PMC JE भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे न्याय्य असून, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांच्या भविष्याचा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. न्याय कधी मिळणार?
@RRPSpeaks@PMCPune@CMOMaharashtra
पुणे महापालिकेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून यामध्ये प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळं ही प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या आवारात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम साहेब यांचीही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या या आक्षेपांची सखोल चौकशी करण्याचं आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणालाही नियुक्त देणार नसल्याचं आश्वासन यावेळी आयुक्त साहेबांनी दिलं. तसंच नॉर्मलायझेशनमुळं कोणत्याही विद्यार्थावर अन्याय होणार नाही, याबाबतही त्यांनी आश्वस्त केलं.
#पुणे_महापालिका #पदभरती_घोटाळा
PMC-JE भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांकडून व्यक्त होत असलेल्या शंका आणि आक्षेप गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
पुणे महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता (JE) परीक्षा विविध शिफ्टमध्ये पार पडली असताना Normalization प्रक्रिया नेमकी कशी राबविण्यात आली, Raw Score व Normalized Score सार्वजनिक का करण्यात आले नाहीत, तसेच गुणवत्तायादी आणि गुणांकनाची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे का जाहीर करण्यात आली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
निकालातील कथित विसंगतींमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी सर्व गुण, सेक्शननिहाय माहिती आणि Normalization संदर्भातील तपशील जाहीर करणे आवश्यक आहे.
समाजमाध्यमांवर काही संशयास्पद बाबी देखील समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. मेरिट यादीतील अव्वल उमेदवारांचे CCTV फुटेज, लॉग डेटा आणि संबंधित अहवालांची पडताळणी करून सत्य जनतेसमोर आणावे.
राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांनी या विषयात तातडीने हस्तक्षेप करून संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचा विश्वास विद्यार्थ्यांना द्यावा. पात्र आणि मेहनती उमेदवारांना न्याय मिळणे हीच सर्वांची अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PMCPune
PMC मुख्यालयाबाहेर विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
पुरावे समोर आहेत, फोटो समोर आहे, तरी प्रशासन गप्प आहे!
विद्यार्थी रस्त्यावर आणि दोषी मोकाट — हीच का पारदर्शक भरती?
न्याय नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होईल.
#JusticeForPMCJE#TransparentRecruitment@prajytnair@navalMH@PMCPune
NEET प्रकरणात गैरप्रकाराचे ठोस पुरावे समोर आल्यानंतर NTA ने परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून कारवाई केली, चौकशी केली आणि आवश्यक त्या ठिकाणी पुनर्परीक्षेचा निर्णय घेतला. परीक्षेची विश्वासार्हता टिकवण्याला प्राधान्य दिले गेले.
मग PMC JE परीक्षेबाबत वेगळा निकष का लावला जात आहे?
परीक्षा सुरू असतानाच परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिकेचे फोटो बाहेर आल्याचे आरोप, उमेदवारांनी केलेल्या तक्रारी, सोशल मीडियावर व्हायरल झालेले पुरावे आणि परीक्षा प्रक्रियेतील गंभीर अनियमिततेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढे सर्व समोर आल्यानंतरही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. चौकशीची स्थिती काय आहे, जबाबदार कोण आहेत आणि पुढील निर्णय काय, याबाबतही कोणतीही स्पष्टता दिली जात नाही.
जर परीक्षेच्या पवित्रतेवर संशय निर्माण झाला असेल, तर प्रत्येक प्रामाणिक उमेदवाराला न्याय मिळणे ही शासन आणि संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे. प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, विश्वासाचा आणि भविष्याचा आहे.
सरकार, PMC आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने निष्पक्ष चौकशी करून अहवाल सार्वजनिक करावा. दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आवश्यक असल्यास पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय तात्काळ जाहीर करावा. विद्यार्थ्यांना मौन नव्हे, न्याय आणि पारदर्शकता हवी.
@prajytnair@navalMH@PMCPune@CMOMaharashtra
CBT चा निर्णय रद्द करावा!
MPSC ची परीक्षा ही लाखो युवकांच्या स्वप्नांच्या दिशेने असलेली वाट आहे. या परिक्षेत CBT आणि Normalization लागू करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. या प्रक्रियेची पारदर्शकता, वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांची समान कठीणता, तांत्रिक अडचणी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी या सर्व समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा.
