जाहीर निषेध!
छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचा ₹1.5 कोटींचा निधी शून्य करण्याचा निर्णय निषेधार्ह आहे.
छत्रपतींचा आशीर्वाद मागायचा आणि त्यांच्याच स्मारकाचा निधी शून्य करायचा, हा दुटप्पीपणा का?
Mama,
I last saw you and Papa together more than 35 years ago. Since the day Papa left, I have watched you face everything life threw at you with never-ending courage and dignity. Only Priyanka and I really know what you have been through, and how difficult your life after Papa truly was.
I am happy, and so proud, that your story - “Belonging: A Journey of Love” - will finally be read by the millions of people who love you. I know how hard it was for someone as private as you to tell the world your beautiful story.
Today, on his birthday, I can see Papa smiling and looking down proudly at his beautiful Sonia.
Love,
Rahul
मोहित कंबोज यांचा कोण लागतो अध्यक्ष महोदय?
महाराष्ट्राचं जलसंधारण खातं मोहित कंबोज नावाचा व्यक्ती चालवतो, माझ्याकडे पुरावे आहेत.. अंबादास दानवेंच्या या वाक्यानंतर भाजपच्या दोन नेत्यांनी विधानपरिषदेत प्रचंड थयथयाट केला..
काय कारण असेल?
कोल्हापूर मधली १५३ वर्षे जुनी शाळा
नांदणी केंद्रीय शाळा…
क्रांतिज्योती सावित्रीबाईंची जयंती एका कौलारू आणि दगडा मातीच्या शाळेत मराठमोळ्या थाटात साजरी! 🙏🏽
मातीत वाढलो… तर मातीशी जोडलेले राहतो! ❤️
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोवर माझ्या मतदारसंघात असे स्टीकर चिकटवून ते पॅड विद्यार्थ्यांना देऊन चमकोगिरी केली जातेय… ही महाराजांची विटंबना असून ज्यांनी केलं आणि ज्यांच्यासाठी केलं ते सगळेच याला जबाबदार आहेत.. याप्रकरणी संबंधितांनी तातडीने जाहीर माफी मागावी..!
#छत्रपती_शिवाजी_महाराज
मराठी शाळा जगली तर मराठी भाषा जगेल!
मी स्वतः रायगड जिल्ह्यात “जिल्हा परिषद” शाळेत शिकलेला विद्यार्थी…. मराठी माध्यमात शिक्षण पुर्ण करून पुढे UK ला KENT UNIVERSITY मधे जाऊन MASTERS IN WILDLIFE CONSERVATION & INTERNATION TRADE या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं…
मनापासून सांगतो… जागतिक पातळीवर आपण मराठी माध्यमात शिक्षण घेतलं याचा खरंतर तोटा कमी आणि फायदाच जास्त झाला! माझ्या UK मधल्या मित्रांना माझ्या शिक्षकांना माझं मराठी शाळेतलं शिक्षण, माझी संस्कृती, माझी जडणघडण सारंकाही अभिमानाने सांगता आलं आणि त्याचं त्यांनी प्रचंड कौतुक देखिल केलं!
मराठी माध्यमात म्हणजे आपल्या मातृभाषेत शिकताना आपलं साहित्य, आपल्या परंपरा आणि संस्कृती याची भक्कम ओळख झाली आणि स्वतःबद्दल स्वतःच्या संस्कृती बद्दल अभिमान बळकट झाला! मी आज जो काही घडलो आहे तो माझ्या मराठी शाळांमुळेच…
आजकाल मराठी माध्यमातल्या शाळांमधला पट कमी होऊन खूप मराठी शाळा बंद होत आहेत जी मराठी भाषेसाठी अत्यंत काळजीची बाब आहे… या कठीण काळात माझ्या या नव्या चित्रपटातून आपल्या मुळ भाषेतलं शिक्षण हे कमीपणाचं नसून समृद्ध करणारं असतं हे सांगायचा माझा प्रयत्न आहे…
“मराठी शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकेल आणि पर्यायाने आपली मराठी संस्कृती!”
या काळात प्रचंड मोठ्या जनजागृती ची गरज आहे, मी माझ्या पासून सुरूवात करतोय…
पुन्हा एकदा माझ्या या नव्या चित्रपटातून मी जे जगलो, मी जे शिकलो आणि त्यातून कसा समृद्ध झालो हा प्रवास सांगायचा आहे!
माझ्या आजवरच्या सर्व मराठी शाळांना, माझ्या शिक्षकांना, शाळेच्या शिपायांना, माझ्या वर्गमित्रांना… माझा सलाम!
आपल्या मातीत रुजावं आणि आभाळाला भिडावं!
चलचित्र मंडळीचा पाचवा सिनेमा
“क्रांतीज्योति विद्यालय - मराठी मिडीयम”
लवकरच तुमच्या भेटीला!
मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आता मराठी शाळा पुन्हा भरणार!
#Krantijyotividyalay #marathimadhyam
#marathimediumschools
#KJMM #मराठीमाध्यम #मराठीशाळा #राजभाषा #मराठी
@cypplOfficial @ChalchitraMndl@aanandlrai #KshiteeJog
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना अख्खा महाराष्ट्र गेल्या ३५ वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात वावरताना बघतोय, कधीही शब्दांचा तोल घसरू न देणारा एक सुसंस्कृत व सुशिक्षित नेता म्हणूनच जयंत पाटील यांची ओळख आहे. मग भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर इतक्या असभ्य भाषेत अश्लाघ्य वक्तव्य कसं करू शकतात. आमदार पडळकरांचं हे जाहीर प्रदर्शन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं आहे का? याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी द्यायला हवं.
ता.क. - आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून दिलगिरीची अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचे आहे; तरी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष त्यांना किमान समज देतील, ही अपेक्षा!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@RaviDadaChavan
नमस्कार,
मला गेले दोन दिवस आपणा सर्वांचे मेसेजेस, फोन कॉल येत आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप स्टेटस् यावरही माझे व्हिडिओ किंवा फोटो शेअर केले जात आहेत.
हा प्रतिसाद मला अनपेक्षित आणि आपल्या प्रेमाने भारावून टाकणारा आहे. मी आपल्या प्रतिसादाचा आदर करतो. वस्तुत: मी व आमच्या ‘पुढारी न्यूज’ टीमने फक्त आपले काम केले आहे. जे दिसलं ते दाखवलं आहे. माणसांची माणुसकी आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. बाकी, प्रतिक्रिया देणं हा तुमचा अधिकार आहे.
आतापर्यंतच्या पत्रकारितेत टीका आणि शुभेच्छा अनेकदा अनुभवल्या आहेत. आपण करत असलेलं कौतुक हा याच प्रवासातला एक टप्पा आहे, याची वास्तव जाणीव मला आहे.
असंख्य लोकांचे फोन, मेसेजेस येत असल्याने, फोन घेणे/ प्रतिसाद देणे शक्य होत नाहीये. आपण माझी अडचण समजून घ्याल ही अपेक्षा.
आपलाच!
प्रसन्न जोशी
संपादक, पुढारी न्यूज tv