@SVW790 ह्या महागाईच्या जमान्यात तुटपुंज्या मानधन तत्वावर इतर जिल्ह्यात तीन वर्ष काढणे खूप मुश्कील आहे त्यामुळे शिक्षण सेवक कालावधी रद्द करावा व नियमित वेतन श्रेणी लागू करून सर्व शिक्षकांना न्याय व दिलासा द्यावा व उर्वरित रखडलेली शिक्षक भरती तात्काळ पूर्ण करावी हीच अपेक्षा..
@SVW790 उशिरा का होईना पण जागे झालात... त्याबद्दल धन्यवाद
गेली वर्षभर रखडलेली शिक्षक भरती आजतागायत पुर्ण नाही होवू शकली
मुलांचं एज बार होतं आलंय
तेव्हा शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्यात यावी ही विनंती
@SVW790 ताई अतिशय कळकळीची विनंती आहे की आपण शिक्षणसेवक ही पध्दत पूर्णपणे बंद करण्यासाठी पाठपुरावा करावा कारण शिक्षक हे सर्वसामान्य घरातील असतात त्यांच्यावर त्यांच्या संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी असते आणि आजच्या महागाईच्या काळात तुटपुंज्या मानधनावर काम करण खूप अवघड आहे
अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे !
शिक्षण सेवक म्हणून मिळणारे मानधन हे अतिशय तटपुंजे आहे. वाढलेल्या महागाईमुळे राज्यातील अनेक शिक्षण सेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. घरभाडे, प्रवास खर्च यातच मोठा खर्च होत असल्याने कुटुंब चालविणे देखील अवघड आहे. त्यातच ३० ते ३५ वयोगटातील अधिकाधिक उमेदवारांची निवड झाली असल्याने त्यांचा सेवाकाळ देखील कमी असणार आहे. तरी राज्य शासनाने शिक्षण सेवक रद्द करून नियमित पगार सुरू करावा. तसेच प्रलंबित भरती Phase -२ देखील विधानसभा आचारसहिंतेपूर्वी पूर्ण करावी.
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
अजून किती वाट जनतेची लावणार. आज phd धारक आणि अभियोग्यता धारक रस्त्यावर उतरले पण निद्रा अवस्थेत असलेले हे सरकारला काय बोलणार. महिला रत्यावर आहेत, त्याची लहान लेकर रस्त्यावर आहेत आणि इथे याचे गैरप्रकार थांबत नाही. डोळे उघडा नाही तर येणारा 2024 ला तुमची जागा पूर्ण समाज दाखवेल.
पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी डी टी एड बी एड स्डुडंट असोसिएशनच्या वतीने बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. पवित्र पोर्टलद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था मधील इंग्रजी माध्यमाच्या पदविका शिक्षकांना नियुक्त करण्याबाबतचे पत्रक तात्काळ रद्द करून गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. आज त्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच त्यांच्या मागण्यांबाबत शिक्षक आयुक्तांबरोबर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
@Mha_Teacher
@RRPSpeaks इयत्ता १ ली ते ८ वी चे शिक्षण मातृभाषेतून झाले पाहिजे असा ncte व NEP चा नियम असताना पण शिक्षण आयुक्त यांनी त्या ठिकाणी इंग्रजी माध्यम शिक्षक भरण्याचा नियमबाह्य व कायदा मोडून घेतलेला निर्णय मागे घेण्यासाठी दादासाहेब आपण प्रयत्न केले त्याबद्दल आपले मनस्वी आभार..
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं असून इंग्रजीला प्राधान्य देताना मराठीवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेण्याची गरज आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ अशी मराठीची गोडवी गायची आणि मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय करायचा ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. केंद्र सरकारकडून भरती करताना माध्यमाऐवजी गुणवत्तेचा विचार केला जातो. त्याप्रमाणे राज्य सरकारने इंग्रजी-मराठी असा भेदभाव न करता गुणवत्तेवरच शिक्षक भरती करावी, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
लकेसरकर साहेब डीएड बीएड धारकांची आज सुद्धा तुमच्या प्रश्ननाला उत्तर खोट्या पद्धतीने दिलेले आहेत,सतत दिशाभूल, धमकी देऊन अपात्र करतो ही भाषा म्हणजे शिक्षणमंत्र्यांच्या इतिहासात कलंकित, अज्ञानी मंत्री म्हणून ओळख निर्माण होईल
@VijayWadettiwar धन्यवाद साहेब