनगर आंदोलन..!
जलसंधारण पदभरती बाबत उद्या छत्रपती संभाजीनगर येथील बेरोजगार स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आणि आमच्या पदाधिकारी यांची उद्या सकाळी ९:०० वाजता मीटिंग ठेवली आहे.
#WCD_Recruitment@SanjayDRathods@Dhananjay4INC
@degree_holders @SanjayDRathods चाळीसगाव
साहेब आज आपण चाळीसगाव येथे असताना आमच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी देखील " जलसंधारण विभाग" पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी याबाबत निवेदन दिले. आपण दिलेल्या निवेदनावर लवकरात लवकर कार्यवाही कराल ही अपेक्षा.🙏
@SanjayDRathods#WCD_Recruitment
दिनांक ३१ जुलै रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार @PrashantBumbMLA साहेबांनी छ. संभाजीनगर मधील विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन प्रधान सचिव जलसंधारण विभाग यांना पत्र दिले. खूप खूप आभार @PrashantBumbMLA साहेब.
#WCD_Recruitment
#GST संकलनात महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक आहे परंतु राज्यातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अभियांत्रिकी आणि सर्वच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येच्या जाहिराती येण्यासाठी प्रत्येक वेळी संघर्षच करावा लागतो मग तो #Combine, राज्यसेवा किंवा सरळसेवेतील जलसंपदा, जलसंधारण विभाग असो.
जलसंपदा व जलसंधारण विभागाने आंदोलनाची तत्काळ दखल घेऊन दोन्ही विभागांतील रिक्त पदांच्या भरतीसाठी तातडीने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा.
🔹 जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदे
🔹 जलसंधारण विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील सर्व १००% रिक्त पदे
…या भरती प्रक्रियेस तात्काळ सुरुवात झाली पाहिजे, ही कांग्रेस पक्षाची अगदी स्पष्ट मागणी आहे.
@INCHarshsapkal
#WCD_Recruitment
#WRD_JE
#RojgarSatyagraha
#CongressForYouth