महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता, कार��यक्षमता आणि गतिमानता वाढविण्याच्या दृष्टीने विविध गुणात्मक व रचनात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. आयोगाच्या परीक्षा व भरती प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणून उमेदवारांना वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येत आ��े, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे.
@mpsc_office
#Mpsc
CJP महाराष्ट्रातील MPSC विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि उद्या पुण्यात होणाऱ्या त���यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देईल.
CJP stands with the MPSC students of Maharashtra and will support tomorrow’s protest in Pune.
महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आंदोलन करत आहेत – याचे ���ारण केवळ एक परीक्षा किंवा भरती मोहीम नसून, संपूर्ण व्यवस्थेवरील तुटलेला विश्वास आहे.
केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, प्रत्येक विद्यार्थी भाजप सरकारला वैतागला आहे. पेपरफुटी, रखडलेली भरती, शिक्षणाचा असह्य खर्च, वसतिगृहातील अमानवीय परिस्थिती, विषारी अन्न, फसवे डीबीटी व्यवहार..आणि आता, एमपीएससीसारख्या घटनात्मक संस्थेचा ताबा घेऊन त्यांनी तिची विश्वासार्हता नष्ट केली आहे.
विद्यार्थ्यांची त्यांच्या भविष्यासाठीची प्रत्येक मागणी रास्त आहे. सरकारने त्यांचा आवाज ऐकून तातडीने कारवाई केली पाहिजे-अन्यथा, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांचा आवाज अधिकच मोठा होत जाईल.
-श्री. राहुलजी गांधी
विभागांतर्गत (डिपार्टमेंटल) PSI पदाच्या परीक्षेत 615 पैकी जवळपास 150 जण मास कॉपी करून पास झाल्याची माहिती समोर आली आहे.
FDA पेपरफुटीमधील आरोपी अभिजीत लेंडवे आणि त्याच दर्जाचा इतर एक अधिकारी यात सहभागी असल्याचे पुरावे आमच्याकडे आले आहेत, याचा लवकरच खुलासा करू.
कुठल्याही परिस्थितीत मेहनत करून पास झालेल्या उमेदवारांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन गैरप्रकार करणाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे. अभिजीत लेंडवे सारख्या अधिकाऱ्यांसह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आयोगाची प्रतिष्ठा खराब केली असून आयोगाच्या विश्वासार्हतेला तडे गेले असून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कचाट्यातून आयोग मुक्त होणे गरजेचे आहे. त्यासाठीच पुण्यात उद्याचा मोर्चा आहे.
#विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा
एमपीएससी परीक्षा पद्धती संदर्भात स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे भेटले. यावेळी त्यांनी काही मागण्या केल्या. यामध्ये शिक्षक सचिन ढवळे, यश��ंत सोलाट, धनंजय मते, गणेश कड, उमेश कुदळे, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते निखिल पाटील यांच्यासह स्पर्धा परीक्षा शिक्षक-विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, अतिशय पारदर्शी पद्धती विकसित करण्यासाठी सरकार सातत्याने काम करते आहे. ही प्रक्रिया अधिक कशी सुदृढ करता येईल यासाठी राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्��� मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली आहे. त्यात युपीएससीचे माजी सदस्य, प��लिस महासंचालक, आयआयटी प्राध्यापक आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याचा शासन आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आला असून ही समिती राज्यभर सर्व विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत प्रक्रिया करणार आहे. पुण्यात सुद्धा ही समिती जाईल. एकीकडे हे प्रयत्न होत असताना काही कठोर कायदे सुद्धा करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर सरकार कठोर क���रवाई करेल.
औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची सुद्धा गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणाचा पोलिसांकडून गतिमान तपास सुरू आहे. आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. याचा पुढील तपास सुरुच असून या गैरप्रकारात आयोगातील किंवा आयोगाबाहेरील ज्या व्यक्तींचा सहभाग आढळेल, त्या सर्वांना कठोर शिक्षा केली जाईल. स्पर्धा परीक्षांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्या��्थ्यांच्या कष्टांचे चीज होईल, अशाच सुधारणा आम्ही करीत आहोत. त्यांच्यावर कुठलाही अन्याय हो�� दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करून परीक्षाव्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा, यासाठी शासन कटिबद्ध आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रश्नपत्रिका निर्मितीपासून परीक्षा प्रक्रियेपर्यंत आवश्यक त्या सुधारणा सर्व घटकांना विश्वासात घेऊन तातडीने अंमलात आणल्या जातील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना आश्वस्त केले. #MPSC
विद्यार्थी बंधू-भगिनींनो तयारीला लागा…
सोमवा��ी तुमच्या हक्काच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा….
