मा.बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प्रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत.मुलांना आश्वस्त करावे ही विनंती@mybmc@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
महाराष्ट्राच्या ४८ खासदारांना नम्र विनंती.
काल मी मंत्री धनजय मुंडे यांच्या कृषी घोटाळ्याच्या विरुद्ध मी एक पत्रकार परिषद घेतली. ती आपण पाहावी. त्याचे सगळे पुरावे आणि माहिती मी जोडत आहे.
डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना पैसे द्यावे असा केंद्र सरकार चा निर्णय असून तो पायदळी तुडवत महाराष्ट्र सरकार चे मंत्री शेतकऱ्यांच्या पैशात मोठा भ्रष्टाचार करत आहेत. ह्यावर ताबडतोब चौकशी लागली पाहिजे.
महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या
https://t.co/J4Em6Av59b
https://t.co/qC0bIQbjPw
नामदेव शास्त्री यांच्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाबद्दल आदर आहे.
भगवान गडाचा राजकीय वापर होऊ नये ही काही वर्षांपूर्वी त्यांची भूमिका होती. आज याच भगवानगडावरून त्यांनी राजकीय भूमिका घेतलेली आहे.
बरं नुसतं काठावरचे बोलले नाहीयत.. तर अगदी आरोपींच्या मानसिकतेचा विचार करा, त्यांनाही मारहाण झाली होती असं म्हणत एक प्रकारे हत्येच्या समर्थनाची भाषा जी महंत लोकांच्या तोंडी अजिबात शोभून दिसत नाही.
आमच्या क्षेत्रात कोणाला इतका त्रास झाला असता तर तो संत झाला असता इतका त्रास धनंजयला झाला आहे. त्याच्या हाताला सलाईन लावली आहे.इतके कनवाळू उद्गार काढले आहेत त्यांनी. समाजावर प्रभाव ठेवण्यासाठी त्यांची विद्वत्ता, ज्ञान पुरेसं आहे. त्यासाठी धनंजय मुंडेंची काय गरज लागत असावी त्यांना?
राज्यसेवा परीक्षांची तयारी करनाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता जागा कमी असून यात वाढ करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे.
विद्यार्थ्यांच्या अडचण लक्षात घेऊन मा. मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले. या संदर्भात निश्चितच सकारात्मक कार्यवाही होईल हा विश्वास आहे.
@Dev_Fadnavis
मा. @CMOMaharashtra महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क पदांच्या संख्येत वाढ करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडे पाठवण्यात यावे.
आम्ही म्हणत आहोत म्हणून पाठवू नका तर स्वतः चेक करा मग पाठवा नियमानुसार पाठवा उमेदवारांना हाव नाही फक्त जेवढा हक्क आहे तेवढं पाठवा.
#COMBINE_जागावाढ_2024
पुण्यात एका गुंडाला महाराष्ट्र पोलीस, गृहमंत्री, आणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अटक करू शकले नाहीत. लाज वाटते या निष्क्रिय सरकारची आणि यंत्रणेची.
@Dev_Fadnavis
काल #धनंजय मुंडे आणि #मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट,
आज आरोपी हजर,
आपले सरकार पारदर्शक कारभार
सबका साथ सबका विकास
आरोपी स्वतः हून सरेंडर होताहेत,
मग पोलीस 22 दिवस काय करत होते ?
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra
हे सगळं नाटक किती प्लॅनिंगने केलं होतं बघा..
ज्याबद्दल सकाळीच आव्हाडसाहेबांनी एक ट्वीट केलं होतं. आत्ताच अशी नाटकबाजी केली जात असेल तर पुढे देशमुख कुटूंबाला न्याय कसा मिळेल?
सुरुवात 'मी वाल्मीक कराड" अशी केली...
तेव्हा एका क्षणासाठी वाटलं हा नग पुढे "ईश्वर साक्ष शपथ घेतो की" असं म्हणत शपथविधीची तयारी करतोय की काय😄
व्वा रे शरणागती.. न्यायदेवता, संतोष भैय्या, मारेकऱ्यांना फाशी, अटकपूर्व जामीन..असे शब्द पेरलेत.. वाल्मीकच्या बचावाचीच स्क्रिप्ट लिहिली आहे जणू.
पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडने सरेंडर केलं?
खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर २२ दिवस पोलिस - सीआयडी वाल्मीक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर आज सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही!
इतके दिवस वाल्मीक कराडला लपायला कोणी मदत केली? कोणाच्या संपर्कात तो होता? कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाले या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे.
महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्याविरोधात जनतेत वाढत असलेला रोष बघता अखेर त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत का?
या वाल्मीक कराडची हिंमत तर इतकी की सरेंडर होण्याआधी हा व्हिडिओ रिलीज करतो आणि स्वतःला क्लिनचीट देतो, यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट आहे.
या प्रकरणी पोलिसांनी जे कर्तृत्व दाखवले आहे ते पाहता पोलीस, सीआयडी निष्पक्ष चौकशी करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली पाहिजे आणि ही चौकशी बीडच्या बाहेर झाली पाहिजे म्हणजे कोणीही दबाव टाकणार नाही!
दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं? खरातर, ही पोलिसांसाठी नामुष्कीची बाब आहे. १७ तारखेला शेवटचा कॉल ट्रेस पुण्यात होता आणि सरेंडर पुण्यातच झाले ह्याचा अर्थ इतके दिवस ते पुण्यातच होते.
पुण्यात राहून पोलिसांना न सापडणे बुद्धीला पटण्यासारखं आहे का ? पोलिस इंटेलिजेंस काय करत होतं?
हे राजकारणी त्यांना संरक्षण देत होते ह्यात शंकाच नाही.