@suvishelke नगरपरिषद भरतीची कागत पडताळणी होऊन रिझल्ट लागून सर्व झाले आहे आचारसंहिता तोंडावर असून सुद्धा नियुक्त्या रखडल्या आहेत. काहीतरी करा साहेब आम्ही सिक्युरिटी गार्ड ची नोकरी करत असून पोट भरतं आहोत.
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२९०���०१.
प्रति,
मा. एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र.
विषय : नगरपरिषद भरती २०२३ मध्ये निवड झालेल्या १७८२ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्याबाबत.
महोदय,
उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येत आहे की, नगर परिषद भरती २०२३ सरळसेवा परीक्षा माहे ऑक्टोबर नोव्हेंबर २०२३ मध्ये झाली होती. सदर परीक्षेचा निकाल तब्बल ९ महिन्यांनी म्हणजेच १० जुन २०२४ रोजी जाहीर झाला होता. निवड झालेल्या उमेदवारा���ची कागदपत्र तपासणी १ जुलै २०२४ पासून १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत म्हणजेच तब्बल १.५ महिना सुरू होती. आज सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन देखील नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून उमेदवारांना नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाहीत. राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग या विभागांच्या परीक्षा नगरपरिषद परीक्षांच्या नंतर होऊन सुद्धा संबंधित विभागांनी नियुक्तीपत्राचे उमेदवारांना वाटप केले आहे. गेल्या 1 वर्षभरापासून उमेदवार प्रचंड तणावात आहेत.
कृपया आपण या विषयात वैयक्तिक लक्ष घालून या १७८२ उमेदवारांना न्याय द्यावा हि विनंती.
धन्यवाद,
@mieknathshinde @CMOMaharashtra
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२७०८०४
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
ऊर्जामंत्री, महाराष्ट्र राज्य
विषय: महावितरण मधील विद्युत अभियंता पदभरती संदर्भातील उमेदवारांच्या मागण्यांबाबत.
महोदय,
वरील विषयाच्या अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येत आहे की महावितरण मधील "विद्युत अभियंता पदभरती" मध्ये ऊर्जा विभागाने टाकल���ल्या अटी/शर्तीमुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याची भावना आहे. उमेदवारांच्या मागण्या पुढीलप्रमाणे.
१. GATE परीक्षेची सक्ती रद्द करावी.
२. "स्किल इंडिया" च्या आधारे मेरिटनुसार नियुक्त झालेल्या ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग अप्रेंटिस (Graduate engineer Training Apprenticeship) विद्यार्थ्यांनी आयुष्यातील एक वर्ष महावितरण मध्ये विना वेतन काम केले आहे. अशा विद्यार्थ्यांना अनुभवाच्या आधारावर महावितरण पदभरती मध्ये प्राधान्य मिळावे.
३. कनिष्ठ अभियंता पदांची जागवाढ
४. महाराष्ट्र शासनाची पदभरती असल्याने ��धिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात यावे.
या पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येत आहे कि विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा व त्यांना न्याय द्यावा.
धन्यवाद,
@Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis 1) गेट परीक्षा रद्द करावी
2) महाराष्ट्राचे डोमासाईल कंपल्सरी करावे
3)सर्व पदांकरिता जागा वाढ करावी
4) ज्या जुन्या विद्यार्थ्यांचे अंतिम निवड यादीत नाव आहे त्यांना जॉइनिंग द्यावी
5) iTi वरील कंत्राटी बंद करून परमनंट भरती .
🕐 12.50pm | 24-6-2024📍 PrakashGad, Mumbai | दु. १२.५० वा. | २४-६-२०२४📍 प्रकाशगड, मुंबई.
💡 Chaired a meeting with the senior officials of the Energy Department to discuss important matters.
💡 ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या विषयांवर बैठक घेतली.
💡 ऊर्जा विभाग के वरिष्ठ अधिकारियों के साथ महत्वपूर्ण विषयों पर बैठक ली।
#Maharashtra #Mumbai #Energy
प्रिय ऊर्जामंत्री साहेब ,
1) ���हावितरण साठी गेट परीक्षा रद्द करावी
2) महाराष्ट्राचे डोमासाईल कंपल्सरी करावे
3)सर्व पदांकरिता जागा वाढ करावी
4) ज्या जुन्या विद्यार्थ्यांचे अंतिम निवड यादीत नाव आहे त्यांना जॉइनिंग द्यावी
5) iTi वरील कंत्राटी बंद करून परमनंट भरती करावी.
@Dev_Fadnavis
ऊर्जा विभागाच्या बेछूट कारभाराला कंटाळून बेरोजगार तरुणावर जीवन संपवण्याची वेळ येणं हे अत्यंत धक्कादायक आहे.
सहवेदना!
किरण लांडगे यांना भावपूर्ण आदरांजली 💐🙏
@AAPMaharashtra@Dev_Fadnavis
ऊर्जामंत्री आणि गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील लाखो बेरीजगार तरुण तरुणींचे “खलनायक” आहेत.
संधिसाधू “महायुती” सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करुन तरुण तरुणी अद्दल घडवतील.
@Dev_Fadnavis@AAPMaharashtra@Mpsc_Andolan @degree_holders @TulsidasBhoite@waglenikhil
@suvishelke@CMOMaharashtra महापारेशन जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करून परीक्षा जुलै - ऑगस्ट पर्यंत घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. एक वर्ष होऊन गेलं जाहिरात येऊन अद्याप परीक्षा नाही आणि महापारेशनच्या काही झालेल्या परीक्षा सुद्धा रद्द केल्यात खूप त्रास होत�� साहेब या गोष्टींचा.