आज रस्त्यावर उतरला नाही तर कायम रस्त्यावर रहावं लागेल आणि घोटाळे करणारे महत्त्वाच्या पदांवर जाऊन तुमच्या डोक्यावर बसतील.
म्हणूनच जिंकण्यासाठी हक्काचा लढा लढू आणि न्याय मिळवू…!
#विद्यार्थी_हक्काचा_लढा
मा.@mpsc_office@bhimanwar
औषध निरीक्षक पेपर फोडून मिळवला, पण नुसत्या पेपरफुटीने निवड होणार नव्हती. अंतिम निवडीसाठी मुलाखतीत किमान 41% गुण आवश्यक होते. मग पेप���मध्ये काहीच येत नसलेल्या उमेदवारांना मुलाखतीत 41%+ गुण कसे मिळाले?
हे गुण मिळाले नसते तर पेपर फोडूनही त्यांची निवड झाली नसती. मग मुलाखतीत आवश्यक गुण मिळतील, असे आश्वासन कोणी दिले?
मुलाखत मॅनेज झाली का? आयोगातील कोणत्या “सदस्याची” भूमिका होती? याची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे.@CMOMaharashtra
@maha_governor
@satejp
@INCHarshsapkal
#MPSC #DrugInspector #पेपरफुटी
🚨 अमरावतीच्या ‘MPSC वाचवा – विद्यार्थी आक्रोश मोर्चा’स काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा!
उद्या अमरावती येथे होणाऱ्या ‘MPSC वाचवा – विद्यार्थी आक्रोश मो��्चा’मध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सक्रियपणे सहभागी होणार असून, या विद्यार्थी संघर्षाला काँग्रेसचा ठाम आणि पूर्ण पाठिंबा आहे. हा केवळ एक मोर्चा नाही; हा महाराष्ट्रातील लाखो मेहनती विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या "स्वप्नांचा, संघर्षाचा, संतापाचा आणि भवितव्याचा बुलंद आवाज" आहे.
MPSC ही केवळ परीक्षा घेणारी संस्था नाही. ती महाराष्ट्रातील लाखो कष्टकरी, सा��ान्य, ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांचा आधार आहे. वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास ��ळमळीत होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेचा अभाव, विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष आणि परीक्षा पद्धतीबाबतची अनिश्चितता यावर सरकारने केवळ आश्वासने देऊन चालणार नाही. विद्यार्थ्यांना "ठोस, पारदर्शक, उत्तरदायी आणि वेळबद्ध निर्णय" हवा आहे.
🇮🇳 विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचा संघर्ष महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही! देशभरातील ���िद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत आहे. मा. राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली ‘छात्रों की गूंज’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले जात आहेत. पुण्यातील कार्यक्रमातही माँ. राहुल गांधीजींनी "आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न, Drug Inspector भरतीचा मुद्दा आणि विद्यार्थ्यांशी संबंधित इतर गंभीर प्रश्नांवर विद्यार्थिनींसोबत संवाद सा���ला आणि ते सुटण्यासाठी ठामपणे भूमिका घेतली.
आमचा संदेश अगदी स्पष्ट आहे "प्रत्येक विद्यार्थ्याच्या न्यायाची लढाई ही काँग्रेसची लढाई आहे. आणि ही लढाई केवळ सभागृहात, पत्रकार परिषदेत किंवा सोशल मीडियावर लढायची नाही. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरायचे, त्यांच्या सोबत उभे राहायचे आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करायचा - हीच काँग्रेसची भूमिका आहे.
✊ हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात त्याचीच अंमलबजावणी!
मा. प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १८ महिन्यांपासून काँग्रेसने विद्यार्थी, युवक आणि रोजगाराच्या प्रश्नांवर सातत्याने प्रत्यक्ष मैदानात उतरून संघर्ष करत आहे.
🔹 परभणी : कृषी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन.
🔹 छत्रपती संभाजीनगर - ITI व विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते MSEB प्रादेशिक कार्यालय आणि मराठवाडा व���भागीय आयुक्त कार्यालयापर्यंत ‘रोजगार न्याय सत्याग्रह’
🔹 छत्रपती संभाजीनगर - स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी WALMI कार्यालयासमोर आंदोलन.
🔹 पुणे - पुणे महानगरपाल��का ते सिंचन भवन ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय अशी ‘रोजगार न्याय यात्रा’.
