#तलाठी_भरती_2023#तलाठी_निकाल_जाहीर_करा
♦️ तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात पार पडली आहे. आज तब्बल 4 माहिने पूर्ण झाले असूनही आजपर्यंत निकाल लागला नाही.
👉 निकाल न लावायला पेसा क्षेत्र चे जरी कारण असले तरीही, पेसा क्षेत्र वगळता तलाठी भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या सूचना लवकरात लवकर शासनाने देण्यात याव्यात. ही नम्र विनंती.🙏🙏
👉 मेगाभरती मधील पदासाठी चे निकाल लावून 26 जानेवारी 2024 ला नियुक्ती पत्र देणार होते असे शासनाने जाहीर केले होते, पण सध्याच्या स्थितीनुसार पाहिले असता मेगाभरती ही आचारसंहिता मध्ये अडकण्याची स्थिती उद्भवली आहे. आधीच स्पर्धा खूप वाढली आहे तेच तेच मुले परीक्षा मध्ये रिपीट होत आहेत.
यावर विचार करून शासनाने
कृपया तलाठी भरती निकाल जाहीर करून उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी ही विध्यार्थी वर्गाच्या वतीने कळकळीची विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@RVikhePatil@TCS@RRPSpeaks@VijayWadettiwar@AbhiPawarBJP@iambadasdanve@Awhadspeaks@AUThackeray@NANA_PATOLE@supriya_sule
जिल्हा परिषद पदभरती मधील प्रस्तावित ७०% पदांच्या परीक्षा पार पडून बराच कालावधी लोटला आहे.बाकीच्या पदांच्या परीक्षा होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे त्यामुळे @girishdmahajan साहेबांनी लक्ष घालून झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी सूचना करावी.विनंती
#ZP_Results@PuneZp
तलाठी पद भरती परीक्षा
पशुसंवर्धन, सहकार विभाग पद भरती परीक्षा
वन विभागातील पद भरती परीक्षा
अर्थ सांख्यिकी विभागातील पद भरती परीक्षा
कृषी विभागातील पद भरती परीक्षा
अश्या राज्यातील विविध विभागासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षांचे निकाल महिन्यांपासून रखडले आहे. ज्यामुळे २५ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत असून मानसिक दडपणातून जात आहे.
राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ७५ हजार पदांची भरती पूर्ण करण्याचे आश्वासन राज्यातील तरुणांना दिले होते. भरती पूर्ण करणे तर सोडा सरकारने अजून परीक्षांचे निकाल जाहीर केलेले नाही.
सरकारच्या इतर आश्वासनाप्रमाने हे सुद्धा बेरोजगारांना प्रतीक्षेत ठेवून दिवस काढण्यासाठी दिलेले "सबुरी चे गाजर" असून दुसरे काही नाही.
मुंबई पोलीस भरतीचा पेपर असाच एकाने कॉपी करून बाहेर पाठविला, त्याचा तपास अजून सुरूच आहे, तरीही १००-१५० आरोपी अटकेत आहेत आणि शेकडो उमेदवारांची निवड रद्द झाली आहे.
वन विभाग, तलाठी भरतीचे पण असचं आहे, #SIT ने तपास होऊ द्या मग बघा कोण-कोण आत जातंय ते. आमचा अजेंडा एकच आहे #पारदर्शक_भरती , शिंदे-फडणवीस सरकार मध्ये दानत असेल तर #SIT ची घोषणा करावी.
⭕️ कृषी विभाग भरती घोटाळ्याची विस्तृत माहिती :
कृषी विभागात पकडलेल्या आरोपींची FIR कॉपी समन्वय समितीकडे आहे, FIR अनुसार परीक्षा ०८:३० ला सुरू झाली आणि आरोपी ०९:४० वाजता पर्यवेक्षकाला कुजुबुज करून हळू आवाजात बोलताना आढळून आला.पर्यवेक्षकाने सर्व अधिकाऱ्यांना बोलवून घेत ०९:५० ला उमेदवाराला ताब्यात घेतले, तेव्हा तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
उमेदवाराकडे मोबाईल, ATM कार्ड सारखे स्मार्ट कार्ड (ज्यातून सर्व कनेक्शन प्रस्थापित होते) कानात मायक्रो ब्लूटूथ आढळून आले. या आरोपीकडे मायक्रो बटण कॅमेरा आढळून आला "नाही", हा बोलून उत्तरे मागवत असल्याची शंका आहे. म्हणजे बटण कॅमेरा घालून इतर कोणीतरी पेपर फोडला असण्याची शक्यता आहे. आरोपीला तब्बल ०१ तास १० मिनटानंतर पकडण्यात आले, आरोपीचा अख्खा मोबाईल TCS ION पवई सारख्या परीक्षा केंद्राच्या आत गेलाच कसा? संभाजीनगर ION केंद्राप्रमाणे TCS ION पवईचा स्टाफ पण मॅनेज आहे का? : हा तपासाचा विषय आहे.
या घोटाळ्याच्या मुळाशी गेल्यास अनेक आरोपी आणि उच्चपदस्थ व्यक्ती सापडण्याची शक्यता आहे. दोन-चार जगांसाठी लढणाऱ्या आमच्या मित्रांसाठी सरळसेवा भरतीमधील सत्य परिस्थिती सांगणे आमचे कर्तव्य आहे.