@mpsc_office@bhimanwar
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
निकालामध्ये कथित डुप्लिकेट नोंदी, दस्तऐवजाच्या अखंडतेबाबत निर्माण झालेल्या शंका, नॉर्मलायझेशन प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव आणि तांत्रिक माहिती सार्वजनिक न केल्यामुळे हजारो अभियंता उमेदवारांमध्ये संभ्रम व अस्वस्थता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या आणि स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या हिताचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच आज मी पुणे महानगरपालिका आयुक्त यांना पत्र पाठवून स्वतंत्र Digital Forensic Audit, संपूर्ण माहिती सार्वजनिक करणे आणि सर्व तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आमची भूमिका स्पष्ट आहे, कोणावरही आरोप करणे हा उद्देश नाही; मात्र भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह असली पाहिजे.
हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने सत्य समोर येणे आणि जनविश्वास कायम राहणे अत्यंत आवश्यक आहे.
@navalMH@INCHarshsapkal
#PMCRecruitment #JERecruitment
#Transparency #StudentsFirst #Pune #EngineeringStudents #DhananjayShinde
पुणे महापालिका भरतीत 26 डुप्लिकेट उमेदवार?
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती निकालात तब्बल २६ उमेदवारांची नावे दोनदा आढळली आहेत. नोंदींमध्ये वेगवेगळे रोल नंबर आणि वेगवेगळे प्रवर्ग नमूद आहेत.
निकालाच्या पहिल्याच पानावर सर्व मजकूर टाईप असताना फक्त तारीख मात्र हस्ताक्षरात आहे. सही डिजिटल नाही तर इमेज आहे.पहिल्याच पानावर "पान क्र. 31" असा उल्लेख दिसत असल्याने मूळ फाईलशी छेडछाड झाल्याची शंका येते.
याशिवाय, भरती परीक्षा तीन वेगवेगळ्या दिवशी झाल्याचे असताना Normalization पद्धतीचा तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही. निकालाच्या PDF मध्ये Editable DOCX File Path दिसत असल्याची बाबही दस्तऐवज व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित करते. तसेच Digital Signature किंवा Tamper-Proof Authentication, Final Answer Key, Objection Report आणि Subject-wise Marks सार्वजनिक नाही.
या प्रकरणात स्वतंत्र Digital Forensic Audit, Recruitment Process Audit आणि तांत्रिक चौकशी करून सर्व तथ्ये सार्वजनिक करावीत.
@navalMH@PMCPune
#पुणे_महापालिका #कनिष्ठ_अभियंता_भरती #Transparency #DigitalForensicAudit #JusticeForCandidates #26_डुप्लिकेट_उमेदवार
६०:४० हे प्रमाण स्थापत्य अभियांत्रिकी कॅडर साठी अन्यायकारक तर आहेच परंतु पदोन्नती बाबतच्या संधीवर परिणाम करणारा आहे. यावर तत्काळ निर्णय घेण्यात यावा अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन आम्हाला राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल.
@SanjayDRathods@naikindranil@Dev_Fadnavis@Aaple_Sarkarr
अनेक वेळा घोषणा करून देखील जलसंधारण विभागाचा आकृतीबंध अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. माननीय मंत्री @SanjayDRathods साहेबांनी याबाबत तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Maha_GoodGovern
प्रति, मा. @JaykumarGore साहेब
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असलेल्या हजारो पदांमुळे ग्रामीण विकासावर परिणाम होत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. कृपया #ZPRecruitment प्रक्रिया तातडीने सुरू करून तरुणांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
पुणे मनपाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २२,२३,२९ तारखेला आहे आणि आज १० एप्रिल आहे.उमेदवारांना परीक्षा आहे हे वर्तमानपत्रातून समजते परंतु पुणे मनपा प्रशासनाला याबाबत अजूनही अधिकृतरित्या तारखा जाहीर करायला किंवा नोटिफिकेशन प्रसिद्ध करायला वेळ भेटत नाही का....?
@PMCPune@MDNagpure
राज्याचे दोन्ही जलसंपदा मंत्री @RVikhePatil@girishdmahajan माजी वनमंत्री @SMungantiwar साहेबांना भेटून उमेदवारांनी निवेदन दिले. याबाबत @CMOMaharashtra देखील स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती.
#WRD_JE
PMC JE परीक्षेचा घोळ संपता संपेना.... मागच्या 18 तासात एकाच विद्यार्थ्याला 4 वेळा हॉलतिकीट त्यापैकी 2 वेगवेगळे सेंटर. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना असे mail आले आहेत. या विद्यार्थ्यांनी नेमके करायचे काय?
PMC निर्णय घेणार कधी? @PMCPune@Dev_Fadnavis@mieknathshinde
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी.
२ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये.
परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी.
#JuniorEngineerExam#PMC#StudentJustice#TCSionOnly