प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला पुरस्काराची झळाळी!
घरगुती वीजग्राहकांना सुमारे २५ वर्ष मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा ‘रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स अवॉर्ड’ने दि. २६ जुलै २०२५ ला फुकेत (थायलंड) येथे गौरव करण्यात आला.
सुमारे १५० खासगी कंपन्या व सार्वजनिक उपक्रम कंपन्यांचे संचालक व प्रतिनिधींच्या परिषदेत ज्येष्ठ अभिनेते श्री. बोमन इराणी यांच्याहस्ते महावितरणला पुरस्कार प्रदान करण्यात आला. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार व विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट यांनी हा पुरस्कार स्विकारला. या गौरवाबद्दल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
#MSEDCL #PMSuryaGhar
सुरक्षा प्रथम !
हे योद्धे महावितरणचे ... गीत
प्रकाशित महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र!
विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, वीज अपघात टाळा.
महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्ताने विद्युत सुरक्षा सप्ताह: १ ते ६ जून २०२५
चोर पावलांनी येती धोके आगंतुक
सुरक्षा कवच घेऊनी जागरूक
पाऊल पडण्याआधी अपघाताचे
भान ठेवतात जे सुरक्षा नियंमांचे
हे योध्दे हे योध्दे हे योध्दे कीर्तीमान महावितरणचे
वीज सुरक्षा उपकरणांचा वापर
कर्तवयदक्ष अन् सेवेशी तत्पर
ज्ञान, कौशल्य गुण सन्मानाचे
टाळतात धोके जे विद्युत अपघाताचे
हे योध्दे हे योध्दे हे योध्दे कीर्तीमान महावितरणचे
#MSEDCL #safetyweek2025
महावितरणच्या १५० विभागात विद्युत सुरक्षा रॅली
महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने १ ते ६ जून २०२५ या कालावधीत विद्युत सुरक्षा सप्ताह सुरू आहे. या सप्ताहात राज्यभरात हाती घेण्यात आलेल्या विद्युत सुरक्षा विषयक व्यापक जनजागृती कार्यक्रमात १५० विभागीय कार्यालयात रॅलीचे आयोजन करण्यात आले. नागपूर येथील रॅलीस संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी समवेत मुख्य अभियंता दिलीप दोडके उपस्थित होते. तर नेरूळ विभागातील रॅलीस कार्यकारी संचालक (मानव संसाधन) परेश भागवत यांनी प्रारंभ केला. यावेळी समवेत मुख्य अभियंता संजय पाटील , मुख्य महाव्यवस्थापक (मासं) भुषण कुलकर्णी उपस्थित होते.
#MSEDCL #safetyweek2025