संदभ : आप महाराष्ट्र/२०२४/१८०६००२
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री,
विषय : १) महापारेषण ची रद्द केलेली भरतीची लवकरात लवकर सुधारित
जाहिरात प्रसिद्ध करून विधानसभा निवडणूकिआधी परीक्षा
घ्याव्यात.
२) महापारेषण मधील सहाय्यक अभियंता (पारेषण) पदांच्या १००%
रिक्त जागांची पद भरती करावी.
३) महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ मधील Gate परीक्षेची १०%
गुणांची जाचक अट त्वरित रद्द करावी.
४) महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ AE आणि जाहिरात
क्र.८/२०२३ JE जागा वाढ करावी आणि
५) महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ AE साठी Open कॅटेगरी
साठी महाराष्ट्र राज्यातील निवास अनिवार्य करणे बाबत.
महोदय,
आपल्या ख्यात्याच्या अखत्यारीतील महापारेषण कंपनीने विविध पदांच्या भरतीसाठी जून २०२३ मध्ये शॉर्ट नोटिफिकेशन वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज उमेदवारांकडून भरून घेऊन परीक्षेची अंदाजित तारीख ही फेब्रुवारी/मार्च २०२४ मध्ये होईल असे नोटीफिकेशन मध्ये नमूद केले होते व जाहिरातीमधील नमूद पदांपैकी ८०% पदे परीक्षा झाल्यानंतर सदर जाहिरातीत अचानक १४ जून २०२४ रोजी पूर्ण पदांची भरती प्रक्रिया रद्द करत असण्याचे परिपत्रक द्वारे official साईट वर प्रसिद्ध करण्यात आले. सदर जाहिरात ही लाखो उमेदवारांसाठी सुवर्ण संधी म्हणून चालू असलेल्या प्रायव्हेट नोकऱ्या सोडून सर्व उमेदवार अभ्यासाची तयारी करत होते.
महोदय, गरीब परिस्थितीशी संघर्ष करत असलेले नांदेड येथील सहकारी किरण रामचंद्र लांडगे यांनी महापारेषण भरती रद्द केल्यामुळे आत्महत्या केली. अशीच काहीशी मानसिक परिस्थिती महापारेषणच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांची आहे. महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ मध्ये GATE परीक्षेत १०% गुणांची सक्ती केली असता १३ मार्च २०२४ रोजी आझाद मैदान मुंबई येथे संपूर्ण विद्युत अभियंता महाराष्ट्र यांनी आंदोलन केले असता, मा.अप्पर मुख्य सचिव ऊर्जा विभाग यांनी महावितरण कंपनी चे मानव संसाधन संचालक यांना GATE १०% गुणांची जाचक अट रद्द करण्यास सांगून देखील महावितरण प्रशासन एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्र मधील हजारो विद्युत अभियंता यांच्या वर अन्याय करत आहेत अशी सर्व उमेदवारांची भावना झाली आहे. महावितरण मध्ये AE साठी ६००+ आणि JE साठी ३००+ जागा रिक्त असता AE २८१ आणि JE ५१ अश्या तुटपुंज्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असल्याने असंख्य उच्च शिक्षित बेरोजगार विद्युत अभियंता यांच्या वर अन्याय होत आहे. १००% रिक्त पदांची भरती करण्यात यावी हि विनंती. तसेच, महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ AE मध्ये खुल्या वर्गासाठी महाराष्ट्र राज्याचा अधिवास अनिवार्य न केल्यामुळे राज्यातील स्थानिक उमेदवारांवर अन्याय झाल्याची भावना आहे. राज्यातील लाखो उमेदवारांमध्ये ऊर्जा विभाग प्रशासन विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि राज्यातील लाखो बेरोजगार तरुण तरुणींच्या वरील मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून त्यांना न्याय मिळवून द्यावा हि नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@AbhijitKaran25@ashish_jadhao@TulsidasBhoite@ameytirodkar@kamleshsutar
महापारेषण ची रद्द केलेली भरती प्रक्रिया तातडीने सूरू झालीच पाहिजे.
जून अखेर जाहिरात प्रसिद्ध करून ऑगस्ट महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन झाले पाहिजे.
SEBC आरक्षणासाठी भरती रद्द करण्याचा अजब निर्णय घेणाऱ्या ऊर्जा खात्याचा धिक्कार!
@CMOMaharashtra
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/१५०६०१
प्रति,
मा.देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री,
महाराष्ट्र.
विषय : महापारेषणची रद्द केलेली भरती, लवकरात लवकर सुधारित जाहिरात प्रसिद्ध करून विधानसभा निवडणूकीआधी परीक्षा घेण्याबाबत.