🔹 मुंबई - MCGM कार्यालयासमोर, आझाद मैदानासह विविध महत्त्वाच्या ठिकाणी विद्यार्थी आणि रोजगाराच्या प्रश्नांसाठी आंदोलने. आणि MPSCच्या प्रश्नावर MPSC मुख्य कार्यालय, बेलापूर येथे ८ जुलै ते १६ जुलै २०२६ - सलग ९ दिवस साखळी उपोषण!
MPSCच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता असावी आणि व���द्यार्थ्यांचा संस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण व्हावा, यासाठी काँग्रेसने हा संघर्ष उभारला. आता प्रश्न केवळ आंदोलनाचा नाही - प्रश्न आहे MPSC ची विश्वासार्हता वाचवण्याचा! गंभीर अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या विश्वासाला बसलेल्या धक्क्याची "निष्पक्ष, स्वतंत्र आणि वेळबद्ध चौकशी" झाली पाहिजे. दोष निश्चित झाले पाहिजेत. जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. आणि ज्यांच्यावर प्रशासकीय किंवा नैतिक जबाबदारी निश्चित होते, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. MPSC चे अध्यक्ष डॉ. विवेक भीमनवार आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून पदावरून पायउतार व्हावे, ही विद्यार्थ्यांची मागणी सरकारने गांभीर्याने घेतली पाहिजे. त्याचबरोबर MPSC मध्ये :
① पूर्ण पारदर्शकता
② स्पष्ट उत्तरदायित्व
③ अधिक कार्यक्षम परीक्षा व्यवस्था
④ तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि सुरक्षित प्रणाली
⑤ वेळबद्ध तक्रार निवारण व्यवस्था
⑥ संस्थेची विश्वासार्हता पुनर्स्थापित करण्यासाठी ठोस संस्थात्मक सुधारणा तातडीने लागू झाल्या पाहिजेत. कारण एक परीक्ष�� चुकली तर एक संधी जाते; पण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासच गमावला तर संपूर्ण पिढीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
उद्याचा अमरावतीतील विद्यार्थी आक्रोश मोर्चा हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक मेहनती विद्यार्थ्याचा आवाज आहे.
📢 आमची भूमिका स्पष्ट आहे :
१. MPSC वाचली पाहिजे.
२. परीक्षा व्यवस्था पारदर्शक झाली पाहिजे.
३. जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.
४. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
५. MPSC ची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित झाली पाहिजे आणि
६. प्रत्येक मेहनती विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे!
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशभर उमटत असलेली ‘छात्रों की गूंज’ आणि महाराष्ट्रात हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला विद्यार्थी संघर्ष - यामागचा संदेश एकच आहे: विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस मैदानात आहे आणि मैदान सोडणार नाही!
@kharge@RahulGandhi @INCHarshsapkal @satejp @VijayWadettiwar @AdvYashomatiINC @BalwantINC @INCRojgar
#MPSCवाचवा #विद्यार्थीआक्रोशमोर्चा #MPSC #StudentsForJustice #ChhatronKiGoonj #RojgarNyay #DhananjayShinde #Dhananjay_Shinde #Congress #Justice4Students #Lawyers4Students
���ा.@mpsc_office @bhimanwar
जा . क्र. 014/2026 मधील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या पदांची गुणवत्ता यादी जाहीर नाही अस का? याच जाहिरातीतील संयुक्त मुख्य परीक्षा द्वारे घेतलेल्या उद्योग निरीक्षक आणि तांत्रिक सहायक पदाची गुणवत्ता यादी तर आली बाकी का नाही आल्या ?
जा.क्र.010/2026 मधील पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल अजून आला नाही काही अडचण आहे का?
#MPSC #निकाल
डॉ. विवेक भीमनवार जी,
आपली भूमिका वाचली. मात्र, “प्रश्नपत्रिका फुटली तेव्हा मी अध्यक्ष नव्हतो” एवढ्या स्पष्टीकरणाने MPSC च्या अध्यक्षपदाची नैतिक आणि संस्थात्मक जबाबदारी संपत नाही.
औषध निरीक्षक परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीमुळे हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा केवळ जानेवारीत घटना घडली की फेब्रुवारीत आपण पदभार स्वीकारला, एवढ्यापुरता प्रश्न नाही. हा MPSC वरील लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा प्रश्न आहे.
