राज्यातील कृषी विभागात कृषी सेवक म्हणून कार्यरत असलेल्यांना मानधन वाढवून मिळावे यासाठी आज काही कृषी सेवकांनी माझी भेट घेतली. शासन आणि शेतकरी यांच्या मधील प्रमुख दुवा म्हणून कार्य करणाऱ्या कृषी सेवकांना अवघ्या ६००० रुपयांच्या मानधनावर काम करावे लागणे हे दुर्दैवी आहे.
महागाईने उच्चांक गाठला आहे, अशा परिस्थितीत तुटपुंज्या पगारावर कृषी सेवक आपले घरदार कसे चालवणार? मनरेगा अंतर्गत रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना देखील कृषी सेवकांपेक्षा जास्त मानधन मिळते. कृषी सेवकांच्या खांद्यावर भिस्त ठेवून सर्व योजना राबविल्या जातात. त्यांच्या कष्टांचा सहानभुतीपूर्वक विचार करून मानधनात लवकरात लवकर वाढ करावी, ही विनंती.
नाव - रीहा बुलोज. वय फक्त ११. देश फिलीपाईंस. मुलीची गेली दोन वर्ष भुणभुण...बाबा मला रनींगचे शूज आणा.. बाबांचे एकच ऊत्तर ..शक्य नाही .., परवडत नाही. म्हणता म्हणता ..देशस्तरावर शालेय स्पर्धा जवळ आली.. ही ..फायनल राऊंड ला गेली. सर्व स्पर्धक हायफाय शूज मधे..