मा. अध्यक्ष,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
3 जानेवारीला नियोजित "महाराष्ट्र अराजपत्रित गट क पूर्व परीक्षा 2026" कोणत्याही कारणे आता पुढे ढकलू नये अशी समस्त महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची विनंती आहे.
@mpsc_office@CMOMaharashtra#गट_क_पूर्व_परीक्षा_2026#Mpsc
@Nikhil_A_Patil सर आमची ती "गट क" ची परीक्षा पुढे जाणार नाही तेवढी काय ते प्रयत्न करा..
घरच्या कडून आता धीर निघत नाहीये !
शेतात दुष्काळ आहे आणि घरी कमावणार कोणी नाही..
पुण्यात एका वेळेचे जेवण करून दिवस काढतोय आम्ही !
@Dev_Fadnavis@mpsc_office
सर्व संस्था चे खासगीकरण सुरू आहे
कोणी नगरसेवकांच्या जवळचे आहे तर कोणी अधिकाऱ्यांच्या
आजी माजी सगळे फक्त ओरबाडून घेत आहेत
शाळा सुद्धा खासगीकरण सुरू आहे
अश्याच प्रकारे पदभरती सुरू राहिली तर काही वर्षांनी पुणे मनपा मध्ये फक्त आयुक्त हेच सरकारी पद राहील बाकी सगळ खासगीकरण होईल..!
क्र. ३ जागा वाढ होणार नाही?
काय डोक्या वर पडलेत की काय?
मुख्यमंत्र्याच्या शब्दाला किंमत नाहिये का ? @Dev_Fadnavis
१३ लाख मुलांना ५-६ हजार जागा मधे शांत मरायला सोडायचं आधी पूर्ण वर्ष एक भरती काढली नाही तुम्ही आता या मध्ये पण हा फालतु पना 🤬
#mpsc@mpsc_office@bhimanwar
@RRPSpeaks भरती वाढवणे नवीन भरती चा जाहिरात काढा हे मुद्दा विसरले आज 65000 जागा निघणार होत्या 2026 मध्ये
प्रत्यक्षात MPSC GROUP-C 2026 मध्ये मात्र 5077
नगर पारिषद गट क , गट ड
जलसंपदा विभाग गट क , गट ड
आरोग्य विभाग गट क , गट ड
जिल्हा पारिषद गट क , गट ड
जिल्हा न्यायालय गट क , गट ड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे एमपीएससीच्या राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा केली. त्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे असे:
▪️औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीचा सखोल तपास सुरू. आम्हाला प्रणाली सुधारण्यात रस, लपवण्यात नाही. हा तपास संपलेला नाही, तो शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्यात येईल.
▪️ एकूणच सर्वंकष सुधारणांसाठी श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेत नवीन समिती. सर्वांचा विश्वास आहे, अशाच अधिकार्यांची नियुक्ती. ही समिती राज्यभर जाणार आणि सर्व विभागात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधितांशी चर्चा करणार. या समितीपुढे आपले प्रश्न आणि सूचना खुलेपणाने मांडा.
▪️ गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 ची चौकशी करणार
▪️ विद्यार्थ्यांच्या इतरही ज्या तक्रारी असतील, त्याच्या निराकरणाची यंत्रणा उभारणार. एसआयटी त्याचा तपास करेल.
▪️ माहिती अधिकारात उत्तरपत्रिका द्यावी, अशी शिफारस एमपीएससीला करण्यात येईल.
▪️ इतरही परीक्षा, ज्यात तक्रारी त्याची फेरतपासणी आणि तोवर मुलाखती थांबवण्यात येईल. कुणाच्याही मनात कोणतीही शंका राहून दीर्घकालीन उपाययोजना आपण करु शकणार नाही.
▪️ गुन्हे शाखेचा तपासाचा प्राथमिक अहवाल सार्वजनिक करण्यात येईल.
▪️ लेंडवे, मराठे, नखाते यांच्या काळात झालेल्या सर्व परीक्षांची चौकशी एसआयटीमार्फत करणार
▪️ राजूरकर कमिटी शिफारसींची पडताळणी करू, योग्य शिफारसींची अंमलबजावणी करणार
▪️ पोलिस भरती: दोन्ही पायाला चीप किंवा आणखी काही पर्याय देणार, प्रत्येक जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी गुणांचा एकच पॅटर्न करणार
▪️सारथी, बार्टी, महाज्योती याबाबतच्या प्रश्नांचे समाधान करणार
▪️मुलाखती संदर्भात गाईडलाईन ठरवणार, तसे समितीला सूचित करणार
▪️ पीएमसी आणि एमएमआरडीए परीक्षांची सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई करणार
▪️ एमपीएससी अध्यक्ष, सचिव यांच्याविरोधात कोणताही पुरावा दिला, तर स्वतंत्र चौकशी करायला तयार, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच, कुणालाही वाचवण्याचा प्रश्नच येत नाही.
▪️ कालबद्ध कारवाई करणार, पुढच्या 8 दिवसात ही प्रक्रिया प्रारंभ करणार
▪️ पुढच्या परीक्षा फुलप्रूफ व्हाव्यात, म्हणून लांबणीवर. प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने भरतीप्रक्रिया होत असल्याने संपूर्ण यंत्रणा सज्जतेनंतरच ती घेणार. पारदर्शिता हाच मुख्य निकष असणार.
▪️ एमपीएससीमध्ये समर्पित तक्रार निवारण कक्ष, सेवानिवृत्त न्यायाधीश त्यासाठी नियुक्त करण्यात येईल.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #MPSC
गावातली सगळ्यात गरीब बाई दर महिन्याला बँकेत फक्त ११ रुपये जमा करायची. लोक तिची थट्टा करायचे. पण ज्या दिवशी तिच्या मृत्यूनंतर बँकेचा लॉकर उघडण्यात आला, संपूर्ण बँकेत शांतता पसरली...
रामपूर गावातल्या कमला देवी एका मोडक्या झोपडीत राहायच्या.
पतीला जाऊन पंधरा वर्षे झाली होती.
ना मुलगा...
ना मुलगी...
ना कोणी आपलं.
सकाळी लोकांच्या घरी भांडी घासायच्या, दुपारी शेतात मजुरी करायच्या आणि संध्याकाळी मंदिराबाहेर बसून माळा बनवायच्या.
गावकरी म्हणायचे -
"अगं कमले, स्वतःकडे खायला नाहीये, बँकेत पैसे जमा करून काय करणार?"
त्या फक्त हसून सोडून द्यायच्या.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला त्या जुनेच कपडे घालून बँकेत जायच्या आणि काउंटरवर ११ रुपये ठेवायच्या.
कॅशियर सुद्धा हसायचा.
"आई, याने काय होणार?"
कमला देवी दर वेळी एकच उत्तर द्यायच्या -
"बाळा... रक्कम नाही, नियत जमा करतेय."
वर्षं निघून गेली.
लोक त्यांची थट्टा करत राहिले.
एका पावसाळी रात्री थंडी लागून कमला देवींचा मृत्यू झाला.
त्यांच्या झोपडीत असं काहीच नव्हतं ज्याला वारसा म्हणता येईल.
पोलिसांनी औपचारिकता म्हणून बँकेला कळवलं.
दुसऱ्या दिवशी बँक मॅनेजरने त्यांचे पासबुक काढले.
खरंच...
दर महिन्याला ११ रुपये जमा झाले होते.
जवळपास तीस वर्षं.
मॅनेजरने विचार केला, "एवढ्या छोट्या रकमेचं काय महत्त्व?"
पण रेकॉर्डमध्ये आणखी एक गोष्ट नोंद होती -
"वारसदार (Nominee): गावातील प्राथमिक शाळा."
संपूर्ण बँक चकित झाली.
शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलावण्यात आले.
जेव्हा नियमानुसार खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा बँकेच्या जुन्या रेकॉर्डमधून एक सीलबंद पाकीट निघाले.
त्यावर लिहिले होते -
"माझ्या मृत्यूनंतरच उघडावे."
मॅनेजरने थरथरणाऱ्या हातांनी पाकीट उघडले.
आत एक चिठ्ठी होती -
"जर ही चिठ्ठी वाचली जात असेल, तर समजा मी या जगात नाही.
मी कधीच शाळेचं तोंड पाहिलं नाही.
गरिबीने लहानपणी पुस्तकाऐवजी माझ्या हातात झाडू दिला होता.
एक दिवस शाळेबाहेरून जात होते. आत मुलांची प्रार्थना चालू होती. तेव्हाच मी एका लहान मुलीला रडताना पाहिलं.
तिच्याकडे परीक्षेची फी नव्हती.
त्या दिवशी मी ठरवलं की मी कितीही गरीब राहिले... तरी दर महिन्याला थोडं ना थोडं वाचवेन.
रक्कम छोटी असेल... पण कोणत्याही मुलाचं स्वप्न छोटं असता कामा नये.
माझ्या खात्यात जितकेही पैसे असतील... त्यातून दर वर्षी त्या मुलाची फी भरा जो शिकू इच्छितो पण गरिबीमुळे मागे राहतो.
माझी एकच अट आहे... त्या मुलाला कधीही सांगू नका की फी कोणी भरली.
जर त्याला माझं नाव कळलं, तर माझ्या दानाची किंमत कमी होईल.
फक्त त्याला एवढंच सांगा -
'जेव्हा तू मोठा होशील, तेव्हा दुसऱ्या एखाद्या मुलाला मदत कर.'
चिठ्ठी वाचता वाचता बँक मॅनेजरचा आवाज भरून आला.
मुख्याध्यापकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
काही दिवसांनी हिशोब लावण्यात आला.
तीस वर्षं जमा केलेले ११ रुपये, त्यावर मिळालेले व्याज आणि बँक कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा योगदानाला मिळून एक छोटीशी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली.
तिचं नाव ठेवण्यात आलं -
"अनामिक आशा"
पहिल्याच वर्षी पाच गरीब मुलांची फी भरली गेली.