महोदय,
महापारेषण कंपनीने विविध पदांच्या भरतीसाठी जून २०२३ मध्ये शॉर्ट नोटिफिकेशन वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केले. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज उमेदवारांकडून भरून घेऊन परीक्षा अंदाजे फेब्रुवारी / मार्च २०२४ मध्ये होईल असे नोटीफिकेशन मध्ये नमूद केले होते. तसेच जाहिराती मधील नमूद पदांपैकी ८०% पद परीक्षा मार्च २०२४ मध्ये झाल्यानंतर सदर जाहिरात अचानक SEBC आरक्षणासाठी १४ जून २०२४ पूर्ण पदांची भरती प्रक्रिया रद्द करत असण्याचे परिपत्रक द्वारे अधिकृत साईट वर प्रसिद्ध करण्यात आले. सदर जाहिरात ही लाखो उमेदवारांसाठी सुवर्ण संधी म्हणून चालून आल्यामुळे खाजगी नोकऱ्या सोडून हजारो इच्छूक उमेदवार अभ्यासाची तयारी करत होते. परिस्थितीने व्याकूळ झालेल्या या बेरोजगार उमेदवारांवरील अन्याय दूर होणे गरजेचे आहे.
या घटनांमुळे राज्यातील विद्युत अभियंते व ITI Electrician यांच्यात ऊर्जा विभाग व प्रशासना विरोधात असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे. तरी त्यांच्या सर्व मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून त्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती.
@Dev_Fadnavis
#महावितरणच्या सहाय्यक अभियंता (जाहिरात क्र.७/२०२३) परीक्षेसाठी रहिवासी दाखला अनिवार्य करणे, GATE परीक्षेची अट रद्द करणे या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या असून विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार उर्जा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता वरिष्ठांकडे पाठपुरावा करून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच विद्यार्थ्यांना अपेक्षित असा सकारात्मक निर्णय होईल हा विश्वास आहे.
नगर परिषद जागा वाढ झाली पाहिजे.
100% पदभरती GR चे CM साहेबांच्या खात्याकडूनच उल्लंघन होतंय.
मोजक्याच पदांसाठी जाहिरात काढून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय.
नगर विकास अधिकारी कडून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली..6-7 वर्षानंतर येणारी जाहिरात,,60% पदे रिक्त ,, राज्यातील वाढती बेरोजगारी बघुन ही हि जागा वाढ का नाही..??
महावितरणमध्ये अलिकडेच कनिष्ठ अभियंता (JE) व सहाय्यक अभियंता (AE) पदासाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली. पण या जाहीरातीमध्ये जातसंवर्ग, आरक्षणानुसार पदे, GATE ची सक्ती, पात्रता निकष अशा अनेक तांत्रिक चुकी दिसून आल्या आहेत.
कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या ३०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५१ जागांची व सहाय्यक अभियंता (AE) पदाच्या ६०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ २८१ जागांची जाहीरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला आहे.
एकतर जाहीरात प्रसिद्ध होत नाही अन् झाली तर अशा एक ना अनेक चुका त्यात असतील तर विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. परिणामी सरकारने यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#नोकर_भरतीमधील_पेपरफुटी
लातूरात #PWD सार्वजनिक बांधकाम विभागाचा पेपर फुटला असल्याचा विद्यार्थांचा आरोप.
आज सार्वजनिक बांधकाम विभागातील महत्त्वाच्या अशा ज्युनिअर इंजिनियर पदाची परीक्षा लातूरातील Coss कॉम्पुटर इन्स्टिट्यूट येथे होती. काही ठराविक उमेदवारांना परीक्षा केंद्रामार्फत बाहेरून #चिठ्ठी द्वारे उत्तरे पुरविण्यात आली आहेत. इतर उमेदवारांनी याचा विरोध केला असता, पर्यवेक्षकांनी चिठ्ठी गायब करून उमेदवाराचा बचाव केल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.
PWD विभागाची अनेक पदे वर्ग-२/३ स्तरावरील आहे, जर त्या उमेदवाराला बाहेरून उत्तरे आली म्हणजे राज्यातून कोठून तरी पेपर फोडून उत्तरे पाठविण्यात येत आहेत, नक्की कोण कोणत्या जिल्ह्यात असे प्रकार सुरू आहेत याचा छडा लागलाच पाहिजे.
आधी परीक्षा पारदर्शक रित्या घेण्यासाठी उपाययोजना कराव्या त्यानंतरच परीक्षा घ्याव्या. तसेच लातूर मधील या परीक्षा केंद्राची सखोल चौकशी करण्यात यावी, सीसीटीव्ही हस्तगत करून आरोपींना अटक करण्यात यावी.
हा प्रकार नक्की कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? फडणवीस शिंदे सरकार पेपरफुटी रोकण्यस सपशेल अप यशी ठरली आहे. पेपरफुटी कायद्याच्या नावावर आमच्या माथी फक्त एक समिती नेमून बोळवण करण्यात आली. PWD घोटाळ्याबाबत निर्णय घ्यावा आणि याच अधिवेशनात पेपरफुटी कायदा मंजूर करावा अशी आमची मागणी आहे.
पेपरफुटी साठी राज्याच्या गृहमंत्र्यांचा जाहीर निषेध.
#फडणवीस_राजीनामा_द्या
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@RRPSpeaks@VijayWadettiwar@satejp@iambadasdanve@NANA_PATOLE@Awhadspeaks@supriya_sule@KunalNitinRaut