मा. @samant_uday साहेब, @midc_india
सरळसेवा भरती २०२६ अंतर्गत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठी नियुक्ती स्वीकारण्याची मुदतवाढ दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना संधी देऊन लवकरात लवकर नियुक्ती देण्यात यावी, ही नम्र विनंती.
राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांपासून ते आयोगाचे अध्यक्ष यांनी २०२६ मध्ये ५० ते ६० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असे वारंवार सांगण्यात आलेले होते तरी ऑगस्ट २०२७ पूर्वी ती भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.
@Dev_Fadnavis@GondaneDevesh@mpsc_office@Dhananjay4INC
#MPSC गट क संयुक्त सेवा परीक्षेसह यापुढच्या सर्व परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन करण्याच्या #MPSC च्या निर्णयाला राज्यातील विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध असून पुण्यात या विद्यार्थ्यांना भेटून याबाबत त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. ऑनलाईन परिक्षेमुळं होणारी पेपरफुटी, भ्रष्टाचार तसंच नॉर्मलायझेशनमुळं होणारा विद्यार्थ्यांवर अन्याय असे अनेक मुद्दे यावेळी विद्यार्थ्यांनी सविस्तर मांडले.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि #MPSC च्या अध्यक्षांची भेटून त्यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय मागे घेण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं. तसंच जर याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर १२ जुलैनंतर विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावरचा लढा लढण्याची तयारी असल्याचं आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांना दिलं.
मा. भिमनवार जी,
MPSC ने ऑफलाईन परीक्षेचा निकाल अवघ्या 21 दिवसांत जाहीर करून दाखवला आहे. त्यामुळे "वेगवान निकालासाठी CBT हाच एकमेव पर्याय आहे" हा दावा आता पोकळ ठरतो. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्या संवादाची तारीख कृपया जाहीर करा.
CBT चा आग्रह सोडून, राज्यातील विद्यार्थ्यांचा आवाज ऐका आणि पारदर्शक, विश्वासार्ह ऑफलाईन परीक्षांवर लक्ष केंद्रित करा.
@bhimanwar@mpsc_office
भविष्यात होणाऱ्या "मेगाभरतीच्या " अनुषंगाने "कॅडर बकेटींग" शासन निर्णय तसेच लोकसेवा आयोगाकडून "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत याबाबत तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर जाहिराती प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा.@CMOMaharashtra
भुमी अभिलेख विभागाची अधिवेशनात लक्षवेधी आली आणि@cbawankule यांनी नवीन आकृतीबंधाला मान्यता दिल्याची घोषणा केली आणी लगेच आकृतीबंध शासन निर्णय प्रसिद्धही केला.जलसंधारण मंत्री @SanjayDRathods घोषणा करून वर्ष झाले अद्याप आकृतीबंध नाही,कसा महाराष्ट्र "जलसमृद्ध"होणार?
#WCD_Recruitment
PMC कनिष्ठ अभियंता पदाच्या 169 जागांसाठी २५ जानेवारी रोजी होत असलेल्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी TCS ION केंद्रांची मागणी करूनही त्यांना खाजगी परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. यापुर्वी खाजगी परीक्षा केंद्रांवर झालेले गैरप्रकार पाहता सदरील परीक्षा पुन्हा खाजगी केंद्रांवरच घेतली तर परत गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासोबतच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना ३०० किमीहून अधिक दुरची केंद्र देण्यात आली आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी सरकारने तात्काळ सदरील विषयामध्ये लक्ष घालून खाजगी केंद्रांऐवजी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्याबाबत निर्णय घ्यावा, ही विनंती...!
@Dev_Fadnavis@mieknathshinde
PMC Jr इंजिनिअर पदभरतीसाठी २५ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्जात निवडलेली परीक्षा केंद्रे देण्यात आलेली नाहीत.
काही विद्यार्थ्यांना शेकडो किमी अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. पुणे महापालिका आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करून परीक्षा केंद्रे बदलून अधिकृत TCS iON Centre वर परीक्षा घ्यावी.
#TCSion
@PMCPune@navalMH
संदर्भ : महाराष्ट्र_काँग्रेस/२०२६/००६.
प्रति,
मा. आयुक्त,
पुणे महानगरपालिका,
पुणे.
विषय : PMC Junior Engineer (Civil) परीक्षा केवळ TCS iON अधिकृत केंद्रांवर घेण्याबाबत.
महोदय,
पुणे महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या Junior Engineer (Civil) पदाच्या परीक्षेबाबत, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या वतीने ही बाब आपल्या निदर्शनास आणत आहे.
दिनांक १ डिसेंबर २०२५ पूर्वीच सदर परीक्षा TCS iON या अधिकृत आणि विश्वासार्ह केंद्रांवर घ्यावी, अशी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सकारात्मक विचार होईल, या अपेक्षेने पुणे महानगरपालिकेने परीक्षेची तारीख पुढे ढकलली होती. मात्र, आता हीच परीक्षा २५ जानेवारी २०२६ रोजी खासगी (Private) परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येत असल्याचे समजते, जे अत्यंत चिंताजनक आहे.