@dhananjay_munde@Dev_Fadnavis@VijayWadettiwar@rrp
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात असे दृश्य म्हणजे आताच्या अपयशी सरकारचा आरसा आहे.
शिक्षक भरतीची TAIT परीक्षा घेऊन महिने उलटले तरी पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करून शिक्षक भरती करण्यात येत नाहीये, त्याविरोधात या तरुणाने आवाज उठविला आहे.
शिक्षणमंत्री गेल्या काही महिन्यांपासून म्हणताय ५०-५५ हजार शिक्षकांची भरती करू पण त्याचा मुहूर्त काही केल्या त्यांना सापडत नसल्याचे चित्र आहे. त्यात शाळा दत्तक देऊन बेरोजगार शिक्षकांना कायमचे बेरोजगार करण्याचे निर्णय शासनाकडून आखल्या जात आहेत.
कंत्राटी भरती करून कायमच्या नोकऱ्यांना संपविण्याचे कारस्थान सुरू आहे. शिंदे फडणवीस सरकारने शिक्षक भरतीच्या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध कराव्या, अन्यथा पुढली निवडणूक जवळच आहे.
#मराठीशाळा_वाचवा
#शाळादत्तक_योजनेचा_निषेध
@dvkesarkar@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks @surmayu
सत्ता प्राप्तीसाठी खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी पेपर फुटले ?
खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग शोधा हेच राज्यात सुरू असलेल्या पेपर फुटी मागचे कारण असू शकते असं वाटत आहे.
तलाठी भरती
मुंबई पोलीस भरती
वन विभाग भरती असे तीन तीन महत्वाच्या परीक्षांचे पेपर फुटतात कसे ?
ईडी, सीबीआय अश्या कार्यतत्पर संस्था असूनही आरोपी सापडत नाही. त्यामुळे सदर पेपर फुटी रॅकेटला कोणत्या महाशक्तीचा आशीर्वाद असेल हे तरुणांना कळले आहे.
त्यामुळेच त्यांनी या सर्व घोटाळ्यांची न्यायालयीन #SIT मार्फत चौकशी करण्याची आणि तत्काळ फेरपरीक्षा घेण्यात यावी ह्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या मागणीला आमचा पाठिंबा असून सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता तरुणांच्या मागणीचा विचार करावा.
@Mpsc_Andolan
मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यांच्या स्तरावर महाराष्ट्रात नोकरभरती घोटाळे सुरू आहेत. पोलीस भरती,वनविभाग भरती,तलाठी भरती ई. पेपर फुटलेले आहेत
तरीही मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं होत परीक्षा पारदर्शक सुरू आहे तर फडणवीस म्हणाले होते खोट्या बातम्या पसरविणाऱ्या वृत्तपत्रांवर हक्कभंग आणू
.@CPMumbaiPolice खेरवाडी पोलिसांनी म्हाडा भरती मधील गुन्हाचा तपास योग्य पद्धतीने केला नाहीये. जर तो तपास योग्य झाला असता तर मुंबई पोलीस भरती मधील घोटाळा नक्कीच थांबला असता. आज पर्यंत तपास योग्य झालाच नाहीये. म्हाडा भरती चा तपास योग्य झाला की नाही ते तपासा आणि पोलिसांवर कारवाई करा
एकाच वेळी २५००० उमेदवारांच्या बसण्याची व्यवस्था,अत्याधुनिक अशा परीक्षा केंद्राचे उद्घाटन बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केले
तर महाराष्ट्राने,नोकरभरती घोटाळ्यांमध्ये बिहारला मागं टाकलंय. महाराष्ट्रातील खोकेबाज राजकारण्यांना पक्ष फोडाफोडीमुळे आमच्या प्रश्नांवर लक्ष देण्यास वेळच नाही.
तलाठी भरतीचा पेपरच फुटलेला आहे, इतर शिफ्टचेसुध्दा पेपर फुटल्याची शक्यता आहे. परीक्षाच पारदर्शक होत नसल्याने सदर भरतीप्रक्रिया स्थगित करून,उपाययोजना करून नवीन वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्याशिवाय पर्याय नाही. सरकारने आमची विनंती न ऐकल्याने आम्ही लवकरच राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहोत
आज सकाळी विविध माध्यमांतून तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या. आणखी किती दिवस आपल्या विद्यार्थ्यांना हे सहन करावं लागणार आहे?
अशा प्रकारांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय तर होतोच, पण त्याचबरोबर सरकारी व्यवस्थेकडे बघण्याचा तरुणाईचा दृष्टिकोनही नकारात्मक होत चालला आहे. असं घडणं हे खूपच दुर्दैवी आहे.
विधानपरिषदेत मी हा मुद्दा उपस्थित केला होता. राज्य सरकारला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की हा दुहेरी धोका लक्षात घेऊन याला आळा घालण्यासाठी तातडीने ठोस पावलं उचलावीत!
#तलाठी_भरती #MPSC #PaperLeak
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks