महाराष्ट्रातील लाखो कुटुंबं आज अतिवृष्टी व पुराच्या गंभीर संकटात अडकली आहेत. रस्ते वाहतूक ठप्प, गावे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशा परिस्थितीत २८ सप्टेंबर २०२५ रोजीची राज्यसेवा (MPSC) परीक्षा घेण्याचा हट्ट म्हणजे विद्यार्थ्यांशी अन्यायच ठरेल.
अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे अशक्य होईल, त्यांचे महिने-वर्षांचे परिश्रम पाण्यात जाऊ शकतात. “फडणवीस-शिंदे-पवार” सरकार संवेदनशील असेल तर आजच परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा करावी. लाखो उमेदवारांचे आयुष्य धोक्यात घालून परीक्षा घेऊ नका. परीक्षा पुढे ढकलणे हीच खरी जबाबदारी आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचा संताप रस्त्यावर दिसेल.
@INCHarshsapkal@mpsc_office@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Drsuvarnas
त्या हिशोबाने परीक्षा एव्हरेस्टवर ठेवली तर छान.. आणि उत्तरेत जाताना असं सौराष्ट्र कच्छ राजस्थान वाळवंट पाक सीमेवरून हिमालयात पोहचण्याची अट ठेवायची.. म्हणजे जे पोहचतील तेच तेवढे आळशी नसतील..❤️
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे अध्यक्ष आदरणीय शिवराजदादा मोरे @imshivrajmore यांच्या उपस्थित MPSC विरोधात आवाज उठवण्यासाठी आपण सर्व जण आज २६ सप्टेंबर रोजी,सायंकाळी ठीक ६.०० वाजता अहिल्या लाइब्रेरी च्या बाहेर एकत्र जमुया
🔥🔥कोणत्याही परिस्थितीत परिक्षा पुढे गेलीच पाहिजे🔥🔥
२८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा (MPSC) हजारो मुलांच्या आयुष्याचं स्वप्न, मेहनतीचं फळ, पण सध्या त्या स्वप्नावर काळ्या ढगांचं सावट आहे..
सध्या मराठवाड्यासह राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे परीक्षार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.. धाराशिव, लातूर, बीड, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आहे..
रस्ते वाहून गेले आहेत, पूल कोसळले आहेत, वीजपुरवठा खंडित झाला आहे, अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यास करणे तर दूर, परीक्षा केंद्रावर पोहोचणे सुद्धा अशक्यप्राय ठरणार आहे..
हवामान खात्याने येत्या काही दिवसांत आणखी पावसाचा इशारा दिलेला असताना परीक्षेची तारेवरची कसरत विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टांगलेली तलवार ठरते आहे.. निसर्गाच्या या भीषण आपत्तीसमोर परीक्षार्थी पूर्णपणे हतबल झाले आहेत..
अशा वेळी राज्यसेवा परीक्षा तात्काळ पुढे ढकलून मुख्यमंत्री व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मानवी संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे..
ही परीक्षा पुढे ढकलली तरच विद्यार्थांच्या मनाला दिलासा मिळणार आहे..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AUThackeray@OmRajenimbalkr@mpsc_office@Mpsc_Andolan@ShivsenaUBTComm
🔴लक्षवेधी...
@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
👉28 सप्टेंबरच्या राज्यसेवा परीक्षेचे परीक्षार्थी राज्यातील नैसर्गिक आपत्तीची आणि पाऊसाची परिस्तिथी बघता परीक्षा खरंच होईल का नाही याबाबत खूप संभ्रमात आहेत तरी तात्काळ नोटिफिकेशन प्रसिद्ध करून संभ्रम दूर करावा ही विनंती.
राज्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचणे ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी आपल्या तयारीनिशी परीक्षेला बसण्यास इच्छुक असले तरी प्रत्यक्ष परिस्थितीमुळे त्यांना संधी न मिळणे हे अत्यंत अन्यायकारक ठरेल. समान संधी मिळावी ही मराठवाड्यातील प्रत्येक विद्यार्थ्याची मूलभूत अपेक्षा आहे.
सद्यस्थितीत विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था देखील तणावपूर्ण आहे. अशा बिकट परिस्थितीत परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे आयोगाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा.
याबाबत सन्मा. उपमुख्यमंत्री ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांना काल बोललो त्यांनी लगेच सचिवांना दुरध्वनी द्वारे सुचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री महोदय यांना लेखी पत्राद्वारे परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या भावना कळविल्या आहेत. शासन या बाबत सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे.
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@mahancpspeaks@Dev_Fadnavis
अतिवृष्टीमुळे 28 Sep राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढं ढकला कारण लाखो विद्यार्थी हवालदिल झालेत.
अन्यायविरुद्ध रस्त्यावर उतरल्याशिवाय या सरकारला जागचं येत नाही.
@BaliramDoleyINC तुमच्या नेतृत्वावर MPSC विद्यार्थ्यांचा विश्वास आहे.
लढूया आणि जिंकूसुद्धा💯
@mpsc_office@CMOMaharashtra
सद्सद्विवेक बुद्धी चा वापर करावा प्रत्येक वेळेस राज्यसरकार चा आदेशाची वाट पाहणे गरजेचे नाहीये, राज्यसरकार पाहणी दौरे करत आहेत आणि आपण एक संविधानिक आयोग आहे तरी विद्यार्थीहिताचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा 🙏
"आज सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. #MPSC#mpscexam
@BaliramDoleyINC@mpsc_office आयोगाने सर्व विचार करून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा व राज्यसेवा परीक्षेची तारीख पुढे ढकलावी.. पंजाब लोकसेवा आयोगाने परीक्षेला १ महिना बाकी असतानाच परीक्षा पुढे ढकलली आहे..
मराठवाड्यात पूर परिस्थिती, विद्यार्थी संकटात, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकला, जयंत पाटील यांची मागणी
https://t.co/P4IPG2NhOB
#JayantPatil@mpsc_office#mpscexam
सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी..!
महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागात अभ्यासाचे वातावरण पूर्णपणे खराब झाले असून अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
28 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा या कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी देणे शक्य नाही. गावा-गावात अभ्यास साहित्याचे नुकसान, वाचनालये बंद, वाहतूक विस्कळीत आणि प्रशासन बचाव कार्यात गुंतलेले असताना परीक्षेला अडचणी निर्माण होत आहेत.
त्यामुळे शासन व संबंधित अधिकाऱ्यांनी याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, ही विनंती.
#पूरपरिस्थिती #अतिवृष्टी #राज्यसेवा_पूर्व_परीक्षा #postpond
#राजेश_विटेकर #पाथरी #mpscexam
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
🔶अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांनो तयारीत रहा,हाक देताच हजर व्हा.
28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा त्याच दिवशी घेण्यावर ठाम असलेल्या @mpsc_office ला
मला एकच सांगायचे आहे राज्यसेवा syllabus मधील decision making, disaster management, natural calamities यात स्वतः आयोग फक्त नापासच नाही तर negative marking मध्ये आहे.
फक्त #UPSC चा syllabus copy paste करून moral, ethics ,principle अंमलात आणता येत नसतात.
मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागताना 31 जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीचा उल्लेख करताय व ज्यांची शेती,घर,जनावरे पुरात संपले त्याच हजारो मुलांना अतिसंकटात असताना परीक्षा द्यायला लावताय.
असंवेदनशील सरकार दुटप्पीपणा दाखवत निर्दयी बनलं आहे नक्कीच.
बरोबर ना ??
@maha_governor महोदय
कुठे आहात आपण ?
@CMOMaharashtra झोपले आहे काय ??
@mieknathshinde साहेब
@AjitPawarSpeaks दादा
आपण कधी मौन सोडणार???
🔶 मुलांनो आपण लढू तयार रहा.
आत्तापर्यंत अन्यायायाविरुद्ध माझ्यासोबत लढणारे माझे सर्व सहकारी, मित्र, निःस्वार्थीपणे मदत करणारे,व माझे सर्व #MPSC उमेदवार
तयारीत रहा
लढेंगे भी और जीतेंगे भी
@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@Jayant_R_Patil@INCHarshsapkal@satejp@AbhiPawarBJP@vishwajeetkadam@OfficeofUT@OmRajenimbalkr@PuneCityPolice@CPPuneCity
मराठवाडा व विदर्भासह राज्यातील अनेक भाग सध्या अतिवृष्टी आणि महापुराच्या विळख्यात आहे. हजारो कुटुंबे उध्वस्त झाली, शेतजमिनी वाहून गेल्या, घरे पाण्याखाली गेली. या अशा आपत्तीच्या काळात राज्यातील हजारो विद्यार्थी आपल्या कुटुंबासोबत संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत २८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा इतकी अत्यावश्यक का ठरवली जाते आहे, हा गंभीर प्रश्न आहे.
नुकतेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) यांनी पूरस्थिती लक्षात घेऊन आपली परीक्षा पुढे ढकलली. मग महाराष्ट्र लोकसेवा आयोग विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे डोळेझाक का करत आहे? हवामान खात्याने २८ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या रेड अलर्ट कडे दुर्लक्ष करून परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणे आहे.
परीक्षा काही दिवस पुढे ढकलल्याने आयोगाचे काहीही नुकसान होणार नाही. मात्र या नैसर्गिक आपत्तीच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षेला बसणे शक्य नसेल, तर त्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर होईल.
त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीचा आदर करत, त्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा आणि २८ सप्टेंबर रोजीची राज्यसेवा पूर्व परीक्षा तातडीने पुढे ढकलावी.
@mpsc_office@CMOMaharashtra@MahaDGIPR@MahaChiefSec@Dev_Fadnavis
#marathwadaflood #mpsc #marathwadafloods #mpscexam #Maharashtra #MaharashtraFloods
अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचा विचार करून, २८ सप्टेंबर २०२५ रोजी नियोजित असलेली ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा’ पुढे ढकलण्याची नम्र विनंती. 🙏
@CMOMaharashtra@MahaDGIPR@MahaChiefSec@Dev_Fadnavis@mpsc_office
सीना नदीला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या माढा तालुक्यातील सीना दारफळ येथे आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय @Dev_Fadnavis साहेब यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रसंगी त्यांच्या समवेत उपस्थित होतो. यावेळी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासनास तातडीने सूचना दिल्या असून शेतकऱ्यांना तत्काळ मदत आणि सर्वतोपरी सहकार्य करण्यात यावे असे त्यांनी सांगितले आहे
#अतिवृष्टी
#पूर_परिस्थिती
#आपत्ती_व्यवस्थापन
#सीना
#माढा
मराठवाड्यात पूरस्थिती गंभीर आहे. अनेक गावे पाण्याखाली, वाहतूक ठप्प आहे. अशा कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेता २८ सप्टेंबरची #MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा घेणे अन्यायकारक ठरेल.
विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, त्यांनी केलेल्या अभ्यासाचे योग्य फळ मिळावे यासाठी आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, ही समस्त विद्यार्थ्यांच्या वतीने आमची विनंती आहे.
#mpscexam