आपण स्वतः आपल्या निवेदनात म्हटले आहे की MPSC ची विश्वासार्हता, निष्पक्षता आणि पारदर्शकता जपणे ही अध्यक्ष म्हणून आपली घटनात्मक जबाबदारी आहे. मग या विश्वासाला तडा गेल्यानंतर त्या जबाबदारीची नैतिक मालकी कोण घेणार? राजीनामा म्हणजे दोषाची कबुली नाही. राजीनामा म्हणजे संस्थेची प्रतिष्ठा स्वतःच्या पदापेक्षा मोठी मानण्याचे नैतिक धैर्य.
राज्यातील लाखो परीक्षार्थी, त्यांच्या कुटुंबियांची आणि काँग्रेस पक्षाची मागणी स्पष्ट आहे:
डॉ. विवेक भीमनवार यांनी MPSC अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि औषध निरीक्षक प्रश्नपत्रिका फुटीची स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होण्यासाठी मार्ग मोकळा करावा.
आपण राजीनामा दिला नाही, तर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आम्ही लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन तीव्र करू आणि बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारू.
ही कोणतीही धमकी नाही, हा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा लोकशाही संघर्ष आहे.
पदाला चिकटून राहण्यापेक्षा MPSC चा विश्वास वाचवा. जबाबदारी स्वीकारा. राजीनामा द्या.
@RahulGandhi@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@VarshaEGaikwad@CMOMaharashtra
#MPSC #MPSCपेपरफुटी #DrugInspector #StudentsJustice #MPSCExam
जबाबदारी झटकण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटल्याचे आपण सांगत आहात, पण मुळात पेपर विद्यार्थ्यांना २० मार्च २०२६ रोजी म्हणजेच परीक्षेच्या दोन दिवस आधी मिळाला होता. त्यामुळे आपण कधी शपथ घेतली आणि कधी पदभार स्वीकारला याचा विषयच येत नाही.
आपण म्हणत असल्याप्रमाणे जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटला असेल तर परीक्���ेच्या दोन महिने आधीच पेपर फुटला ही बाब अत्यंत गंभीर नाही का ? परीक्षेच्या दोन महिने आधी पेपर फुटला असतानादेखील मार्च मध्ये पेपर घेतलाच का? दोन महिने आयोग झोपा काढत होता का ?
कर्णिक घोटाळ्यासारखेच हे प्रकरण असून आपण जो विश्वासघात केलाय ना त्यामुळे अभ्यास करावा की करू नये ? या द्विधा मनस्थितीत आज विद्यार्थी आले आहेत, लायब्ररीतसुद्धा बसण्याची कोणाची मानसिकता राहिलेली नाही. संवैधानिक पदा���ी, आयोगावरच्या विश्वासाची, विद्यार्थ्यांच्या भवितव्याची आपल्याला खरंच काळजी असेल तर तत्काळ नैतिकता दाखवत स्वतःहून राजीनामा द्या आणि लाखों विद्यार्थ्यांवर उपकार करा.
राहिला विषय वैयक्तिक आणि राजकीय आरोपांचा, त्यासंदर्भात मी अजून एक टक्का देखील बोललेलो नाही, जेव्हा बोल��यला सुरुवात करेल ना तेव्हा आपणच काय तर आपला पाठीराखा असलेल्या सरकारला सुद्धा परवडणार नाही कारण मी पुराव्याशीवाय बोलत नाही.
#MPSC #पेपरफुटी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री विवेक भीमनवार यांचे औषध निरीक्षक परीक्षेसंदर्भात वक्तव्य...
मुंबई/दि. 2 सप्टेंबर 2026
प्रसिद्धीपत्रक
(औषध निरीक्षक परीक्षेसंदर्भात)
1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या संदर्भात माझ्याविरोधात काही वैयक्तिक आरोप करण्यात येत असून, माझ्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर काही वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते.
2. औषध निरीक्षक परीक्षेशी संबंधित प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी 2026 मध्ये घडल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची मी 18 फेब्रुवारी 2026 रोजी शपथ घेतली आणि 3 मार्च 2026 रोजी पदाचा प्रत्यक्ष कार्यभार स्वीकारला. तथापि, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची ��त्यंत गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने यासंदर्भात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भविष्यात अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुरक्षा उपाय सुचविण्याकरिता आयोगाने अंतर्गत उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. तसेच, एकूणच परीक्षा प्रक्रियेत आवश्यक समग्र सुधारणा सुचविण्यासाठी शासनानेही उच्चस्तरीय समित��� स्थापन केली आहे.
3. अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर माझे संपूर्ण लक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व भरती प्रक्रियेची विश्वासार्हता, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुरक्षितता अधिक बळकट करण्यावर केंद्रित राहिले आहे. आयोगावर सोपविण्यात आलेल्या वाढीव भरतीच्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा व भरती प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित करण्यासाठी अनेक महत्त्वपू���्ण सुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत.
4. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून आयोगाची उच्च परंपरा, निष्पक्षता आणि विश्वासार्हता जपणे तसेच लाखो उमेदवारांना न्याय्य आणि समान संधी उपलब्ध करून देणे ही माझी घटनात्मक जबाबदारी आहे आणि त्याची मला पूर्ण जाणीव आहे. ही जबाबदारी पूर्ण पारदर्शकता, निष्पक्षता आणि सचोटीने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
5. सार्वजनिक परीक्षांबाबत लोकप्रतिनिध���, उमेदवार आणि नागरिकांना प्रश्न उपस्थित करण्याचा तसेच त्यांच्या चिंता व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकशाही व्यवस्थेत अशा प्रश्नांचे मी स्वागतच करतो. मात्र, कोणत्याही गंभीर आरोपाचे मूल्यांकन हे वस्तुस्थिती, अधिकृत नोंदी आणि पुराव्यांच्या आधारेच झाले पाहिजे. सार्वजनिक भरतीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांमध्ये लाखो तरुण उमेदवारांचे भवितव्य गुंतलेले आहे. त्यामुळे अशा विषयांचे वैयक्तिक आरोप किंवा राजकीय वादामध्ये रूपांतर होऊ नये, अशी माझी सर्व संबंधितांना नम्र विनंती आहे.
विवेक भीमनवार
अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
@bhimanwar
मा. देवेंद्र फडणवीस साहेब,
MPSC पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे येत असून कुंपणच शेती खात असल्याचं स्पष्ट झालं आहे. जसजशी नवीन माहिती समोर येत आहे तसतसा विद्यार्थ्यांचा आयोगावरचा विश्वास उडत चालला आहे, त्यामुळे आपण आता मैत्री बाजूला ठेवून बघ्याची भूमिका न घेता तत्काळ अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा आणि संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून चांगल्या व्यक्ती त्या जागी नेमण्यात याव्यात. पोलीस करत असलेला तपास समाधानकारक असला तरी केवळ एक दोन नावापुरता तपास मर्यादित न ठेवता आम्ही जी शेकडो नावे दिली आहेत त्यांचा देखील सखोल तपास होणे गरजेचे आहे, तरच खरे सूत्रधार असलेले मोठे मासे जाळ्यात अडकतील.
(अध्यक्षांचा राजीनामा झाल्याशिवाय आमचा हा लढा थांबणार नाही.)
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
कष्टकरी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी सुरू असलेला हा खेळ अत्यंत चिंताजनक!
चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी स्वतःचे आणि आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी वर्��ानुवर्षे अहोरात्र परिश्रम घेतात. पोटाला चिमटा काढून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोजक्या अन्नावर दिवस काढून हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संशयास्पद आणि अपारदर्शक कारभारामुळे या विद्यार्थ्यांच्या अपार कष्टांवर पाणी फेरले जात असल्याचे चित्र आहे.
स्पर्धा परीक्षेच्या मुख्य निकालांमध्ये भाषा व इतर विषयांत उत्तम कामगिरी असलेल्या उमेदवारांना ऐच्छिक विषयाच्या एकाच पेपरमध्ये अत्यंत नगण्य गुण मिळणे अत्यंत संशयास्पद आहे. परीक्षा मूल्यमापन पद्धती व गुणदानातील तफावतीमुळे विद्यार्थ्यांना आता आयोगावर विश्वास राहिला नाही. सतत होणारी पेपरफुटी, ऐनवेळी परीक्षा रद्द होणे, यामुळे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात तीव्र अविश्वास, असंतोष आणि नैराश्याचे वातावरण पसरले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताज��क आहे.
विद्यार्थ्यांचे वर्षांनुवर्षांचे कष्ट वाया जाऊ दिले जाणार नाही. हा विषय केवळ परीक्षेच्या गुणांचा नसून ��ाखो कष्टकरी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. परीक्षा आयोगाने आपले उत्तरदायित्व स्वीकारून यावर तात्काळ योग्य पावले उचलावीत.
@mpsc_office
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@INCMaharashtra @IYC
#JusticeForStudents #YouthJustice #PratibhaDhanorkar #Chandrapur