मुलांनी विचारलं -
"सर, आमची फी कोणी भरली?"
मुख्याध्यापक हसले आणि म्हणाले -
"एका अशा आईने... जिला स्वतःची मुलं नव्हती, पण जिने अख्ख्या गावच्या मुलांना आपलं मानलं होतं."
त्या दिवशी गावातले तेच लोक, जे कधी कमला देवींच्या ११ रुपयांवर हसायचे, शाळेबाहेर उभे होते.
कोणाचीही हिंमत झाली नाही की मान वर करून शाळेच्या इमारतीकडे पाहावं.
त्यांना पहिल्यांदाच समजलं -
गरिबी खिशाची असते...
इराद्यांची नाही.
कमला देवी निघून गेल्या...
पण दर वर्षी जेव्हा एखाद्या गरीब मुलाच्या हातात नवीन पुस्तक यायचं, तेव्हा असं वाटायचं जणू त्या अजूनही हसत-हसत म्हणत आहेत -
"रक्कम नाही बाळा... नियत जमा कर."
C/P
NEET पेपर फुटले,MPSC पेपर फुटले,
हे, आभाळा तुला फुटायला सरकार मदत करणार नाहीये, तुझ तुळाच फुटावं लागणार आहे.
आज बैलपोळा आहे , या निमित्ताने का होईना
तू फुट आणि शेतकऱ्याची पोळी गोड कर...
#दुष्काळ_पेपरफुटी_MPSC_शेतकरी
परीक्षा पुढे ढकलल्याने कोचिंग क्लासेसना टेस्ट सिरीज, नोट्स आणि नवीन बॅचेस विकण्यासाठी अधिक वेळ मिळतोय. पण #MPSC च्या एवढ्या मोठ्या विलंबाविरोधात आवाज उठवायला कोणी तयार नाही.
याची किंमत मात्र विद्यार्थ्यांना पैसा, मानसिक त्रास आणि मौल्यवान वेळ गमावून मोजावी लागते. #Pune
२५ ऑक्टोबरची MPSC गट-क परीक्षा थेट ३ जानेवारीला!
परीक्षा तोंडावर आली असताना अचानक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय म्हणजे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या वेळेचा, मेहनतीचा आणि भविष्याचा अवमान आहे.
केंद्रांची अनुपलब्धता, वाहतूक, सणासुदीचा काळ, इतर परीक्षांचे वेळापत्रक, ही कारणे आज अचानक निर्माण झाली आहेत का? परीक्षेची तारीख जाहीर करताना MPSC ने याचे नियोजन का केले नाही? विशेषतः यापूर्वीही परीक्षा वेळापत्रकात वारंवार बदल झाले असताना, आता पुन्हा तीन महिने परीक्षा लांबवण्यामागील नेमके नियोजन आणि निर्णयप्रक्रिया आयोगाने सार्वजनिक करावी. विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत आधीच प्रश्न आहेत. त्यामुळे या निर्णयामुळे निर्माण झालेल्या प्रत्येक संशयाचे स्पष्ट आणि तथ्याधारित निराकरण करणे ही आयोगाची जबाबदारी आहे.
गरीब शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलांनी MPSC साठी वर्षानुवर्षे तयारी करायची आणि आयोगाच्या नियोजनातील त्रुटींची किंमत त्यांनीच का मोजायची?
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हा खेळ तातडीने थांबवा. MPSC ने पारदर्शक स्पष्टीकरण द्यावे आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा संपादन करावा.
@mpsc_office@INCMaharashtra@bhimanwar
#MPSC #MPSCExam #ExamPostponed #StudentsJustice #ChhatronKiGoonj
2026 ची परीक्षा आता आयोग 27 ला घेणार वा म्हणजे आणखीन एक वर्ष विद्यार्थ्यांचे वाया घालवणार आहे लवकरात लवकर नवीन तारीख द्यावी आणि ती जवळची असावी. असा मनमानी कारभार चालणार नाही आत्महत्या करता येतो विद्यार्थी जरा तरी विचार करा.
CM साहेब, MPSC ने पोरांचा खेळ मांडला आहे त्याबद्दल त्यांना तुमच्या प्रेमळ 🤬 भाषेत समज द्या.. MPSC च्या परीक्षा वेळेवर घ्यायची लायकी नसेल पूर्ण बरखास्त करा, पोरांची वर्षे का वाया घालवत आहात , याची पोरं श्रीमंत बापाची आहेत.. आम्ही नाहीत
@CMOMaharashtra
मा.@Dev_Fadnavis साहेब,
मी विदर्भातून आलेला (पुण्यात)गरीब घरचा मुलगा आहे,
आयोगाने ३ महिने पेपर पुढे ढकलला त्या मुळे माझी आर्थिक कोंडी होतेय
गावा कडे दुष्काळ पडल्या मुळे आणि वडील नसल्या मुळे मी घरी पैसे मागू शकत नाही आणि त्यांच्या कडे ते पण नाहीत.
विनंती करून माझी मदत करावी🙏😓