१) परीक्षा सुव्यवस्था आणि केंद्र व्यवस्थापन :
सदर परीक्षा पुन्हा खासगी केंद्रांवर आयोजित करण्यात आली असून, अनेक उमेदवारांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून ३००-४०० किलोमीटर अंतरावर केंद्रे वाटप करण्यात आली आहेत. सामान्यत: अशा मोठ्या प्रमाणातील परीक्षा TCS iON सारख्या सक्षम यंत्रणेमार्फत २-३ दिवसांच्या स्लॉटमध्ये सुव्यवस्थितपणे पार पाडता येतात. मात्र, PMC सारखी महत्त्वाची परीक्षा एकाच दिवशी ४२,००० पेक्षा अधिक उमेदवारांसाठी खासगी केंद्रांवर घेण्यात येत आहे. यातील अनेक केंद्रांची रेटिंग, सुविधा आणि पारदर्शकता अत्यंत निकृष्ट असल्याची वस्तुस्थिती आहे.
२) परीक्षा गांभीर्य आणि उमेदवारांचा मानसिक त्रास :
अचानक आणि पुरेशी पूर्वसूचना न देता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास नियोजन, निवास व्यवस्था तसेच काही उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या ड्युटीसंबंधी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तब्बल २ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या परीक्षेसाठी अपारदर्शक आणि असुविधाजनक खासगी केंद्रांवर परीक्षा देण्याची सक्ती केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता, आपणास विनम्र विनंती आहे की, PMC Junior Engineer (Civil) परीक्षा दिनांक २५ जानेवारी २०२६ ही केवळ TCS iON अधिकृत केंद्रांवरच आयोजित करण्यात यावी. यामुळे परीक्षेतील पारदर्शकता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता सुनिश्चित होईल. तसेच, उमेदवारांचा अनावश्यक प्रवासाचा त्रास टाळून योग्य आणि समतोल परीक्षा वातावरण निर्माण होईल.
आपण विद्यार्थ्यांच्या हक्क, भविष्य आणि प्रशासकीय जबाबदारीचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.
धन्यवाद,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करिता,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस
अध्यक्ष : रोजगार व स्वयंरोजगार विभाग (भ्रमणध्वनी : ९८६७६ ९३५८८)
प्रत,
मा. हर्षवर्धन दादा सपकाळ, प्रांताध्यक्ष : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@PMCPune@INCHarshsapkal@INCMaharashtra@CMOMaharashtra
@degree_holders @cbawankule@iYogeshRKadam@maharevenue भू-अभिलेख विभागाच्या परीक्षेचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. निकाल तात्काळ जाहीर करून उमेदवारांना दिलासा द्यावा, अशी नम्र विनंती.
@degree_holders @cbawankule@iYogeshRKadam@maharevenue भूमी अभिलेख विभागामार्फत भूकरमापक (Group-C) पदाच्या एकूण 903 जागांसाठी दि. 13 व 14 नोव्हेंबर 2025 रोजी IBPS कंपनी मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षा होऊन आजतागायत 30 दिवसांहून अधिक कालावधी लोटला असून, तरीही अद्याप परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.
भूमिअभिलेख विभागांमधील भूकरमापक (Surveyor) Group-C परीक्षा होऊन 1.5 महिने झाले अजूनपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही आहे तरी,मा. मंत्री महोदयांनी कृपया तातडीने निकाल जाहीर करण्याचे आदेश विभागाला द्यावेत, ही नम्र विनंती. @cbawankule@iYogeshRKadam@maharevenue
@samant_uday साहेब, 2023 ची जाहिरात, 2025 ला परीक्षा , 2 महिने निकाल लागून झाला तरी निवड यादी गुलदास्त्यात का? आचारसंहितेच्या नावाखाली विदयार्थ्यांचा किती अंत बघणार. नियुक्ती नाही मागत फक्त लिस्ट मध्ये स्वतःच नाव पाहायची लालसा आहे
अनेक वर्षांपासूनचा अंधार 2026 च्या आधी संपवा ही विनंती 🙏
@samant_uday MIDC भरती 2023-
शासनाच्या इतर विभागांची भरती प्रक्रिया सुरू असताना केवळ MIDC लाच आचारसंहितेचा अडसर का?
जाहिरात येऊन 2 वर्षे झाली. निकाल ऑक्टोबर मध्ये लागला असून पुढील प्रक्रिया (निवड यादी, कागदपत्र पडताळणी, नियुक्ती) तात्काळ सुरू करावी ही विनंती.
@midc_india@midc_CEO
@samant_uday MIDC result तयार असून फक्त इच्छेची कमतरता या कारणामुळे तुम्ही result लावत नाही आहे हे चुकीचा आहे.
MIDC office कडे संपर्क साधला असता वरून आदेश आल्याशिवाय लाऊ शकत नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे Result लवकर laun मुलांच्या प्रश्नाचे निराकरण करावे
@samant_uday MIDC result 2023 भरती जाहिरात अगोदरच दोन वर्षापासून रखडलेली आहे, तरी आता 2025 मध्ये परीक्षा झाली असून रिझल्ट तयार आहे, फक्त इच्छेची कमतरता या कारणामुळे रिझल्ट लावल्या जात नाहीये.